2018 या वर्षामध्ये कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण, कृषियंत्रे व पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशी

डिजिटल बळीराजा-2    16-Oct-2019
 
 
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या समन्वयाने राज्यातील एका कृषी विद्यापीठाने संयुक्त कृषिसंशोधन व विकास समितीची बैठक दरवर्षी आयोजित करण्यात येते. या बैठकीस कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांव्यतिरिक्त भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या महाराष्ट्रातील संशोधन संस्थांचे संचालक, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी , कृषीसंबंधित खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित असतात. विविध विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, पिकांचे नवीन विकसित केलेले वाण, यंत्र, अवजारे इत्यादींबाबत या बैठकीमध्ये सखोल चर्चा होते आणि यामधील उत्कृष्ट वाणांना, तसेच कृषी उत्पादनवाढीसाठी उपयुक्त असणार्‍या तंत्रज्ञान शिफारसींना मान्यता देऊन शेतकर्‍यांसाठी प्रसारित करण्यात येतात.
 

 
 
विकसित व प्रसारित केलेले पिकांचे वाण
 
1. भात: बीएआरसीकेकेव्ही-13 (ट्रॉम्बे कर्जत कोलम) 
हा भाताचा अधिक उत्पादन देणारा, बुटका, निमगरव्या, आखूड बारीक आणि तांदळाची उत्तम गुणवत्ता असलेला वाण कोकण विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
2. कॅशिया : सालीचे जास्त उत्पादन, सालीतील तेलाचे प्रमाण जास्त असणारा आणि क्युमारीनचे प्रमाण योग्य असणारा कॅशियाचा कोकण कॅशिया हा वाण कोकण विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्यात येत आहे.
3. जायफळ : नर व मादी फुले एकाच झाडावर असणारा आणि छोट्या आकाराच्या जायफळाचे अधिक उत्पादन देणारा कोकण संयुक्ता हा वाण कोकण विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्यात येत आहे.
 
यंत्रे व अवजारे
 
केकेव्ही शंकू कोळपे
महिला वर्गासाठी श्रमशास्त्रीयदृष्ट्या विकसित केकेव्ही शंकू कोळप्याची भातशेतीत कोळपणी करण्यासाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
यंत्रांची वैशिष्टे :
 
* भातशेतीतील तण काढण्यासाठी उपयुक्त 
* एकूण वजन 5.72 किग्रॅ
* वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वापरताना फ्लोटवर चिखल साचत नाही.
* शंकूंवरील पात्यांच्या नावीन्यपूर्व रचनेमुळे भातशेतीतील तण काढण्याचे काम जलद व चांगले होऊन श्रमाची बचत होते. 
* शंकू कोळप्याची कार्यक्षमता 0.011 हेक्टर/तास 
* वजनास हलके, अधिक चांगली पकड आणि समतोल रचना यामुळे वापरास सोईस्कर 
* श्रम शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासातून तयार केल्याने महिलांकरिता सुलभ 
* रक्कम रु. 800/-
 

 
 
पीक उत्पादनावर तंत्रज्ञानावर आधारित संशोधन शिफारशी
 
अ) नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन :
 
1. कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये हापूस आंब्याचे अधिक उत्पन्न व नफा मिळविण्यासाठी 3:1:1 किग्रॅ नत्र स्फुरद पालाश अधिक 50 किलो शेणखत यांची मात्रा एकत्रितरीत्या दहा वर्षांवरील प्रतिझाडांना देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
2. खरीप भातपिकास संपूर्ण वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करून अधिक उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळविण्यासाठी प्रतिहेक्टर 175 किग्रॅ कोकण अन्नपूर्णा ब्रिकेटस (34:14:6 टक्के नत्र स्फुरद पालाश) वापरण्याची शिफारस करण्यात येते.
3. कोकणातील जांभ्या जमिनीत काजूचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत खतमात्रेसोबत काजू पिकाला मोहोरावर आणि बी धरतेवेळी कॉपर सल्फेट 0.1 टक्के अधिक 0.5 टक्के चुना अशा दोन फवारण्या देण्याची शिफारस करण्यात येते.
4. दक्षिण कोकण किनारपट्टी विभागात सह्याद्री-3 या संकरित भात वाणापासून खरीप हंगामात अधिक उत्पन्न व निव्वळ नफा मिळवण्याकरिता रोपवाटिका 23व्या हवामान आठवड्यात (4 ते 10 जून ) पेरून 15 दिवसांची रोपे पुनर्लागवडीकरिता वापरावीत अशी शिफारस करण्यात येते.
5. दक्षिण कोकण विभागात उसाचे अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी एक डोळा असलेल्या उसाच्या कांडीपासून तयार केलेली रोपे वापरावीत आणि रोपे करण्यासाठी कोकोपीट आणि गांडूळखत सम प्रमाणात घेऊन त्यात 5 ग्रॅम अ‍ॅसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक प्रतिकिलो प्रमाणात वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
6. उन्हाळी भेंडी पिकापासून अधिक उत्पादन व फायदेशीर मिळकतीची कोकण विभागातील जांभ्या जमिनीत प्लॅस्टिक अस्तीकरणाचा वापर आणि 120-45 ु 15 सेंमी अंतराने जोडओळीत लागवड करून खालीलप्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे दररोज पाणी द्यावे व शिफारशीत मात्रेनुसार (100:50:50किलो नत्र स्फुरद पालाश/हे ) विद्राव्य खताचा आठवड्याच्या अंतराने सात समान हप्त्यांत (0.375 किलो 19:19:19 आणि युरिया 0.155 किलो हे ) वापर करावा, अशी शिफारस करण्यात येत आहे.
पिकाच्या वाढीच्या कालावधीत (आठवडा) पाण्याची मात्रा (ली/मी लांबी) एकूण दिलेले पाणी (मिमी/हे )
 
 1 ते 5  52   65-4
 6 ते 9  50  62-8
 10 ते 13  75   94-2
14 ते 17 47  58-6
 
7. खरीप हंगामात सेंद्रिय भाताचे अधिक उत्पादन आणि आर्थिक नफा मिळविण्यासाठी सह्याद्री -3, सह्याद्री-4, सह्याद्री-5, कर्जत-3, कर्जत-5, कर्जत- 8 आणि रत्नागिरी -3 या जातींची शिफारस करण्यात येते.
 
