कीड व रोगनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत

डिजिटल बळीराजा    12-Aug-2019
 

 
 
कीड व रोगनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत

वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांपासून दशपर्णी अर्क तयार करून त्याद्वारे किडी व रोगाचे प्रमाण काहीअंशी आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवता येते. यासाठी लागणारे वनस्पतीचा पाला जवळपासच्या परिसरात सहज उपलब्ध होतो. अर्क तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी असल्याने सर्वसामान्य शेतकरी घरच्या घरी दशपर्णी अर्क करू शकतो. वनस्पतीमधील नैसर्गिक रसायनाद्वारे अळ्या व बुरशी यांच्या वापराने नियंत्रणात येतात. त्याद्वारे बाजारातील कीडनाशकावर होणारा खर्च तसेच पीक उत्पादन खर्च कमी होतो व पर्यावरण चांगले ठेवण्यास मदत होते.

दशपर्णी अर्काची वैशिष्ट्ये:
1)वनस्पतिजन्य अर्क मनुष्यास व इतर प्राण्यांस तसेच वनस्पतीस हानिकारक नसतात.
2)वनस्पती अर्काच्या वापराने कीटकामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही.
3)वनस्पती अर्क मित्रकिटकांना हानिकारक नसतात व त्यांचे निसर्गाशी मित्रत्वाचे नाते असते.
4)वनस्पती अर्काचे अंश धान्य, फळे व भाजीपाला यात इतर कीडनाशकाप्रमाणे शिल्लक राहत नाहीत.
5)वनस्पतीचा अर्क वापरण्यास सोपा असल्याने त्यापासून कोणताही धोका संभवत नाही.

दशपर्णी अर्क म्हणजे दहा पानांचा अर्क बनवण्यासाठी खालीलप्रमाणे वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला उपलब्ध करून घ्यावा.
 
 
 अ.नं.   वनस्पतीचे नावपाला  (कि.ग्रॅ.)
 1)  कडुनिंब  5 कि.ग्रॅ.
 2)   घाणेरी  2 कि.ग्रॅ.
 3)  निरगुडी  2 कि.ग्रॅ.
 4)  पपई  2 कि.ग्रॅ.
 5)     गुळवेल/ पांढरा धोतरा   2 कि.ग्रॅ.
 6)  रुई पाला  2 कि.ग्रॅ.
 7)  लाल कन्हेर  2 कि.ग्रॅ.
 8)  वनएरंड  2 कि.ग्रॅ.
9)   करंज पाला  2 कि.ग्रॅ.
 10)  सीताफळ पाला  2 कि.ग्रॅ.
 
 
वरीलप्रमाणे 1 ते 10 पाला मिश्रण करावे. हे मिश्रण करून ते एक महिना आंबवणे (सडवावे) हे मिश्रण दिवसातून तीन वेळा काठीने ढवळणे आवश्यक आहे. 1 महिन्यानंतर सदर मिश्रण उकळून घ्यावे. हा अर्क साधारणपणे 6 महिन्यांपर्यंत फवारणीसाठी वापरता येतो. दशपर्णी अर्काद्वारे सर्व प्रकारच्या किडी पहिल्या अवस्थेतील व 34 प्रकारच्या बुरशींची नियंत्रण दशपर्णी अर्काद्वारे करता येते.
ह्नकीडनाशक गुणधर्म असणार्‍या व वेगवेगळ्या अर्कासाठी वापरण्यात येणार्‍या काही वनस्पतींविषयी माहिती

1) निरगुडी

निरगुडी ही वनस्पती कुंपनाला सर्वत्र आढळते. निरगुडी ही बहुवर्षायू झुडूपवर्गीय वनस्पती आहे. ही घाटपरिसरात कोकणात मैदानी प्रदेशात, जंगलात सर्वत्र आढळते. निरगुडीचे दोन प्रकार आहेत. ‘साधी निरगुडी’ व ‘कातर निरगुडी.’ साध्या निरगुडीच्या पानांच्या कडा अखंड असतात; तर कातर निरगुडीच्या पानांच्या कडा कातरलेल्या असतात. कातर किंवा कात्री निरगुडी जास्त गुणकारी समजतात. या वनस्पतीस निगडी, निरगुंडी अशीही स्थानिक नावे आहेत. निरगुडीस भरपूर फांद्या येतात. फुले निळसर लहान फांद्यांच्या टोकावर येणार्‍या लांब, विभागीय परिमंजिरीत येतात. पुष्पवृंत जांभळट-निळसर, पुष्पकोश पाच संयुक्त दलाचा. पुष्पमुकुट द्विओळी, पाकळ्या पाच, चिकटलेल्या, पुंकेसर चार, असमान पाकळ्यांना चिकटलेले बीजांडकोश दोन ते चार कप्पी. फळे मृदू फळवर्गीय, मांसल, लहान, वाटोळे, काळे दोन ते चार भागीय. आत एक बी असते. या वनस्पतीच्या अर्काचा उपयोग मावा व तुडतुडे किडींचे नियंत्रणासाठी होतो.

