पशु आहार : स्मार्ट किसान

डिजिटल बळीराजा-2    12-Dec-2019
 
Cow_1  H x W: 0 
 
 
पशु आहार: स्मार्ट किसान
 
गाई, म्हशींचा आहार पूरक व संतुलित असावा. प्रत्येक गाई, म्हशीला शरीर वजनाच्या 2.5 ते 3 टक्के कोरडे घटक आवश्यक असतात.
 
कबडा, सरमाड, गव्हाचे काड, भाताचे तूस यात 85 टक्के, पेंडी, चुनी यात 90 टक्के आणि कडवळ, मका, बरसीम, गिनी गवत यात 15 ते 20 टक्के कोरडे घटक असतात.
 
प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवी चारा (एकदल अथवा द्विदल) पशुखाद्य व क्षारमिश्रण द्यावे. वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करून द्यावा.
 
सर्वसाधारणपणे दहा लिटर दूध देणार्‍या आणि 400 किलो वजन असणार्‍या संकरीत गाईसाठी आहार
 
हिरवा चारा एकदल (21 किलो) : मका, ज्वारी, बाजरी, ओट, नेपियर इ.
 
द्विदल (9 किलो) : लुसर्न, बरसीम, चवळी, वाटाणा, वाल, गिनी गवत, पॅरा गवत, सुदान गवत, दशरथ गवत, अंजन गवत, स्टायलो गवत इ.
 
वाळलेला चारा (3-5 किलो) : ज्वारीचा कडबा, मका, बाजरी, सरमाड, गव्हाचा तूस, भाताचा पेंडा, वाळलेले गवत, सोयाबीन व तुरीचे काड, उडदाचा पाला, मुगाचा पाला इ.
 
पशुखाद्य : शरीर पोषणासाठी 1-1.5 किलो आणि प्रतिलिटर दूध उत्पादनास 400 ग्रॅम.
 
खनिज मिश्रण : 60 ते 80 ग्रॅम प्रतिदिन - गरजेनुसार मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे.