गुलाबराव पाटील यांचा यशस्वी प्रवास

डिजिटल बळीराजा-2    21-Dec-2019
Gulabrav Patil_1 &nb
 
आटपाडीमधील एका दूरवरच्या खेड्यात गुलाबराव पाटील मोठा झाला. त्याचे वडील 2.5 एकर कोरडवाहू जमीन असलेले एक लहान शेतकरी होते. गुलाबराव पाटील, 2 मोठे भाऊ, दोन धाकट्या बहिणी असे सर्वजण शाकारलेल्या झोपडीमध्ये जेथे पिण्याचे पाणी, वीज, शौचालय यांसारख्या पायाभूत सुविधा नसल्याशिवाय मोठे झाले. ते नऊ वर्षांचे असताना आईचे निधन झाल्यामुळे सर्वांत मोठ्या भावाला शाळा सोडावी लागली. त्यांना एकवेळचे जेवण मिळण्यासाठी झगडावे लागत होते, परंतु अशाही परिस्थितीतही गुलाबराव आटपाडी तालुक्यात एसएसएलसी परीक्षेमध्ये प्रथम आले आणि त्यांच्या या हुशारीने आपल्या वडिलांना पुढील शिक्षणासाठी साह्य करण्यासाठी देण्यास प्रवृत्त केले.
 
परंतु 1990 मध्ये वडिलानी काही मोठ्या शेतकर्‍यांचे बघून शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर खणून त्यांच्या जमिनीच्या छोट्या तुकड्यावर डाळिंबाची लागवड केली. त्यामुळे त्यांच्या विक्रीतून मिळणारा अल्पसा नफा मुलाच्या शिक्षणासाठी काळजीपूर्वक वापरत होते. गुलाबराव 1991 मध्ये बीएस्सी (फॉरेस्ट्री) पास झाले आणि लागलीच बायफ रिसर्च फाउंडेशनमध्ये नोकरीस रुजू झाले. त्यांनी तेथे वनविकास, फलोत्पादन, पशुधनविषयक विकासाचे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या हाताळले. सन 2014 मध्ये त्यांनी स्वतःच्या गावी परतण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्या पगारात शिल्लक राहिलेल्या पैशातून चार हेक्टर पडीक जागा रु. 25,000/- प्रति हेक्टर याप्रमाणे खरेदी केली.
 
jamin_1 H x W:
 
सोलापूर जिल्ह्याला लागून असलेला आटपाडी हा सांगली जिल्ह्यातील वर्षाला 350 मिमी. पाऊस आणि डोंगराळ, हलक्या जमिनी असेलेला तालुका आहे. हलक्या मातीचा, पाणी टिकून राहण्याची क्षमता नसलेला. त्यामुळे दख्खनच्या पठाराचा हा भाग हलकी माती, कमी पाणी त्यामुळे झाडेही कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथे शेती आणि पशुपालनही कमी आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीसाठी पारंपरिक शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते. बहुतेक जण पावसाळ्यात बाजरी, तूर, इतर भरड धान्ये आणि रब्बीमध्ये हरभरा इत्यादी विविध पिके घेतात, परंतु अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी खूपच कमी होते. उन्हाळ्यात हिरवळ तुरळक आढळते, तरीही काही शेतकरी विहिरी खणून फळझाडाची लागवड करीत आहे. उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध नसल्यामुळे बहुतेक छोटे शेतकरी गरिबीमध्ये जीवन जगत आहेत.
 
Khadda_1  H x W 
 
झाडावर आधारित शेतीसाठी व डाळिंब बागायतीविषयी असलेली आवड लक्षात घेऊन त्यांनी डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानी विहीर खणली आणि तिला डाळिंबाला पुरेल एवढे पाणी लागले. सुदैवाने ठेंबू पाटबंधारे योजनेंतर्गत 90 किलोमीटर अंतरावरून कृष्णा नदीचे पाणी आटपाडीमध्ये आले. त्यामुळे डाळिंबाची वाडी वाढविण्यास प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी उर्वरित म्हणजे सर्वच चार हेक्टर खडकाळ जागा फळ बागायतीखाली, लागवडीसाठी आणण्याचे ठरविले. पहिली पायरी म्हणून त्यांनी बुलडोझरने खोदकाम करून मोठे दगड काढून लागवडयोग्य जमिनीची खोली वाढविण्याचे ठरविले. शेतामध्ये समतल बांध घालून पाणी अडविले. त्यांनी तलावातून थोडीशी गाळाची माती आणून ती शेणखतामध्ये मिसळून खड्ड्यामध्ये टाकली. त्यानंतर त्यांनी हलक्या मातीच्या 2.4 हेक्टर (6 एकर) जमिनीवर भगवा जातीच्या डाळिंबाची आणि चांगल्या दर्जाच्या जमिनीवर 1.5 हेक्टरवर (4 एकर) द्राक्षे लावली. जमीन हलकी आणि पाण्याची कमतरता या बाबी लक्षात घेऊन आणि रासायनमुक्त फळेनिर्मितीचे तत्त्व लक्षात घेऊन शेणखत आवश्यक मात्रेमध्ये आणि जैविक कीटकनाशके वापरण्याचे ठरविले. जशी ही सेंद्रिय शेतीच, परंतु आवश्यक त्या मात्रेमध्ये रसायने वापरण्यात आली की ज्याचे फळामध्ये अंश उतरणार नाहीत. ठेंबू सिंचन योजनेची पाणीपट्टी भरावयास लागू नये म्हणून ठिबक सिंचन पद्धतीच्या पर्यायाचा वापर करण्याचे ठरविले.
Tractor_1  H x
 

लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सोपे मार्ग

डाळिंबाच्या एक एकर लागवडीसाठी पहिल्या वर्षी रु. एक लाख चाळीस हजार खर्च येतो. या खर्चामध्ये झाडे लावण्यासाठी खड्डे खणणे, खड्डे भरणे (रु.15,000/-), ऊतिसंवर्धनावर तयार केलेली 4000 रोपे (रु.8000/-12,000 /-), ठिबक सिंचन संच बसविणे (रु.30,000 /-), कृषी औषधे आणि इतर मजुरी स्थानिक (रु.15,000/-) इत्यादी. याव्यतिरिक्त सिंचन सुविधासाठी अतिरिक्त गुंतवणूक आहे जी पाणी उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकते. बरेच वेळेस शासन स्थानिक विकासाचा भाग म्हणून ही गुंतवणूक करीत असते. जर शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकरीच हा भांडवली खर्च रु. एक ते दीड लाख प्रतिएकरी भांडवली गुंतवणूक करतात. फळतोडणीनंतरचा झाडाची छाटणी खर्च रु.25000/-, शेणखत-कृषी औषधे रु.25000/-, सिंचन-सुविधा रु.10,000 ते 15,000 /-लक्षात घेता प्रतिएकरी अंदाजे एकूण खर्च रु. एक ते सव्वा लाख येतो. तिस़र्‍या वर्षापासून झाडापासून एकरी आठ ते बारा टन फळ उत्पादन मिळण्यास सुरवात होते आणि साधारणतः अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. व्यवस्थापन लक्षात घेता रु. चार लाख उत्पन्न मिळते, अंदाजे रु. एक ते अडीच लाख अतिरिक्त नफा मिळतो.

तेल्या रोग, मूळ कुजणे हे डाळिंबावरील प्रमुख रोग असून त्याचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असते. आटापडीतील दुर्गम भागातील शेतकर्‍यांना डाळिंब विक्रीची अडचण येत नाही. कारण बर्‍याच शहरांतील फळाचे व्यापारी विशेषतः दिल्ली, कोलकता येथील फळांचे व्यापारी हे शेतकर्‍यांशी फळखरेदीसाठी थेट संपर्क साधतात. काही नोंदणीकृत निर्यातदार फळ उत्पादकाशी संपर्क साधून खरेदीपूर्वी डाळिंबाचे नमुने तपासणीसाठी घेतात, परंतु कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे बरेचवेळा या व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होते. 

लहान शेतकर्‍यांना यशस्वी होण्यासाठी वाडीचे नियोजन, जमिनीची पुरेशी मशागत, पाण्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर, बागेच्या निगराणीबद्दलची विशेषतः त्यांना लागणार्‍या अन्नघटकांची माहिती, निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी फळझाडांच्या संरक्षण बाबीचा समावेश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शेतकर्‍यांची आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. मूळतः छोट्या शेतकर्‍यांना प्रथमतः त्याचा उत्पादनवाढीविषयक आत्मविश्वास वाढावा म्हणून मार्गदर्शन करण्याची गरज असते. एकदा उत्पादनवाढीला सुरवात झाली की, इतर बाबींचे पुरवठादार बागायातदाराशी संपर्क साधतात आणि त्याची उत्पादने विकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत्तात. बरेच सल्लागार स्वतःचे कौशल्य विकण्याचा प्रयत्न करतात. या सर्व घटकांना टाळणे मोठे आव्हानच आहे. व्यापारामधील गैरमार्गाचा वापर आणि वेळेवर विक्रीचे पैसे मिळणे या समस्या आहेत. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी उत्पादकांनी ग्रामीण पातळीवर एकत्र येऊन स्वतःचे औपचारिक अथवा अनौपचारिक गट स्थापन करून आधुनिक तंत्रज्ञान, माहितीची उपलब्धता, खरेदी-विक्रीची साखळी तयार करणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांना सिंचनासाठी स्थानिकरीत्या उपलब्ध असलेल्या विविध जलस्त्रोतांच्या माध्यमातून पाणी सुलभपणे उपलब्ध करून देणे त्याकरिता स्थानिक जलस्त्रोताचा अभ्यास करणे, आवश्यकता असल्यास दूर असलेल्या नद्यांचे पाणीही उपलब्ध करून देणे याबाबत शासन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शासन आणि बँकांनी मनात आणल्यास टेंभू सिंचन प्रकल्पाची क्षमता वाढवू शकतात किंवा अनेक योजना राबवू शकतात. त्यामुळे एकट्या आटपाडीतील 6000 ते 8000 हेक्टर पडीक क्षेत्र फळ लागवडीखाली आणता येईल. किमान हेक्टरी सहा ते आठ जणांना रोजगार उपलब्ध होईल. अशा योजनांमुळे देशातील इतर दुष्काळग्रस्त भागातील लाखो अल्प/अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना सन्मान आणि समृद्धीसह राहण्याची एक उत्कृष्ट संधी निर्माण करता येईल.

पडीक जमिनीच्या विकासाच्या सेवा देणार्‍यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या सेवा शेतकर्‍यांना वाजवी दरात उपलब्ध होणे गरजेचे आहे. शेतीविषयक यंत्रसामग्री उत्पादन करणार्‍या उत्पादकांनी अशा भूविकासात्मक प्रकल्पाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुसर्‍या बाजूने, शासनाने दर्जेदार रोपांचा (ऊतिसंवर्धनाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक रोपाचा) पुरवठा, खाजगी पुरवठादारांमार्फत होणार्‍या निविष्ठांवर नियंत्रण, नवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी आणि शेतकर्‍यांना वेळोवेळी भेडसावणार्‍या तांत्रिक अडचणी याबाबत संशोधन करणार्‍या संस्थांशी संपर्कात राहणे गरजेचे आहे. फळ उत्पादकांना विविध बाजारपेठांतील खरेदी-विक्री दर, आयातदार देशांतील फळ गुणवत्तेबाबतचे निकष-मापदांड, जलद आणि सुरक्षितरीत्या उत्पादनाची वाहतूक, शीतगृहाची उपलब्धता, अधिक चांगली किमत मिळवण्यासाठी योग्य आणि स्पर्धात्मक व्यापार, शेतकर्‍यांना नियमितपणे प्रशिक्षण, सुलभरीत्या अर्थपुरवठा यामुळे उत्पादनाला आणि शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास गती मिळेल. देशामध्ये अशाप्रकारच्या अनेक यशो-कथा आहेत. आपले धोरण असे असावे की अशा यशो-कथांची पुनरावृत्ती व्हावी आणि त्यातून यशस्वी शेतकर्‍यांच्या सहभागातून उत्कृष्ट शेतकरी तयार व्हावेत की ज्यामुळे शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळेल.

2013-14 मध्ये सुरू केलेल्या वाडी कार्यक्रमामध्ये गुलाबरावांनी शेणखत खरेदीसाठी आणि पाणीपट्टीसाठी रु. एक लाख रुपये खर्च. गेल्या वर्षी त्यांनी 6 एकर क्षेत्रावर जवळजवळ 35 टनांपेक्षा डाळिंबाचे उत्पादन घेतले. त्यापैकी 18 टन डाळिंबे निर्यात केली आणि त्याला रु.102/- प्रतिकिलो भाव मिळाला. बाकी शिल्लक डाळिंबे रु.30/- प्रतिकिलो भावाने स्थानिक बाजारात विकली. या वर्षी त्यांना पंचावन्न टन डाळिंबाचे उत्पादन होईल, असा विश्वास वाटतो. द्राक्षवाडी कार्यक्रमामध्ये माणीक चमन आणि एसेस जातीच्या द्राक्षाची लागवड केली आणि प्रतिएकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळून साधारणतः रु. 5 लाख /-प्रतिएकरी/प्रतिवर्षाचे उत्पन्न मिळेल असे वाटते. गुलाबरावांनी नुसतेच उत्पन्न दुप्पट केले नाही, तर ते नवीन पिढीला मार्गदर्शक ठरले आहेत. सध्या आटपाडीतील 2500 पेक्षा जास्त शेतकरी 3000 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करतात. पडीक जमिनीवर झालेली ही लागवड आणि प्रतिएकर कमी उत्पन्न देणारी धान्ये ही बाब लक्षात घेता, जर थोडीशी काळजी घेतली तर आपल्या शेतकर्‍यांचे उत्पन्न पुढील पाच वर्षांत दुप्पट करणे अशक्य नाही. गुलाबरावांचे सिद्ध झालेले तंत्र वापरल्यास निश्चितच शेतीद्वारे मिळकतीत चौपट वाढीची खात्री मिळते. 

 
 
डॉ. नारायण हेर्डे