डाळींब पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    04-Sep-2018
 
 
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व टिकाऊ किंवा शाश्‍वत बाजारपेठ निर्माण करावयाची असल्यास आपणास डाळिंब उत्पादनात अनेक गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल. या लेखामध्ये अशोक वाळूंज यांनी डाळिंबावरील प्रमुख नुकसानकारक किडींच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत अतिशय योग्यरीत्या मांडणी केली आहे.
 
भारतात डाळिंब फळपिकाखालील 1,93,000 हे क्षेत्र असन उत्पादन 19,18,000 मे. टन आहे. महाराष्ट्र राज्यात 1, 28,000 हे क्षेत्रावर डाळिंब लागवड झालेली असून महाराष्ट्रात मुख्यत्वे सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सांगली इ. व्यतिरिक्त धुळे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यातही डाळिंब लागवड होत आहे. महाराष्ट्रात डाळिंबाना दिवसेंदिवस परदेशी बाजारपेठ वाढत आहे. डाळिंब उत्पादनात अनेक गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल व त्यातील एक प्रमुख भाग म्हणजे डाळिंबावरील प्रमुख उपद्रवकारक नुकसानकारक किडींचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण होय. कारण निर्यातक्षम उत्पादनात किटकनाशकाचे अवशेष शिल्लक राहिल्यास फळे निर्यात करण्यात समस्या निर्माण होते. किटकनाशकांचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने किड नियंत्रण केल्यास निर्यातक्षम फळ उत्पादन करणे सुलभ होईल.
 
डाळिंबावरील प्रमुख किडी-ओळख
अ.रस शोषणार्‍या किडी
1)मावा (अ‍ॅपीस पुनीकी)
2)फुलकिडे (थ्रीप्स) : (स्कीरीटोथ्रीप्स रिडीफफोरोध्रीप्स करयुयेनटेटस)
3)पांढरी माशी (सिप्पोरिनस फिलीरा)
4)पिठ्या ढेकन (फेरीसा व्हरीगेटा)
5)कोळी (माईटस) : टेन्यपालस पुनिका)
 
ब) फळावरील किडी
1)फळ पोखरणारी अळी (सुरसा) : (ड्युडोरिक्स आयसोक्रेटस)
2)रसशोषणारा पतंग : (ऑथेरस पयुलोनीका)
 
क. खोड व फांद्यावरील किडी :
1)झाडांची साल खाणारी अळी : (कोनोगेनथस प्युनटीफेरालीस)
2)खोडकिडा (स्टेम बोरर)
3)खोडाला लहान छिद्रे पाडणरे भुंगेरे (शॉट होल बोरर) : झायलोबोरस परफोरस)
 
ड. जमनीलग / खालील कीडी
1)मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (रुट नॉट निमॅटोड) : (मॅलीडोगायनी इनकॉगनीय)
2)वाळवी- (टरमीस स्पे)
3)हुमनी - (होलोट्रेकीय स्पे) 
 
कीडीचे सर्वेक्षण : कीड व्यवस्थापन / नियंत्रणामध्ये फळबागेतील कीडीची तीव्रत/ स्थिती ओळख, नुकसनीच प्रकार, कीहीची सरासरी संख्या, मित्रकीटक इ. गोष्टींचे सर्वेक्षणावर आधारित उपाययोजना हा कीड व्यवस्थापनेचा आत्मा आहे. डाळिंबाच्या बागेतील कीड/ रोग सर्वेक्षण करताना संपूर्ण / बागेच्या क्षेत्रात नागमोडी आकारात प्रत्यक्ष चालून किमान 10 ठिकाणी झाडे/ एकरी निश्‍चित करून प्रत्येक झाडाच्या सभोवतालच्या गोलाकार फेरीतील सर्व झाडांचे शेंडे, पाने, फुले, फळे/ खोड व जमिनीमधील प्रत्यक्ष आढळणार्‍या कीडीच्या अळीचे निरिक्षण करताना चोहूबाजूने झाडाच्या शेंड्याकडील भाग व खालचा बुंध्याच्या भागातील सर्वसाधारण 5 सें.मी. ते 15 सेंमी फांदीवरील किडीच्या अवस्थेतील अंडी, अळी, खाल्लेली पाने, फुले फळांना नीट छिद्रे पाडलेली फळे संख्या याची संख्या मोजून सरासरी करून नुकसानीची तीव्रत व टक्केवारी संख्या इ. गोष्टी कीड व्यवस्थापनात नुकसान पातळीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानुसार वातावरणातील घटक स्थिती व कीड संख्या यांची तुलनात्मक बाबही व्यवस्थापन पद्धतीमध्ये निर्णायक ठरते.
 