8. रब्बी : उन्हाळी हंगामात सेंद्रिय भुईमुगाचे अधिक उत्पादन आणि आर्थिक नफा मिळविण्यासाठी कोकण गौरव, टीजी-26 आणि जेएल-776 या भुईमूग जातीची शिफारस करण्यात येते.
9. उत्तर कोकण किनारपट्टी विभागात भात- भुईमूग आणि भात-घेवडा या सेंद्रिय पीकपद्धतीपासून अधिक उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळविण्यासाठी खालील तपशिलानुसार विविध स्रोतांतून अन्नद्रव्य व्यवस्थापनाची शिफारस करण्यात येते.
स्रोत खरीप भात रब्बी पिके भुईमूग मधुमका घेवडा
 
 शेणखत (टन प्रतिहेक्टर) 5-0  1-5  6-0  4-0 
 गिरिपुष्पाचा हिरवा चारा (टन प्रतिहेक्टर)  7-5  --  --  --
 निंबोळी पेंड (टन प्रतिहेक्टर)  0-5  1-150  0-6  0-4
 भाताचा पेंढा (टन प्रतिहेक्टर)  4-0  --  --  --
 गांडूळखत (टन प्रतिहेक्टर)  --  0-5  2-0  1-3
 गोमूत्र आणि गांडूळ पाणी यांच्या प्रत्येकी 10 टक्के
द्रावणाच्या पेरणीनंतर 30 व 60 दिवसांनी
दोन फवारण्या (लि प्रतिहेक्टर)
 --  --  50  --
 
 
10. उत्तर कोकण किनारपट्टी विभागात खरीप भात रब्बी चवळी पीकपद्धतीपासून अधिक उत्पादकता आणि आर्थिक फायदा मिळण्यासाठी दोन्ही पिकांना 75 टक्के शिफारशीत खतमात्रा (भात- 100:50:50 किलो नत्र स्फुरद पालाश प्रतिहेक्टर आणि चवळी- 25:50: 0 किलो प्रतिहेक्टरीसहित भातपिकास गिरिपुष्प 3 टन व 3.5 किलो ऍझोस्पिरिलम, तर चवळी पिकास 3.5 किलो रायझोबियम प्रतिहेक्टरी देण्याची शिफारस करण्यात येते.
 
 

 
 
उद्यानविद्या
 
1. आंबा : हापूस आंबा पिकामध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी व साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एन- एटका (छ _ -ढउ-) (10 तऊवी) आणि फॉलिक अ‍ॅसिड (0.20 टक्के ) घटक असलेल्या द्रव्याची फवारणी अनुक्रमे 50 टक्के मोहार फुलल्यावर (1 मिली/लि) फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर (1.5 मिली/लि) फळाच्या आकार अंडांकृती झाल्यावर (2 मिली/लि) आणि फळधारणेनंतर 75 दिवसांनी/2 मिली/लि) करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
2. काजू : वेंगुर्ला- 4 काजूमध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी थायोप्रोलीन (5 टक्के ) फॉलिक अ‍ॅसिड (0.01 टक्के) आणि ब्रासिनोलिडस (500 पीपीएम) हे घटक असलेल्या द्रव्याची फवारणी फळधारणा झाल्यावर (1 मिली/लि ) पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी (1.5 मिली/ हे) आणि दुसर्‍या फवारणीनंतर 15 दिवसांनी (2 मिली/हे ) करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
3. नारळ : नारळ बागेत अधिक उत्पादन व नफा मिळविण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे दालचिनी, जायफळ, काळी मिरी, केळी आणि अननस या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करण्याची शिफारस करण्यात येते.
4. तेलताड आंतरपीक : दक्षिण कोकण विभागात तेलताडाच्या बागेत सुरुवातीच्या कालावधीत (5 वर्षांपर्यंत) किफायतशीर उत्पन्नाकरिता केळी, अननस आणि सुरण या पिकांची मिश्रपीक म्हणून लागवड करण्याची शिफारस करण्यात येते.
5. अभिवृद्धी : जायफळ, कोकमाची कलमे आणि काळी मिरीची छाट कलमे अधिक यशस्वी होण्यासाठी आणि त्याच्या चांगल्या वाढीसाठी बंद अभिवृद्धी गृहाचा (आकार 10.5 मी लांबी ु 3.10 मी रुंदी ु 2 मी उंच) वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
पशू व मत्स्यविज्ञान
 
1. कोकण विभागातील जर्शी संकरित वासराच्या अधिक वाढीसाठी खाद्यातून 1.5 किलो ताजा अझोला प्रतिदिन देण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
2. व्हॅलिसनेरिया जातीच्या पाणवनस्पतीच्या उत्तम वाढीसाठी वाळू आणि मातीच्या समप्रमाणातील मिश्रणामध्ये म्हशीचे 2 टक्के वाळलेले शेण मिसळून त्यात वनस्पतीचे रोपण करून 800 लक्स प्रकाश प्रखरतेत वाढविण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
3. शेततळ्यात पिंजर्‍यामध्ये स्वोडरटेल जातीचे बीज 150 नग प्रतिचौरस क्षमतेने साठवणूक करून त्यांना 32 टक्के प्रथिनयुक्त खाद्य वजनाच्या 8 टक्के प्रमाणात देऊन संवर्धन करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
4. मोनोसेक्स संवर्धन पद्धतीत नर तिलापिया माशांच्या अधिक उत्पादनासाठी खाद्यात 3 टक्के स्पायरुलीना पावडर मिसळण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
5.गप्पी माशांच्या उत्तम वाढीसाठी 3 टक्के शतावरी चूर्ण मिश्रित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फिफू खाद्य वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
6. कटला माशाच्या बोटुकलीच्या उत्तम वाढीसाठी जास्त जगण्याचे प्रमाण मिळवण्यासाठी पूर्वजैविक म्हणून 2 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात सुक्या केळ्यांच्या पावडरबरोबर 0.5 प्रतिकिलो या प्रमाणात प्रजैविक खाद्यात मिसळण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
7. तिलापिया माशाच्या बोटुकलीच्या उत्तम वाढीसाठी जास्त जगण्याचे प्रमाण मिळण्यासाठी पूर्वजैविक म्हणून 2 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात सुक्या केळ्यांच्या पावडरबरोबर 0.5 प्रतिकिलो या प्रमाणात प्रजैविक खाद्यात मिसळण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
8. मुत्री माशांच्या उत्तम वाढ आणि जास्त जगण्याचे प्रमाण मिळवण्यासाठी 33 टक्के इंटेरोमाँफ्रो शेवाळयुक्त खाद्य माशांच्या वजनाच्या 5 टक्के प्रमाणात देण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
9. किनारी भागात तिलापिया माशांच्या बीजोत्पादनासाठी 0 ते 5 पीएसयू क्षारतेच्या निमखार्‍या पाण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 

