उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी खते, पोषणद्रव्य व पीकसंरक्षक फवारणीचे नियोजन

डिजिटल बळीराजा-2    03-Dec-2019

uss_1  H x W: 0


जुलै महिना म्हणजे आडसाली लागणीचा हंगाम.
आडसालीची पूर्वतयारी पूर्वी पाठवलेल्या माहितीनुसार केलेली असणार आहेच. 
 
ऊस पिकासाठी वर्षभर काय काय नियोजन करावयाचे याचा एक चार्ट पाठवित आहे. हा सेव्ह करून ठेवावा, वेळोवेळी पाहावा.
 
1. पाचट कुट्टी करून गाडावी.
 
2. रोटर मारून नांगरट करावी. शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करावी. 
 
3. सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करावा. 
 
4. ढेकळे फोडून बारीक करून घेऊन सरी काढावी. 
 
5. सरीमध्ये थोडेसे सेंद्रिय खत पसरून घ्यावे.
 
6. सेंद्रय खतावर रासा. खते- बेसल डोस टाकून हलक्याशा अवजाराने सरीतल्या मातीत मिसळून घ्यावे.
 
मातीत मिसळून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
 
लागणीचे वेळी
 
7. बियाण्यांवर बुरशीनाशक व कीटकनाशकाची प्रक्रिया करूनच लागण करावी. 
 
8. लागण करण्यापूर्वी सरीत पाणी देऊन जमीन ओलावून घ्यावी. कोरड्यात लागण करून लगेचच पाणी द्यावे किंवा पाण्यात लागण करावी. 
 
9. लागणीनंतर सहा सात दिवसांत हलकेसे पाणी द्यावे.
 
सरीची रुंदी
 
10. मध्यम व हलक्या जमिनीत साडेचार फुटी व मध्यम व खोल काळ्या जमिनीत पाच फूट रुंदीची सरी काढावी. 
बियाणांतील अंतर
 
11. मध्यम व हलक्या जमिनीत एक डोळा दीड फुटावर व मध्यम व खोल काळ्या जमिनीत एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावावे. 
 
तणनाशक
12 . लागणीनंतर तिसर्‍या चौथ्या दिवशी जमिनीत ओल असताना मेट्रीब्युझिनची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यातून समान फवारावे. 
 
बेसल डोस
13. अ. डीएपी 100 किलो 
ब. पोटॅश 75 किलो 
क. सूअ. द्रव्ये 15 किलो 
ड. गंधक 15 किलो 
ई. मॅग्ने. सल्फेट 25 किलो 
फ. कीटकनाशक 10 किलो 
 
जिवाणु लागणीपासून 10 व्या दिवशी 
14. अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर 
ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर 
क. ट्रायको 1 लिटर 
 
डोस क्रमांक 2 लागणीपासून 20/25 दिवसांनी 
15. अ. युरिया 45 किलो 
ब. लिंबोळी पेंड 10 किलो 
सरीत टाकावे.
 
डोस क्रमांक 3 लागणीपासून 40/45 दिवसांनी 
16. अ. युरिया 90 किलो 
ब. लिंबोळी पेंड 20 किलो 
सरीत टाकावे.
 
फवारणी क्रमांक 1 लागणीपासून 45 व्या दिवशी 
17. पहिली फवारणी (60 लिटर पाणी पुरते) 
या फवारणीत संजिवके आणि पोषण द्रव्यांसोबत बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे. याचदरम्यान *खोडकीड* येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करून ही फवारणी ठरवली आहे.
 
15 लिटरच्या पंपाने फवारणी.
पोषण द्रव्ये 
*18:18:18 किंवा 19:19:19 - 600 ग्रॅम प्रतिपंप 150 ग्रॅम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये- 80 ग्रॅम प्रतिपंप 20 ग्रॅम 
 
पीकसंरक्षके
* क्लोरोपायारिफोस - 120 मिलि प्रतिपंप 30 मिली 
* बाविस्टिन - 120 ग्रॅम प्रतिपंप 30 ग्रॅम 
 
संजिवके
* खइ- - 1 ग्रॅम 
* 6 इ- - 4 ग्रॅम
 
खइ- 20-30 मिलि अल्कोहोल (देशी दारू चालते) मध्ये आणि 6इ- सालव्हन्टमध्ये विरघळून घ्यावे आणि 8 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पंपात, वरील तयार केलेल्या मिश्रणापैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरित निविष्ठा मिसळून पाणी भरून फवारणी घ्यावी.
 
एकरी 15 लिटरचे 4 पंप पुरतात.
 