अ.रस शोषणार्‍या किडीचा प्रादुर्भाव
1)मावा : 
ओळख : मावा कीड आकाराने लहान व प्रजातीनुसार या किडीचा रंग पिवळा, हिरवा, काळा असतो. 
नुकसान प्रकार : बहार धरल्यानंतर कोवळ्या शेंड्यावर तसेच फुलांवर, कोवळ्या फळांवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. नवीन पालवी फुले यावर रस शोषून उपजीविका करतात व तोंडातून चिकट द्रव्य सोडतात. प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर शेंडे चिकट होऊन त्यावर तसेच पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते व पानांचे प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रिया मंदावते पाने वेडीवाकडी होऊन चुरडामुरडा झाल्यासारखी दिसतात. त्यमुळे शेंड्याची वाढ थांबते.
 
पोषक हवामान : थंडीच्या हंगामात नोव्हेंबर-डिसेंब ते फेब्रुवारी या कालावधीत तापमानात कमी झाल्याने या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
पिवळ्या रंगाचे फुलकिडे आणि काळ्या रंगाचे फुलकिडे दिसून येतात. किडीचा आकार अतिशय लहान (1 मी.मी.) असून लांबट निमुळते शरीर असते. या किडीला खरड्या असेही म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव ओळखण्याकरिता झाडावरील कोवळी उमललेले फुल जर आपण तळहातावर झटकले तर फुलकिड्यांचे असंख्य किडे आपल्या हातावर पडतात आणि ते आपल्याला डोळ्याने सहजपणे दिसतात. 
 
नुकसान प्रकार : फुलकिड्यांची पिल्ले आणि प्रौढ किडे पानांवरील, कोवळ्या फांद्यावरील व फळांवरील पृष्ठभाग खरवडून त्यातून स्रवणार्‍या रसावर / पेशीद्रव्यावर उपजिवीका करतात. परिणामत: प्रादुर्भाव झालेली पाने वेडीवाकडी होतात. फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग खरवडल्यामुळे फळांचा आकर्षकपणा नाहीसा होऊन अशा फळांना बाजारपेठेत किंमत मिळत नाही. 
 
जीवनक्रम : फुलकिड्याची मादी 40-50 अंडी कोवळी, पानावर, फुलकळ्यावर अंडी घालते. अंड्यातून 6-8 दिवसांतून पिलू बाहेर येते. पिलावस्था 3-4 दिवसात, कोषावस्था 3-4 दिवस पूर्ण होऊन एक पीढी पूर्ण होण्यास 13-18 दिवसात पूर्ण होते. प्रौढ 10 ते 15 दिवस जगतो. एका वर्षात या कीडीच्या 25 पिढ्या पूर्ण होतात. 
 
पोषक हवामान : कीडीची तीव्रता फेब्रु ते जुलै या महिन्यात जास्त प्रमाणात आढळते. वातावरणातील उष्ण तापमान व आर्द्रता या कीडीस पोषक ठरते. 
 
3. पांढरी माशी :
ओळख : पांढर्‍या माशीचे वास्तव्य पानांच्या मागील बाजूस असून. पानांच्या मागील बाजूस समुदहाने या किडीचे पिल्ले आणि प्रौढ माशा राखाडी-पांढर्‍या रंगाच्या दिसून येतात. 
 
नुकसान प्रकार : या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील पेशीद्रव्ये शोषतात, तर प्रौढ माशी कोवळ्या पानातील पेशीद्रव्यावर उपजिविका करतात व पाने पिवळसर पडता. पानांवर उपजीविका करताना माशा तोंडातून चिकटद्रव्ये सोडतात व या चिकट पदार्थांवर बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडून गळतात.
 