2) सीताफळ 
 
 
 
 
सीताफळ हे गोड फळ असून फळामध्ये शर्करा, प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. ताजी पक्व सीताफळे वापरतात. सीताफळातील शुभ्र पांढर्‍या रंगाच्या गराचा उपयोग आइस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात करतात. सीताफळाच्या पानात ‘अँकोरीज’ आणि ‘अ‍ॅनोनीन’ ही कीटकनाशक अल्कलाइड द्रव्ये असतात, तसेच बियांमध्ये ‘अ‍ॅसिमेजेनिन’ हे कीडनाशक गुणधर्म असलेले रसायन आहे. या झाडामध्ये ‘हायड्रोरासायनिक आम्ल’ असते. त्यामुळे झाडात वाळवी लागत नाही. त्याच्या अशा कीडनाशक गुणधर्मामुळे त्याचा वापर कीडनाशक अर्कात केला जातो.

3) घाणेरी 
 

 
 
अत्यल्प पाण्यावर वाढणारे बहुवार्षिक वनस्पती असून त्याच्या खोडावर बारीक-बारीक काटे असल्यामुळे ते खरखरीत असते. याचे मोठे झुडूप होत असून काही वेळा ते 6 फुटांपर्यंतही वाढते. अंडाकृती आकाराची पाने फांद्यावर एकमेकांच्या विरुद्ध बाजूस येतात. फुले पूर्ण वाढल्यावर तांबडी व अंजिरी दिसतात. त्याला वर्षभर फुले येतात. या वनस्पतीचे पानांमधील कीडनाशक गुणधर्मामुळे त्याचा वापर वनस्पती अर्कात करतात.

4) धोतरा
 
 
 
अत्यल्प पाण्यावर 2 ते 4 इंच वाढणारे हे वार्षिक वनस्पती आहे. त्याच्यावर स्वतंत्रपणे एकेकटी पाने येतात. फुलाच्या पाकळ्या एकत्र येऊन त्याला नरसाळ्याचा आकार आलेला असतो. फुलामध्ये स्त्रीकेसर व पुंकेसरचे लांब सरळ दांडे असतात. बियाचा आकार मूत्रपिंडासारखा असून त्याचा रंग काळा किंवा तपकिरी असतो. याचे बी विषारी असते. सर्व प्रकारच्या जमिनीतील, बागेची पिके, बागायती पिके व पडिक जमिनीत खरीप हंगामात ही वनस्पती आढळते. या वनस्पतीचे पानातील कीडनाशक गुणधर्मामुळे पीकसंरक्षणामध्ये अर्क म्हणून वापर केला जातो.

5) रुई
 

 
 
ही एक रांगडे बहुवार्षिक वनस्पती असून ती उभी 6 फूट उंच वाढते. कोवळ्या फांद्यावर पांढर्‍या लोकरीसारखी मऊ लव असते. त्याचे खोड गोल असून ते चिवट असते. फांद्यावर मोठ्या आकाराची अंडाकृती साधी पाने एकमेकांविरुद्ध आलेली असतात. फुले बगलेत व शेंड्याकडेही येतात. लहान-लहान फुलांच्या पाकळ्या एकवटून एकत्र राहिल्यामुळे स्त्रीकेसर व पुंकेसर गुंडाळल्यासारखे दिसतात. याचे फळ म्हणजे एक कप्पा असलेली शेंग होय. बियांवर तंतूसारखे पांढरे केस असतात व त्यामुळे बियांचा प्रसार सुलभतेने होतो. या वनस्पतीचा उपयोग कीडनियंत्रणासाठी केला जातो.

6) कडुनिंब (उरीवशीरलींर खपवळलर)


 
 
कडुनिंब सदाहरित, उंच व जलद वाढणारा वृक्ष (उंची 25 मीटर व खोडाचा घेर 2.5 मीटर). त्याच्या पानांचा गर्द हिरवा मुकुट आकर्षक असून, त्याचा विस्तार 10 मी. असतो. या झाडावरील असंख्य फुलांना मधाचा सुगंध असतो. हे झाडा नापीक कोरड्या जमिनीत वाढते आणि जास्त तापमान, कमी पर्जन्यमान दीर्घकाळ अवर्षण व क्षार सहन करू शकते. बियांपासून नैसर्गिक अभिवृद्धी होते आणि 9 ते 12 महिन्यांच्या रोपांचे यशस्वीपणे स्थलांतर करता येते. पक्षी व वटवाघुळे बियांचा प्रसार करतात. पेरणीपासून 3 ते 5 वर्षांनी फळधारणेची सुरुवात होते. भारतीय उपखंडात या झाडाला जानेवारी ते एप्रिल महिन्यात फुले लागतात. आणि ते ऑगस्ट महिन्यात फळे (निंबोळ्या) पक्व होतता. सुमारे 2 सें.मी. लांब पक्व फलात पिवळा गर, पांढरे टणक कवच व भरपूर तेल असलेले तपकिरी रंगाचे बी असते. झाडापासून त्याच्या वाढीनुसार पाला दरवर्षी मिळतो. फळांचे उत्पादन, पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, अनुवंशिकता यावर अवलंबून असतो.

