पशुपालनात हिरवा चारा नियोजन व महत्त्व

डिजिटल बळीराजा-2    03-Sep-2019
पशुपालानासाठी हिरवा चार व खुराक यांची योग्य प्रमाणात घेतल्यास जनावरांच्या शरीर पोषणासाठी व उत्पादनासाठी एकूण लागणार्‍या शुष्क पदार्थांपैकी जास्तीत जास्त सकस हिरवा चारा देऊन त्याच समन्वय जास्त प्रथिने व उर्जा व कमी तंतुमय पदार्थ असलेल्या खाद्याशी केलातर खुराकावरील बराच खर्च कमी कसा होता या संबंधीची माहिती या लेखात दिली आहे.
 
दूध उत्पादनासाठी जातिवंत जनावरांबरोबर सकस, पौष्टिक चार्‍याची मुबलक उपलब्धता आवश्यक आहे. म्हणूनच ग्रामीण भागात गायी-म्हशीचे दूध हे तिच्या दाभाडात असते, ही म्हण रूढ झाली आहे. अधिक दूध उत्पादन व त्याचे सातत्य टिकवण्यासाठी दुभत्या जनावरांना सकस व हिरवा चारा वर्षभर प्रमाणात मिळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून सकस चारा वर्षभर मिळण्यासाठी चारा पिकाचे काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे.
 
पशुपालनाच्या व्यवस्थापनात आर्थिक विचार केला तर होणार्‍या एकूण खर्चाच्या 60 ते 70 टक्के खर्च हा फक्त त्यांच्या आहारावर होतो. जनावरांना द्यावयाचा आहार हा म्हशीपासून दूध उत्पादन जास्त मिळण्यासाठी चारा वैरण ही सकस असणे आवश्यक आहे. अद्यापही आपणाकडे ग्रामीण भागातून गायी-म्हशींना खाद्यान्न म्हणून गवत आदी नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवताचा अथवा पिकाचे राहिलेले अवशेष जसे कडबा, गुळी, तनीस, सरमाड, पाला-पाचोळा आदींचा वापर जास्त होतो. या गवताची व चार्‍याची पौष्टिकता व प्रत कमी असते. तसेच ते जनावराच्या अन्नघटकाची गरज पूर्ण करू शकत नाही. या कारणामुळे सकस चार्‍याची पिके घेणे आवश्यक आहे.
 
पशुसंवर्धन खात्याच्या 2010च्या अहवालानुसार सद्यस्थितीत आपल्या देशात 1700 दशलक्ष टन चार्‍याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्ष उपलब्धतता मात्र 865 दशलक्ष टन आहे. यामुळे चारा पिकाचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना वर्षभर बाराही महिने हिरव्या चार्‍याची समानतेने, समतोल व योग्य प्रमाणात उपलब्धता असणे हे फायदेशीर दूध उत्पादनाची पहिली पायरी होय. त्याकरिता चारा पिकाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
 
