अ‍ॅक्वापोनिक्स उपयुक्त प्रणाली

डिजिटल बळीराजा    09-Aug-2019
 

 
 
 
विविध भाजीपाल्याचे कमी दिवसात भरपुर दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी उपयुक्त प्रणाली काय आहे त्याचा बरोबर मस्त्य उत्पादन कसे घ्यावे यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.


अ‍ॅक्वापोनिक्स प्रणाली ही शेतजमिनीला पर्यावरणातील शाश्वत हवामानामध्ये दुहेरी फायदा मिळवून देणारी यंत्रणा आहे. या प्रणालीत पाण्याच्या पृष्ठभागावर संच बनवून त्यावर विविध भाजीपाल्याचे उदा. लेट्युस, ब्रॉक्रोळी, लिक, पासली, बॉक चॉय, टोमॅटो, मेथी, फुलकोबी, पत्तीकोबी, रेड कबेज इत्यादींचे दर्जेदार उत्पादन कमी दिवसांत भरपूर प्रमाणात घेता येते. त्याचप्रमाणे खालील भागातील फीड ट्रेमध्ये मस्यउत्पादन सहजपणे घेता येते. या संचाचा उपयोग करून पोषक व गुणवत्तापूर्वक भाजीपाल्याचे उत्पादन आपणास मिळेल, शिवाय खाण्यासाठी मासे उपलब्ध होतील. त्याचबरोबर अनेकांची उपासमारी त्याद्वारे टाळता येईल. या पद्धतीमध्ये झाडांची वाढ उत्तम व जलद होते, तसेच झाडांची संख्यासुद्धा घनपद्धतीने लागवड करता येते.
 
अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीमधील घटक : अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीमध्ये मुख्य तीन घटक उपलब्ध असतात. ते खालीलप्रमाणे :
 

झाडे (श्रिरपीं) :-
 
अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीमधील मुख्य पर्यावरणातील शाश्वत हवामानामध्ये झाडांची वाढ करून उत्पादन तयार करणे होय. या झाडांना अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीपासून सर्व वाढीचे फायदे मिळत नसतात, परंतु या झाडांची मुख्य भूमिका म्हणजे अ‍ॅक्वापोनिक्स प्रणाली सुरू ठेवण्यासाठी मदत करतात. या झाडांमुळे ट्रेमधील पाणी नैसर्गिकरीत्या शुद्ध होण्यास मदत होते आणि झाडांची मुळे मत्स्य ट्रॅकमधून आलेल्या पाण्यातून नायट्रेट (छे2) तसेच साचून राहिलेल्या माशांची विष्टा झाडांमुळे मस्य टँकमधील पाणी स्वच्छ होत असते. झाडांची मुळे पाण्यातील झाडांची वाढ होण्यासाठी उपलब्ध असलेले नायट्रेट (छे3) शोषून घेतात व नंतर झाडांचा ट्रेमधील पाणी स्वच्छ पाणी खाली ठेवलेल्या बॅरलमध्ये येते व पुन्हा पंपाच्या साहाय्याने हे स्वच्छ पाणी मस्य टँकमध्ये जाते. अशा पद्धतीने पाण्याचा पुनर्वापर सुरू राहतो.
 
मस्य टँकमध्ये नायट्रेट (छे2) उपलब्ध असल्यास माशांसाठी हे जगण्यासाठी विष असते. झाडे लावण्यासाठी प्लॅस्टिकचे अपारदर्शक ट्रेंज वापरावे. या ट्रेच्या वरील बाजूवर उच्चप्रतीचे थर्मोकोल बसवून घ्यावे. या प्रणालीमध्ये भाज्यांची रोपे तरंगत तराफा संचावर लागवड करतात. या तराफ्यावर म्हणजेच थर्मोकोलवर छोटी छोटी छिद्रे तयार केली जातात. या छिद्रांमध्ये जाळीदार कप - भांड्यामध्ये रेतीचा उपयोग करून भाज्यांच्या रोपांची लागवड केली जाते. लावलेल्या वनस्पतींची मुळे स्वतंत्रपणे पाण्यामध्ये लटकती राहतात. व ही मुळे झाडांची वाढ होण्यासाठी ट्रेमधील पाण्यात उपलब्ध असलेले ’नायट्रेट’(छे3) पोषक तत्त्व शोषून घेतात. आणि अशी प्रक्रिया सुरूच राहते. तराफ्याचा खाली पाण्याच्या स्तर 15-20 से. मी. असावा लागतो.
 
अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीची रचना जलसंवर्धन रचनेवर अवलंबून असून, या प्रणालीची स्थापना मोठ्या प्रमाणावरसुद्धा करू शकतो. अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीमध्ये कमीत कमी एक एकरपेक्षा मोठ्या आकारामध्ये माशांचे व भाज्यांचे संवर्धन करता येते. या फ्लोटिंग (तरंता) संचामध्ये थर्मोकोल शीटवर छोटी-छोटी छिद्रे बनवलेली असतात. या छिद्रांमध्ये जाळीच्या भांड्यामधे (12-15 से.मी. वर्तुळ चौरस आकार) रेतीचा व उपलब्ध असलेल्या ग्रावल्सचा (बारीक खडी) उपयोग करून त्यामध्ये भाजीपाल्यांची व फुलांच, रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात करू शकता.
 
पाण्याची गुणवत्ता : माशांची वाढ आणि माशांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाण्याची गुणवत्ता अती चांगली ठेवली पाहिजे. पाण्याच्या पीएच (झ.क.) 6.8 ते 7.0 पर्यंत ठेवणे आवश्यक आहे.
 
 
मासे :
 
अ‍ॅक्वापोनिक्स प्रणालीमध्ये मासेसंवर्धन करण्यासाठी (फीश टँक) जोडणी केलेला असून फीश टँकमध्ये शुद्ध पाणी असते. या पाण्यात मासे त्यांची विष्टा शरीराबाहेर टाकत असतात. या विष्टेपासून झाडांना वाढीसाठी लागणारे नायट्रेट उत्पादित होत असते. 500-600 ग्रॅम वजनाच्या माशांकरिता 7.5 लिटर पाणी आवश्यक असते. याप्रमाणे 'फिश टँक' ची पाण्याची क्षमता विचारात घेऊन मासेसंवर्धन करावे. माशांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य ती काळजी विचारपूर्वक घ्यावी. फीश टँकमधील माशांची जोमदार व लवकर वाढ होण्यासाठी उपयुक्त माशांच्या स्पीसिझची निवड करणे आवश्यक आहे. कारण मासे फिश टँकमधील पाण्यात ठेवण्यात येत असल्याने त्यांचे आरोग्य वाढ योग्य होणे आवश्यक आहे. फिश टँकमधील पाण्यात ’टिलापिया’, सीपीसीज मासे सहज संवर्धनासाठी योग्य ठरतात. हे मासे ’फिश टँक’मधील वातावरणात अतिशय जोमाने वाढतात. शिवाय या माशांचे संवर्धन उत्तमप्रकारे फिश टँकमध्ये घनपद्धतीने करता येते. कोपोनिकास प्रणालीमध्ये 1) पेरच (झशीलह), 2) कॅट फिश (लरीं षळीह),3) ट्राऊट आणि 4) संकरित स्रीप्पेड बास या माशांचेसुद्धा संवर्धन करता येते.
 
 

 
 
'फिश टँक' मधील माशांची उत्तम जोमदार व लवकर वाढ होण्यासाठी माशांना टँकमध्ये फिश फूड टाकावे. दररोज 2-3 वेळा फिश फूड टाकावे. टाकलेले फिश फूड माशांनी जर 30 मिनिटांत खाल्ले तर दुसर्‍या दिवशी फिशफूडच्या मात्रेत वाढ करावी.
अ‍ॅक्वापोनिक्समध्ये माशांच्या उत्पादनासोबत निरनिराळ्या प्रकारचा भाज्या. फुले,फळे यासारख्या पिकांचे उत्पादन त्यांच्यासोबत केले जाते. या संचयामुळे अनेक गरजू कुटुंबांसाठी अन्नाची सोय होऊ शकते.

 
                                                                                                                  
                                                                                                              
                                                                                                                                                         डॉ. अरुण श. नाफडे
                                                                                                                                                                    उद्यान विशेषज्ञ
                                                                                                                               डी/6, ब्रह्मा मेमोरीज, भोसलेनगर, पुणे- 7