 
 
क) मूलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान
 
1. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित ऊतिसंवर्धन तंत्र कोकणातील लाल केळीच्या सूक्ष्म अभिवृद्धीसाठी शिफारस करण्यात येत आहे. 
2. म्हशीच्या दुधापासून सर्वोत्तम स्वाकारार्हता आणि सर्वसाधारण वातावरणीय तापमानात चार दिवसांची टिकवणक्षमता असलेला छन्ना पोडो बनविण्यासाठी डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, (दापोली) यांनी विकसित केलेल्या निर्मिती प्रक्रियेचा वापर करून छन्नाच्या वजनाच्या 20 टक्के हापूस आंब्याचा रस वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
3. सर्वसाधारण वातावरणीय तापमानात सहा दिवसांची आणि रेफ्रेजरेशन तापमानाला दहा दिवसांची टिकवणक्षमता असलेला कलाकंद बनविण्यासाठी डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, (दापोली) यांनी विकसित केलेल्या निर्मिती प्रक्रियेचा वापर करून मूळ दुधाच्या वजनाच्या 7.50 टक्के आंब्याचा रस वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
4. मिल्क पुडिंग बनविण्यासाठी 2 टक्के जिलेटीनचा स्थिरीकरण घटक म्हणून आणि 15 टक्के आंब्याच्या राशीचा स्वाद म्हणून वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
5. वातावरणीय तापमानाला 12 दिवसांची व रेफ्रिजरेशन तापमानाला सोळा दिवसांची टिकवणक्षमता असलेला पंटुआ बनविण्यासाठी डॉ. बा सा कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेल्या निर्मिती प्रक्रियेचा वापर करून छन्ना व खव्याच्या मिश्रणाच्या वजनाच्या 20 टक्के खजूर पेस्ट वापरण्याची आणि पंटुआ 5 तास साखर पाकात मुरविण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
6. म्हशीच्या दुधापासून सर्वसाधारण वातावरणीय तापमानात दोन दिवसांची आणि रेफ्रेजरेशन तापमानाला चार दिवसांची टिकवणक्षमता असलेले आलेयुक्त श्रीखंड बनविण्यासाठी डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यांनी विकसित केलेल्या निर्मिती प्रक्रियेचा वापर करून दुधाच्या वजनाच्या 1 टक्का स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलीस व लॅकटोबॅसिलस बल्गारिक्स या योगर्ट विरजनाचा व चक्क्याचा वजनाच्या 5 टक्के या प्रमाणात आल्याच्या रसाचा स्वादद्रव्य म्हणून वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
7. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रक्रियेने 15 टक्के कसावा स्टार्चपासून खाद्यवेष्टण तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
8. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रक्रियेने सोयाबीन व गायीच्या दुधाच्या (25:75) मिश्रणापासून पनीर बनविण्याच्या प्रक्रियेची शिफारस करण्यात येत आहे.
10. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रक्रियेने सोयाबीन दूध व गायीच्या दुधाच्या मिश्रणापासून (25:75) मायक्रोव्हेव कन्हेक्टिव्ह वाळवणी यंत्रात 50 अंश से. तापमानास वाळवलेले पनीर क्यूब्ज तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
11. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पद्धतीने 20 टक्के काजू बोडाचा रस, 3 टक्के श्रळपलरलहर रस आणि 1 टक्का आल्याचा रस वापरून 15 ब्रिक्स एकूण विद्राव्य घटक असलेले लिंबू रसयुक्त मसालेदार काजू बोडाचे नेक्टर तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
12. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुवर्णा जातीपासून बाटलीबंद आंबा रस तयार करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. 
13. कमी स्निग्धांश असलेले व उत्तम प्रतीचे पंकज माशांचे फिंगर्स बनविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बॅटर (मिश्रण) वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
 

 
 
ड) पीकसंरक्षण :
 
1 कोकणातील चिकू पिकावरील फायटोफथोरा या बुरशीमुळे उद्भवणार्‍या फळगळ रोगाच्या किफायतशीर व प्रभावी व्यवस्थापनासाठी बागेच्या स्वच्छतेबरोबरच पावसाळ्याच्या सुरुवातीला ट्रायकोडर्म हरझियानाम हे जैविक बुरशीनाशक 250 ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात झाडाच्या विस्ताराखाली पसरावे. त्यानंतर एक टक्का बोर्डोमिश्रणाच्या तीन फवारण्या द्याव्यात. बोर्डोमिश्रणाची पहिली फवारणी पावसाळ्याच्या सुरुवातीस करावी व इतर दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
2. नारळावरील इरिओफाइड कोळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शिफारशीत नत्र, स्फुरद आणि पालाश, अझादीरॅक्टिन, बोरॉन, मँगॅनीज, मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त गोळ्या 4.5 किलो प्रतिमाड प्रतिवर्ष याप्रमाणे वर्षातून तीन वेळा जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये विभागून देण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
3. आंब्यावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी बुप्रोफेझिन 25 एससी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
4. काजूवरील बोड व बी पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी डायक्लोरॉव्हस 76 टक्के प्रवाही 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
5. भातपिकावरील खोडकिडा व पाने गुंडाळणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी कारटाप हायड्रोक्लोराइड 4 टक्के दाणेदार 18.75 किलो किंवा क्लोरँत्रनिलिपोल 0.4 टक्के दाणेदार 10 किलो किंवा फिप्रोनील 0.3 टक्के दाणेदार 20.8 किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात पहिली मात्रा रोपवाटिकेमध्ये 2-3 दिवस पुनर्लागवडीपूर्वी आणि दुसरी मात्रा पुनर्लागवडीनंतर 30.35 दिवसांनी आवश्यकतेनुसार देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
 

 
 
इ) कृषी अभियांत्रिकी
 
1. मका, तांदूळ आणि कुळीथ यांच्या 50:30:20 मिश्रणापासून टिवन स्क्रू एक्सस्टुडर संयंत्राने 150 से बॅरल तापमान आणि 225 फेरे प्रतिमिनिट स्क्रू वेग वापरून खाण्यासाठी योग्य केकेव्ही क्रिस्प बनविण्याच्या प्रक्रियेची शिफारस करणेत येत आहे. 
2 . बासाकोकृवि. विकसित बाबूंच्या कळकव मेस या वाणांपासून बनविलेले बांबू कुटीर संरचनेची कोकणासाठी शिफारस करण्यात येत आहे. बांबू कुटीर बनविण्यासाठी लागणार्‍या साहित्याची तपशीलवार माहिती.
 
