द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    16-Aug-2019

 
 
सध्याच्या वातावणात मिलीबर्ग तसेच खोड किडीचा प्रौढ भुंग्यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे ह्यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. 
द्राक्षाचे मूळ स्थान रशियातील अरमेनिय जिल्हा आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे. ङ्कहाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत द्राक्षाची सर्वांत जास्त लागवड आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, सांगली, तासगाव, उगाव, नारायणगाव, करकंभ - पंढरपूर, फलटण हा भाग उत्तम प्रतीच्या द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षाच्या लागवडीला औरंगाबाद, बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांतही तेथील अनुकूल हवामानामूळे भरपूर वाव आहे. सध्याच्या वातावरणात द्राक्ष बागेत मिलिबग तसेच खोड किडीच्या प्रौढ भुंगे-यांचा वावर दिसुन येतो आहे.
एकात्मिक व्यवस्थापन
जुन महिन्याच्या सुरुवातिला ’स्ट्रोबॅशिय बार्बाटक’ हि प्रजाती कोषावस्थेतुन बाहेर पडुन अंडी घालण्यासाठी बाहेर पडते. ह्या प्रजातीची अळी खोडातील भुसा बाहेर न टाकता तो आतमध्येच साठवुन ठेवते. त्यामूळे किड नाशके खोडात सोडुन ही अळी लवकर करत नाही. तर ’सेलोस्टर्ना स्क्रेबेटर’ ही प्रजाती जुन ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत प्रौढअवस्थेत आढळुन येते. ह्या प्रजातीचे अळी अवस्था खोडावर होल करुन खोडा बाहेर भुसा टाकते. खोडा मधील भाग पोकळ असल्या कारणाने फ़्युमिगेशन किडनाशकांचा फायदा होउ शकतो. खोड किड नियंत्रण पद्धतीमध्ये जिवन चक्र समजुन घेउन प्रौढ अवस्था व अंडी अवस्था नियंत्रण करणे सगळ्यात महत्वाचे असते. या साठी सामूहिक पद्धतीने प्रकाश सापळ्यांचे नियोजन करुन प्रौढ खोड किडीचे प्रौढ पकडुन नष्ट करता येइल. प्रकाश सापळे 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 या प्रमाणात संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लावावेत. प्रकाश सापळ्यांचे नियोजन साङ्कुहिक रित्या केल्यास फायदा जास्त मिळतो. मूळे द्राक्ष बागेची कोवळी पाणे खाणारे कॉकचा़फर भुंगेरे,हुमणी चे प्रौढ देखील मोठ्या प्रमाणात पकडुन करता येइल. पाउस पडुन गेल्यानंतरआर्द्रता वाढल्यानंतर बागेत ह्या प्रौढ खोड किडीकडुन अंडी घालण्याचे सुरुवात होते. बारिक तांदळाच्या आकाराची लांबट अंडी खोडावरील मोकळ्या सालीत घातली जातात.याच दरम्यान बाजारात उपलब्ध असणारे अंडीनाशक,स्पर्श जन्य किड नाशके यांचा वापर खोड ओलांडे फवारणीसाठी केल्यास नुकतेच घातलेली अंडी तसेच अंड्यातुन बाहेर आलेल्या लहान अळ्या यांचा नाश करता येइल. या सोबत ङ्किलिबगचे देखील नियंत्रण होइल. असे पंधरा दिवसातुन एकदा करावे. ’रासायनिक किड नाशकांचा वापर करताना रेसिड्यु,एङ्क.आर.एल यांचा अभ्यास करुन घ्यावा. ’
 
‘व्हर्टिसिलियम लेकॅनि 1 ली + बिव्हेरिया बॅसियाना 1 ली + मटारायझियम अ‍ॅनोसोप्लि 1 लि’ प्रति 200 ली या प्रमाणात बुरशीजन्य जैविक किड नाशकांची खोड ओलांड्यावर फवारणी देखील फायदेशीर ठरते. ह्या किटक परोपजिवी बुरशी किड्यांच्या शरिरावर वाढून विविध प्रकारचे एन्झाईम्स किटकांच्या शरिरात सोडल्यामूळे किडी मरतात. ह्या उपयुक्त बुरशी किड्यांच्या शरिरावर आर्द्रतायुक्त वातावरणात वाढतात. या जैविक किडनाशकांची फवारणी मध्ये आणि रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणी मध्ये एक आठवड्याचे अंतर ठेवावे. अशा किटकपरोपजिवी बुरशी युक्त किड नाशके वापरताना वातावरणातील बदलास अनुकुल अशा प्रजाती (स्ट्रेन्स) असलेले वापरावे. त्या बुरशींचा संसर्ग करण्याची ताकद ही कमी झालेली नसावी. ब-याच वेळेस बागायतदार फक्त उत्पादक कंपनिने दिलेले स्पोर काउंट वर विश्वास ठेवुन अशा जैविक घटकांची खरेदी करतात,परंतु अशा जैविक किडनाशकाची कार्यक्षमता देखील तपासने गरजेचे आहे. जैविक किड नाशकांचा वापर हा पर्यावरण पुरक,रेसिड्यु फ़ि्र् आहे. खात्रिशिर उत्पादने वापरुन किड नियंत्रणामध्ये खात्रिशीर परिणाम मिळवता येतात. आतापर्यंत खोड किड मिलिबग नियंत्रणामध्ये ‘व्हर्टिसिलियम लेकॅनि, बिव्हेरिया बॅसियाना,मटारायझियम अ‍ॅनोसोप्लि’ यांचे परिणाम खुप चांगल्या प्रकारे दिसुन आलेले आहेत. फक्त बागायतदारांनी बाजारातुन खात्रिशीर उत्पादने उपलब्ध करुन घ्यावी.
 
 
पाचोळे एस. एच., प्रा. एल. जी. हाके.