नियंत्रित हवामानात द्राक्ष पिकांचे दर्जेदार उत्पादन कसे घेता येईल

डिजिटल बळीराजा-2    12-Jan-2020
Havaman Badal_1 &nbs
 
हवामान बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर होत आहे. द्राक्ष शेतीही याला अपवाद नाही, नियंत्रित हवामानात द्राक्ष पिकांचे दर्जेदार उत्पन्न कसे घेता येईल या संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळेल. 
 
हवामान बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर होत आहे. द्राक्ष शेतीही याला अपवाद नाही यावर्षी सर्वच विभागामध्ये थोड्याफार फरकाने पाण्याचे दुभिक्ष जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये ‘मल्चिंग’ अर्थात आच्छादनाचा वापर करून नंतर येणार्या समस्यांवर प्रभावीपणे मात करता येऊ शकेल. खास करून छाटणी नंतर सुरुवातीचे 30 दिवस पाण्याचा ताण पडू देऊ नये. यासाठी मुळाच्या कार्यक्षेत्रात सतत वाफसा राहील याची काळजी घ्यावी लागते.
 
मल्चिंग किंवा अच्छादन म्हणजे काय?
 
द्राक्षबागेमध्ये जमिनीवर जैविक किंवा अजैविक पदार्थांचा थर पसरविण्यात येतो यालाच आच्छादन असे संबोधले जाते. यासाठी खालील गोष्टींचा वापर केला जातो.
 
1) माती, दगड किंवा दगडांचा चुरा :
 
NA_2 H x W: 0
 
निंदणी किंवा कोळपणी करताना मातीच्या वरच्या थरामध्ये केली जाणारी उलथापालथ व त्यामुळे मातीच्या वरच्या थराचा खालील थरांवर होणारे संचयन हे आच्छादनाचाच एक प्रकार आहे. याचे परिणाम काही कालावधीसाठी मिळतात. अग्निजन्य खडकाची पुड व कच (दगडाचा चुरा) यांच्या वापरावर अनेक संदर्भ आढळून येतात. अन्नद्रव्याच्या प्राथमिक पुरवठा करता यावा म्हणून याचा परदेशात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
 
2) लाकडाचा भुसा व सुगीमधील तत्सम टाकाऊ पदार्थ :
 
NA_1  H x W: 0
 
लाकडाचा भुसा, गहू, बाजरी, ज्वारी व इतर धान्यांच्या मळणीनंतर शिल्लक राहणारा भुसा, तसेच साखर कारखान्यांनी व बगॅस याचा आच्छादनासाठी वापर करता येतो.याचा 2.4 इंचाचा थर यासाठी आवश्यक असतो. 
 
जैविक घटक, अजैविक घटक 
 
1) जैविक घटक : 
 
यात प्रामुख्याने वेलीवर होणार्या रोग व किडींचा प्रादुर्भाव याचा सामावेश होतो. बुरशीजन्य रोगांमुळे वेली वरील पाने पूर्णपणे अकार्यक्षम होऊ शकतात. यामुळे खरड छाटणीच्या काळात अन्नसाठ्यावर व फळकाढणीच्या काळात हाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घट येऊ शकते. त्याचबरोबर द्राक्षबागेत वाढणार्या अमीद तणांमुळे देखील वेलींची वाढ खुंटून त्यावर विपरित परिणाम दिसू शकतात. तणे द्राक्षवेलीशी पाणी व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे वेलींची वाढ खुंटते.
 
2) अजैविक घटक : 
 
यात प्रामुख्याने जमिनीतील व वातावरणातील घडून येणार्या घटकांचा समावेश होतो. प्रथम आपण वातावरणात होणार्या बदलामुळे होणार्या ताणाविषयी माहिती घेऊ. वातारणातील बदल होऊन वेलींवर ताण निर्माण करणारे घटक.
 
1. अवर्षण परिस्थिती.
 
