चला, जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेल्या पाण्याची उत्पादकता वाढवूया...

डिजिटल बळीराजा-2    08-Nov-2019
|
 
 
 
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र शासनातर्फे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून व पानी फाउंडेेशनतर्फे वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम जोरात चालू आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढत चालली आहे. मात्र मे व जून महिन्यात दरवर्षी आपण पाणीटचाईला सामोरे जात आहोत. याच्या कारणांचा शोध घेतला तर असे लक्षात येईल की, पाण्याची उपलब्धता वाढली आहे, पण उत्पादकता (water use efficiency) वाढलेली नाही. उपलब्ध झालेल्या पाण्याचा वापर सर्रास भुईदंडाने (flow Irrigation) केला जात असल़्याने आपण तुतीच्या जलसंकल्पाकडे वाटचाल करीत आहोत. शिलकीच्या जलसंकल्पाकडे जाण्यासाठी या उपलब्ध पाण्याचा वापर सूक्ष्मसिंचनाने चळलीे Micro Irrigation करण्याशिवाया पर्याय नाही. म्हणजेच जलसंधारणाबरोबरच जलनियोजनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यासाठी काही प्राथमिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
 
सर्वप्रथम जलयुक्त शिवारमधून उपलब्ध झालेल्या पाण्याचे मोजमाप करावे लागेल. जून ते सप्टेंबर हा जरी पावसाळ्याचा कालावधी असला तरी आपल्याकडे ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने, ऑक्टोबरच्या शेवटी प्रत्येक पाणीसाठ्याचे ऑडिट करून घ्यावे. या पाणीसाठ्याचा लाभ होणार्‍या शेतकर्‍यांची यादी करावी. यामध्ये पाझराद्वारे विहिरीला पाणी उपलब्ध होणारे व उपसा सिंचन करणारे अशी वर्गवारी करावी. उपसा सिंचन करणार्‍या शेतकर्‍याकडे दैनंदिन गरजेप्रमाणे शेतामध्ये शेततळे किवा टाकी असावी. अशा सर्व शेतकर्‍यांनी सूक्ष्मसिंचनासाठीच्या पायाभूत सुविधा आपल्या शेतावर तयार कराव्यात.
 
1988 सालापासून माझ्या शेतावर रबी हंगामात तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून मी हरभरा, गहू व कांदा या तीन पिकांचे शाश्वत उत्पादन घेतो आहे. मी मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी. कालव्याच्या पाझरामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा वापर मी खुबीने केल्यामुळे मी यशस्वी झालोय. जलयुक्त शिवारमधून शाश्वत निर्माण झालेल्या पाण्याचा वापरही शेतकर्‍यांनी या पद्धतीने करण्याचे आवाहन या निमित्ताने मी करतो आहे.
यासाठी सर्वप्रथम शेतकर्‍यास त्याच्या शेतावर सिंचनासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण 
कराव्या लागणार आहेत. एक उदाहरण आपण त्याच्यासाठी घेऊया.
 
जलयुक्त शिवारमधून दररोज 4 ते 5 तास पाणी 15 ऑक्टोबर ते 25 मार्चपर्यंत उपलब्ध होणार असेल तर तो शेतकरी तुषार सिंचन संचाचा वापर करून 1.20 हे. क्षेत्रावर हरभरा, 0.60 हे. क्षेत्रावर गहू व 0.60 हे. क्षेत्रावर कांदा पीक घेऊ शकतो. म्हणजेच एकूण 2.40 हे. क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पुढीलप्रमाणे क्षेत्र निवडूया.
 
 

 
 
वरील नकाशा आपण आता समजून घेणार आहोत.
 
- शेताचे एकूण मोजमाप - 240 मी ु 100 मी = 2.40 हे.
- उत्तरेकडून शेताचे कडेने 90 मि.मि. व्यासाची 4 कि.ग्रॅ/सें.मी 2 दाबाची पीव्हीसी पाइपलाइन भूमिगत टाकणे. एकूण 37 पाइप+ 1 पाइप ऑउटलेटसाठी = 38 पाइप.
- पश्चिमेकडून पहिला ऑउटलेट 18 मीटरवर, त्यानंतर पुढील 2 ऑउटलेट 72 मीटरवर व शेवटचा ऑउटलेट पूर्वेकडून 18 मीटरवर काढावयाचा आहे. एकूण ऑउटलेट - चार.
- या प्रत्येक ऑउटलेटला तुषार सिंचन संच जोडण्यासाठी कऊझए पाइप कनेक्टिंग नीपल झउछ बसवून त्याला एपव कॅप बसवून ठेवायची आहे. हा ऑउटलेट जमिनीचेवर 1 फूट उभ्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.
- या ऑउटलेटपासून आपणास तुषार सिंचन संच जोडावयाचा आहे. यासाठी 3.2 कि.ग्रॅ/सें. मी2 दाबाची कऊझए HDPE overhead sprinkler system घ्यावयाची आहे. वरील नकाशामध्ये 72 मीटरवर आपण outlet काढलेले आहेत त्या outlet पासून पीव्हीसी पाइपलाइनच्या दिशेने 20 फुटाचे कऊझए 5 पाइप आपण मेन लाइनला वापरणार आहोत व तेथे बेंड टाकून तुषार सिंचन संच जोडणार आहोत. शेतीची रुंदी 100 मीटर असल्याने दर 2 पाइपावर म्हणजेच 12 मीटरवर एक नोझल याप्रमाणे 7 पूर्ण फिरणारे नोझल व शेवटी अर्धा फिरणारा नोझल जोडण्यासाठी एकूण कऊझए चे 16 पाइप लागणार आहेत. म्हणजेच मेन पाइपलाइनसाठी 5 व तुषार सिंचन संचाच्या सबमेनसाठी 16 असे एकूण 21 कऊझए पाइप लागणार आहेत.
 