*डोस क्रमांक 4 लागणीपासून 60/65 दिवसांनी* 
18. अ. युरिया 45 किलो 
ब. 242400 100 किलो 
क. पोटॅश 50 किलो 
ब. लिंबोळी पेंड 10 किलो
मिसळून पहारीने एकाच बगलेत 4 ते 6 इंच खोलीवर विभागून आणि दोन छिद्रांत एक फुट अंतराने खते घालावित. 
 
फवारणी क्रमांक 2 लागणीपासून 65 व्या दिवशी
19. दुसरी फवारणी (90 लिटर पाणी पुरते)
या फवारणीत संजिवके आणि पोषण द्रव्यांसोबत बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे. याचदरम्यान खोडकीड असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करून ही फवारणी ठरवली आहे.
पोषण द्रव्ये 
*12:61:0 किंवा 17:44:0 - 900 ग्राम. प्रतिपंप 150 ग्रॅम 
* सी विड एक्स्ट्रॅक्ट- 120 ग्रॅम. प्रतिपंप 20 ग्रॅम
 
पीकसंरक्षके
* क्लोरोपायारिफोस/ रोगोर- 180 मिली. प्रतिपंप 30 मिली
* बाविस्टिन/कार्बेंडिझम - 180 ग्राम. प्रतिपंप 30 ग्रॅम 
 
संजिवके
* G- - 4 ग्रॅम 
* 6 B- - 4 ग्रॅम
 
1- अल्कोहोलमध्ये व 6इ- सालव्हन्टमध्ये विरघळून घ्यावे आणि 12 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पंपात, वरील तयार केलेल्या मिश्रणापैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरित वरील निविष्ठा मिसळून पाणी भरून फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 6 पंप पुरतात*.
 
फवारणी क्रमांक 3 लागणीपासून 85 व्या दिवशी
20. तिसरी फवारणी ( 35 लिटर पाणी पुरते) 
 
पोषण द्रव्ये 
*12:61:0 किंवा17:44: 0 - 1350 ग्रॅम प्रतिपंप 150 ग्रॅम 
* सी विड एक्स्ट्रॅक्ट 180 ग्रॅम प्रतिपंप 20 ग्रॅम 
* पोटॅशियम शोनाइट 1 किलो प्रतिपंप 110 ग्रॅम 
 
पीक संरक्षके
* मोनोक्रोटोफॉस(आवश्यकतेनुसार)-270 मिली प्रतिपंप 30 मिली 
* हेक्झकोनेझॉल(आवश्यकतेनुसार)- 270 ग्रॅम प्रतिपंप 30 ग्रॅम
 
संजिवाके 
* G- - 6 ग्राम 
* 6 B- - 6 ग्राम
 
2- अल्कोहोलमध्ये व 6इ- सॉलव्हन्टमध्ये विरघळून घावे आणि 18 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पंपात, वरील तयार केलेल्या मिश्रणापैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरून फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 9 पंप पुरातात*.
 
डोस क्रमांक 5 लागणीपासून 90 ते 120 दिवसांनी 
21. अ. युरिया 135 किलो 
ब. 242400 100 किलो 
क. सिंसु. फॉस्फेट 150 किलो 
ड. पोटॅश 100 किलो 
ई. लिंबोळी पेंड 100 किलो 
उ. सूअ. द्रव्ये 15 किलो 
ए. गंधक 15 किलो 
ऐ. मॅग्ने सल्फेट 25 किलो 
सरीत टाकून भरणी पूर्ण करावी.
 
जिवाणु भरणीपासून 10 व्या दिवशी 
22. अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर 
ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर 
क. ट्रायको 1 लिटर
 
फवारणी क्रमांक 4 लागणीपासून 105 व्या दिवशी
23. *चौथी फवारणी* ( 150 लिटर पाणी पुरते ) 
 
ही फवारणी महत्त्वाची आहे, यानंतरची फवारणी उसाच्या उंचीमुळे करता येण्याची शक्यता कमी असते.
 
पोषण द्रव्ये 
*13:0:45 - 1000 ग्राम, प्रतिपंप 100 ग्रॅम 
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 1ज्ञस प्रतिपंप 100 ग्रॅम 
* ट्रायकाँन्टेनाँल 0.1 % - 500 मिली प्रतिपंप 50 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 200 ग्रॅम प्रतिपंप 20 ग्रॅम 
 
* क्विनॉलफॉस - 400 मिली प्रतिपंप 40 मिली 
* कार्बेंडॅझीम - 400 ग्रॅम प्रतिपंप 40 ग्रॅम 
 
संजिवाके 
* G- - 7 ग्रॅम 
* 6 B- - 7 ग्रॅम
 
2- अल्कोहोलमध्ये व 6इ- सॉलव्हन्टमध्ये विरघळून घावे आणि 20 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पंपात, वरील तयार केलेल्या मिश्रणापैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरून फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 10 पंप पुरतात*.
 