 अ क्र  बांबू  कुटीरचा भाग  साहित्य तपशील
 1  कॉलम  कळक  100 ते 130 मिमी व्यास
 2  बीम व परलिन  मेस  70 मिमी व्यासाचे
 3  भिंतीसाठी बांबू   मॅट  14 मिमी आणि 9 मिमी जाडीचे बांबू मॅट
 4  फॉलसीलिंग बांबू  मॅट  3 मिमी बांबू मॅट
 
3. बासाकोकृवि. एकत्रित कार्बनीकरण व द्रवीकरण संयंत्राची जैवभारापासून कोळसा (50 किलोग्रॅम प्रतिबॅच) व कच्चे जैव तेलनिर्मितीसाठी शिफारस करण्यात येत आहे. 
4. बासाकोकृवि विकसित कमी खर्चाची कालसापेक्ष जमिनीतील ओलाव्यावर आधारित स्वयंचलित सिंचन प्रणालीचा विविध पिकांच्या सिंचनासाठी शिफारस करण्यात येत आहे. 
5. कोकण विभागातील वाळूयुक्त पोयटा चिकन मातीमध्ये भूपृष्ठाखाली 15 सेंमी खोलीवर उपनळी गाडून पिकांना सिंचन करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
फ ) सामाजिक शास्त्रे, कृषी अर्थशास्त्र
 
1. आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी पीकसंरक्षक रसायनांचा अवास्तव वापर केल्यामुळे प्रतिहेक्टरी रु. 5,718/- इतका अतिरिक्त खर्च होतो. त्यामुळे खर्च कमी होण्यासाठी आणि रासायनिक औषधांचे टाळण्यासाठी आंबा उत्पादक शेतकर्‍यांना विद्यापीठाच्या आंबा संशोधन प्रणालीचा अवलंब करण्यासाठी प्रशिक्षित करण्याची शिफारस करण्यात येते. 
2. अ . कोकण विभागात रु. 1100/- कोटींचे आंब्याचे काढणीनंतर नुकसान होत आहे. म्हणून तालुकास्तरावर काढणीपश्चात व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्याची शिफारस करण्यात येते. 
ब. दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर नियंत्रित बाजारपेठ आहे, परंतु या तालुक्यात आंबा व इतर पिकांसाठी बाजार आवाराची स्थापना करण्याची शिफारस करण्यात येते. 
क . आंबा बागायतरांना काढणीपश्चात हाताळणी व विपणन व्यवस्थापन बदलांबाबत विस्तार यंत्रणेबाबत प्रशिक्षण देण्याची शिफारस करण्यात येते. 
3. दक्षिण कोकणातील; आंब्याच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन केले असता 7 वर्षांनंतर प्रतिहेक्टरी 29.31 क्विंटल वाढीव उत्पन्न मिळाल्याने निव्वळ नफा रु. 53189/- ने वाढल्याचे आढळून आले तसेच फवारणी आणि फळे काढणीच्या खर्चामध्ये 32.10 टक्के बचत झाल्याचे आढळले. म्हणून जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन करण्याच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या तंत्रज्ञानाने आंबा बागायतदारांना प्रशिक्षण देण्यासाठी विस्तार यंत्रणेमार्फत खास योजना कार्यान्वित करून ती राबविण्याची शिफारस करण्यात येते.
 
2. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) 
डॉ. दत्तप्रसाद वासकर आणि डॉ. दिगंबर पेरके
 
46वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक-2018 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) या ठिकाणी दिनांक मे 24-26, 2018 दरम्यान संपन्न झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) यांचे या बैठकीमध्ये 03, वाणांचे 04 यंत्राचे प्रसारण आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारसी पारित करण्यात आल्या आहेत. त्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ) वाण प्रसारण
 
1. खरीप ज्वारी : परभणी शक्ती (पीव्हीके 1009) 
परभणी शक्ती (पीव्हीके 1009) हा खऱोप ज्वारीचा अधिक उत्पादन देणारा, लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असलेला, दाण्यावरील काळी बुरशी, खोडमाशी व खोडकिडीस मध्यम सहनशील असलेला वाण महाराष्ट्रातील खरीप ज्वारी पिकविणार्‍या क्षेत्रासाठी लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
2. कापूस : (पीए-740) 
देशी कापसाच्या पीए 740 हा धाग्याचे सरस गुणधर्म असलेला, रसशोषण करणार्‍या किडी, जिवाणूजन्य करपा, अल्टरनेरिया व दहिया रोगास सहनशील असलेला वाण मराठवाडा विभागात लागवडीकरिता प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
3 चिंच : शिवाई
चिंच या फळपिकाचा नियमित फळे देणारा, तसेच अधिक उत्पादनक्षम शिवाई हा वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू विभागातही प्रसारित करण्यात येत आहे.
 

 
 
ब) कृषी यंत्रे प्रसारण :
 
1. एक बैलचलित टोकणयंत्र : वनामकृवि एक बैलचलित टोकण यंत्राची प्रसारण करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. 
यंत्राची वैशिष्टे : 
* क्षमता 0.189 हे/तास एवढी आहे.
* लहान व अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी उपयुक्त 
* पिकांमधील पेरणीसाठी/रिलेक्रोपिगसाठी उपयुक्त 
2. बैलचलित सरीयंत्रासहित तीन पासेचे कोळपे- वनामकृवि तीन पासेचे कोळपे सरीसह रुंद वरंबा व सरीवरील पिकातील आंतरमशागत करण्यासाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
यंत्राची वैशिष्टे :
 
* बीबीएफने पेरणी केलेल्या जमिनीत कोळपणी व सरी तयार करण्यासाठी उपयुक्त 
* क्षेत्रीय क्षमता 0.20 हे. तास 
* गावात काढण्याची क्षमता 84 टक्के 
* मजुरीवरील खर्चात 60-70 टक्के बचत
3. ट्रॅक्टरचलित रुंदसरी वरंबा टोकण यंत्र व तणनाशक फवारणी यंत्र- वनामकृवि ट्रॅक्टरचलित पाच फणीच्या बीबीएफ टोकण यंत्राची पेरणी व तणनाशक फवारणी करण्यासाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
यंत्राची वैशिष्टे :
 
* रुंदसरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते. सोबतच तणनाशकाची (उगवणी) फवारणी करता येते. 
* 45 अश्वशक्ती ट्रॅक्टरच्या साह्याने पाच ओली बी व खतपेरणी करता येते. 
* तणनाशक फवारणी करता येते. 
* सोयाबीनसाठी 0.49 हे. तास एवढी क्षमता आहे.
 