2. अति पाऊस (दलदलयुक्त परिस्थिती)
 
3. जास्त तापमान
 
4. अती थंडी
 
5. गारपीट
 
1) अवर्षन परिस्थिती : सध्याच्या परिस्थितीत सर्वच द्राक्ष उत्पादक विभागात अवर्षणाची स्थिती आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अवर्षण परिस्थिती निर्माण होते. जेव्हा वेलींतील पेशी किंवा उतींमध्ये नियमित पातळीपेक्षा कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होते. यावेळी पाण्याची कमतरता किंवा ताण आहे असे मानले जाते. वेलींची क्रिया मंदावते. वाढ थांबते. तसेच पानांच्या वाढीवर परिणाम होतो. पानांचा आकार महत्त्वाचे घटक आहे. त्याच्यावर प्रकाश संश्लेषण क्रिया अवलंबून असते. मुळांच्या कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने नवीन मुळी किंवा पांढरी मुळी वाढत नाही. यासाठी मल्पिंग करणे अत्यावश्यक असते. त्याविषयी माहिती आपण मागील पृष्ठावर दिली आहे. 
 
2) अतिपाऊस : जमिनीत ज्या भागात मुळांची वाढ होते. त्या भागात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे तेथील माती दलदलयुक्त होते. अशी परिस्थिती महिनाभर राहिल्यास जमीन पाणीमय होते. त्यामुळे जमिनीतील वायुविजन थांबते. त्यामुळे वाढ तसेच कार्यक्षमता कमी होते. याचा वेलीच्या वाढीवर परिणाम होऊन वेलींची वाढ थांबते व अन्नद्रव्यांचे कमतरता निर्माण होते. वातावरणातील इथिलिनची पातळी वाढते व वेलींच्या ओलांड्यावर तंतुमुळांची वाढ होते. त्यासाठी जमिनीमध्ये वाफसा राहीन याची काळजी घ्यावी. 2)उताराच्या दिशेने नांगराने चर काढावेत. 3) कुठल्या प्रकारची फवारणी घेणे टाळावे. 
 
3) तापमान : प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी 25-30 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. परंतु हेच तापमान द्राक्षाच्या इतर वाढीस योग्य असते असे नाही कारण काही पिष्टमय पदार्थांचे वहन व त्यांच्यामुळे पाने, फळे यासाठीचा वापर या वेगळ्या तापमानात चांगल्या प्रकारे होऊ शकतात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया 30 अंश से. पेक्षा जास्त तापमानात मंदावते. व 45 अंश से. ला ती शून्य होते. अधिक तापमानात श्वसनाचा वेग प्रकाश संश्लेषणाच्या तुलनेने कमी होते. 
 
4) कमी तापमान : जर तापमान मोठ्या प्रमाणावर कमी झाले तर वेलीवर अनिष्ठ परिणाम घडून येतात. कडक थंडीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या आसपासचे तापमान दहा अंश सें. कमी होते. बर्फासारख्या पांढर्या कणांचा थर पानांवर निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम पानांवर तसेच घडांवर दिसून येतो. कडक थंडीमुळे चांगल्या अवस्थेत दिसणारी द्राक्ष वेल तपकिरी रंगाचे किंवा पूर्णपणे जळाल्याचे दिसून येते. तसेच गारपीटीमुळे देखील मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होऊ शकतो. गारपीट झाल्यावर 28 तासात गारपीट झालेल्या जमिनीचे तापमान झपाट्याने कमी होते. अचानक झालेल्या तापमान बदलांमुळे वेलीला अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी हेाते. तसेच संप्रेरकांमध्ये असमतोल निर्माण होतो. जमिनीचे तापमान पुर्णवत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. याचा वेलीवर अनिष्ठ परिणाम होऊन वेलींवर ताण निर्माण होतो. 
 
5) अतिक्षार व खार यामुळे होणारी हानी : क्षारयुक्त जमिनीमध्ये एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण हे जास्त असल्यास हानीकारक ठरते. प्राथमिक अवस्थेत क्षारांमुळे वेलींच्या पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो व वेलींची वाढ खुंटते. जास्त प्रमाणात क्षार असल्यास पाने जळणे तसेच पाने गळून पडणे असे परिणाम वेलींवर दिसून येतात. अतिशय जास्त प्रमाणात क्षार असल्यास पाने जळणे तसेच पाने गळून पउणे असे परिणाम वेलींवर दिसून येतात. अतिशय जास्त प्रमाणात क्षार निर्माण झाल्यास वेली मरण पावू शकतात.
 
अशाप्रकारे नैसर्गिक समस्या व हवामानात होणारे बदल द्राक्ष पिकांचे योग्य नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास येणार्या अडचणींवर मात करून भरघोस उत्पादन मिळण्यास नक्कीच मदत होईल.
 
 
डॉ. एस. डी. रामटेके, शरद भागवत, पंकज बनकर