डोस क्रमांक 6 भरणीपासून 30 दिवसांनी 
24. अ. अमो. सल्फेट 45 किलो 
ब. 242400 100 किलो 
क. पोटॅश 25 किलो 
ब. लिंबोळी पेंड 10 किलो 
*मिसळून सरीत टाकावे. 
 
फवारणी क्रमांक 5 लागणीपासून 125 व्या दिवशी 
25. *पाचवी फवारणी (शक्य झाल्यास)* 
(180 लिटर पाणी पुरते) 
 
पोषण द्रव्ये 
*12:61:0 - 1350 ग्रॅम प्रतिपंप 100 ग्रॅम 
* माग्ने सल्फेट/ मॅग्ने नायट्रेट - 750 ग्रॅम प्रतिपंप 0 ग्रॅम 
* सी विड एक्स्ट्राक्ट - 260 ग्रॅम प्रतिपंप 20 ग्रॅम 
 
*क्लोरोपायरीफॉस - 400 मिली प्रतिपंप 30 मिली
*हेक्झाकोनेझॉल - 400 मिली प्रतिपंप 30 मिली
 
संजिवाके 
* G- - 10 ग्रॅम 
* डखद इ- - 10 ग्रॅम
 
3- अल्कोहोल मध्ये व 6इ- सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणापैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 13 पंप पुरातात*. 
 
*डोस क्रमांक 7 भरणीपासून 60 दिवसांनी* 
26. अमो. सल्फेट 50 किलो 
ब. पोटॅश 25 किलो 
 
27 151 खोडकीड
 
उसावरील खोडकीड वेळीच रोखा
 
उसाच्या उगवणीनंतर मोठ्या बांधणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडकिडीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर झाल्यास ऊस मेल्यासारखा दिसतो.वाळलेल्या पोंग्यावरून ही कीड ताबडतोब ओळखता येवू शकते.सुरू उसामध्ये फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसतो.उसाची लागवड फेब्रुवारीच्यानंतर केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.या किडीचा पतंग वैरणीच्या रंगाचा असून मादी पतंग पानाच्या खालील बाजूस पुंजक्यात अंडी घालते.अंडी लांब गोलाकार सपाट व एका रेषेत घालत असून त्यांचा रंग पांढरा असतो. मादी पतंग 30 ते 40 अंडी घालते व अंडी उबविण्यासाठी 3 ते 6 दिवसांचा कालावधी लागतो.अंड्यातून बाहेर आलेल्या आळीचा रंग पिवळसर पांढरा असून तिच्या अंगावर जांभळ्या रंगाचे पाच पट्टे असतात.अळी अवस्था नुकसान करणारी असून तिचा कालावधी 22 ते 31 दिवसांचा असतो.कोषाचा रंग पिवळसर तपकिरी असून कोषाचा कालावधी 5 ते 9 दिवसांचा असतो.कोष जमिनीलगत पोंग्यात दिसून येतो.पतंगाचा कालावधी 4 ते 5 दिवस असतो.खोडकिडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी 35 ते 51 दिवस लागतात.अंड्यातून बाहेर पडलेली अळी साधारणपणे 17 ते 18 तास पानावर फिरून नंतर ती उसाच्या सुरळीतून किंवा जमिनीलगत असलेल्या खोडात शिरते आणि आतील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे उसाचे पोंगे वाळून मूळ ऊस मेल्यासारखा दिसतो. त्याबरोबरच उसाला फुटवे फुटतात.फुटव्यावरसुद्धा ही अळी उपजिवीका करते.खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात 22 ते 33%, साखर उतार्यात 12 % व गुळाच्या उत्पादनात 27% घट येते.
 
 
नियंत्रणासाठी-ऊस लागवड फेब्रुवारीनंतर करू नये,ऊस उगवणीनंतर ऊस 45 दिवसांचा झाल्यावर बाळबांधणी केल्याने खोडकिडीने निर्माण केलेली छिद्रे बंद होऊन पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल,खोडकिडीची अंडी व किडग्रस्त भाग अळ्यांसह गोळा करून नष्ट करावे.
फवारणी करावी.
 
कृषिभूषण संजीव माने 9404367518
संजीव माने 9403964040 
www.sanjeevmane.com