जीवनक्रम : या किडीची मादी माशी अतिसूक्ष्म अंडी पानांवर घालतात आणि त्यापुढील जीवनक्रम झाडांच्या पानांवरच पूर्ण होतो. एक माशी कोषावस्था पूर्ण होऊन 6 ते 20 दिवसांत कोषावस्था पूर्ण होते. प्रौढ 7 ते 24 दिवस जगतो.
 
पोषक हवामान : कीडीस वातावरणातील तापमान वाढीबरोबर सापेक्ष आर्द्रता वाढीस पोषक ठरते. मृग बहारामध्ये कीडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. मात्र आंबे बहरात कीडीचा प्रादुर्भाव कमी असतो. 
 
4. पिठ्या ढेकूण :
ओळख : पिढ्या ढेकणाचा रंग पांढरा असून त्याचा आकार अंडाकृती असतो. पूर्ण वाढ झालेल्या कीडीच्या अंगावर कापसासारखे आवरण असते. पिल्लांचा रंग विटकरी असतो. ही किड मिलीबग किंवा पांढर्‍या ढेकण्या या नावानेही ओळखली जाते. मोठ्या फळांवर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट काळपट झाल्याने बाजारात विकण्यायोग्य राहत नाहीत. 
 
नुकसान प्रकार : अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पिल्ले क्रावलर्स कोवळ्या पानांवर व फळांवर रस शोषन उपजिविका करतात. कीडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास चिकट द्रव फळांवर दिसून काळी बुरशी वाढते.
 
जीवनक्रम : पिठ्या ढेकणाची पूर्ण वाढ झालेली मादी सुमारे 300 ते 400 अंडी झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत अंडी घालते. अंडी उबवल्यानंतर पिल्ले 20 दिवसात खोडावरून फांद्यावर सुमारे 6 आठवड्यांपर्यंत उपजीविका करतात. कीडीचा जीवनक्रम 40 दिवसांत पूर्ण होतो. नर 1 ते 3 दिवस व मादी 5 ते 6 आठवडे जगते.
 
पोषक हवामान : उष्ण आणि कोरड्या हवामानात आर्द्रता कमी झाल्यानंतर या किडीचा प्रादुर्भव नोव्हेंबर ते जानेवारी आणि एप्रिल ते जन कालावधीत जास्त प्रमाणात होतो.
 
5. कोळी (माईटस) :
ओळख : कोळी हे (माईटस) लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात लाल आणि पिवळ्या रंगाच्या दोन प्रजाती डाळिंबावर निदर्शनास येतात. ही किड पानांच्या खालील बाजूवर शिरेजवळ किंवा कडेला असंख्य अंडी घालते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या वेळी लाल रंगाची दिसतात. अंड्याचा रंग पांढरा शुभ्र असतो. प्रादुर्भावग्रस्त झाडांचे शेंडे तपकिरी निस्तेज दिसून येतात.
 
नुकसान प्रकार : या किडीची पिल्ले आणि प्रौढ किडे पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. परिणामी पानांच्या वरील बाजूचा रंग विटकरी रंगासारखा दिस लागतो. कालांतराने पूर्ण पाने विटकरी रंगाची होऊन वाळू लागता आणि नंतर गळून पडतात.
 
ब. फळांवरील किडी : 
1)फळे पोखरणारी अळी (सुरस) :
ओळख : डाळिंबावरील सर्वांत महत्त्वाची ही कीड महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आणि सतत कमी-अधिक प्रमाणात आढळून येते. विशेषत: पावसाळ्यात (मृग बहरात) ही कीड जास्त प्रमाणात असते.
 
नुकसान प्रकार : प्रथमत: अंड्यातून उबवणीनंतर अळी बाहेर येऊन फळांच्या कोवळ्या भागावर उपजिवीका करून या किडीच्या अळ्या फळे पोखरून आतील भाग खातात व त्याची विष्ठा फळांच्या पृष्ठभागावर आलेली दिसते. फळांमध्ये इतर बुरशी व जीवाणूंचा शिरकाव होऊन फळे कुजतात. या किडीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या वेळेस सुरू होतो.
 
