ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांचा वापर

डिजिटल बळीराजा-2    27-Nov-2019
 
 
 
उसाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या पद्धतीचा अवलंब ऊसशेतीमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये होणे अत्यंत जरुरीचे आहे. ठिबक सिंचनातून अन्नद्रव्याचे योग्य व आवश्यक प्रमाण असणारे पाण्यात विरघळनारी द्रव्यरूप खते देणे कसे महत्त्वाचे आहे या माहितीचा समावेश सदरच्या लेखात केला आहे.
 
जमीन व पाणी या बहुमोल नैसर्गिक राष्ट्रीय संपत्तीचा कार्यक्षमपणे वापर क रू न दरहेक्टरी ऊ स व साखर उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे. पाणी व खते हे ऊ स उत्पादनातील प्रमुख घटक असून, त्यांचा कार्यक्षम वापर क रू न जमिनीची प्रत टिकविणे व उत्पादनक्षमता वाढविणे यासाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्मजलसिंचन पद्धतींचा अवलंब ऊ सशेतीमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये होणे अत्यंत जरुरीचे आहे. ठिबक सिंचनातून अन्नद्रव्यांचे योग्य व आवश्यक प्रमाण असणारी, पाण्यात विरघळणारी किं वा द्रवरू प खते पिकाच्या मुळांशी गरजेनुसार योग्य त्या प्रमाणात परिणामकारक रीत्या देणे यास शास्त्रीय भाषेत ‘फ र्टिगेशन‘ असे संबोधले जाते. 
 
ठिबक सिंचनातून पाण्याबरोबर खते दिली असता खालील फायदे होतात. 
 
1.जमिनीतील ओलाव्यात आणि पिकांच्या मुळांजवळ मूलद्रव्ये दिल्याने त्यांची उपलब्धता वाढते व 
दिलेल्या खतांचा पीक वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
2.फ क्त ओलितक्षेत्रामध्ये व कार्यक्षम मुळांच्या सहवासात खते दिल्याने झिरपण्याद्वारे, निचर्‍यावाटे किं वा बाष्पीभवनाने खतांचा होणारा र्‍हास क मी होऊ न खतमात्रेत बचत होते.
3.मृदा द्रावणात अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखणे शक्य होते.
4.खते देण्याच्या मजुरी खर्चात व ऊर्जेत बचत होते.
5.खतांतील क्षारांच्या निचर्‍यामुळे भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येतो.
6.पीक वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक तेवढेच एक किं वा अनेक अन्नद्रव्ये पिकाच्या मुळाशी देणेशक्य होते.
7.जमिनीचे आरोग्य अबाधित राखून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते.
8.पीक उत्पादनात भरीव वाढ मिळते.
ठिबक सिंचनातून द्यावयाची खते निवडताना व त्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी खालील बाबींक डे लक्ष देणे अत्यंत जरू रीचे आहे. 
 
1.खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.
2.शेतीतील तापमानास खते पाण्यात लवक रात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत.
3.खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरू पात एक त्रीक रण होता कामा नये.
4.खतातील क्षारामुळे गाळण यंत्रणा व ठिबक सिंचनातील तोट्या बंद पडू नयेत तसेच संचातील कोणत्याही घटक ावर खतातील क्षारामुळे गंज चढणार नाही किं वा इतर अनिष्ट परिणाम होणार नाही.
5.खते शेतातील वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.
6.खतांची पाण्यामध्ये असणार्‍या मीठ व इतर रसायनांबरोबर रासायनिक अभिक्रि या होऊ नये.
7.एकाच वेळी एकापेक्षा अधिक खते एक त्रित द्यावयाची असल्यास त्यांची आपापसात णतीही रासायनिक अभिक्रि या होणार नाही अशीच खते एक त्रित द्यावीत.
8.ठिबक संचातील तोट्यांवर खतातील अथवा पाण्यातील क्षार, शेवाळ, लोह, गंधक इ. साचू नदेणे जरू रीचे आहे.
 
