हवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम

डिजिटल बळीराजा-2    04-Dec-2019

rain_1  H x W:
 
 
 
किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकाशी विशिष्ट सबंध असून हवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम नियमित सर्वेक्षनाद्वारे किडींचा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने बंदोबस्त करणे शक्य होणार आहे.
 
आपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. या किडी आपल्या पिकांचे दरवर्षी 15-20 टक्के नुकसान शेतात करत असतात. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध असतो, म्हणून कीड व्यवस्थापनामध्ये हवामानाचा किडीवर होणारा परिणाम समजावून घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षात हवामानाचे बदलते स्वरूप त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या पिकाने यापूर्वी कोरडवाहू भागातील बाजरीचेक्षेत्र व्यापले, मात्र त्याच पिकास कोरडे हवामान न लाभल्याने रोगाचे साम्राज्य वाढले आणि अनेक प्रकारची कीडनाशके फवारणी करूनही नियंत्रण कमी प्रमाणात लाभले. आर्थिक उलाढालीच्या पिकांना हवामान बदलाचा फटका बसला आणि शेतकरीवर्ग हताश झाला. सर्वसाधारणपणे किंडीची संख्या पावसाळ्यात जास्त असते. त्या मानाने ती हिवाळ्यात कमी तर उन्हाळ्यात त्यापेक्षाही कमी असते. परंतु सध्या बदलत्या हवामानामुळे किंडीचे प्रमाण वातावरणानुसार कमी अधिक प्रमाणात बदलत व अनियमित आहे. 
 
किडींच्या संख्येवर परिणाम करणारे हवामानातील घटक 
 
1) तापमान (Temperature) ः वातावरणातील खूप जास्त किंवा अति कमी तापमान हे किडीच्या जीवनक्रमावर परिणाम करतात. उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे भरपूर किडी मरतात, तर काही सुप्तावस्थेत जातात. त्याला एस्टीवेशन(-शीींर्ळींरींळेप) असे म्हणतात. उन्हाळ्यात अधिक तापमानामुळे किडींची संख्या कमी होते, अंडी देणे, चयापचय व जीवनवाढीच्या क्रिया मंदावतात, तसेच किडी एका ठिकाणावरून दुसरीकडे स्थलांतर करतात. अति कमी तापमानालासुद्धा किडींची वाढ व रचनात्मक कार्य मंदावते. त्या सुप्तावस्थेत जातात त्याला हायबरनेषण (कळलशीपरींळेप) असे म्हणतात. किडींमध्ये त्यांचे शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानाशी कमी जास्त प्रमाणात सम प्रमाणात ठेवले जाते. त्याला पोइकिलोथर्मिक (झेळज्ञळश्रेींहशीाळल) असे म्हणतात. वातावरणातील तापमानावर किडींचे अंडी देण्याचा दर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. उदा. चौकोनी ठिपक्याचा पतंग (ऊइच्) ही कीड फक्त 18 ते 22े उ तापमानाला अंडी देतात. मनुष्याच्या केसातील ऊ सुद्धा 25े उ पेक्षा कमी तापमानाला अंडी घालत नाही. वातावरणातील जास्त तापमानामुळे किडींचे खाद्य नष्ट होऊन किडींची संख्या कमी होते किंवा मंदावते. विशिष्ट प्रकारच्या तापमानात ठराविक किडींची आणि रोगांची वाढ झपाट्याने होते. पावसात उघडीप होताच आणि चांगला सूर्यप्रकाश मिळून तापमान वाढू लागल्यावर काही किडी आपल्या वाढीची अवस्थापूर्ण करतात. झपाट्याने अनेक अंडी घालतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. लष्करी अळी, केसाळ अळी, हेलिकोव्हर्पा वा अमेरिकी बोंड अळी, फळमाशी, शेंगा पोखरणारी अळी, मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी असे एक ना अनेक किडींचे प्रकार दिसू लागतात. 
 
