द्राक्ष पिकावर विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पीक सौरक्षणाच्या दृष्टीने त्या रोगांची लक्षणे माहित असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यात रोग, रोगांचा प्रसार, लागणीची तीव्रता यावरून रोगास कारणीभूत असलेल्या रोगजंतूंची माहिती असणे गरजेचे असते. द्राक्ष पिकामध्ये बुरशी (र्ऋीपर्सीी), जिवाणू (इरलींशीळर), विषाणू (तर्ळीीी) या प्रमुख जैविक कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वेळीच रोगाची ओळख करून त्यांचे नियंत्रणाकरिता किंवा उच्चाटनाकरिता कृती करणे महत्त्वाचे असते. रोगाचे निदान झाल्याशिवाय उपाय योजने चुकीचे ठरते. त्याकरिता द्राक्ष पिकात आढळणारे रोग, त्यांचे जीवनक्रम आणि उपाय आदीची महत्त्वाची माहिती असणे आवश्य असते.
1. केवडा (Downy mildew)
द्राक्ष पिकात या रोगाची लागण प्लझमोपॅरा व्हीटीकोला (झश्ररीोरिीर तळींळलेश्रर) या बुरशीपासून होत असते. या बुरशीचे धागे एक पेशीय नळीच्या आकाराचे असतात. या बुरशीचे चर बीजूक वेलींच्या भागावर वाढत असताना आपली मुळे (हॉसस्टोरिया) वेलीच्या पेशीत प्रवेशतात. यांचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो. पानाच्या आतील भागात वाढणारी बुरशी त्वचारंध्रामधून बाहेर दांडे काढतात व त्यावर अगणीत चर बुजूक तयार करून वारा, पावसाच्या मदतीने निरोगी भागावर पसरून रोगाचा प्रसार करतात.
प्रसार कसा होतो ?
भौतिक गुणधर्म हरवलेल्या जमिनीमध्ये तसेच आर्द्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाला दमट वातावरण अनुकूल असते. या रोगाची लागण द्राक्ष पिकात पाने, फुले व घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात व रोगग्रस्त भाग निकामी होतो. या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते. हा रोग द्राक्ष पिकात हमखास येणारा रोग आहे.
रोगाची लक्षणे :
या रोगाची लक्षणे वेलीच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात. हिरव्या पानावर सुरुवातीस लहान तेलकट डाग पडतात. पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते. दमट हवामानात तो भाग रोगग्रस्त होऊन वेलीवरून गळतो. हा रोग दमट वातावरणात बुरशीला दीर्घकाळ पोषक असल्यास संपूर्ण कोवळी पाने, फुले, फळे यावर आक्रमक होतो. या रोगामुळे द्राक्ष वेलही जळून मरते आणि द्राक्ष मणी अर्धवट वाढतात. रोगग्रस्त मण्याच्या गाभ्यात व देठावर बुरशी वाढते. त्यामुळे मण्याची कातडी जाड व सुरकुतलेली, करड्या रंगाची जाळीयुक्त होते. रोगग्रस्त भागातील पेशी तपकिरी होतात.
बुरशीचा जीवनक्रम
प्लझमोपॅरा व्हीटीकोला शेवाळ कवक वर्गातील बुरशी असून तंतू सलग पटलरहित असतात. पण तंतू जुनी झाल्यावर पटल आढळतात. या बुरशीचे कवक तंतू दमट हवामानात बिजूकपुंज तयार करतात. ही बिजूकपुंज रन्ध्रातून अथवा अपित्व भेदून आत प्रवेश करतात. आत बिजूकपुंज रुजून रन्ध्रातून 5-6 बीजूकदंड बाहेर येतात. ही बीजूक दंडाची संख्या निश्चित नसून ती 20 पर्यंत असू शकतात. या बीजूक दंडावर फांद्या येतात व त्यावर उपफांद्या येतात. प्रत्येक फांदीच्या अग्रावर गोल वीबिजूक तयार होतो. विबीजूक चरबीजुकत तयार करतात. चर बीजुकात हालचाल तयार होऊन आवरणयुक्त होतात व जनन नलिका तयार करून बीजूक रुजून निरोगी भागावर प्रदुर्भावीत होतात. या रोगाचा प्रसार रोगट पानात तयार होणार्या लैंगिक बिजाद्वारे, वेलीवर राहिलेल्या हिरव्या रोगग्रस्त पानाद्वारे अथवा वेलीवरील सुप्थ डोळ्यामध्ये असलेल्या बुरशीच्या तंतुमुळे होते. विबिजूक तयार होण्यास 12 अंश सेल्सिअस ते 13 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर बीजूक रुजवण्याकरिता 18 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. बीजूक रुजवण्यास व बुरशीची आक्रमक वाढ होण्यास 70 ते 95 टक्के आर्द्रता आवश्यक असते. या रोगाच्या झपाट्याने वाढीकरिता जमिनीतील हवेतील व वेलीतील पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे असते. या रोगाचा प्रादुर्भाव पावसात अधिक वाढल्याचे आढळते. आठवड्याचे अंतराने पाऊस पडत असल्यास या रोगाच्या वाढीस गती मिळते. जमीन निकृष्ट दर्जाची असल्यास आणि या रोगाच्या जीवक्रमास अनुकूल परिस्थिती असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते.