र्टिगेशनसाठी पिकांना द्यावयाची खते : 
 
रासायनिक खतांचे त्यातील मुख्य अन्नद्रव्यांनुसार नत्रयुक्त , स्फु रदयुक्त व पालाशयुक्त खते असे वर्गीक रण होते. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी किं वा द्रवरू प खतेच वापरता येतात. ही खते हाताळण्यासाठी सोपी व शेतक र्‍यांना किमतीने परवडणारी असणे जरुरीचे आहे. 
 बाजारपेठेमध्ये नत्र, स्फु रद व पालाश ही अन्नद्रव्ये एक त्रित किं वा वेगवेगळी असणारी खते उपलब्ध आहेत. 
 
नत्रयुक्त खते : 
 
नत्रयुक्त खते ठिबक सिंचनातून दिल्यास मृदा द्रावणात त्याची जलद हालचाल होऊ न ती खते तोटीच्या बाजूस मुळांच्या सान्निध्यात ताबडतोब पसरतात व पिकाची मुळे ती त्वरित शोषून घेतात. पिकाच्या आवश्यक तेनुसार ठराविक ओलित क्षेत्रामध्ये क मी प्रमाणात, परंतु जास्त वेळा नत्रयुक्त खते ठिबक सिंचनातून देता येत असल्याने बाष्पीभवनाद्वारे आणि निचर्‍यावाटे त्यांचा व्यय क मी होऊ न वापर अधिक कार्यक्षम होतो. अमोनियायुक्त , नायटे्रटयुक्त आणि अमाइर्डयुक्त अशा चार प्रकारांमध्ये नत्रयुक्त खतांचे वर्गीक रण क रता येते. 
नत्रासाठी खालील खते वापरता येतात. 
 
 
 खते   गे्रड
 युरिया   46-0-0
 पोटॅशियम नायटे्रट   13-0-46
 अमोनियम सल्फे ट   21-0-0
 अमोनियम नायटे्रट   34-0-0
 युरिया अमोनियम नायटे्रट   32-0-0
 मोनो अमोनियम फॉस्फे ट   12-61-0
 डाय-अमोनियम फॉस्फे ट   21-53-0
 कॅ ल्शियम नायटे्रट   15-0-0
 मॅग्नेशियम नायटे्रट   11-0-0
 
 
वरील नत्रयुक्त खतापैंक ी युरिया हे खत सर्वात उत्कृ ष्ट व पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे. युरिया खताची पाण्याशी कोणत्याही प्रकारची संयुगे तयार होत नसल्यामुळे ठिबक सिंचनातून देणे अधिक फायदेशीर आहे. 
ऊ सपिकासाठी नत्रयुक्त खते दर पंधरा दिवसांनी 6 महिने वयाचे ऊ स पीक होईपर्यंत 
दिल्यास उसाची उगवण चांगली होते, फु टवे भरपूर येतात, पिकाची वाढ जोमदार होते आणि नत्रयुक्त खताची 30 टक्क्यांपर्यंत बचत क रता येते. 
 
स्फुरदयुक्त खते : 
 
स्फु रदयुक्त खते ठिबक सिंचनातून देण्याअगोदर पाण्यातील कॅ ल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण तपासले पाहिजे. पाण्याती कॅ ल्शियम व मॅग्नेशियम बरोबर फॉस्फ रसची रासायनिक अभिक्रि या होऊ न तयार होणारा पांढरा साका ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद क रण्यास कारणीभूत ठरतो. उपलब्ध स्फु रदयुक्त खतांपैक ी फॉस्फॅ रिक आम्लाचा उपयोग ठिबक सिंचनाद्वारे के ल्यास खत पिकाच्या मुळाजवळ उपलब्ध होऊ न त्याचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.
 