2) प्रकाश (Light) : प्रकाश हा किडीमध्ये ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. प्रकाश व अंधाराच्या आधारावर किडींचे मुख्य कार्य सुरळीत चालते. प्रकाशामुळे किडींमध्ये बदल होत असतात. कडींच्या हालचाली, अंडी देण्याची क्षमता, वाढीचा स्तर, प्रजनन, खाद्य अशा गोष्टींवर प्रामुख्याने प्रभाव पडतो. प्रकाशाच्या आधारावर किडींमध्ये दोन प्रकार पडतात. पहिला ज्या किडी दिवसा कार्यरत असतात त्यांना डायअर्नल (ऊर्ळीीपरश्र) असे म्हणतात. दुसरे ज्या किडी रात्रीच्या वेळेस कार्यरत असतात त्यांना नॉक्चअर्नल (छेर्लीीींपरश्र) असे म्हणतात. काही किडी फक्त अंधारातच अंडी देतात उदा. कपाशीवरील बोंड अळी, केसाळ अळी, कॉडलिंग पतंग इत्यादी, तर काही किडींना अंडी देण्यासाठी प्रकाशाची गरज असते. उदा. फळमाशी.
 
3) आद्रता (Humidity) : पावसाळ्यात जास्त आद्रता बर्‍याच किडींना मानवते, तर हिवाळ्यात जशीजशी आद्रता कमी कमी होत जाते तशी किडींच्या संख्येत घट होते. भात या पिकांवर येणार्‍या तपकिरी तुडतुडे व इत्तर पिकांवर येणारा मावा या किडींचा प्रादुर्भाव आद्रतेमुळे वाढतो. साठवणीतील धान्यात नऊ टक्क्यांपेक्षा कमी आद्रता असल्यास धान्याला किडींचा उपद्रव होऊ शकत नाही, पावसाळ्यात धान्यातील आद्रता वाढल्यामुळे धान्य मऊ होते, त्यामुळे धान्य किडी साठवणीतील धान्याचे खूप नुकसान करतात. उन्हाळ्यात तीन-चार दिवस धान्य व्यवस्थित वाळवून जर हवाबंद, स्वच्छ, कोरड्या कोठारात अथवा धातूच्या कोठ्यात साठविले तर पावसाळ्यात अशा धान्यास किडींचा उपद्रव होत नाही. जास्त आद्रतेमुळे किडीबरोबर रोगाचे प्रमाणसुद्धा वाढते. हिवाळ्याच्या सुरवातीला म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये किडींचा सुळसुळाट असतो, परंतु नंतर वातावरण जसे जसे थंड होत जाते व आद्रता कमी कमी होत जाते तसे किडी निष्क्रिय होऊन सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे त्यांच्या विविध जीवन अवस्थाचा कालावधी वाढत जातो व किंडीची संख्या कमी होते. 
 
4) पाऊस (Rainfall): किडींवर परिणाम करणार्‍या घटकांपैकी पाऊस हा महत्त्वाचा घटक असून अतिपावसामुळे भरपूर किडी पाण्याबरोबर धुतल्या जाऊन पाण्यासोबत वाहून जातात, तर खूप सार्‍या किडी मरण पावतात. पावसाळ्यात जमिनीत पाणी मुरल्यामुळे जमिनीत राहणार्‍या किडी मातीत दबून मरतात, तर काही कडक उन्हात आल्यामुळे प्रखर उष्णतेत मरण पावतात, परंतु तुरळक पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. ढगाळ वातावरण हे किडीसाठी पोषक समाजले जाते. त्यामुळे अळीवर्गीय किडी व रसशोषित किडी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होतो. मावा, खोडकिडे, फळे पोखरणार्‍या अळीचा उपद्रव जास्त पावसामुळे कमी होतो, परंतु खोडमाशीचा उपद्रव वाढतो. जास्त पाऊस होऊन मध्येच खंड पडल्यास लष्करी अळी, उंट अळी, शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, मावा, कोळी या किडींचा उपद्रव सुरू होतो.
 
