रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन

डिजिटल बळीराजा-2    23-Nov-2019

 
 
शेतकरी बंधुनो,रब्बी हंगाम जवळ आलाय त्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन,तिचा प्रकार,जमिनीची खोली,शेतीसाठी आवश्यक औजारे,त्यांची देखभाल दुरुस्ती,रासायनिक खते,जैविक खते ,कीटकनाशके,बी बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे.त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते,औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे. 
 
ज्वारी:
 
 • हलकी जमिन: फुले अनुराधा,फुले माऊली
 • मध्यम खोल जमिन: फुले सुचित्राफुले चित्रा,फुले माऊली,मालदांडी ३५-१,परभणी मोती 
 • खोल जमिन: सुधारित वाण-फुले वसुधा,फुले यशोदा,सीएसव्ही२२,पीकेव्ही-क्रांती , 
                        संकरीत वाण-सीएसएच१५, सीएसएच१९,
 • बियाणे: १० ते १२ किलो /हेक्टरी 
 • पेरणीची योग्य वेळ: १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर
 • पेरणीचे अंतर: ४५x२० से.मी.
 • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे.
           ५०:२५:२५ नत्र:स्फुरद: पालाश प्रति हेक्टरी
 • बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक चोळावे.त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी
                       अॅझोटोबॅकटर व पीएसबीया जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी. 
करडई :
 
 • वाण: भीमा,फुले कुसुमा,एसएसएफ ६५८, एसएसएफ ७०८,फुले करडई,फुले चंद्रभागा 
            नारी-६,नारी एन एच -१ (बिगर काटेरी वाण)
 • बियाणे: १० ते १२ किलो /हेक्टरी 
 • पेरणीची योग्य वेळ: २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
 • पेरणीचे अंतर: ४५x२० से.मी.
 • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे 
           ५०:२५:०० नत्र:स्फुरद: पालाश प्रति हेक्टरी
 • बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन
                       चोळावे.त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जैविक खतांची 
                       बीजप्रक्रिया करावी.
सूर्यफूल: 
 
 • वाण: सुधारित- भानू, फुले भास्कर
              संकरित-एमएसएफएच-१७,एलएसएफएच -१७१ 
 • बियाणे: ८ ते १० किलो /हेक्टरी 
 • पेरणीची योग्य वेळ: २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
 • पेरणीचे अंतर: मध्यम खोल जमीन ४५x३० से.मी., भारी जमिन: ६०x३० से.मी. 
 • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे
           ५०:२५:२५ नत्र:स्फुरद: पालाश प्रति हेक्टरी
 • बीजप्रक्रिया: मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २-२.५ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
                       केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रम अॅप्रॉन३५ एस डी प्रति किलो बियाण्यास
                       चोळावे.नॅक्रासिस रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड ७० डब्लू,ए गाऊचा ५
                       ग्रॅमप्रति किलो बियाण्यास चोळावे.
                       त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅकटर या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.
हरभरा:
 
 • वाण: विजय,दिग्विजय
 • बियाणे: ७० ते १०० किलो /हेक्टरी 
 • पेरणीची योग्य वेळ: (हस्त चरणानंतर) २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
 • पेरणीचे अंतर: ३०x१० से.मी.
 • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे
           २५:५०:३० नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी
 • बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम +२ ग्रॅम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम
                       ट्रायकोडर्मा चोळावे.त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी रायझोबियम व पीएसबी या
                       जैविक खतांची गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून बीजप्रक्रिया करावी.
डॉ.आदिनाथ ताकटे