रोगाचे नियंत्रण :
संरक्षक बुरशीनाशक म्हणून 1% बोर्डोमिश्रण किंवा डायथीओकार्बोमेटची फवारणी करणे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास थायोफीनेट मिथेल किंवा रीडोमील 0.256% तीव्रतेची फवारणी करावी. या रोगामुळे श्वसन क्रियेत बदल होत असल्यामुळे वाढती विकृती आढळते.
2) करपा (Anthracnose)
द्राक्ष पिकात करपा रोगाची लागण एल्सिनॉई अंप्लिना (एश्रीळपेश राश्रिळपर) किंवा स्पोसिलोमा अॅम्पेलिनम (डहिरलशश्रेार राशिश्रळर्पीा) या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार युरोपियन देशातून झाला. मात्र युरोपमध्ये 1985 साली आणि नंतर ताम्रयुक्त औषधाच्या वापरामुळे या रोगाचे प्रमाण बरेच कमी झाले, पण सेंद्रिय बुरशीनाशकांची वापरामुळे काही भागात रोगाचे प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले. या बुरशीचे धागे अनेक पेशीय असतात व दाट झुपक्याने एकत्र आढळतात. या रोगाचा प्रादुर्भाव व जीवनक्रम संपल्या नंतर त्याच भागावर सुप्त अवस्थेत जातात. व पुन्हा अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच बीजे तयार होऊन रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो. या रोगाचा प्रसार वारा, पाऊस या माध्यमामधून होतो.
रोगाची लक्षणे
करपा रोगामुळे द्राक्षाच्या पानावर बारीक ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार गोल किंवा कोनात्मक असतो. ठिपक्याची कडा तपकिरी रंगाची असते. रोगग्रस्त पानावर असंख्य ठिपके येतात. त्याची वाढ झाल्यावर एकमेकांत मिसळून संपूर्ण पाने करपते व त्यावर सुरुवातीच्या लागणीच्या ठिकाणी भोके पडतात. या सुरुवातीची लागण बहुधा कमकुवत कोवळ्या पानावर होते. नवीन फुटीवर जास्त प्रादुर्भाव झाल्यास शेंड्याचा भाग करपतो. मध्यम रोगग्रस्त पाने वेडीवाकडी व आकारहीन दिसतात. पानाप्रमाणे हा रोग द्राक्ष काड्यावरही आढळतो. सुरुवातीला जांभळट-तपकिरी रंगाचे उभट गोलाकार किंवा कोनात्मक ठिपके आढळतात. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून ठिपक्यांचा मधला भाग खोलगट होतो. त्यांची व्याप्ती काष्ठा पर्यंत होते. या रोगाची लागण पिक उत्पादनाच्या वेळी केव्हाही होते. फुलोरा असतानाही प्रादुर्भाव झाल्यास द्राक्षाचा फुलोरा करपून नष्ट होतो. मण्यावर प्रादुर्भाव असल्यास त्या ठिपक्यांचा आकार पक्षाच्या डोळ्यांसारखा होतो. त्यामुळे काही ठिकाणी बर्ड्स आयस्पॉट’ म्हणूनही ओळखत असतात. या रोगामुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढते.