-आता आपल्या ध्यानात आले असेल की नकाशाच्या उत्तर बाजूला शेताच्या कडेने पीव्हीसी पाइपलाइन केलेली आहे. पश्चिमेकडून 18 मीटर अंतरावर (3 पाइपावर) पहिला ऑउटलेट आहे. या ऑउटलेटवर PCN END cap आहे. तुषार सिंचन पद्धतीची सुरवात आपणास या out let पासून करावयाची आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपणशपव लरि काढून तेथे पश्चिमेकडे तोंड करून बेंड बसवणार आहोत. या बेंडपासून 3 HDPE pipe पश्चिमेकडे टाकून शेताच्या कडेपर्यंत येणार आहोत. तेथे पुन्हा एक HDPE Bend टाकून आपण शेताच्या पश्चिम बाजूने 16 पाईपाची HDPE submain टाकणार आहोत वया पाइपलाइनवर दर 12 मीटर अंतरावर (2 पाइपवार) अर्धे फिरणारे नोझल (part circle noggle) जोडणार आहोत. नोझलच्या ठिकाणी 2 कि. ग्रॅ/सें.मी2 दाब मिळणार असल्याने हे नोझल 12 मीटर त्रिज्येमध्ये पाणी फेकणार असल्याने आपण दर 12 मीटर अंतरावर नोझल जोडून 100% overlap घेणार आहोत. त्यामुळे सर्वदूर सिंचन होणार आहे. अशा रीतीने पहिल्या दिवशी 4 तासांचे सिंचन करावयाचे आहे. या सिंचनाद्वारे 12 मीटर रुंद व 100 मीटर लांब क्षेत्राचे सिंचन पूर्ण होणार आहे. दुसर्‍या दिवशी outlet पासून पश्चिमेकडे जोडलेल्या कऊझएच्या 3 पाइपापैकी पश्चिमेकडील 2 पाइप काढून टाकून कऊझए HDPE submain चे 16 पाइप उचलून पूर्वेकडे 12 मीटर अंतरावर उचलून ठेवायचे आहेत. येथे मात्र उत्तर बाजूला सर्वप्रथम अर्धा फिरणारा नोझल जोडून नंतर दर 12 मीटर (2 पाइपावर) अंतरावर 7 पूर्ण फिरणारे नोझल जोडून शेवटी 16 व्या पाइपाचे शेवटी दक्षिण बाजूला 1 अर्धा फिरणारा नोझल जोडावयाचा आहे. (नकाशात दर्शविलेला पूर्व बाजूकडील टप्पा बघा). हे आपले दुसर्‍या दिवशीचे सिंचन असेल. या ठिकाणी 4 तास सिंचनाने पाणी दिले जाईल. तिसर्‍या दिवशी outlet पासून पश्चिमेकडे असणारा HDPE Main लाइनचा 1 पाइप काढून, बेंडचे तोंड पूर्वेकडे फिरवून तो Main pipe पूर्वेकडे टाकावयाचा आहे. म्हणजे 3 री shift ही पुढे 12 मीटर अंतरावर (2 पाइपावर) येईल. चौथ्या दिवशी Main line HDPE ला पुन्हा 2 पाइप जोडून 4 थ टप्पा व पाचव्या दिवशी पुन्हा 2 पाइप जोडून 5 वा टप्पा सिंचित करावयाचा आहे. म्हणजेच पश्चिमेकडून असणार्‍या पहिल्या outlet पासून HDPEMainline साठी 5 व submain साठी 16 अशा एकूण 21 HDPE पाइपांची गरज आपणास लागणार आहे. त्याचबरोबर 2 बेंड, 7 पूर्ण फिरणारे नोझल, 7 अर्धे फिरणारे नोझल व 1 एपव लरि लागणार आहे. 
 
आतापर्यंत 5 टप्प्याचे सिंचन पूर्ण झाले आहे. 6 व्या टप्प्यासाठी आता पश्चिमेकडील 1 नं. च्या AmVm चे बेंड काढून तेथे outlet  बसवायची आहे. आणि तो बेंड आता 72 मीटर अंतरावरील दुसर्‍या Mr Amho वर बसवून पश्चिमेकडे तोंड करून त्याला कऊझए चे 5 पाइप मेनलाइनला जोडावयाचे आहेत, म्हणजे 6 व्या टप्प्याच्या ठिकाणी आपण येणार आहोत. म्हणजेच काय तर 16 पाइपांची सबमेन ही 2 अर्धे फिरणारे नोझल व 7 पूर्ण फिरणार्‍या नोझलसह रोज वाफसा स्थितीत उचलून ठेवायची आहे आणि या सबमेनला सिंचन करण्यासाठी आउटलेटपासून कऊझए पाइप कमी जास्त करावयाचे आहेत.
 
