भविष्यकाळातील कुक्कुटपालन व्हेज/नॉनव्हेज आणि नॉनव्हेजसारखे व्हेज

डिजिटल बळीराजा-2    16-Nov-2019

 
आम्ही व्हिवा फूड्सच्या माध्यमातून सोयाबीनचे एकमेवाद्वितीय असे खाद्यपदार्थ बनवतो. उदा. सोयाबीनची कॉफी.
जगाच्या पुढे दोन पावले राहण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील संशोधन व विक्रीची माहिती गोळा करताना ही जी माहिती मिळाली आहे ती अनेकांना अनेक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल. 
 
ही माहिती खळबळजनक आहे. मार्टेन अर्नस्ट हे हॉगकाँगमधल्या ओव्होटेक या अंड्याचे मार्केटिंग प्रमुख आहेत. जगाच्या पोल्ट्री उद्योगात होणार्‍या बदलांची फर्स्ट हॅड माहिती देताना ते सांगतात की आता यापुढे पोल्ट्रीला वनस्पतिजन्य पर्याय पुढे येऊ लागले आहेत. वाढत्या लोकसंख्येला प्रथिने पुरवण्याला त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. 
 
जगातल्या पाण्याचा प्रमुख उपयोग शेतीसाठी होतो आणि त्यापैकी मोठा भाग कुक्कुटपालनाचा आहे. भारत हा एकमेव देश शाकाहारी आहे, हे येथे लक्षात घ्यावे. पुढच्या तीस वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या पोल्ट्री उद्योगासाठी लागणारे पाणी दुर्मीळ होत जाईल. जनतेचे उत्पन्न वाढतेय, शहरीकरण वाढतेय. पाण्याची मागणी वाढतेय. मांसजन्य पदार्थांसाठीसुद्धा लागणार्‍या पाण्याची मागणी वाढत आहे. या सहस्त्राकामध्ये आता कंपन्या वनस्पतिजन्य प्रथिनांचा अभ्यास करू लागल्या आहेत. जगातील या क्षेत्रातील महाप्रचंड कंपन्यांनी म्हणजे टायसन फूड्स. चिकन, बीफ, पोर्क यांवर प्रक्रिया करून विकणारी सर्वांत मोठी अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने में फीस मिट या प्रयोगशाळेत मांसजन्य पदार्थाचे संशोधन करणार्‍या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी बियाड मिट या अशाच प्रकारच्या कंपनीतही गुंतवणूक केली आहे. 
 
कारगिल ही अशीच एक जागतिक मोठी कंपनी. या कंपनीने मटारपासून प्रथिने बनवणार्‍या लहान कंपनीशी भागीदारी केली आहे आणि डेअरी उद्योगही बदलत आहे. डीन फूड्स या डेअरी उद्योगाने गुड कर्मा फूड्स या कंपनीत गुंतवणूक केली आहे, तर गोल्डन सॅक्सने रिपल फूड्समध्ये गुंतवणूक केली आहे 
 
हे बदल होताना ग्राहकांच्या अन्नाच्या सवयी बदलत आहेत. सारे जग वनस्पतिजन्य खाद्याकडे वळत आहे आणि जर आपण काळाबरोबर चाललो नाही, तर डिनोसॉरीप्रमाणे आपल्याला अस्तंगत व्हावे लागेल. आता होत असलेले बदल हे येणार्‍या काळाची दिशा दाखवत आहेत. आपण बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुसंगत बदल केले पाहिजेत. 
 
मांस आणि डेअरी उद्योगातील जगातील मोठ मोठ्या कंपन्या वनस्पतिजन्य अन्नपदार्थांकडे वळत आहेत. हे लक्षात घेऊन अंड्याला पर्यायावर संशोधन करणार्‍या जस्ट गाडी या कंपनीबरोबरसुद्धा भागीदारी केली आहे. 
 
या दोन्ही कंपन्या मिळून इतर कंपन्यांसाठी स्क्रॅनल्ड एग्जला पर्याय असणारे खाद्यपदार्थ विकसित करतील. वनस्पतिजन्य पदार्थांमध्ये अनेक चांगले गुण आहेत. त्यामध्ये अँंटीबायोटिक नसतात. पण क्लोरेस्ट्रोल नसते. हे उत्पादन करताना कार्बन एमिशन 24 % कमी होईल आणि 65 % कमी पाणी पुरेसे होईल. 
 