सर्वसाधारणपणे हिरवा चारा हा सर्वांत स्वस्त व खुराक हा महाग आहार होय. यशस्वी व फायदेशीर पशुपालनासाठी हिरवा चारा व खुराक या दोहोंची योग्य प्रमाणात सांगड घातली तर आहारावर होणारा बराच खर्च कमी करता येतो. जनावराच्या शरीर पोषणासाठी व उत्पादनासाठी एकूण लागणार्‍या शुष्क पदार्थांपैकी जास्तीत जास्त सकस हिरवा चारा देऊन त्याचा समन्वय जास्त प्रथिने व उर्जा तर कमी तंतूमय पदार्थ असलेल्या खुराकाशी केला तर खुराकावरील बराच खर्च कमी होतो. वाळलेल्या चार्‍यात जास्त तंतूमय पदार्थ, कमी प्रतीची व नगण्य प्रथिने असतात. हा चारा फक्त पोटाची खळगी पूर्ण भरण्यासाठी दिला तर कमी कमी खर्चात जास्तीचे दूध उत्पादन मिळू शकते.
 • हिरव्या चार्‍यापासून खालील फायदे मिळतात.
 • हिरवा चारा स्वस्त पडतो.
 • हा चारा हिरवा, सकस, रसदार, स्वादिष्ट व पौष्टिक असतो. त्यामुळे तो पाहिजे तेवढा जनावरांना खाऊ घालता येतो.
 • हिरवा चारा हा फार पाचक असतो. तो जर रुक्ष/वाळलेल्य चार्‍याबरोबर मिसळून खाऊ घातल्यास वाळलेला चारा पण जास्त पाचक व स्वादिष्ट होतो.
 • हिरवा चारा जनावराच्या बाह्य व आतील इंद्रियांवर चांगला परिणाम करतो.
 • हिरवा चारा विशेषत: पालेदार असतो, त्यात पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे अशा चार्‍यांतील विविध घटक पचनीय स्थितीत असतात.
 • हिरव्या चार्‍यात कॅरोटिन हा हरितद्रव्याचा घटक भरपूर प्रमाणात असतो, जो जनावरांना जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा करतो.
 • हिरवा चारा जनावराचे दूध उत्पादन वाढविण्यास मदत करतात.
 • हिरवा चारा खाऊ घातल्याने उन्हाळ्यात जनावरांना असह्य होणारी उष्णतेची दाहकता कमी होते. यामुळे जनावरांना उन्हाळी वातावरणाचा दुष्परिणाम होत नाही.
 • चवदारपणा व पौष्टिकतेमुळे जनावरे हिरवा चारा संपूर्ण खातात. म्हणून चारा वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असते.
 • हिरवा चारा लागवड या परंपरागत लागवडीसह मिश्र पीक, लवकर तयार होणारी पिके, जादा पुरवठा करणारी पीक योजना,आदी योजनातही या पिकाचा समावेश करता येतो. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे, की पाणी देण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी चारापिकांमुळे 40 टक्के जास्त पीक घेता येणे शक्यआहे
 • जास्त उत्पादन देणारी चारापिके अनेक वेळा कापून खोडवा राखल्यामुळे मेहनत, वेळ, पैसा व खताची बचत करून फार मोठा फायदा मिळवता येतो.
 • हिरवा चारा हा पडीक जमीन, नापीक जमिनीवर तसेच शेताच्या कानाकोपर्‍यातही पिकवता येतो.
 • शेताच्या चारही बाजूस हिरव्या चार्‍याची झुडुपे लावून शेताचे हवेपासून संरक्षण होते व झुडुपापासून जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होतो.
 • रस्त्याच्या दुतर्फा, रेल्वे रुळांच्या बाजूला, नदीकाठी, तलावाचय पाटाच्या बाजूस हिरव्या चार्‍याची झुडूपे लावून त्या जमिनीचा उपयोग चारा पिकांकरिता करता येतो.
 • हिरवा चारा स्वस्त असून हा महाग असलेल्या खराकास पर्याय होय. तसेच खुराकावर होणारा खर्च बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो. 
 • हिरवा चारा वर्षभर घेता येऊ शकत असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व मे-जून या महिन्यात चार्‍याची तूट असते. त्यावेळी पण नियोजनामुळे या महिन्यातही हिरवा चारा उपलब्ध होतो. हा काळ म्हणजे खरीप व रब्बी मोसमाचा शेवटचा काळ असून या काळात वैरणीची तूट जास्त जाणवते आणि यावेळी घेतलेले जास्तीचे चारा पिक हे वाळवून अथवा मूरघास बनवून साठवता येते.
 • द्विदल चारा पिके (शैम्बिक पिके) घेतल्याने जनावरांसाठी प्रथिनयुक्त चारा तर मिळतोच पण त्याचबरोबर ही पिके जमिनीची सुपीकता वाढवितात. याचा फायदा पुढील येणार्‍या पिकाच्या उत्पादन वाढीत होतो.
 • हिरव्या चार्‍याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असेल तर निश्चितच जनावराच्या वाढीवर, उत्पादन क्षमतेवर आणि प्रजोत्पनावर चांगला परिणाम होतो, यामुळे पशुपालकास जास्त नफा मिळतो.
 • भारत हा खंडप्राय देश असून प्रत्येक भागाकरिता त्या भागातील वातावरणाप्रमाणे पिकांचा फेरपालट करण्यासाठी वेगवेगळ्या जाती शोधून काढल्यामुळे पिकांचा फेरपालट करता येतो.
 • हिरव्या चारा पिकाचे नियोजन हे त्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे व त्या भागातील नैसर्गिक वातावरणाप्रमाणे करता येते.
 • चारा पिकाबरोबरच शेतातील तण हे जनावरासाठी चारा म्हणून योग्यप्रकारे वापरता येते. तसेच चारापीक हे लवकर येत असल्याने चार्‍याबरोबर तणे बी येण्यापूर्वीच काढली जातात. त्यामुळे पुढील पिकामध्ये तण कमी होते.
हिरव्या चार्‍याची लागवड करताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
 