या ठिकाणी रोज फक्त 4 ते 5 तास तुषार सिंचनाने सिंचन करावयाचे आहे.संच दुसर्‍या दिवशी उचलून ठेवायचा आहे. कारण सिंचन संपल्याबरोबर लगेच संच उचलला तर ओलावा असल्याने तुडवातुडव होते. दुसरया दिवशी वाफसा असल्यामुळे तुडवातुडव होत नाही. आणि रोज 12 मीटर ु 100 मीटर याप्रमाणे 0.12 हे. क्षेत्र सिंचीत होणार आहे.शेताचा कोणताही कोपरा कोरडा राहणार नाही कारण 100% overlap घेतलेला आहे. (नोझल 12 मीटरवर, शिफ्टिंग 12 मीटरवर, पाणी फेकण्याची त्रिज्या 12 मीटर) तसेच VgoM part circle full circle nozzle चा वापर केलेला आहे.
 
वरीलप्रमाणे सिंचन साध्य करण्यासाठी 2.5 कि.ग्रॅ/सें.मी2 दाब तयार करणारा वीज पंप लागणार आहे. त्यासाठी दाबाचे गणित समजून घेऊया. 1 कि.ग्रॅ/सें मी 2 दाब तयार होण्यासाठी पंपाचे 10 मीटर हेड शिल्लक असण्याची आवश्यकता असते. म्हणजेच वीजपंपाजवळ 2.5 कि.ग्रॅ/सें मी 2 दाब तयार होण्यासाठी 25 मीटर हेड शिल्लक पाहिजे. शेतकर्‍यांच्या विहिरींची खोली 10 मीटर असेल तर त्याला 10+25=35 मीटर हेडचा पंप घ्यावा लागेल.
 
10 मीटर हेड पाणी उचलण्यासाठी व 25 मीटर हेड दाब तयार करण्यासाठी खर्च होईल व पंपाजवळ 2.5 कि.ग्रॅ/सें.मी2 दाब तयार होईल. 
 
पावसाळ्यात विहिरींची पाणीपातळी ही वर असेल व उन्हाळ्यात हीच पातळी विहिरीच्या तळाकडे जाईल. परिणामत: वर पाणी असताना पंप पाण्याचा जादा विसर्ग (Discharge) देईल व तळात पाणीपातळी असताना पाणी विसर्ग कमी मिळेल. आपला तुषार सिंचन संच मात्र 7 full circle व 2 part cricle नोझल असलेला आहे. 2 किग्रॅ/सेंमी 2 दाब नोझलजवळ असताना सरासरी gamgar full circle nozzle मधून 30 लिटर व part cricle noggle मधून 15 लिटर/मिनीट पाण्याचा विसर्ग होत असतो. म्हणजेच तुषार सिंचन संचासाठी एकूण 240 लिटर/मिनीट पाण्याची आवश्यकता आहे. यापेक्षा कमीही नको व जादाही नको. पंपाची पाणी फेकण्याची क्षमता मात्र विजेचा दाब व पाण्याची विहिरीतील पातळी यानुसार बदलणार आहे. त्यासाठी वीजपंपाच्या Delivery pipe आपण जेथे मुळ्या PVC pipeline जोडणार आहोत. तेथे Uma AmhmoV. VoWo tee Q बसवायचा आहे.इूश byepass Valve वढशशयांचेमध्ये Bye pass valve बसवायचा आहे. तुषार सिंचन चालू करताना Pressure meter उघडा ठेवायाचा आहे.
 
वीज पंप चालू झाल्यानंतर आऊटलेटपासून जोडलेल्या तुषारसिंचन संचाकडे पाणी जाण्यास सुरुवात होईल त्याचवेळी Bye pass valve मधूनही विहिरीत पाणी पडत असणार आहे. आता आपण हळूहळू Bye pass valve बंद करावयास सुरुवात करावयाची आहे. त्यामुळे तुषारसिंचनाकडील विसर्ग वाढत जाईल व Bye pass valve वरील काटा दाब तयार झाल्यामुळे वरवर जाण्यास सुरुवात होईल. एक वेळ अशी येईल की हा काटा बरोबर 2.5 किग्रॅ/से.मी. 2 या आकड्यापर्यंत पोहोचेल. यावेळीइूश रिीी र्ींरर्श्रींश बंद करणे थांबवायचे आहे. म्हणजेच आता तुषारसिंचन संच हा योग्य दाबाने सुरू झालेला असणार आहे. तुषार सिंचन संचाची गरज असणारे 240 लिटर/मिनीट पाणी संचाकडे तर शिल्लक पाणी Bye pass valve मधून विहिरीत पुन्हा मागे पडत असणार आहे. कोणताही पाण्याचा अपव्यय यामुळे होणार नाही व विहिरीपासून थेट पिकांच्या मुळांना पाणी मिळण्यास सुरुवात झालेली असेल.
 