 खते  ग्रेड
 फॉस्फ रिक आम्ल  0-52-0
 मोनोपोटॅशियम फॉस्फे ट   0-52-34
 मोनोअमोनियम फॉस्फे ट   12-61-0
 डायअमोनियम फॉस्फे ट   21-53-0
 ग्लिसरो फॉस्फ रिक आम्ल   18-46-0
 
 
ऊ स पिकासाठी स्फु रदयुक्त खत ठिबक सिंचनातून वापरणे हे अधिक खर्चिक असल्याने स्फु रदयुक्त खतांची मात्रा सिंगल सुपर फॉस्फे टच्या माध्यमातून 50 टक्के लागणीचे वेळी व 50 टक्के मोठ्या खांदणी/भरणीचे वेळी जमिनीमध्ये उसाच्या मुळालगत ओलाव्यामध्ये मिसळून देणे फ ायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेल्या प्रयोगावरू न आपण फॉस्फ रित आम्लाचा वापर स्फु रद खत ऊ स पिकास देण्यासाठी क रू न शक तो. त्यामुळे स्फु रद खतमात्रेमध्ये 30% बचत क रणे शक्य होते. 
 
 पालाशयुक्त खते : 
 
पालाशयुक्त खतांचा वापर ठिबक सिंचनातून क रण्यासाठी पांढर्‍या रंगाचे पोटॅशियम क्लोराईड हे खत उपयुक्त आहे. रेड पोटॅशचा वापर के ल्यास त्यातील लोहामुळा ठिबक तोट्या बंद होण्याचा धोका असतो. 
 
 खते   ग्रेड
 पोटॅशियम क्लोराईड   0-0-60
 पोटॅशियम नायटे्रट   13-0-46
 पोटॅशियम सल्फे ट   0-0-50 (फ क्त फ र्टिगेशन ग्रेड)
 पोटॅशियम थायोसल्फे ट  0-0-25 (फ क्त द्रवरू प खत)
 मोनोपोटॅशियम फॉस्फे ट   0-52-34
  
 
रासायनिक खते ठिबक सिंचनातून वापरण्यासाठी पाण्यात विरघळणार्‍या सरळ खतांमध्ये 
युरिया, अमोनियम नायटे्रट, डाय अमोनियम फॉस्फे ट, पोटॅशियम क्लोराईड तर मिश्र खतामध्ये 20- 20-20, 20-9-20, 15-4-15 तर द्रवरू प खतामध्ये 4-2-8, 6-3-6, 6-4-10, 12-2-6, 
9-1-6 अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. 
 
ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती : 
 
ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध (प्रपोर्शनल) व मात्राबद्ध (क्व ांटिटेटिव्ह) पद्धतीने देता येतात. प्रपोशर्नल पद्धतीमध्ये खताची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर राहते. खतमात्रा व पाण्याचा प्रवाह सतत एकसारखा राहतो. उदा. 1 लि. खत द्रावण व 100 लि. पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरू पात म्हणजेच पीपीएममध्ये मोजली जाते. क्व ांटिटेटिव्ह पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खतमिश्रित व खतविरहित पाणी पिक ाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खतमात्रा कि. ग्रॅम/हेक्टर या स्वरू पात मोजली जाते.
 
खते देण्याची उपकरणे : 
 
 
 
फर्टिलायझर टँक (बायपास टँक ) 
 
फर्टिलायझर टँक मध्ये खत व पाण्याचे द्रावण तयार होऊ न ठिबक संचातील तोट्यांद्वारे पिकाच्या मुळाशी पोचते. 
 
फायदे : 
 
1. मूळ किं मत व देखभालीवरील खर्च क मी 
2. सुलभ वापर 
3. पाण्यात विरघळणशरी खते देण्यासाठी उपयुक्त 
4. खते देण्यासाठी वाढ ीव ऊर्जेची आवश्यक ता नाही. 
 