4. बैलचलित सौरऊर्जेवर चालणारे तणनाशक फवारणी यंत्र : वनामकृवि बैलचलित सौर फवारणी यंत्राची तणनाशके फवारणी करण्याकरिता प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
यंत्रांची वैशिष्टे :
 
* सौरऊर्जेवर चालत असल्याने प्रदूषणरहित फवारणी यंत्र 
* एकूण 12 नोझल्स असून एकत्रित ब्रुम प्रवाह 7.0 ते 9 लि/मि एवढा आहे. 
* फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, पैशाची बचत होते. 
* क्षमता-1.13 हे/तास तर ओढणंशक्ती 34.14 किलो एवढी आहे.
 
 
क) पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशी
 
1. सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन, जास्त आर्थिक नफा व जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी सुडोमोना स्ट्रायटा या जस्त विरघळविणार्‍या द्रवरूप जिवाणू संवर्धनाची 10 मिली लिटरप्रति 10 किलो प्रमाणे बीजप्रक्रिया व शिफारशीत खत मात्रेसह (30:60:30 नत्र, स्फुरद व पालाश/हे) व रायझोबियम बीजप्रक्रियेसह 30 किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस करण्यात येते. 
2. मराठवाडा विभागातील उशिरा पेरण्यात (25+ 5 जुलैदरम्यान) आलेल्या खरीप बाजरीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी 5 टन शेणखतासोबतच शिफारस खतमात्रा (30:60:30 नत्र, स्फुरद व पालाश/ हे ) व 19:19:19 या विद्राव्य खताची मात्रा 0.5 टक्के (50 ग्रॅम/10 लिटर पाण्यात)ची फवारणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
3. मराठवाडा विभागातील मध्यम खोल काळ्या जमिनीत बागायती बीटी कपाशीमध्ये लाल्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिहेक्टरी अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी 125 टक्के शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा (100 :50 :50 नत्र, स्फुरद व पालाश/हे ) ठिबक सिंचनातून देऊन सूक्ष्म न्नद्रव्ये ग्रेड-2 (0.5 टक्के ) व पोटॅशियम शुनाइड (0.5 टक्के) ज्या दोन फवारण्या लागवडीनंतर अनुक्रमे 55 आणि 70 दिवसांनी कराव्यात अशी शिफारस करण्यात येते. 
नत्र, स्फुरद, पालाश प्रतिहेक्टर खतमात्रा खालील दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे विभागून देण्याची शिफारस करण्यात येते.
हप्ता दिवस किंवा कालावधी नत्र (किलो प्रतिहेक्टर) स्फुरद (किलो प्रतिहेक्टर) पालाश (किलो प्रतिहेक्टर) 
4. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये जमिनी, चार पिकांत व गोवंशाच्या रक्तामध्ये आढळलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, या भागातील गोवंशाच्या आहारामध्ये जस्त, मंगल व तांबेयुक्त खजिनाच्या मिश्रणाचा समावेश करण्यासही शिफारस करण्यात येत आहे. 
5. मराठवाड्यातील खरीप बाजरीचे अधिक उत्पादन व आर्थिक फायदा मिळविण्यासाठी फेरस सल्फेट 0.75 टक्के (75 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) बी फवारणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
6. शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवनाद्धारे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सिटाइल अल्कोहोल 20 मिली ग्रॅम प्रतिचौ. मीटर या मात्रेत प्रत्येकी 10 दिवसांच्या अंतराने वापरण्याची शिफारस करण्यात येते.
7. बीटी कापसातील आकस्मित रोप मरवे प्रमाण कमी राहून कापसाचे अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक फायदा मिळविण्यासाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड करून प्रवाही सिंचन पद्धतीने 20 मे नंतर आणि ठिबक सिंचन पद्धतीने 30 मेनंतर किंवा तापमान 39 सें च्या खाली आल्यानंतर मराठवाडा विभागात करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
8. वन लागवडीखालील अमेरिकेन कापसाचे अधिक उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळविण्यासाठी कापूस लागवडीनंतर 75 किंवा 90 दिवसांनी झाडाचा शेंडे खुडण्याची किंवा लागवडीनंतर 75 दिवसांनी मेपिक्वेट क्लोराइड 5 टक्के एएस 250 पीपीएम तीव्रतेची (25 मिली प्रति 10 लिटर पाणी) फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते.
10. उशिराच्या खरीप हंगामातील मका पिकाचे अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी जोडओळीने (45 ु 30-75 सेंमी) मक्याची पेरणी करून 120 सेंमी अंतरावरील इनलाइन ठिबक नळीने एक दिवसाआड एकत्रित बाष्पीभवनाच्या 80 % खोलीचे पाणी देऊन विद्राव्य खतांद्धारे नत्र : स्फुरद : पालाश 113:57:57 कि/हे नत्र एकूण मात्रेच्या प्रति 12.5 टक्के याप्रमाणे आठ समान हप्त्यांत 10 दिवसांच्या अंतराने पेरणीपासून 10 दिवस ते 80 दिवसांपर्यंत, तसेच स्फुरद व पालाश दोन समान हप्त्यांत पेरणीचे वेळी आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी देण्याची शिफारस करण्यात येते. खते देण्याचे वेळापत्रक
खते देण्याची कालावधी खताची मात्रा (113:57:57 कि / हे नत्र स्फुरद पालाश ) विद्राव्य खते कि / हे 
 
 
   नत्र  स्फुरद  पालाश  नत्र  स्फुरद  पालाश
 लागवडीच्या वेळी 14.13  28.5  28.5   - 55  19.6 
लागवडीनंतर 10 दिवसांनी  14.13  30.5 
लागवडीनंतर 20 दिवसांनी  14.13  30.5 
लागवडीनंतर 30 दिवसांनी  14.13   28.5  28.5 30.5 55  19.6 
लागवडीनंतर 40 दिवसांनी   14.13 30.5 
लागवडीनंतर 50 दिवसांनी   14.13  - 30.5   -  -
लागवडीनंतर 60 दिवसांनी  14.13  30.5   -
 लागवडीनंतर 70 दिवसांनी 14.13  30.5   -  -
 लागवडीनंतर 80 दिवसांनी 14.13   - 30.5  -
 