वरीलप्रमाणे पायाभूत सुविधा निर्माण करून आपण शाश्वत शेतीमधील निम्मी लढाई जिंकलेली असणार आहे. यासाठी लागणार्‍या भांडवली खर्चाचा तपशील आता समजून घेणार आहोत. यासाठी मार्च 2018 च्या किंमती गृहीत धरलेल्या आहेत. 
 
 
 अ.न.   तपशील   रक्कम (रु.)
1.   90. मि.मि. 4 कि.ग्रॅ./से.मी.2, पाईपलाईन भूमिगत करण्यासाठी चार खोदाई- अडीच फूट खोदाई करून बुजणे. एकूण लांबी 740 फूट × 5 रु.  3700
2. पाईप जोडणी व आऊटलेट काढणे खर्च 740 फूट × 1 रु.  740
3. 90 मि.मि. 4 कि.ग्रॅ/से.मी.2PVC 38×570 रु.  21660
4. 90 मि.मि. 6 कि.ग्रॅ/सें.मी.2PVC 4 × 90 रु.  360
5. 90 मि. मि. 75 मि.मि. PVC FTA 4 × 75 रु.  300 
6. 75 मि. मि. HDPE PCN 4 × 350 रु.  1400
7.  75 मि. मि. HDPE Bend 2 × 290 रु.  580
8. 75 मि. मि. HDPE End cap 5 × 130 रु.  650
 9.  75 मि. मि. HDPE Coupler with Riser pipe 14 × 550 रु  7700
10 HDPE Coupler with Riser pipe 7 × 450 रु  3150
11. Part circle nozzle 7 × 250 रु  1750
12. Pressure meter and Byepass assembly 1 × 1000 रु  1000
13. HDPE 75 mm 3.2 kg/cm2 pipe 21 × 720 रु  15120
14. 5HP High head Electric Pump 1 × 18000 रु  18000
   एकूण  76110
 
 
76110 + आकस्मिक खर्च रु. 1890 असा एकूण भांडवली खर्च रु. 78000/-
2.40 हे (6 एकर) क्षेत्रासाठी येणार आहे. म्हणजेच एकरी फक्त रु. 13000. आता ही पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर, आपण पीक पद्धती व सिंचनाचे वेळापत्रक समजवून घेणार आहोत.
 
आपण नकाशाचा अभ्यास केला असता असे ध्यानात येईल की, पश्चिमेकडून पूर्वेकडे दर 12 मीटरवर (2 पाईपावर) आपली तुषार सिंचनाची ीहळषीं असणार आहे. व अशा 21 ीहळषीीं मधून आपणास 2.40 हे. चे सिंचन करावयाचे आहे. रोज एकच शिफ्ट (4 ते 5तास) असणार आहे. रबी हंगामातील तीन पिकांची निवड या ठिकाणी केलेली आहे. हरभरा 1.20 हे., गहू 0.60 हे. व कांदा 0.60 हे. या तीनही पिकांची पाण्याची गरज अनुक्रमे 15 ते 20 सें.मी./हे. 30 ते 35 सें.मी./हे. व 45 ते 50 सें.मी./हे. असणार आहे.
मध्यम भारी जमिनीसाठी, आवश्यक बाबींची गरज लक्षात घेऊन, वरीलप्रमाणे पाणी गरज मी अभ्यासांती काढलेली आहे. वरील क्षेत्रासाठी निवडलेल्या तुषारसिंचन संचाद्वारे एका वेळी पुढीलप्रमाणे पाणी सिंचन होणार आहे.
 
- 7 फुलसर्कल 2 पार्ट सर्कल नोझलद्वारे पाणी विसर्ग 240 लीटर/मिनिट 14400 लीटर/तास
- भिजवणारे क्षेत्र 12 मीटर 100 मीटर 1200 मी2.
- पाणी वापर वापरलेले पाणी (लिटर्स) 14400 
(मि.मि.) ------------------------- 12
        भिजलेले क्षेत्र (मी2) 1200
 
म्हणजेच 1 तासाचे सिंचन केले तर 12 मि.मि. (1.2 सें.मी.) पाणी पिकाला मिळणार आहे. मध्यम भारी जमिनीच्या पाणी धारणा क्षमतेचा विचार केला तर 4 ते 5 तासाचे सिंचनानंतर (4.8 ते 6.00 सें.मी.) पिकाची पाणी गरज पूर्ण होते. अशा रितीने हरभरा पिकास 3 सिंचनाद्वारे, गहू पिकास 6 सिंचनाद्वार व कांदा पिकास 9 सिंचनाद्वार पाणी देऊन या पिकांची पाण्याची गरज पूर्ण करता येते. येथे पिकाची पाण्याची गरज, त्याच्या संवेदनशील अवस्था, जमिनीची पाणी धारण क्षमता याचा विचार करून या तीन पिकांसाठी मी पाढे तयार केले आहेत. पेरणीनंतर हरभर्‍याला 2 वेळा, गव्हाला 5 वेळा व कांद्याला 9 वेळा त्याच्या संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे लागते. हरभर्‍याला शेवटचे पाणी लागवडीनंतर 70 दिवसांनी, गव्हाला 90 दिवसांनी तर कांद्याला 100 दिवसांनी द्यावे लागते. त्यामुळे हरभर्‍यासाठी मी 0, 35, 70 याप्रमाणे 3 पाणी गव्हाला 0,18,36,54,72,90 याप्रमाणे 6 पाणी व कांद्याला दर 11 दिवसांनी 9 पाणी म्हणजेच शेवटचे पाणी 99 व्या दिवशी देतो. थोडक्यात हरभर्‍यासाठी 35 चा पाढा, गव्हासाठी 18 चा पाढा व कांद्यासाठी 11 चा पाढा तयार झाला आहे. परिस्थितीनुसार यात थोडेफार बदल होवू शकतो.
 