बुरशीचा जीवनक्रम
जुन्या भागातील सुप्तावस्थेतील बीजूक अनुकूल परिस्थिती 24 तासच अलैगिक बीजूक तयार होतात. पाऊस व वारा प्रसार माध्यमाद्वारे निरोगी हिरव्या भागावर पसरतात. अनुकूलता असल्यास वेलीच्या आंतर भागास बुरशीचे धोके रुजतात व गतीमान वाढ होण्यास सुरुवात होते. 32 अंश सेल्सिअस तापमान तीन-चार दिवस असल्यास व पाऊस असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
रोगाचे नियंत्रण
रोगग्रस्तभाग छाटून नष्ट करावा. पिकांची काढणी झाल्यावर बुरशीग्रस्त भाग किंवा जुन्या रोगग्रस्त फांद्या नष्ट करून द्राक्षबाग स्वच्छ ठेवावी. बाग करपा मुक्त ठेवण्यासाठी बुरशी संरक्षण म्हणून 0.2% किंवा 0.4 तीव्रतेची बोर्डोमिश्रणाची फवारणी 20 ते 25 दिवसाच्या अंतरांनी करावी. पिकाची रोग-प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
3) भुरी (Powdery mildew)
द्राक्ष पिकात या बुरशीचा प्रादुर्भाव ‘अनसिन्युला निकेटर’ (Uncinula necator) या बुरशीपासून होत असते. या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव 1834 साली अमेरिकेत आढळून आला. भारतात द्राक्ष पिकातील हा एक महत्त्वाचा रोग असून या रोगाला अनुकूल वातावरण उपलब्ध झाल्यास विराट रूपधारण करते. या रोगाच्या तडाख्याने 1950-55 वर्षी फ्रान्समध्ये होऊन संपूर्ण द्राक्ष पिकाचे नुकसान झाले होते. भारतात या रोगाची लक्षणे ऑक्टोबर छाटणीनंतर थंड हवामान व बेताची आर्द्रता असल्यास आढळते.
रोगाची लक्षणे
या रोगाचा प्रादुर्भाव वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढते. मात्र अन्नद्रव्य शोषणाकरिता बुरशीची मुळे (हॉस्टोरिया) पृष्ठपेशी (एपिडरमल सेल्स)मध्ये प्रवेश करतात. या बुरशीची सुरुवातीची लक्षणे पिवळसर पांढरट रंगाचे ठिपके व नंतर भुरकट पांढर्या रंगाचे दिसतात. हे ठिपके संपूर्ण पानावर पसरून काळपट दिसतात. पिकाचा सर्व भाग रोगग्रस्त होतो. रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी अनियमित आकाराची होतात. काही मणी अपक्वच राहतात. फुलोरा अवस्थेत या रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही व फार मोठे नुकसान होते. यात विशेष म्हणजे मण्यात साखरेचे प्रमाण 8 टक्के पेक्षा पुढे गेल्यास घडावर या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
बुरशीचा जीवनक्रम
सुप्ताअवस्थेमधील या बुरशीचे धागे वेलीच्या सुप्ता डोळ्यात जिवंत राहते. या बुरशीचे धागे वेलीच्या डोळांना आश्रीत भाग म्हणून उपयोग करून एक हंगामापासून दुसर्या हंगामापर्यंत जिवंत राहतात. अनुकूल परिस्थिती उपलब्ध होताच सुप्त डोळ्यांतील धागे वाढून नवीन कोवळया फुटीवर रोगाची लागण करतात. त्या ठिकाणी बुरशीची वाढ होऊन बीजूक तयार होऊन रोगाचा प्रसाराचा परीचक्र सुरू होतो. या बुरशीची वाढ वातावरणातील आर्द्रता, तापमान व सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. हवेत 40 ते 100 टक्के आर्द्रता आणि 20 ते 24 अंश सेल्सिअस तापमान असताना रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने होतो. 35 अंश सेल्सिअस तापमानात रोगाची तीव्रता कमी होते आणि 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास या बुरशीचा नाश होतो. पानाच्या पृष्ठभागावर पाण्याचे तुषार साचल्यास अथवा पाऊस पडल्यास या बुरशीच्या प्रसारास आळा बसतो.
रोगाची नियंत्रण
या बुरशीच्या प्रादुर्भाव पूर्व संरक्षणाकरिता गंधकाची भुकटीची धुरळणी किंवा पाण्यातून फवारणी कमी किंमतीचा प्रभावी उपाय आहे. या बुरशीचा प्रार्दुभाव आढळल्यास बेनोमील (बेनलेट), बेलेटॉन 0.25 तीव्रतेचे द्रावण निवारक म्हणून फवारावे अथवा जास्त प्रादुर्भाव असल्यास ॲझाक्सीस्टोपीन 23 ईसी (A°{‘ñQ>ma) 200 मिली एकर या प्रमाणात फवारणी घ्यावी. तसेच बागेत खेळती हवा व सूर्यप्रकाश पडेल अशी व्यवस्था करावी.
डॉ. कुणाल सूर्यवंशी, सहाय्यक प्राध्यापक,
श्रीमती श्वेता शेवाळे, वनस्पती रोगशास्त्र विभाग
म. वि. प्र. कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक.
संपर्क (लेखक) : 942164181