5) वारा (Wind) ः वार्‍यामुळेसुद्धा किडींच्या जीवनक्रमावर प्रभाव पडतो. वार्‍यामुळे किडी हवेसोबत एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळे किडींचा उपद्रव एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी प्रसारित होतो. हलक्या किडी, अंडी, कोष हे हवेसोबत प्रसारित होऊन नवीन ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करतात किंवा नवीन ठिकाणी खाद्य न मिळाल्यामुळे मरतात.
 
प्रत्येक हवामान आठवड्यात कपाशीवरील रसशोषक किडींचा सरासरी प्रदुर्भाव बघता, असे निदर्शनास येते की मावा या किडींचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात व डिसेंबरपासून पुढचा हंगाम संपेपर्यंत आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षावर आढळून येतो. माव्याचा प्रादुर्भाव होण्यास दिवसाचे कमी तापमान व रात्रीची कमी आद्रता कारणीभूत आहे, असे आढळून येते. तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत आर्थिक नुकसानीच्यावर आढळून येतो आणि त्याला ढगाळ वातावरण, रात्रीच्या तापमानातील वाढ, तसेच रात्रंदिवसाची जास्त आद्रता पोषक आढळून आली आहे. फुलकिडीच्या पोषक वाढीस ढगाळ वातावरण, रात्रीच्या तापमानात वाढ तसेच रात्रंदिवासाची जास्त आद्रता, तर पांढर्‍या माशीच्या प्रदुर्भावास भरपूर सूर्यप्रकाश, रात्रीच्या तापमानात व पाऊसमानात घट हे वातावरणपोषक असल्याचे आढळून आले आहे.
 
अशाप्रकारे वातावरणातील विविध घटक किडींच्या जीवनक्रमावर बदल घडवून आणतात. शेतकरी बंधूंनी नियमित सर्वेक्षण करून, वाढलेल्या किडींचा ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने बंदोबस्त केला तर कीड वेळीच नियंत्रणात येऊन आर्थिक नुकसान पातळीच्याखाली राखण्यात मदत होते.
पिकावरील विविध किडीसाठी पोषक घटक
 
कापूस
 
किडी पोषक घटक
 
तुडतुडे तापमान, आर्द्रता व पर्जन्य वाढल्यास व सूर्यप्रकाश कमी असल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो.
पांढरी माशी पायरेथ्रॉइड गटातील किटकनाशकाचा अतिवापर पर्जन्याचा अभाव, जास्त दिवसांचा पावसाचे ताण व जास्त तापमान यामुळे पांढर्‍या माशीचा उद्रेक होतो. कमाल तापमान व सूर्यप्रकाश वाढल्यास, किमान तापमान, पर्जन्य व आर्द्रता कमी झाल्यास पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वाढतो.
 
फुलकिडे उष्ण व कोरड्या हवामानात फुलकिड्यांचे प्रजनन वाढते व जीवनक्रम कमी कालावधीत पूर्ण होतो व जास्त पिढ्या तयार होतात. मावा सततचा रिमझिम पाऊस व अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक आहेत.
 
हिरवी बोंंडअळी कमी तापमान, ढगाळ वातावरण व जास्त आर्द्रता या किडीस पोषक आहेत. जोराच्या पावसानंतर प्रादुर्भाव वाढतो. तसेच लागवडीचे कमी अंतर व सिंथेटीक पायरेथ्रॉईड गटातील किटकनाशकाचा अतिवापर हेसुद्धा या किडींच्या प्रादुर्भावास पोषक आहेत. ही कीड कोळशी, पेठारी व तूर, हरभरा, टोमॅटो इत्यादी अनेक तण व पिकांवर उपजीविका करते.
पिठ्या ढेकूण उष्ण व कोरडे हवामान या किडीस पोषक आहे. ही कीड गाजरगवत, पेंंठारी, रानभेंंडी, कोळशी, जास्वंद, इत्यादी अनेक तण व पिकावर उपजीविका करते.
 