वरील उपलब्ध पायाभूत सुविधांद्वारे योग्य सिंचन होण्यासाठी 2.40 हे. चे 3 फ्लॉट आपण पाहणार आहोत. पश्चिमेकडील 1.20 हे. क्षेत्रावर हरभरा, त्यानंतर 0.620 हे. क्षेत्रावर गहू व पूर्वेकडील 0.60 हे क्षेत्रावर कांदा लागवड करावयाची आहे. यासाठीचे सिंचन वेळापत्रक समजून घेऊ या. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
रबी हंगाम हरभरा -1.20 हे. गहू 0.60 हे. कांदा 0.60 हे. साठी
डॉ. वने मॉडेलप्रमाणे पाणी नियोजनाचा तपशील
 
 
 कालावधी    सिंचनाचे दिवस  पीक
 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर   10  हरभरा 1 ले पाणी
 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर   05   गहू 1 ले पाणी
 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर   13   आवर्तन बंद
 12 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर   05   गहू 2 रे पाणी
 17 नोव्हेंबर 19 नोव्हेंबर   03   आवर्तन बंद
 20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर   10   हरभरा 2 रे पाणी
 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर   05   गहू 3 रे पाणी
 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर   05   कांदा ओलवणी
 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर   05   कांदा लागवड 1 ले पाणी
 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर   02   आवर्तन बंद
 17 डिसेंबर 21 डिसेंबर   05   गहू 4 थे पाणी
 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर   05   कांदा दुसरे पाणी
 27 डिसेंबर ते 5 जानेवारी   10   हरभरा शेवटचे पाणी
 2 जानेवारी ते 6 जानेवारी   05   कांदा 3 रे पाणी
 (2, 3, 4, 5 ओव्हरलॅप)   04  
 7 जानेवारी ते 11 जानेवारी   05   गहू पाचवे पाणी
 12 जानेवारी   01   आवर्तन बंद
 13 जानेवारी ते 17 जानेवारी   05   कांदा 4 थे पाणी
 18 जानेवारी ते 24 जानेवारी   07   आवर्तन बंद
 25 जानेवारी ते 29 जानेवारी   05   गहू शेवटचे पाणी
 (24 जानेवारी ते 28 जानेवारी)   05  कांदा 5 वे पाणी
 4 फेबु्रवारी ते 8 फेबु्रवारी   05  कांदा 6 वे पाणी
 15 फेबु्रवारी ते 19 फेबु्रवारी   05   कांदा 7 वे पाणी
 26 फेबु्रवारी ते 2 मार्च   05   कांदा 8 वे पाणी
 9 मार्च ते 13 मार्च   05   कांदा 9 वे पाणी
 20 मार्च ते 24 मार्च   05   कांदा 10 वे पाणी
 
 
अशा रीतीने दि. 15 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत रोज 0.12 हे. क्षेत्रावर 45 सें.मी. अंतरावर दोन ओळींत अंतर ठेवून 15 सें.मी. अंतर दोन बियाण्यांत ठेवून हरभरा पेरणी करून सिंचन करावयाचे आहे म्हणजे या ओलाव्यावर हरभरा उगवून येईल. हरभर्‍याची पुढची पाण्याची पाळी ही 35 दिवसांनंतर म्हणजेच 20 नोव्हेंबरला येईल.
 
25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या काळात रोज 0.12 हे प्रमाणे गहू पेरणी करून सिंचन करावयाचे आहे. यासाठी दोन ओळींतील अंतर 30 से.मी. व दोन बियाणांतील अंतर 10 सें.मी. ठेवावयाचे आहे. गव्हाच्या पुढच्या पाण्याच्या पाळ्या ह्या दर 18 दिवसांनी म्हणजेच 12 नोव्हें., 30 नोव्हें, 17 डिसेंबर, 7 जानेवारी व 25 जानेवारीला असतील.
 