वर्षभर चारा पिकाचे उत्पादन मिळण्यासाठी तसेच त्याच्या नियोजनासाठी जनावरांची संख्या, हिरव्या चार्‍याची गरज, जमीन व पाण्याची उपलब्धता, हंगामवार घेण्यात येणारी चारा पिके, चारा पिकाच्या सुधारीत जाती व त्यांची उत्पादन क्षमता आदींचा विचार करणे आवश्यक आहे.
 
हंगामनिहाय चारा पिके
 
खरीप हंगाम - जून ते सप्टेंबर या कालावधीत ज्वारी, बाजरी, मका, चवळी, नेपीअर
रब्बी हंगाम - ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत बरसीम, लसूण, मका, चवळी आणि ज्वारी
उन्हाळी हंगाम -फेब्रुवारी ते मे या कालावधीत ज्वारी, बाजरी, मका, चवळी, नेपीअर गवते यांची लागवड करता येते.
चारा पिकाचे वर्गीकरण
एकदल चारा पीक - मका, ज्वारी, बाजरी, ओट्स
द्विदलवर्गीय चारा पीक - लसूण घास, बरसीम, चवळी, वाटाणा, स्टायलो, सुबाभूळ, शेवरी, दशरथ, गिरीपुष्प, अंजन, ताग इत्यादी. 
गवतवर्गीय चारा - बागायती, पॅरा गवत, गिनी गवत, नेपीअर
जिरायत - मारवेल, अंजनगवत, पवना, डोंगरी गवत
चार्‍याची झुडुपे - गिरीपुष्प, शेवरी, सुबाभूळ, दशरथ, तुती
कंदयुक्त चारापिके -रताळे, गाजर, मुळा
 