पारंपरिक पद्धतीने एक छोटेसे अंडे तयार होताना विश्वास बसणे अवघड आहे. 5.3 लिटर पाणी वापरावे लागते. धान्याची शेती आणि कोंबड्यांना द्यावे लागणारे हे पाणी आणि जगात रोज अब्जावधी अंडी खाल्ली जातात. 
 
कॅनडामधला वनस्पतीवर आधारित कत्तलखाना = अमेरिकेला व्हेगान बर्जर्स सॉसेजेस वगैरे मांसाला पर्याय असणारे पदार्थ पुरवत आहे. The very good Butchers हे या कंपनीचे नाव आहे. 2016 मध्ये त्यांनी हा नवा उद्योग सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षांतच त्यांना अमेरिकन भागीदार लाभले आहेत. ते तेथे online विक्री करतात, तर काही जण monthly meat club चे सभासद झाले आहेत. ते म्हणतात आम्हाला उत्तम दर्जाचे पर्यायी मांसपदार्थ करायचे आहेत. अमेरिकेत काहीजण आता मांसाहार सोडून vegan बनत आहेत. ही व्हेगात मनसे गाईचे दुधसुद्धा मांसजन्य म्हणतात. त्यांनी very good Butchers यासाठी सँंडविचेस, बँगर्स वगैरे ब्रेकफास्ट पदार्थ मिळतात.
 
बहुसंख्य अमेरिकनांच्या मते (65%) वनस्पतिजन्य आहार मांसजन्य पदार्थाइतकाच चांगला असतो. हा जास्त चवदार व जास्त आरोग्यदायक पर्याय आहे. 
 
भारतातील या धंद्याची स्थिती- दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगलोर वगैरे मोठ्या शहरांमध्ये थायलंड, मलेशियावरून आयात केलेले सोयाबीनपासून केलेले चिकनला पर्याय असणारे खाद्यपदार्थ 800 रु. ते 1200 रु. प्रतिकिलो भावाने आयात केले जातात. महागड्या हॉटेलात हे सर्रास विकले जातात. दिल्लीमधून येणारे सोयाबीनचे मांसासारखे खाद्यपदार्थ- दिल्ली, हरियाना, पंजाब या राज्यांमध्ये लोक अंडी, मांस खाण्यास प्रथम क्रमांकावर असतात. त्यामुळे तेथील ग्राहकांनी मांसजन्य पदार्थाचे दुष्परिणाम प्रथम भोगले. त्यांनी पाहिले की काढणीच्या काळात बलुचीस्तानातून आलेल्या काही पंथांमध्ये अंडी मांस खात नाहीत. ते लोक सोयाबीनपासून बनवलेले मांसासारखे दिसणारे चवीला मांसासारखे असणारे पदार्थ सेवन करतात. मी दिल्लीत असताना हे पदार्थ खाल्ले आहेत. तेथली एक रेस्टॉरंट कंपनी दिल्लीत 22 ठिकाणी रात्री अन्नाच्या ट्रकमधून असे पदार्थ विकते. गव्हापासून तसेच फणसापासूनही असे पदार्थ बनवता येतात. 
 
मी सोयाबीनपासून असे पर्यायी पदार्थ करायला सुरवात केली आहे. हे सुरुवातीचे दिवस असल्याने दोन दिवस अगोदर ऑर्डर द्यावी. तसेच किमान 5 किलोची बॅग असल्याने 5 किलोची ऑर्डर असावी. भाव बोनलेस चिकनचा. 
 
बचत गटांनी पापड लोणच्यातून बाहेर पडावे, असे म्हटले जाते. ज्या बचत गटांना मांसाहारी चवीचे पदार्थ उदा. कबाब, रोस्ट, करी करता येते त्यांना ही नवीन संधी आहे. 
 
ऑगस्ट 2018 पर्यंत मी पुणे जिल्ह्यापुरतेच काम करणार आहे. नंतर व्यवसाय स्थिर झाल्यावर इतर जिल्ह्यांकडे पाहता येईल. 
आतापरुते या चिकनला सोयाचिकन हे नाव दिले आहे. हे 100 टक्के सोयाबीनपासून केलेले पूर्ण शाकाहारी आहे, तसेच पूर्णपणे क्लोरेस्ट्रोलमुक्त आहे. भविष्यकाळातच हा पोल्ट्रीला पर्याय ठरणारा महाप्रचंड उद्योग होईल.कारण हे उत्पादन alternative to meat तसेच extender to the meat आहे.
पद्माकर देशपांडे