5 डिसेंबरला चांगली पूर्वमशागत झालेल्या 0.60 क्षेत्रावर कांदा लागवडीसाठी ओलवणी सुरू होईल. दर 12 मीटर अंतरावर फक्त 2 फूट रुंदीचे दंड पाडले जातील. या दंडाचा वापर तुषार सिंचनाचा संच ठेवण्यासाठी होईल. उरलेल्या 11.40 मीटर रुंदीच्या जागेत 1.14 मीटर अंतरावर खुणा करून 10 बेड तयार केले जातील. अशा रीतीने प्रत्येक 0.12 हे क्षेत्रात 1.14 मी. रुंदीचे 10 बेड तयार होतील. तुषार सिंचनाने ओलवणीनंतर (फक्त 2॥ तास) या बेडवर प्रत्येकी 1 मजूर बसवून 15 सें.मी. ओळीत अंतर ठेवून 10 सें.मी. अंतरावर कांदा रोपांची लागवड करावयाची आहे. ही लागवड पूर्ण झाल्यानंतर पाठीमागून 2॥ तासाचे आंबोणी देऊन पूर्ण होईल. 5 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत कांदा लागवड आंबोणी देऊन पूर्ण होईल. कांद्याच्या पुढील पाणी पाळ्या ह्या दर 11 दिवसांनी म्हणजेच 22 डिसेंबर, 2 जानेवारी, 13 जानेवारी, 24 जानेवारी, 4 फेबु्रवारी, 15 फेबु्रवारी, 26 फेबु्रवारी, 9 मार्च व 20 मार्च या दिवशी सुरू होतील.
 
वरील कालावधीत 2 ते 5 जानेवारीदरम्यान हरभर्‍याचे शेवटचे पाणी व कांदा 3 रे पाणी यासाठी र्ेींशीश्ररि घ्यावा लागणार आहे. म्हणजे या चार दिवशी एक टप्पा हरभर्‍यावर व 1 टप्पा कांद्यावर तुषार सिंचन संच चालवावा लागणार आहे. तसेच 25 जानेवारी ते 28 जानवेारी गहू शेवटचे पाणी व कांदा 5 वे पाणी यासाठी घ्यावा लागेल. 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर, 12 जानवेारी, 18 जानेवारी ते 24 जानेवारी, 30 जानेवारी ते 3 फेबु्रवारी, 9 फेबु्रवारी ते 14 फेबु्रवारी, 20 फेबु्रवारी ते 25 फेबु्रवारी, 3 मार्च ते 8 मार्च, व 14 मार्च ते 19 मार्च तुषार सिंचन संच बंद राहणार आहे.
 
24 फेबु्रवारीनंतर हरभर्‍याचे क्षेत्र रिकामे झालेले असेल त्यामुळे त्यावेळी जर पाणी शिल्लक असेल तर आपण उन्हाळी मुगाचे पिक घेऊ शकतो. पाणी जर संपलेले असेल तर तुषार सिंचन संच घरी घेऊन यायचा आहे व पुन्हा पुढील वर्षी पाऊस पडून जलयुक्त शिवाराचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर तो शेतात न्यायचा आहे.
 
आता आपण वरीलप्रमाणे 2.40 हे. मधील पिकांचे उत्पादनाचे गणित समजून घेऊ या. नकाशाचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या ध्यानात आले असेल की संपूर्ण क्षेत्रासाठी आपणास 21 शिफ्टद्वारे तुषार सिंचन संचाने पाणी द्यावयाचे आहे.15 ऑक्टोबरपूर्वी शेताची पूर्वमशागत करून दर 12 मीटरवर 60 सें.मी. रुंदीचे दंड पाडून घ्यावयाचे आहेत. ह्या दंडांचा वापर हा तुषार सिंचन संचाची सबमेन ठेवण्यासाठी होणार आहे. ही जागा सोडून शिल्लक सर्व जागेवर पिकांची पेरणी होणार आहे. म्हणजेच एकूण क्षेत्रापैकी 95% जागेवर पिकांची लागवड व 5% जागा ही सबमेन ठेवण्यासाठी खर्च होणार आहे. तुषार सिंचन संचाने पाणी द्यावयाचे असल्याने रानबांधणी करण्याची गरज पडत नाही. पाणी धरण्यासाठी मजूर लागत नाही. पर्यायाने रानबांधणी न पाणी धरणे या दोन गोष्टीवरील खर्चात बचत होते.
 
रबी हंगामातील या पीक पद्धतीची मी घेतलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
 
 पिक  ओळींतील अंतर (सें.मी.)  दोन दोन बिया/रोपातील अंतर (सें.मी.) रोपे/मी 
उत्पादन
ग्रॅम/मी 
उत्पादनक्षमता
कि.ग्रॅ. /हे. 
 हरभरा   45   15   15   300   3000
 गहू   30   10   33   528   5280
 कांदा   15   10   66   5280   52800
 
प्रत्यक्षात मात्र रबी 2017-18 मघ्ये पुढीलप्रमाणे उत्पादन मिळालेले आहे. उत्पन्न व नफा तपशील पुढीलप्रमाणे.
 
 
 
 पिक  क्षेत्र (हे.)  
उत्पादन
कि. ग्रॅ.
 
दर
रु./कि.
 उत्पन्न (रु.)  
उत्पादनखर्च
(रु.)
 