एकूण जनावरांच्या संख्येनुसार लागणारा एकूण चारा व त्यासाठी लागणारे क्षेत्र याचे नियोजन करावे.
 • जनावरांच्या गरजेनुसार लागणारे पोषणमूल्य व उत्पादित चार्‍यापासून मिळणारे पोषणमूल्य याचा विचार करणे. चारा स्वादिष्ट, पचनीय असावा तसेच तो शरीरास बाधक नसावा.
 • उत्पादन लागवडीसाठी उपलब्ध चारापिके, त्याच्या वाढीचा काळ, एकूण उत्पादन, सुयोग्य व्यवस्थापनाची माहिती आदी गोळा करणे व त्याचा अभ्यास करणे. बागायती जमिनीत घेण्यात येणारी पिके लवकर वाढणारी असावीत.
 • पिकाच्या गरजेनुसार चांगला निचरा होणारी जमीन उपलब्ध करणे, त्या जमिनीची मशागत व ओलिताची व्यवस्था करणे.
 • दर हेक्टरी जास्त उत्पादन देणारे वाण व सुधारीत जातीचे बियाणे वापरावे. योग्य बियाणाची निवड व बीज प्रक्रियेने हेक्टरी रोपसंख्या योग्य राहून उत्पादनात वाढ होते.
 • सेंद्रिय खते व रासायनिक खते दोन्ही हिरवा चारा वाढीसाठी उपयुक्त होय. सेंद्रिय खतामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व सुपिकता वाढते. पिकात प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. तर रासायनिक खतामुळे चारा पिकाची जलद वाढ होते. यामुळे हिरव्या चार्‍याचे भरपूर उत्पादन मिळते व चार्‍याची सकसता वाढते, म्हणून जास्त उत्पादनासाीं योग्य प्रमाणात खते वापरावीत.
 • चारापिके ही जनावरांसाठी वापरावयाची असल्याने यावर शक्यतो कीटकनाशक, तणनाशक किंवा रोगनाशक औषधी फवारण्याचे टाळावे. जर आवश्यकच असेल तर कापणीपूर्वी किमान 1 महिना अगोदर या पिकावर औषधी फवारणी करू नये.
 • जनावरास एकदल व द्विदल चारा योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे. एकदल चार्‍यात कर्बोदके तर द्विदल चार्‍यात प्रथिने, क्षार आदी जास्त असतात. जनावरांना एकूण लागणार्‍या चार्‍यामध्ये 1/3 भाग हा प्रथिनयुक्त द्विदल चार्‍याचा असतो. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये.
 • पेरणी एकाच वेळी न करता पेरणी ही टप्प्याटप्प्याने करावी व त्यानुसार जमिनीचे भाग करावे.
 • वर्षभर चारा पिकासाठी बहुपीक योजना म्हणजे एकाच जमिनीत वर्षभर जास्तीत जास्त पिके घेणे, याकरिता नियोजन व कामाची गती वाढविणे जरूरी असते. बहुपीक योजनेत सुरुवातीसच नांगरण करून जमीन मशागत केली जाते, पण त्यानंतर मात्र कमीत कमी मशागत केली जाते. यामुळे वेळेचा व मजुरांचा खर्च वाचतो.
 • बहुपीक योजनेत काही पिके ही मोसमात येणारी (खरीप, रबी, उन्हाळी) असावी. थोडी वर्षायू पिकासाठी तर थोडी बहुवर्षायू पिकासाठी जमीन राखून ठेवावी. म्हणजे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल.
 • वर्षभर हिरव्या चार्‍याचे उत्पादन करण्यासाठी व सकस चार्‍याचे उत्पादन हेतू लक्षात घेऊन सारकी पिके व पिकाच्या फेरपालटीच्या क्रमाचे नियोजन करावे. खरीप हंगामात मका, ज्वारी, चवळी तर रब्बी हंगामात बरसीम, ओट व उन्हाळी हंगामात मका, चवळी व ज्वारी पिकांचा समावेश करता येतो. तसेच वर्षभर येणारे गजराज, लसूणघास यांचीही लागवड करता येते.
 • कापणी योग्य वेळी करणे, उशीरा कापणी केल्यास पाने वाळून गळतात. तसेच त्याची सकसता व रुची कमी होते. तसेच कापणीनंतर येणार्‍या फुटव्यावर परिणाम होऊन उत्पादन कमी होते.
 • वर्षभर चारा पिकासाठी खालीलप्रमाणे साखळी पद्धतीने पिकाचे नियोजन करता येते. 
जून - जुलै : गजराज, मका, ज्वारी, चवळी, पावटा, लसूण घास, ज्वारी, मका, चवळी
ऑगस्ट-सप्टेंबर : ज्वारी, मका, चवळी, बाजरी, लसूण घास, ज्वारी, मका, चवळी, पावटा
ऑक्टोबर-नोव्हेंबर : ओट, बरसीम, लसूण घास, गजराज, लसूण घास, ज्वारी, मका,चवळी,पावटा, ओट, बाजरी
डिसेंबर-जानेवारी : ओट, लसूण घास, बरसीम, गजराज, ओट, बरसीम,लसूण घास, बाजरी
फेब्रुवारी-मार्च : मका, ज्वारी, चवळी, बाजरी, मका, ओट, बरसीम, लसूणघास, गजराज
एप्रिल-मे : मका, ज्वारी, चवळी, पावटा, मका, ज्वारी, चवळी, लसूणघास, गजराज, बाजरी
 
या पीक चक्रावरून खरीप व उन्हाळ्याकरिता मका, ज्वारी, चवळी, बाजरी, गवार ही पिके तर रब्बी करिता बरसीम, ओट, लसूणघास, आदी घेता येतात. याशिवाय वार्षिक व बहुवर्षायू म्हणून नेपीयर, गजराज, पॅराघास, गिनीगवत, दशरथ, सुबाभूळ, शेवरी आदी पिकांची लागवड करता येते. तसेच खरीप व उन्हाळी चारा पिके ही थोडी उशीरा पेरून तुटीच्या काळात चारा उपलब्ध होईल असे नियोजन करता येईल.
 