सोयाबीन
 
किडी पोषक घटक
 
पाने पोखरणारी/गुंडाळणारी अळी ः ही कीड जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत क्रियाशील राहते. पण सप्टेंंबरच्या तिसर्‍या आठवड्यात जास्त नुकसान करते. खूप दिवसांची उघडीप व नंतर अनियमित पाऊस यामुळे प्रादुर्भाव वाढतो. बावची या तणावरसुद्धा उपजीविका करते.
 
चक्री भुंगा हंंगामाच्या शेवटी या किडीची अळी सुप्तावस्थेत जाते व नंतर पावसाळ्यामध्ये या अळीचा कोष होऊन त्यातून प्रौढ बाहेर पडतात व प्रादुर्भावास सुरुवात करतात.
 
खोड माशी ही कीड जून-जुलै ते ऑटोबर या कालावधीत क्रियाशील राहते.
तंबाखूची पाने खाणारी अळी चांगला पाऊस व त्यानंतर कोरड तसेच अनियमित पाऊस यामुळे या खाणारी अळी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कमी तापमान व जास्त आर्द्रता हे या किडीस पोषक आहेत.
उंट अळ्या अनियमित पावसामुळे प्रादुर्भाव वाढतो.
 
भुईमूग
 
किडी पोषक घटक
 
मावा थंड हवामान या किडीस पोषक आहे.
 
फुलकिडे उष्ण व कोरडे हवामान या किडीच्या प्रादुर्भावास जास्त पोषक आहे.
लाल केसाळ अळी खूप दिवसांनी पावसाची उघडीप व त्यानंतर पाऊस यामुळे प्रादुर्भाव वाढतो.
तंबाखूची पाने चांगला पाऊस व त्यानंतर कोरड तसेच अनियमित पाऊस यामुळे या खाणारी अळी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कमी तापमान व जास्त आर्द्रता हे या किडीस पोषक आहेत.
हुमणी या किडीचे प्रौढ जोराचा मृगाचा पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर पडतात.
 
तुर
 
किडी पोषक घटक
 
पिसारी पतंग फुलोर्‍याच्या वेळी सूर्यप्रकाश व 25 अंश से. तापमान यामुळे पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव वाढतो.
शेंंगा पोखरणारी 27-28 अंश. सेंं. तापमान या किडीस पोषक आहे.
 
अळी
 
हरभरा
 
किडी पोषक घटक
 
घाटेअळी 20- 30 अंश से. तापमान या किडीच्या वाढीस पोषक आहे. तसेच तूर, टोमॅटो इत्यादी पर्यायी खाद्य वनस्पतीमुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
 
देठ कुरतडणारी अळी जमिनीमध्ये जास्त ओलावा व पेरणीच्या वेळी जमिनीमध्ये जास्त सेंद्रिय घटक हे या किडीस पोषक आहेत.
वाळवी हलकी व कोरडी जमीन यामध्ये वाळवीचा जास्त प्रादुर्भाव होतो. पहिल्या पावसानंतर जमिनीतून एकत्रितपणे निघतात व रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतात.
 
करडई
 
किडी पोषक घटक
 
मावा कमी तापमान व जास्त आर्द्रता यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
उशिरा पेरणी केल्यास प्रादुर्भाव जास्त होतो.
 
नाकतोडे : शेताच्या बांधावर नाकतोड्याची अंडी सुप्तावस्थेत असतात. पाऊस पडल्यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात व आजूबाजूच्या वनस्पतीवर उपजीविका करतात.
 
हुमणी : मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर या किडीचे प्रौढ जमिनीतून बाहेर पडतात व रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या झाडावर उपजीविका करतात. जमिनीमध्ये कमी ओलावा असल्यास यांची संख्या वाढते.
 
 
डॉ. ए. जी. बडगुजर, प्रा. किरण बुधवत
डॉ. समीर लांडे