नफा
(रु)
 हरभरा   1.20   2400   33   79200   48000   31200
 गहू   0.60   2400   17   40800   24000   16800
 कांदा   0.60   24000     168000   60000   108000
       एकूण रु.   288000   132000   156000
 
 
म्हणजेच जलयुक्त शिवारामधील उपलब्ध झालेल्या पाण्याचा वापर तुषार सिंचंन पद्धतीने वरील मॉडेलद्वारे केला तर 2.40 हे. क्षेत्र सिंचीत होऊन 156000 रु. चा नफा मिळतो. 1 चोरस मीटरमधील निरीक्षणाचा विचार करता, काटेकोर पद्धतीने ही पीक पद्धती केली तर उत्पादन क्षमतावाढीला मोठा वाव आहे. त्यातून नफ्याचे प्रमाण आणखी वाढू शकते.
 
आता या मॉडेलमुळे पाण्याची झालेली बचत बघूया. वरील पीक पद्धतीसाठी भुईदंडाने पाणी वापर केला असता तर एकूण 1 कोटी 8 लाख लिटर पाणी लागले असते. शिवाय रानबांधणीचा खर्च वाढला असता. पाणी धरण्यासाठी मजुरीचा खर्च वाढला असता. रात्री वीज असताना पाणी देणे शक्य होत नाही. लागवडीखालील क्षेत्रात घट होते. त्यामुळे उत्पादन क्षमता घटते. तुषार सिंचन पद्धतीने 2.40 हे वर सिंचन केल्यामुळे 66 लाख लिटर पाणी लागले म्हणजेच 42 लाख लिटर पाण्याची बचत या मॉडेलमुळे झाली आहे. शिवाय बियाणे लागवड, खत, पाणी, वीज, मजूर या सर्वांचे व्यवस्थापन चांगले झाल्यामुळे उत्पादकताही वाढली आहे. निव्वळ नफ्याचे प्रमाणही वाढले आहे. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाले तर 66 लाख लिटर पाणी जर भुईदंडाने वापरले असते तर फक्त 0.80 हे हरभरा, 0.39 हे गहू व 0.38 हे कांडा असे एकूम 1.57 हे क्षेत्र सिंचीत झाले असते. पारंपरिक पद्धतीने शेती करणार्‍या आजच्या शेतकर्‍यास वरील पीकपद्धती पासून पुढीलप्रमाणे उत्पादन मिळते आहे. हरभरा एकरी 6 क्विंटल, गहू एकरी 13 क्विंटल व कांडा एकरी 120 क्विंटल अशी उत्पादकता सध्या पारंपरिक पद्धतीने मिळते आहे. 
 
 पिक   क्षेत्र (हे)   उत्पादन कि ग्रॅ   दर रु कि   उत्पन्न (रु)  उत्पादन खर्च (रु)  नफा 
 हरभरा   0.80   1200   33   39600   32000  7600 
 गहू   0.39   1270   17   21590   15600  5990
 कांदा   0.38   11400     79800   38000  41800
       एकुण रु  140990   85600  55390
 
 पारंपरिक पद्धतीचे भुईदंडाने पाणी व्यवस्थापन व तुषार सिंचन पद्धतीचे वरील मॉडेलद्वारे पाणी व्यवस्थापनाचा विचार करता आज शेती का परवडत नाही, याचे कारण आपल्या ध्यानात आले असेल. भुईदंडाने पाणी व्यवस्थापन करून आज महाराष्ट्रातील शेतकरी ढोरमेहनत करतो आहे. त्याऐवजी आता स्मार्ट मेहनत करावी लागणार आहे. गरज आहे ती आपली मानसिकता बदलवण्याची. 1988 मध्ये लाभक्षेत्रात 24 तास वीज, 24 तास पाणी, पाणी धरण्यासाठी मजुरांची सहज उपलब्धता असताना मी जेंव्हा तुषार सिंचनाकडे वळालो त्यावेळी गावातील लोक म्हणायचे ते दवाखान्यात कमावतात व शेतीत घालतात, त्यांची व आपली बरोबरी होणार नाही. आज मात्र मी माझा दवाखाना बंद करून टाकलाय आणि माझा मुलगा वरील मॉडेलव्दारे आनंदाने शेती करतोय. आता काही क्षेत्र त्याने ठिबक सिंचनाखालीही आणले आहे. 
 
मी महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांना आवाहन करतो. आहे की, जलयुक्त शिवारमुळे तुम्हाला हक्काचे पाणी रब्बी हंगामात उपलब्ध होणार आहे. हरभरा, गहू, कांदा या तीन पिकांचे बियाणे आपण निवड पद्धतीने तयार करू शकतो. ह्या तीन ही पिकांची साठवण करता येते. त्यामुळे मूल्यवृद्धीसाठी संधी आहे. हवामानातील बदल व बाजारभावामुळे जरी एखाद्या पिकापासून कमी उत्पन्न मिळाले किंवा तोटा झाला तरी दुसर्‍या पिकातून त्याची भरपाई होऊ शकते. दिवसभरात फक्त 5 तास वीज उपलब्ध असेल तरी ही तुम्ही वरील मॉडेलद्वारे 2.40 हे क्षेत्र सहज सिचिंत करू शकता. पुढील गोष्टीची मात्र तयारी पाहिजे. 
 