7) पपई (उरीळलर झररिूर)
 

 
 
पपईचे मूळ स्थान दक्षिण मेक्सिको असून, भारतात फार वर्षांपूर्वी पपईचे स्थलांतर झाले व बिहार, राजस्थान, आसाम व ब्रह्मदेश, तसेच महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नागपूर, बुलडाणा, अहमदनगर, वर्धा, अमरावती, नाशिक व पुणे जिल्ह्यांमध्ये पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पपईचे पीक कमी वेळेत, कमी खर्चात व कमी जागेत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असून पपईचे फळ आरोग्याला पोषक आहे. त्याचा औषधांमध्ये उपयोग होतो. पपईच्या फळापासून ‘पपेन’ नावाचा जो चिकट पदार्थ मिळतो त्याचा उपयोग कातडी कमवणे औषधे तयार करणे वगैरेंसाठी केला जातो. पपई फळामध्ये खनिजद्रव्ये, स्फुरद, लोह, कॅल्शियम तसेच अ, ब, क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच फळामध्ये कार्बोहायड्रट्सही असतात.
पपईला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. पपईच्या झाडाला कडाक्याची थंडी मानवत नाही. दमट हवामान फळांचा दर्जा चांगला नसतो. ज्या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो, अशा प्रदेशात पपईची लागवड यशस्वी होत नाही. पपईची वाढ 38 ते 44 अंश तापमानात चांगली होते. जोरदार वारे तसेच कडाक्याची थंडी, दव व धुके या पिकास हानिकारक ठरते. पपईच्या पानामध्ये कीडनाशक गुणधर्म असल्याने त्याचा अर्क तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

8) कण्हेर
 


 
तांबडी कण्हेर व पिवळी कण्हेर या दोन्ही वनस्पती म्हणजे सदाफुलीच्या कुळातील आहेत. तांबड्या कण्हेरीचे अनेक संकरित-सुधारित प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. तांबड्या कण्हेरीचे सुधारित, मोठे झुडूप असते. फांद्या भरपूर, खोडाच्या तळापासूनच तयार होतात. फांद्या सरळ, उंच वाढणार्‍या, गुळगुळीत पाने, साधी, समोरासमोर, चामड्यासारखी जाड, अनेक वेळा एका पेर्‍यावर तीन-तीन पाने तयार होतात. 10 ते 15 सें.मी. लांब, रेषाकृती-कुंतसम, दोन्ही बाजूंस निमुळती, वरील बाजू गर्द हिरवी खोडा-फांद्या व पानांमध्ये मोठ्या प्रमाणात पांढरा दुधासारखा चीक असतो. या वनस्पतीस वर्षभर बहर येतो. तांबड्या कण्हेरीची झुडपे नैसर्गिकपणे नद्यांच्या काठांवर वाढलेली असतात.

9) जट्रोफा


 
 
ही वनस्पती रबर एरंड या पिकाशी साधर्म्य दर्शविते. जट्रोफाचे झाड 3-4 मीटर उंचीचे वाढते. या झाडाच्या फळाबरोबर इतर सर्व भाग उपयोगी असतात. पोर्तुगीज प्रवाशांमुळे या वनस्पतीचा प्रसार जगभर झाला. अरब लोक जट्रोफाचा औषधी उपयोग करतात.10) करंज (झशपसराळर सश्ररलीर)
 

 
 करंज ही वृक्षवर्गीय वनस्पती लेग्युतिमिनीसी (शिंबी) कुळातील असून पोंगामिया हे या वृक्षाचे तमील नाव पोंग किंवा पोंगमपासून झाले आणि लॅटीनमध्ये ग्याब्रा म्हणजे गुळगुळीत किंवा लोमहीन पदार्थ असा आहे. एका मध्यम 25 ते 30 फूट उंचीचा पानगळ वृक्ष आहे. याचे खोड लहान, साल मातकट रंगाची गुळगुळीत आणि छत्र पसरट छायादायक असते. पाने त्रिदळी, हिरव्या रंगाची गुळगुळीत असतात.
अखाद्य तेल देणारा हा एक महत्त्वाचा वृक्ष आहे. बियात 27 ते 36% तेल असते. तेल पिवळसर रंगाचे विशिष्ट वासाचे असते. तेलात ओलीक अ‍ॅसिड 61.30%, लिनोलिक अ‍ॅसिड 9.27%, पालमॅटिक 6.06%, हायड्रेडॉक्सीस्टोरिक 4.36%, अराचिडीक 4.30%, लिनोसेरिक 3.22%, स्टीरीक 2.19% आणि मायरीस्टिरीक 0.23% असते.