 
11. कापूस+सोयाबीन (1:1) आंतरपीक पद्धतीत, अधिक उत्पादन, अधिक आर्थिक मिळकत, अधिक निव्वळ आर्थिक मिळकत आणि तणनियंत्रण कार्यक्षमता मिळविण्यासाठी लागवडीनंतर, परंतु पीक उगवणीपूर्वी ऑकक्सिफ्लोरफेन 23.5 % इ सी 0.1 किलो प्रतिहेक्टर क्रियाशील घटकाची (425 मिली/हे ) फवारणी करून पेरणीनंतर 6 आठवड्यांनी कोळपणी करावी. 
12. फ्लुरोसेन्ट प्रोब तंत्रज्ञानावर आधारित वनामकृवि बीबीटीव्ही-आरे या जनुकीय निदान संच प्रणालीद्धारे जलद, विश्वासार्ह, अचूक व कमीत कमी दरामध्ये केळी पर्णगुच्छ या रोगाचे केळी पिकाच्या मातृ वृक्षापासून, तसेच ऊतिसंवर्धित रोपापासून निदान करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
13. शेवग्याची पाने, फुले व शेंगा यांची पौष्टिकत्वयुक्त भुकटीचा वापर कॅप्सूलच्या स्वरूपात तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येत आहे. 
14. पनीर दोडा फळांचा 0.5 टक्के संहत काढा व 0.3 टक्के सुक्रोलोजचा वापर करून कार्बनयुक्त पनीर दोडा पेय तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
15. सोयाबीन लोण्याची फैलावण्याच्या गुणवत्तावाढीसाठी 0.2 टक्के गवार डिंकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
16. गहू 20 टक्के, तांदूळ 20 टक्के, मूगडाळ 27 टक्के सोयाडाळ 13 टक्के (सर्व भाजलेले) यांचे पीठ, गाजराची भुकटी 10 टक्के, दुधाची भुकटी 8 टक्के, कोथिंबीर भुकटी 1 टक्का आणि जिरा भुकटी 1 टक्का एकत्र करून बनविलेले उष्मांक, प्रथिने, लोह आणि कॅल्शियम समृद्ध वनामकृवि विकसित थठॠ पूरक आहार गरम पाण्यात किंवा दुधात मिसळून 7 ते 9 महिने वयोगटातील शिशुला खाऊ घालण्याची शिफारस करण्यात येत आहे.
17. वनामकृवि प्रकाशित बालविकासाची उत्कृष्ट तंत्रे- पालकांसाठी मार्गदर्शिका हे पुस्तक बालकांची योग्य काळजी व विकास, विकासात्मक दोष, त्यांची करणे व निराकरण यावर आधारित असल्याने सर्व स्तरांतील पालकांना व शालेय शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि बालकाच्या हितासाठी आवश्यक असणार्‍या कृती करण्याकरिता अतिशय उपयुक्त असल्याने त्यांना याविषयी शिक्षित करण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शिका म्हणून या पुस्तकाची शिफारस करण्यात येत आहे. 
18. व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे आणि स्निग्धांशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी वनामकृवि, परभणी विकसित मल्टिपर्पज फंक्शनल फूड मिक्स सकाळचा नाश्ता 50 ग्रॅम सेवन करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
19. वनामकृवि प्रमाणित आर्थिकद़ृष्ट्या फायदेशीर सुधारित कार्यस्थळ आराखड्याची पापड व शेवया गृहोउद्योग केंद्रातील महिलांचे आरोग्य व कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. 
20. पडदा छपाईकरिता सुती आणि रेशमी कापडावर 10 टक्के आंब्याच्या कोयींच्या स्टार्चचा, थीकनिग एजन्ट म्हणून वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
21. बाजरी पिकावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी सुडोमोनास फ्लुरोसन्स (एमवायएस-14) या जैविक बुरशीनाशकाची 8 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करण्याची शिफारस करण्याची येत आहे. 
22. तुरीवरील शेंगा पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी क्लोरँनट्रानिलीप्रोल 18.5 एस सी 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे 50 टक्के फुलोरा अवस्थेत आणि दुसरी फवारणी फ्ल्युबेन्डमाइड 39.35 एससी 2 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे शेंगा अवस्थेत करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
23. तुरीवरील शेंगा माशीच्या व्यवस्थापनासाठी यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या शेंगांमध्ये 1 अळीप्रति 20 शेंगा किंवा 5 टक्के शेंगांचे नुकसान किंवा 2 टक्के बियाण्यांचे नुकसान अशी आर्थिक नुकसान पातळी निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
24. वनामकृवि विकसित प्रक्रियेमध्ये फोम मॅट ड्रॉइंग तंत्रज्ञान वापरून उत्तम प्रतीची केशर आंबा पोळी बनविण्यासाठी आंब्याच्या रसामध्ये 3 टक्के जीएमएम टाकून ब्लेन्डरद्वारे 2 मिनिटे फिरविल्यानंतर आंबा रसाच्या फोमची जाडी 6 मिलिलिटर ठेवून 60 अंश सेल्सियस तापमानावर 15 टक्के पाण्याच्या अंशापर्यंत ट्रे ड्रायरमध्ये वाळविण्याची शिफारस करण्यात येते. 
25. जनावराच्या मुक्त संचार गोठ्याच्या मोकळ्या जागेमधील फरशीसाठी 40 सेंमीचा थर ज्यामध्ये 20 सेंमीचा दबाई केलेला मुरुम त्यावर 10 सेंमी पीसीसीचा थर व त्यानंतर लाल उभ्या विटांच्या एका थराची 1:6 सिमेंट मालामध्ये बांधकामाची शिफारस करण्यात येत आहे. 
26. मराठवाड्यातील रेशमी उत्पादक शेतकर्‍यांच्या अभ्यासामध्ये खत व्यवस्थापन व रोग व्यवस्थापनाविषयी ज्ञान व अवलंबन कमी असल्याचे दिसून येते. यासाठी विविध कृषी विस्तार यंत्रणा, कृषी विज्ञान केंद्र, रेशीम उद्योग संचालनालय व कृषी विद्यापीठ यांनी विविध विस्तार पद्धतींद्वारे वरील तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. 
27. एकपीक पद्धती, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, लग्नायोग्य मुले, तसेच आजारपण या बाबींमुळे आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले. यासाठी विस्तार यंत्रणेने सीमांत व लहान शेतकर्‍यांमध्ये एकात्मिक शेतीपद्धतीने अवलंबन व जलस्त्रोतनिर्मिती व जलसंधारण यामध्ये शेतकर्‍यांचा सहभाग वाढवावा. 
28. रोग व किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान, कर्जबाजारीपणा, सावकाराचा तगादा, मुलीच्या लग्नाची विवंचना या कारणांमुळे शेतकरी तणावग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. यासाठी सामूहिक विवाह व शासकीय यंत्रणेद्वारे गावपातळीवर मानसशास्त्रीय समुपदेशन व्हावे.
3. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, (अकोला) संशोधन शिफारशी 2017-18 
(संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती 2018 मध्ये मंजूर केलेल्या शिफारशी) 
डॉ. व्ही. के. खर्चे (संशोधन संचालक), श्री. ए . एच. नागोने (सहायक संशोधन संचालक )
 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे दिनांक 24 ते 26 मे 2018 दरम्यान संपन्न झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती 2018 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी अवजारे व यंत्रे-5, उत्पादन तंत्रज्ञान-8 , उद्यानविद्या- 4, पीकसंरक्षण- 1, कृषी अभियांत्रिकी-9 व सामाजिकशास्त्र-1 इत्यादी शिफारशींचा समावेश असून, त्याचे सविस्तर विवरण खालीलप्रमाणे आहे.
 