1. शेतकरी पती पत्नीने अर्धा तास वेळ खर्च करून रोज तुषार सिंचन संच पुढच्या टप्प्यावर उचलून ठेवला पाहिजे. 
2. किमान 6 तास काम रोज शेतात केले पाहिजे. शेतीला उद्योग समजून, नोकरदाराप्रमाणे ठराविक वेळ दिलातर आपणही नोकरदाराप्रमाणे आयुष्य जगू शकतो. 
3. पाणी, पैसा, वेळ याचा हिशोब रोज लिहून ठेवायचा आहे. यामुळे राहणीमानासाठी लागणार खर्च, शेतीतून मिळणार नफा, त्याची गुंतवणूक याचा आढावा घेणे सोपे जाते. 
4. आरोग्य विमा व पीक विमा घेऊन जोखीम कमी करावयाची आहे. 
वरीलप्रमाणे शेतकर्‍याने स्मार्ट मेहनत करावयाची ठरविली तरी काही गोष्टी मात्र शासनाच्या अखत्यारीत येतात. त्याची पूर्तता शासनाने केली पाहिजे. 
 
त्या पुढीलप्रमाणे ः
1. विनाखंडित पूर्ण दाबाने रोज 10 तास वीजपुरवठा (शक्यतो दिवसा) 
2. वरील मॉडेलसाठी आवश्यक भांडवल रु. 78000 साठी सहज माध्यम मुदत कर्जपुरवठा.
3. ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, सध्या ग्रामीण रस्त्यांची फार वाईट अवस्था आहे. 
4. शेतमाल साठवणुकीसाठी गावस्तरावर गोदाम व्यवस्था. 
5. उत्पादित शेतमालाची निर्यात बंदी नको तसेच गरज नसताना शेतमालाची आयात नको. 
जलयुक्त शिवार योजनेला वरीलप्रमाणे शेतकरी व शासन पातळीवर बदलांची जोड मिळाली तर शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास फारसा काळ लागणार नाही. शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. तो जलयुक्त शिवारमधून उपलब्ध होणार आहे. 
यासाठी लागणारे भांडवल रु. 78000/- 5 वर्षांच्या मुदत कर्जाद्वारे दर साल दर शेकडा 12 दराने उपलब्ध झाले तर परतफेड पुढीलप्रमाणे असेल.
 
 
 कर्ज रक्कम रु   हप्ता क्र.   मुद्दल रु   व्याज रु   एकूण वार्षिक हप्ता रु
 78000     15600   9360   24960
 62400     15600   7488   23088
 46800     15600   5616   21216
 31200     15600   3744   19344
 15600     15600   1872   17472
   एकूण रु.  78000   28080   106080
 
 
रब्बी हंगामातील 2.40 हे क्षेत्रापासून मिळणार्‍या 156000 रु नफ्यातून वार्षिक हप्ता भरून उर्वरित रक्कम ही राहणीमानावरील खर्चासाठी व बचतीसाठी खर्च करावयाची आहे. या तीन पिकांसाठी लागणार उत्पादन खर्च रु. 132000, किसान क्रेडिट कार्डद्वारे बँकेने उपब्लध करून द्यायचा आहे. शेतमाल विक्रीनंतर हे कर्ज शेतकर्‍याने त्वरित भरणा करावयाचे आहे. 5 वर्षांनंतर कर्जाची परतफेड होईल. त्याचबरोबर दरवर्षीच्या नफ्यातून ठराविक रक्कम बचतीकडे वर्ग केल्यामुळे आपत्कालीन निधी तयार होईल . 6 व्या वर्षानंतर हळूहळू काही क्षेत्रावर ठिबक सिंचन करून लॉटरी पिकाकडे वळावे. लॉटरी पिकातून जास्त नफा मिळाला तर उत्तमच, तोटा झाला तर आपत्कालीन निधीतून भरपाई झाली पाहिजे. 
 
शेतमालाचे बाजारभाव कमी होणे, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, (गारपीट, तापमानातील अचानक बदल, अतिवृष्टी इ.) या शेतकर्‍यासमोरील आज प्रमुख समस्या आहेत. वरीलप्रमाणे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून मिळालेल्या नफ्याची गुंतवणूक प्रभावी पाने केली तर जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेल्या पाण्याची अधिक उत्पादकता आपण मिळवू शकतो. चला तर आजपासून डॉ वने मॉडेलच्या या पध्द्तीचा अवलंब करून शाश्वत शेतीची कास धरूया. 
 
1988 पासून प्रयोग करून हे मॉडेल पूर्णत्वास नेण्यासाठी मला महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळे सर, कांदा व लसूण संशोधनालय (राजगुरुनगर) महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व आत्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्रीमियर इरिगेशन अड्रिटेकच्या तुषार सिंचन संचामुळे शाश्वत शेतीचे डॉ. वने मॉडेल पूर्णत्वास गेले आहे. सर्व शेतकरी बांधवांना जलयुक्त शिवारच्या पाणी व्यवस्थापनासाठी शुभेच्छा.
 
 
डॉ. वने मॉडेल, डॉ. दत्तात्रय सहदेव वने