चांगल्या कार्यक्षमतेसाठी ट्रॅक्टरची देखभाल

डिजिटल बळीराजा-2    22-Nov-2019

 
 
ट्रॅक्टर हे कोणतीही गोष्ट सहजतेने ओढून नेता यावी या साठी बनवले गेलेले वाहन आहे. याचा उपयोग शेतीसाठी होतो. गाड्यावर घातलेली वा त्यालाच सरळ जोडलेली शेतकामाची व अन्य प्रकारची यंत्रे, तेल, पाणी किंवा अन्य पदार्थ असलेल्या गाड्यांवरील टाक्या, सामान लादलेले चालीत डबे (अनुवाहन, ट्रेलर) वगैरे ओढण्यासाठी वापरावयाचे स्वयंचलित शक्तिसाधन. अचल यंत्रेही ट्रॅक्टर (त्यावरील कप्पी-पट्ट्याच्या मदतीने) चालवू शकतो. ट्रॅक्टर हे केवळ चाके लावलेले इजिन असते आणि त्यामुळे स्वतः ट्रॅक्टरावर सामान वगैरे काही लादता येत नाही. तरी पण हे विविध प्रकारची कामे करणारे बहुगुणी यंत्र आहे.
 
ट्रॅक्टर जनावरांऐवजी नुसते ओढण्याचे कामच करीत नाही; तर तो मालसामान भरण्याचे, कणसे-लोंब्या खुडण्याचे, कापण्याचे, फवारा मारण्याचे, झोडण्याचे, थप्प्या लावण्याचे वगैरे माणसांनी करावयाची कामेही करू शकतो. त्याचा सर्वांत जास्त उपयोग शेतीसाठी, पडिक जमीन नांगराखाली आणण्यासाठी आणि मोठाल्या बांधकामात होतो. भारतात त्याचा प्रसार मुख्यत्वे शेतीसाठी होत आहे.
 
आपली गरज लक्षात घेऊन गुणवत्ता पूर्ण ट्रक्टर ची निवड करावी. ट्रक्टर सुरु करण्यापूर्वी पहिल्यांदा पुरेसे इंधन आहे की नाही ते पाहावे. पंप मधील वंगण डीप स्ट्रीक च्या सहाय्याने तपासावे. रेडीयटर मधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे. एअर क्लीनर स्वच्छ करावा. टायरमधला हवेचा दाब तपासावा. पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १.५ ते २.५ केजी से.मी. हवेचा दाब असावा. ज्या ठिकाणी ग्रीस लावलेले आहे,असे भाग तपासावेत. महत्त्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत. 
 
ट्रक्टर चालू करताना पहिल्यांदा इंधन कॉक चालू करावा. गिअर शिफ्ट लिव्हर आणि PTO लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा. थ्रोटल लिव्हर तीन चातुर्थौंश जागेवर ठेवावी. क्लच दाबून ट्रक्टर ची किल्ली ऑनच्या बाजूने फिरवावी. ट्रक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावी. क्लच पेडल दाबावे. गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा. मेन स्विच ऑफ च्या बाजूला फिरवावा. गरज असेल तर पार्किंग ब्रेंक लावावेत.
 
ट्रक्टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण ऐकू येऊ लागला की ट्रक्टर थांबवून त्याचे कारण शोधावे. जर इंधन मधून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भार कमी करावा. ट्रक्टर गती मध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये. नेहमी क्लच हळुवार सोडवा. रस्त्यावर चालताना दोन्ही चाकांना ब्रेंक लागतो का नाही ते तपासावे. काही तास कामाचे झाले की सूचनेनुसार फिटरकडून ट्रक्टरची देखभाल करून घ्यावी.
 

 
 
दर ८ ते १० तासानंतरचे व्यवस्थापन
 • इंजिनमधील आणि एअर क्लीनर मधील तेलाची पातळी तपासावी.
 • रेडिएटरमधील पाण्याची पातळी तपासावी.
 • जर ट्रक्टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्लीनरमधील तेल बदलावे.
 • डिझेल गळती आहे का ते तपासावे.
दर ५० ते ६० तासानंतरचे व्यवस्थापन
 • फॅन बेल्टचा ताण योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी.
 • गेअर बॉक्स मधील तेलाची पातळी तपासावी.
 • चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी.
 • डिझेल फिल्टरमध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.
दर १०० ते १२० तासानंतरचे व्यवस्थापन
 • इंजिन तेल बदलावे, तसेच बदलण्याजोगे फिल्टर्स बदलावेत.
 • श्याकतो सर्व ग्रीसिंग पॉइन्टला वंगण लावावे.
 • डायनामोच्या बेअरिंग मध्ये ८ ते १० थेंब तेल टाकावे.
 • पुढील चाकांमध्ये प्ले आहे का ते पाहावे. सर्व चाकांचे नट बोल्ट तपासून आवश्यकतेनुसार आवळून घ्यावेत.
 • बॅटरी तपासून आवश्यक्तेनुसार डिस्टील्ड वाटर भरावे.
दर २०० ते २५० तासानंतरचे व्यवस्थापन
 • ऑइल सम्प काढून स्वच्छ करून त्यात नवीन ऑइल भरावे.
 • ऑइल फिल्टर तसेच डिझेल फिल्टर बदलावेत.
 • स्टेअरिंग कॉंलमच्या बेअरिंग ग्रीसिंग कराव्यात.
 • ब्रेक्सची तपासणी करावी.
दर ४०० ते ५०० तासानंतरचे व्यवस्थापन
 • पुढील चाकाचे हब ग्रीसिंग करावे.
 • रेडिएटरमधील पाणी काढून तो स्वच्छ करून घ्यावा. पुन्हा नवीन पाणी भरावे.
 • क्लच तपासून घ्यावा.
 • आवश्यक्तेनुसार ब्रेंक नीट करून घ्यावेत.
 
दर ७५० ते ८०० तासानंतरचे व्यवस्थापन
 • गेअर ऑइल बदलावे.
 • ब्रेंक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे.
 • डिझेल टाकी साफ करावी.
 • स्टेंअरिंग बॉक्समधील ऑइल तपासून पाहावे.
दर १००० ते १२०० तासानंतरचे व्यवस्थापन
 • पुढील व मागील चाकाच्या एक्सलचे बेअरिंग्ज स्वच्छ करून पुन्हा बसवावेत.
 • बॉंश पम्प व नोझल्स अधिकृत सर्व्हीस सेंटरकडून तपासून घ्यावेत.
 • वोल्व सेटिंग करून घावेत.
 • बोनेट, ग्रील तसेच सीट तपासून पहावी. आवश्यक्तेनुसार दुरुस्ती करावी.
 
श्री. ठोंबरे ए. व्ही., श्री. सोनवणे सी. के.,
कु. शिरसाट पी.पी.
सहाय्यक प्राध्यापक 
उद्यानविद्या महाविद्यालय, मालेगाव
कॅम्प (नाशिक)
मो.९०६७२७१७०६ , ९४०३२८६२७२