विकसित वाण
 
अ. क्र. पीक वाण प्रमुख वैशिष्टे प्रसारित झालेले वाण (शेती पिके)
1. भात एसवायई-503-78-34-2 (पीडीकेव्ही तिलक) उत्पादन-38 ते 40 क्विंटल / हे कालावधी : 140-145 दिवस, भाताची प्रत उत्तम, बारीक आकाराचा आकर्षक दाणा कडा करपा रोगास प्रतिबंधक
2. सोयाबीन एएमएस-1001 (पीडीकेव्ही यलो गोल्ड ) उत्पादन : 22 क्विंटल/हे, तेलाचे प्रमाण 21.44 टक्के, कालावधी 97 दिवस, मुळकूज व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक, न लोळणारा,न फुटणारा
ब) प्रसारित झालेले वाण (उद्यानविद्या पिके)
 
3 ग्लॅडिओलस पीडीकेव्ही गोल्ड (एकेजीएल- 04-16) आकर्षक गुलाबी पिवळसर रंगाचा, जास्त फुलाची संख्या, रोग व किडीस मध्यम प्रतिकारक, उत्पादन 2.77 लाख दांड्या 

क) प्रसारित झालेली यंत्रे
4 छोट्या ट्रॅक्टरचलित पंदेकृवि पेरणी व डवरणी यंत्र छोट्या ट्रॅक्टर (18.5-25 अश्र्वशक्ती ) चलित पंदेकृवि विकसित पेरणी व डवरणी यंत्राची शिफारस करण्यात येते. या यंत्राची क्षेत्र क्षमता 0.485 हेक्टर प्रतितास, तसेच तणकाढणी क्षमता 90.02 टक्के एवढी आहे. 
5 पंदेकृवि पावर कटर पंदेकृविनिर्मित पावर कटरचा ऊस बेणे व कडबा कापणी करण्याकरिता उपयोग करण्यात यावा, अशी शिफारस करण्यात येते. ऊर्जेची आवश्यकता 0.23 कि वॉट, क्षमता- बेणे 1800 प्रतितास, कडबा 80 किलो प्रतितास, हिरवा चारा 110 किलो प्रतितास 
6 पीडीकेव्ही कांडा प्रतवारी यंत्र * क्षमता 20 टन प्रतिदिवस (8 तास)
* प्रतवारी कार्यक्षमता 90.51 टक्के 
* 40 मिमी 
* 40-60 मिमी
* 60 मिमी
* 5 अशवशक्ती विद्युत ऊर्जेची गरज 
* 4 अकुशल मजुराची आवश्यकता 
* एका जागेवरून दुसरीकडे नेणे सुलभ 
7 पीडीकेव्ही जांभुळगर निष्कसन यंत्र पीडीकेव्ही जांभूळगर निष्कसन यंत्राची जांभूळगर काढण्याकरिता शिफारस करण्यात येत आहे. यंत्राची गर निष्कसन क्षमता 80 किलो प्रतितास, गर निष्कसन कार्यक्षमता 97.13 प्रतिशत, हे यंत्र अर्ध्या अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीवर चालते, यंत्र चालविण्यास सुलभ आहे.
उत्पादन तंत्रज्ञान
 

 
 
शेती पिके
 
1. विदर्भातील पूर्णा खोर्‍यातील खोल काळ्या चोपण जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी तसेच सोयाबीनचे अधिक उत्पादन व आर्थिक मिळतीकरता बंदिस्त रुंद वरंबा सरीमध्ये पेरणीनंतर 15-20 दिवसांनी हेक्टरी 2.5 टन शेणखत टाकण्यासाठी शिफारस करण्यात येते. 
2. विदर्भातील खोल, काळ्या जमिनीत तुरीचे अधिक उत्पादन, प्रथिनांचे प्रमाण, आर्थिक मिळकत तसेच जमिनीची सुपीकता सुधारण्याकरिता शिफारशीत 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरदसोबत 30 किलो पालाश अधिक गंधक कमतरता असलेल्या जमिनीत 20 किलो गंधक प्रतिहेक्टरी वापरण्याची शिफारस करण्यात येते. 
3. 50 टक्के हिरव्या शेडनेटमधील सिमला मिरचीच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी, तसेच जास्त आर्थिक नफा मिळण़्यासाठी 187.5:112.5:150 किलो नत्र, स्फुरद या खतांची 25 टक्के बचत होते. शिफारशीत खतांपैकी 84.40 किलो स्फुरद या खताची 25 टक्के बचत होते. मातीत मिसळून व 187.5 : 28:150 किलो प्रतिहेक्टरी नत्र, स्फुरद, पालाश हे युरिया फॉस्फोरिक आम्ल व म्युरेट ऑफ पोटॅशद्वारे लागवडीनंतर ठिबकमधून वीस सामान भागांत विभागून आठवड्यातून एकदा द्यावे. 
4. सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन व आर्थिक मिळकतीसाठी शिफारसीत खतांची मात्रा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत 2 टक्के 19 : 19: 19 (नत्र, स्फुरद, पालाश)ची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
5. विदर्भातील मध्यम ते भारी जमिनीवर खरीप ज्वारीपासून जस्त उत्पादन व उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी ज्वारीची लागवड ट्रॅक्टरद्वारे चार ओली 1.5 मीटर रुंद वरंबा सरी पद्धतीने 45 सेंमीवर करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
6. पूर्व विदर्भात अधिक उत्पादनात व आर्थिक मिळकतीकरिता पेरीव धानाची पेरणी 20 ु 10 -15 सेंमी वर करण्याची शिफारस करण्यात येते.
7. विदर्भातील मध्यम खोल काळ्या जमिनीत, कोरडवाहू परिस्थितीत जमिनीची मशागत करताना रोटाव्हेर वापरल्यामुळे येणार जमिनीतील टणकपणा कमी करण्यासाठी, तसेच जमिनीची जलधारणा क्षमता आणि पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता तीन वर्षांनी खोल नांगरट करून दरवर्षी रोटाव्हेटर वापरण्याची शिफारस करण्यात येते. 
8. नांगरट पिकात प्रभावी तण व्यवस्थापनाकरता, तसेच किफायतशीर व अधिक उत्पादनाशी एमॅझीथापर ईमॅझीथायपर ईमॅझोमॉक्स 70 डब्ल्यूजी 0.07 किग्रॅ क्रियाशील घटक/हे (100ग्राम/हे ) या तणनाशकाची उगवणीनंतर 20 दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
उद्यानविद्या
 
