कार्यक्षम गुळ प्रक्रिया यंत्राची निर्मिती

डिजिटल बळीराजा-2    21-Sep-20192019 मध्ये महात्मा गांधींची 150 वी जन्म शताब्दी साजरी करीत आहोत. गांधींजी हे ग्रामीण उद्योगांची खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपले मौलीक विचार ‘हरिजन’ या मासिकाद्वारे लोकांपुढे वारंवार मांडले. अशाच एका लेखात गांधींजीनी साखर आणि गुळाची तुलना केली असून, ‘ साखरेच्या तुलनेत गुळ हा अधिक प्रमाणात पोष्टीक, सात्वीक आहे. त्यामुळे गुळ बनविणे (गुर्हाळ घर) महत्वाचा लघुउद्योग असून त्याचे सबलीकरण महत्वाचे आहे असे म्हटले होते.’ (Harijan 10/08/1935)
 
तसे पाहिले तर आजही 85 वर्षानंतर हे विचार तंतोतंत लागू पडतात. गेल्या अनेक वर्षात (दशकात) गुळाचा डरडोई वापर 13.6 किलोवरून 3.6 किलो (2014) इतका कमी झाला आहे. या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे गुळ निर्मितीत कमतरता व ग्राहकांचे साखरेकडील आकर्षण हे होय. 
 
पूर्वी गुर्हाळ हे मुख्यतः आपल्या शेतातील उसाचा आपल्याच शेतात गुळ हा पक्क माल करण्याकडे भर होता. वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही दशकांमध्ये शेतजमीनीची विभागणी होवून कुटुंबाचे जमिनक्षेत्र कमी झाले आहे. यामुळे गुर्हाळ घर चालविण्यासाठी एका कुटुंबाकडे लागणारे उसाचे क्षेत्र कमी झाले. याच काळामध्ये साखर कारखान्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये पसरले. यातून शेतकर्याला आपल्या शेतातून गुळ निर्मितीपेक्षा ऊस साखर कारखान्यांना देणे जास्त सोयीचे वाटू लागले. 
 
या व्यतिरिक्त गुळ निर्मितीसाठी कुशल व मेहनती कामगाराची गरज लागते. यामध्ये कुशल कामगार म्हणजे ‘गुळव्या’ (गुळ बनल्याचे ठरविणारा) व ‘जळव्या’ (इंधन/जाळ घालणारा) गुळव्या हा आपल्या अनुभवाच्या जोरावर गुळ बनविण्याच्या प्रक्रियेत वेगवेगळे निर्णय घेवून गुळ बनवितो. तर जळव्या हा आदेशानुसार जाळ कमी जास्त करतो. गुळव्या म्हणजे गुर्हाळ मालकाच्या तळ हातावरचा फोड. गुळव्यासारख्या कुशल कामगारावर अवलंबून राहून उद्योग करणे गुर्हाळ मालकांना जोखमीचे वाटायला लागले. याचबरोबर गुर्हाळ बंद होण्याचे इतर कारणे म्हणजे कमी कार्यक्षम भट्टी. यामध्ये उसापासून निघणार्या चोथरीपेक्षा अधिक इंधनाची गरज भासू लागली. यातूनच ‘नको ते गुर्हाळ’ असा सुर बर्याच शेतकर्यांकडून निघायला सुरुवात झाली. 
 
परंपरागत गुर्हाळांची मांडणी व डिझाईन हे साधारणपणे त्याच्या स्वच्छतेला तसेच इंधन व कामगारांच्या कार्यक्षमतेला मारक ठरते. बर्याच गुर्हाळांमध्ये गुळाचा रंग (तांबुस व पिवळा) व कठीणपणा मिळविण्यासाठी कृत्रिम रंग व काही रसायनांचा वापर होतो. हे रंग व रसायने मानवी शरिरीला अपायकारक तर आहेतच व त्याच्या वापराने त्याची टिकवन क्षमता कमी होते. 
 
साधारणपणे गुळ हा अर्धा/एक किलो ढेपेच्या स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येतो. ढेप हा प्रकार शहरी जिवन पध्दतीत तसा कठीणच असतो. ढेपेचे खडे करण्यासाठी योग्य सामग्री नसते. वरील काही कारणांमुळे रंग, रसायन, अस्वच्छता, ढेपेचा आकार आदींमुळे ग्राहक गुळ वापरण्यास निरूत्साही होतो व साखरेकडे वळतो.
 
गुळ उत्पादक शेतकरी व गुळ वापरणारे ग्राहक यांच्या गरजा लक्षात घेवून सर्वाय सोल्युशन ह्या कंपनीने अर्थात संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया यंत्राची निर्मिती केली आहे. ठएगझ हा प्रकल्प पुण्याजवळ बसवला असण तो गेल्या ? महिन्यापासून कार्यरत आहे. 
 
हा 1000 स्क्वें. फुट (एक गुंठा) जागेत बसतो. यामध्ये आपल्याला 24 तासात 400 ते 500 किलो गुळाची निर्मिती करता येते. हा प्लांट चालविण्यासाठी एका शिफ्टमध्ये 4 कामगारांची गरज लागते. या प्लांटचे काही ठळक वैशिष्टे पुढील प्रमाणे. 
 

 
1) औद्योगिक शिस्त- गुळ प्रक्रियेत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर 
2) कामगारांची कार्यक्षमता- स्वयंचलित यंत्रणा वापरून कामगारांच्या श्रमाचा योग्य उपयोग
3) प्रक्रिया नियंत्रण- थोड्या परिश्रमात कोणीही गुळ बनवू शकेल असे तंत्रज्ञान
4) नेटके डिझाईन- कमी जागेत व कमी वेळात उभे करण्याजोगे नेटके डिझाईन
5) फायदेशीर उद्योग पर्याय- रसायन विरहीत, स्वच्छ प्रक्रियेद्वारे चांगल्या प्रतिची गुळाची निर्मिती ज्यास चांगली मागणी व योग्य / जास्त दर.
 
सर्वाय सोलुशन हि कंपणी ’छोटे हे सुंदुर’ या ई. यफ. शुमाकर यांच्या विचारांना अनुसरून शेतीमालाचे मुल्यवर्धन करनार्‍या छोटया तंत्रज्ञानचा विकास व निर्मिती या क्षेत्रात कार्यरत आहे.
डॉ. विशाल सरदेशपांडे