तोटे : 
 
1. फ क्त मात्राबद्ध (क्व ांटिटेटिव्ह) पद्धतीने खत देता येते. 
2. खतांची तीव्रता एक सारखी रहात नाही, ती क मी क मी होत जाते. 
3. पाण्याचा दाब व प्रवाह यातील बदलानुसार खतमात्रा व तीव्रता बदलते. 
4. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फ र्टिगेशन क रण्यासाठी वाहून नेण्यावर निर्बंध येतात. 
5. स्वयंचलित सिंचन प्रणालीत वापरासाठी मर्यादा आहेत.
 
व्हेंच्युरी इंजेक्टर : 
 
या उपक रणाच्या साह्याने पाइपमध्ये पोक ळी निर्माण क रू न खत द्रावण ओढू न घेतले जाते.
 
फायदे : 
 
1. मूळ किं मत व देखभालीवरील खर्च क मी. 
2. खताची तीव्रता एक समान राहते. 
3. बाहेरील वाढ ीवर ऊर्जेची आवश्यक ता नाही. 
4. वजनाने हलक ी व अनेक ठिकाणी वापरण्यास शक्य होते. 
5. स्वयंचलित सिंचनप्रणालीत वापरता येते. 
 
तोटे : 
 
1. मोठ्या प्रमाणावर दाबातील घट (हेड लॉस-30 टक्क्यांपर्यंत) 
2. दाबातील फ रकानुसार कार्यक्षमतेत बदल होतो.
 
र्टिलायझर इंजेक्शन पंप : 
 
यामध्ये हायड्रॉलिक व इलेक्ट्रिक पंपाचा अंतर्भाव होतो. हायड्रॉलिक पंपामध्ये अ‍ॅमेआइड व डोसाट्रॉन तर इलेक्ट्रिक पंपामध्ये डायफ्रॅ म व पिस्टन पंपाचा वापर के ला जातो. 
 
फायदे : 
 
1. प्रमाणबद्ध (प्रपोशर्नल) पद्धतीने खत देता येते. मूळ किं मत व देखभालीवरील खर्च क मी. 
2. खतमात्रा अतिशय काटेक ोरपणे व एक समान तीव्रतेने देता येते. 
3. पाण्याच्या दाबातील फ रकाचा परिणाम होत नाही. 
4. हेड लॉस नाही. 
5. वजनाने हलका व अनेक ठिकाणी वापर शक्य होतो. 
6. स्वयंचलित सिंचनप्रणालीसाठी उपयुक्त आहे. 
7. बाहेरील वाढ ीव ऊर्जेची आवश्यक ता नाही. 
 
तोटे : 
 
1. मूळ किं मत जास्त आहे. 
2. काही पंपासाठी वाढीव ऊर्जा आवश्यक असते. 
 
फर्टिगेशन उपक रणांचा तुलनात्मक अभ्यास : अ.नं. विवरण फ र्टिलायझर टँक व्हेंच्युरी इंजेक्ट र फ र्टिलायझर पंप 
 
1. वापरण्यास सुलभ जास्त मध्यम क मी 
2. पाण्यात विरघळणारी खते देणे द्रावण तयार क रावे लागते द्रावण तयार क रावे लागते 
3. द्रवरू प खते देणे 
4. प्रवाह (डिस्चार्ज रेट) जास्त क मी जास्त 
5. तीव्रता नियंत्रण नाही मध्यम जास्त 
6. आकारमान नियंत्रण चांगले मध्यम जास्त 
7. दाबातील घट (हेड लॉस) क मी फ ार जास्त नाही 
8. स्वयंचलित सिंचन प्रणाली वापर क मी मध्यम जास्त 
9. किं मत क मी मध्यम जास्त 
 
उसासारख्या दीर्घायुष्यी पिकाचे दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पाणी व खते यांचा कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. यासाठी ठिबक सिंचन व त्याद्वारे खतांचा वापर यास पर्याय नाही.
 
 
 
श्री. अरुण शिवाजीराव देशमुख