9. केळीची यशस्वी लागवड, उत्तम प्रत व अधिक उत्पादनाकरिता केळीची ग्रँड नाइन ही जात विदर्भ विभागात लागवडीकरिता शिफारस करण्यात येत आहे. 
10. डाळिंब या फळपिकांच्या यशस्वी व किफायतशीर अभिवृद्धीकरता गुटी बांधताना शेवाळ व गांडूळ खत (1:1) या प्रमाणात वापर करण्याची शिफारस करण्यात येते. 
11. विदर्भ विभागात सीताफळ कलमे मृदुकाष्ट कलम पद्धतीने जानेवारी ते मार्च या काळात करण्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा खुंट वापरण्याची शिफारस करण्यात येते. 
12. विदर्भ विभागातच मोगरा फुलांच्या अधिक उत्पादनाकरिता आणि आर्थिक मिळकतीकरिता झाडांची डिसेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात मध्यम प्रमाणात (जमिनीपासून 30 सेंमी उंचीवर) करण्याची शिफारस करण्यात येते.
पीकसंरक्षण 
13. साठवणुकीतील मुगावरील भुंगा किडीच्या व्यवस्थापनासाठी पंदेकृवि विकसित हर्बल टॅब्लेट प्रत्येकी 0.5 ग्रॅम वजनाच्या 8 गोळ्या प्रति 10 किग्रॅ मुगामध्ये वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
कृषी अभियांत्रिकी 
14. बीटरूटपासून मऊ पोटाचे बीटरूट जॅम बनविण्याची पीडीकेव्ही प्रक्रिया पद्धती, ज्यामध्ये बीटरूट प्रेशर कुकरमध्ये शिजविल्यानंतर मिक्सरमधून तयार केलेल्या लगद्यामध्ये साखर, लिंबू, रस, पेक्टिन व प्रिझर्वेटिव्ह टाकून 30 ते 40 मिनिटे गरम करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
15. यूपीवीसी पाइपचा वापर करून विकसित केलेल्या पीडीकेव्ही हायड्रोपोनिक संरचनेची (आकारमान : 3 ु 2 ु 3 मी) हिरव्या चार्‍याच्या निर्मितीसाठी शिफारस करण्यात येत आहे.
16. एकात्मिक कीटक व्यवस्थापनामध्ये हानिकारक कीटकांना शेतामध्ये पकडण्यासाठी पीडीकेव्ही विकसित सौरप्रकाश कीटक सापळ्याची शिफारस करण्यात येत आहे.
17. निर्वात सौरसंग्रहाकांचा वापर करून उच्च औष्णिक क्षमता व जास्त शुद्ध जल उत्पादनासाठी 3 सेंमी पाण्याची पातळी कायम ठेवून पीडीकेव्ही विकसित द्विपात्र सौरजल निक्षारीकरण सयंत्राची शिफारस करण्यात येत आहे.
18. पीडीकेव्ही सौर फोटोव्होल्टाइक तथा हस्तचलित फवारणी यंत्राची फवारणीकरिता शिफारस करण्यात येत आहे.
19. मिरची पिकाची जास्तीत जास्त वाढ व उत्पादन मिळविण्यासाठी 80 टक्के बाष्पपर्णोत्सर्जन पुनःपूर्ती इतके पाणी ठिबक सिंचनाने देऊन त्याचबरोबर चंदेरी रंगाचे पॉलिइथिलीन आच्छादन वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
20. हिवाळ्यात (रब्बी) कारले पिकाची सर्वोकृष्ट वाढ व उत्पादन मिळविण्यासाठी 80 टक्के पीक बाष्पपर्णोत्सर्जन इतके पीक ठिबक सिंचनाने देऊन त्याबरोबर काळ्या रंगाचे पॉलिइथिलीन आच्छादन वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
21. नागपूर संत्र्याचे अधिक उत्पादन व दर्जेदार फळे मिळविण्याकरिता, तसेच अधिक आर्थिक मिळकतीकरिता पाण्यात विरघळणार्‍या खतांची मात्रा 1020:340:510 (ग्रॅम/झाड) नत्र : स्फुरद : पालाश ठिबक सिंचनाद्धारे सहा वेळा विभागून देण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
22. रोपवाटिकेमधील पॉलिबॅगमध्ये माती भरण्यासाठी पीडीकेव्ही मातीभरण यंत्राची शिफारस करण्यात येत आहे. 
सामाजिक शास्त्र 
23. विदर्भातील अमरावती महसूल विभागात निवड केलेल्या 81.80 टक्के शेतकर्‍यांना कीटकनाशक फवारणीकरिता द्रावण तयार करण्याचे ज्ञान नसल्याचे आढळले. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे व इतर संस्थांद्वारे याविषयी जनजागृती करण्यात यावी.
 
डॉ. पराग हळदणकर, डॉ. नितीन गोखले, 
डॉ. संजयकुमार तोरणे, डॉ अरुण माने 
आणि डॉ. मकरंद करमकर
|