पशु आहारात सर्वसाधारण मोठ्या गायी / म्हशी 15 ते 20 किलो हिरवा चारा व 5 किलो वाळलेला चारा तर कारवाडीसाठी (1 ते 1.5 वर्ष) 10 किलो हिरवा चारा व 2 किलो वाळलेला चारा प्रति दिन प्रति जनावर आवश्यक आहे. या सूत्रानुसार आपल्याकडे असलेल्या जनावराच्या संख्येनुसार वर्षभर किती हिरवी वैरण व वाळलेला चारा लागेल हे काढू शकतो व त्याप्रमाणे त्याचे नियोजन करता येते.
 
एका गायीसाठी वार्षिक चारा पिकाचे नियोजन करावयाचे असल्यास हिरवा चारा 7 ते 8 टन व सुका चारा (वाळलेला) 2 ते 3 टन आवश्यक आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे हिरव्या चार्‍याचे उत्पादन कमी होते असे गृहीत धरले तर उन्हाळ्यात चार महिन्यासाठी लागणारा हिरवा चारा खरीप व रब्बी हंगामातील अतिरिक्त चारा उत्पादन करून त्याचा मूरघास बनवता येतो. जो उन्हाळ्यात आपण वापरू शकतो.
5 ते 7 जनावरांसाठी चारा नियोजन होम निहाय खालीलप्रमाणे करता येईल.
 
तक्ता - हंगाम निहाय चारा पिकाची लागवड योजना
 
(5 ते 7 जनावरांना वर्षभर उपलब्ध होईल असे 30 गुंठ्याचे नियोजन)
खरीप हंगाम 
 
 प्लॉट नं.  क्षेत्रफळ (गुंठे)

चारा पिके (प्रतिहे.)

पेरणी/लागवड (टन/प्रति प्लॉट)

कापणी  वेळ 

उत्पादन  टन  
1  10  नेपीयर जून-जुलै - 150-300
  6
7  मका जून-जुलै  - 60-75
  5
 चवळी जून-जुलै - 35-40
  3
4  ज्वारी जून-जुलै - 40-60
 2ते5
एकूण
 30  
     16.5 

 
रब्बी हंगाम
 
 प्लॉट नं.  क्षेत्रफळ (गुंठे)

चारा पिके (प्रतिहे.)

पेरणी/लागवड (टन/प्रति प्लॉट)

कापणी  वेळ

उत्पादन टन 
1 5 लसूणघास ऑक्टो-नोव्हें.  नोव्हें-डिसें.नंतर 75-100  1.5
10  नेपीयर  खरीप  निरंतर 150-300  6
10   बरसीम  नोव्हेंबर  डिसेंबरनंतर 80-100  8
4 मका नोव्हेंबर  जाने.फेब्रु 60-75  3
एकूण
 30    
   18.5
 
 
 प्लॉट नं.  क्षेत्रफळ (गुंठे)

चारा पिके (प्रतिहे.)

पेरणी/लागवड (टन/प्रति प्लॉट)

कापणी  वेळ

उत्पादन टन 
1 5 लसूणघास रब्बी  निरंतर 75-100  1.5
10  नेपीयर  खरीप  निरंतर 150-300  6
 मका  मार्च  मे 60-75  3
4 चवळी
मार्च  एप्रिल-मे 35-40  2
5 5 ज्वारी  मार्च  मे-जून
40-60  2.5 
एकूण    30         15.0 
 
तक्ता 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे चारा पिकाची लागवड केल्यास खरीप-रब्बी हंगामात एकूण 5 टन चारा जनावरांच्या गरजेपेक्षा जास्त तयार होतो. तो वाळवून इतर वेळी सुका चारा अथवा त्याचा मूरघास बनवून तो टंचाई काळात वापरता येतो. याप्रमाणे नियोजन केल्यास 30 गुंठे क्षेत्रात 5 ते 7 जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा उपलब्ध होऊ शकतो व पशु आहाराचे सातत्य ठेवता येते. 
प्रा. डॉ. शांती लाहोटी