ट्रॅक्टरची देखभाल वाढवते कार्यक्षमता

डिजिटल बळीराजा-2    02-Sep-2019
 
 
 
ट्रॅक्टर शेतीमध्ये काम करीत असताना त्याच्या विविध भागांची झीज होते. त्यामुळे ट्रॅक्टरची नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमता व आयुष्य वाढते. त्यासाठी निरीक्षण, अ‍ॅडजस्टमेंट व दुरुस्ती ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी.
 
दररोजची देखभाल किंवा दर 10 तासांनंतरची देखभाल
1) ऑइल पंपामधील ऑइल लेव्हल चेक करणे. 
2) एअर क्लिनरमधील ऑइल चेक करणे. 
3) रॅडिएटरमधील पाण्याची लेव्हल चेक करणे. 
4) एअर क्लिनरचे प्रीक्लिनर साफकरणे. 
5) डिझेल टँकमधील डिझेलची पातळी चेक करणे. 
6) बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइटची पातळी चेक करणे. 
7) टायरमधील हवा चेक करणे. 
8) फॅन बेल्टचा तणाव चेक करणे.
 
साप्ताहिक देखभाल किंवा दर 50 तासांनंतरची देखभाल
 
1) क्लच पँडल फ्री प्ले चेक करणे. 
2) सेडिमेंट बाउल चेक करणे. 
3) फ्युएल फिल्टर बाउल ड्रेन करणे. 
4) ट्रान्समिशन व हायड्रोलिक ऑइल चेक करणे. 
5) एअरक्लिनरचे ऑइल बदलणे. 
6) बॅटरी टर्मिनल्स चेक करणे. 
7) सर्व नट बोल्ट टाइट करणे. 
8) सर्व ग्रीस पॉइंटना ग्रीस करणे
 
मासिक देखभाल किंवा दर 150 तासांनंतरची देखभाल
 
1) दर तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) इंजिन ऑइल व ऑइल फिल्टर बदलणे. 
3) डायनॅमोमध्ये ऑइल टाकणे. 
4) बॅटरी टर्मिनल्सला पेट्रोलियम जेली लावणे.
 
त्रैमासिक देखभाल किंवा 300 तासांनंतरची देखभाल
 
1) दर तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) स्टिअरिंग शाफ्ट एन्ड प्ले चेक करणे. 
3) (समोरील चाकाचे) टो-इन चेक करणे व अ‍ॅडजस्ट करणे. 
4) समोरच्या चाकाचे प्रीलोडिंग चेक करणे. 
5) टॅपेट क्लिअरन्स सेट करणे.
 
सहा महिन्यांनी देखभाल किंवा 600 तासांनंतरची देखभाल
 
1) दर 300 तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) प्रायमरी डिझेल फिल्टर इलिमेंट बदलणे. 
3) कुलिंग सिस्टिम फ्लश करणे. 
4) समोरचे टायर अदलाबदल करणे. 
5) इंजेक्शन प्रेशर चेक करणे. 
6) डिझेल टँक साफ करणे.
 
नऊ महिन्यांनी देखभाल किंवा 900 तासांनंतरची देखभाल
 
1) दर तासांनंतरची देखभाल पूर्ण करणे. 
2) स्टिअरिंग गिअर बॉक्स ऑइल बदलणे. 
3) सेकंडरी डिझेल फिल्टर इलिमेंट बदलणे.
 
एक वर्षानंतरची देखभाल किंवा 1000 तासांनंतरची देखभाल
 
1) सर्व प्रकारचे ऑइल बदलणे जसे इंजिन ऑइल, गिअर बॉक्स, हायड्रोलिक, एअरक्लिनर आणि स्टिअरिंग इत्यादी. 
2) फ्युएल इंजेक्शन पंप चेक करणे. 
3) कॉम्प्रेशन प्रेशर चेक करणे. जर आवश्यक असेल, तर इंजिन ओव्हरहॉलिंग करणे.
4) ब्रेक लायनिंग चेक करणे.
 
नितीन मुरलीधर मिसाळ
क दु सी पा कृषी महाविद्याल, नाशिक