शिंगाचा कार्कारोग : कारण मिमांसा व प्रतिबंधात्मक उपाययोजना

डिजिटल बळीराजा-2    25-Nov-2019
 
शिंगाचा कर्करोग हि नेहमी भारतातील शेतकरी वर्गाला चिंतीत करणारी घटना असते. शिंग असलेली देशी जनावरे हि भारतातीय शेतकऱ्याचा अभिमान आणि भारतीय जातींची ओळख हि मुळात शिंग असलेली गायी किवा बैल म्हणू आहे.आपल्या कामच बैलाला तसेच गायीला होणार हा आजार त्यांची कार्यक्षमता कमी करतेच पण त्या बरोबर गायीच्या दुध उत्पादन कमी होऊन शेतकर्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. शिंगाचा बदलेला आकार जनावराचे सौदर्य कमी करते. या सर्व बाबींमुळे शेतकरी शिंगांच्या शस्रक्रियेसाठी तयार होत नाही. तसेच त्यामुळे बाजार भावापेक्षा शेतकऱ्याला आपली जनावरे कमी भावात विकावी लागतात.
 
कारणे :
 
i.वय: साधारणतः वयस्कर जनावरामध्ये शिंगांचा कर्करोग जास्त आढळतो. ५ वर्षे ते १२ वर्षे वयाच्या बैल आणि गायी मध्ये वाढलेल्या शारीरिक ताणामुळे जास्त आढळुन येतो. 
ii.शिंगाना रंग देणे: महाराष्ट्रात नेहमी शिंग कोरून रंग देण्याची पद्धत आहे. रंगाने होणाऱ्या चुर्चुरीमुळे शिंगांच्या पेशींची अतिरिक्त वाढ होते व हि वाढ शिंगांचा कर्करोग घडवू शकते.
iii.शिंगाना सतत बांधून ठेवणे: काही शेतकरी जनावरांना दोरीने शिंगास बांधुन ठेवतात. दोरीच्या सततच्या घर्षणाने शिंगांच्या जवळील कातडीच्या पेशींची अतिरिक्त वाढ होते. या पेशींमुळे सुद्धा शिंगांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
iv.सतत प्रखर उन्हात बांधल्याने सूर्याच्या अतिनील किरणांमुळे सुद्धा हा रोग होण्याची शक्यता असते.
 
लक्षणे: 
 
खाणे कमी करणे, दिवासोन्दिवस खंगत जाने हि लक्षणे तर दिसतातच पण त्या बरोबर इतर लक्षणे आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्या मध्ये दिसून येतात.
पहिल्या टप्प्यात शिंगाचा डोक्याजावालचा भाग हा गरम व लालसर जाणवतो. जनावरे शिंग सारखे भिंतीला किवा झाडाला घासतात. शिंग समोरून पहिले असता समामितीत म्हणजे दोन्ही बाजूस सारखी दिसुन येत नाही. शिंगाचा तळभाग नरम,गरम व हात लावल्यास वेदना होतात. तसेच ज्या भागाचे शिंग आहे त्या भागाच्या नाकपुडी मधुन रक्तमिश्रित स्त्राव येतो.
दुसऱ्या टप्प्या मध्ये शिंग एकाबाजूस झुकते.रक्तमिश्रित स्त्राव येण्याचे प्रमाण वाढते. शिंगाच्या तळास जखम दिसुन येते. घन वास असलेला स्त्राव जखमेतून येण्यास सुरवात होते. 
तिसर्या टप्प्यामध्ये शिंग झुकते किवा गळून पडते व शिंगाच्या जागेवर लालसर मास येण्यास सुरवात होते. शिंग पूर्णपणे कर्करोग ग्रस्थ पेशी व मांसाने भरून जातो. डोक्यातील सिनुसेस यामध्ये कर्करोगग्रस्थ पेशी जमा होऊन जनावरे आपले डोके कठीण वस्तुवर आपटून घेऊ शकतात.
 
उपाय:
 
पहिल्या व दुसर्या टप्प्यातील लक्षणे असणाऱ्या जनावरांची शस्रक्रियेद्वारे तज्ञ पशुवैद्याकाकडून उपचार केल्यास जानवर ठीक होण्याची शक्यता जास्त असते तर तिसऱ्या टप्प्यातील जनावरामध्ये शल्यचिकित्से नंतर गुंतागुंतीची शक्यता जास्त असते. शल्यचिकित्से सोबत केमोथेरपी हि नेहमी लाभदायक ठरते परंतु त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत.
 
प्रतिबंध:
 
i.शिंग जास्तीची सारखी सारखी कोरु नयेत.
ii. जनावरे बांधताना सतत प्रखर उन्हात बंधू नयेत.
ii. शिंगाना दोरी नाभून जनावरे बंधू नयेत.
ii सुरवातीची लक्षणे आढळ्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकार्याकडे संपर्क साधावा. 
 
 
 
 शिंगाच्या कर्करोगाने वाकलेले शिंग
 

 
 
कर्करोगामुळे वाकलेले शिंग व मुळावर झालेली जखम.
 
 
डॉ.सत्यवान मधुकर आगिवले,डॉ.सुनिता चौगुले,
डॉ.संजीव पिटलावार, डॉ.अनिल भिकाने
फोने: ९२२३५७६१९७