जीवनक्रम : पतंग डाळिंबाच्या फुलावर फळावर अंडी घालतो. अंड्यातून 7 ते 10 दिवसात अळी बाहेर पडून फुलकळी, फळामध्ये आतील भागात पोखरून 18 ते 47 दिवसांची उपजिविका करून फळात कोषावस्थेत जाते. 8.34 दिवस या किडीचे वर्षात चार वेळा जीवनक्रम होतो.
 
पोषक हवामान : फळ पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव मृग बहारमध्ये जास्त दिसून येतो. त्याची सुरुवात एप्रिल-मे पासून होते. उष्ण तापमान, पाऊस व आर्द्रता कीडीस पोषक ठरते. 
 
2)रस शोषणारा पतंग :
ओळख : पतंग दिसायला आकर्षक असून ते फळांना आपल्या सोंडेनं सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसन आतील रस शोषून त्यावर उपजिवीका करताना छिद्र पाडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरुवात होते. अशी प्रादुर्भावाची फळे गळून पडतात. 
 
जीवनक्रम : या किडीचा जीवनक्रम अंडी कोषावस्था ते कोषागुळवेल व वासनवेल या जंगली वनस्पतीवर ओढ्याच्या , नाल्याच्या काठी होत असतो. पंतग आणि वनस्पतीवर 200-300 अंडी घालते व अंड्यातन 3 ते 4 दिवसात बाहेर आल्यावर पाने कुरतडून 13 ते 20 दिवसात वाढ पूर्ण होते.
 
पोषक हवामान : या पतंगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. कारण पावसाळी हवामान या किडीचे पंतग बाहेर पडतात. पतंग रात्रीच्या वेळी फळांवर हल्ला करतात. म्हणून त्यांचे नियंत्रण करणे तितकेच कठीण असते. सर्वसाधारणपणे रात्री 8 ते 11च्या दरम्यान या पतंगाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते.
 
क. खोड व फांद्यावरील किडी :
1)झाडांची साल खाणारी अळी (इंडरबेला) :
ओळख : कीडीचा पतंग फिकट तपकिरी रंगाचा असून त्यावर करड्या रंगाचे पट्टे असतात. अळी फीकट तपकीरी रंगाची असते. विशेष करून जुन्या तसेच दुर्लक्षित बागेत या किडींचे प्रमाण जास्त असते. साल खाणारी अळी ही खोड फांद्याच्या बेचक्यात छिद्र पाडून त्यात सालीवर उपजिविका करून राहते. अळीची विष्ठा तसेच चघळलेला लाकडाचा भुस्सा जाळीच्या स्वरुपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसतो. अळी काळपट रंगाची असन पूर्ण वाढलेली अळी 4 सें. मी. लांब असते. खोड किड्याची अळी मात्र पांढरी, जाड व तिचा डोक्याकडील भाग रुंद असतो.
 
जीवनक्रम : मादी पतंग खोडाच्या / फांदीच्या साली खाली अंडी घालतो. 8 ते 10 दिवसात अंडी उबवून अळी बाहेर येते. अळी 10 ते 11 महिने उपजिविका करते. कोषावस्था 15 ते 25 दिवस पूर्ण होते.
 
नुकसान प्रकार : ती खोड व फांद्याचा आतील भाग पोखरून खाते. या किडीची तीव्रता जास्त असल्यास प्रथम फांद्या वाढतात व नंतर संपूर्ण झाड वाळते. खोडकीडीमुळे संपूर्ण झाडसुद्धा मरते.
 
2)खोडकिडा (स्टेम बोरर) : 
ओळख : खोडकीडीचा भुंगेरा हा पिवळसर तपकिरी रंगाचा असन डाळिंबाच्या खोडांवर जमिनीलगत त्याचा प्रादुर्भाव छोटी छिद्रे पाहून उपजीविका करून त्यातून भुसा बाहेर आल्याचे डोळ्याने स्पष्ट दिसते. 
 
जीवनक्रम : खोडकीडीचा भुंगेरा हा पिवळसर तपकिरी रंगाचा असून डाळिंबाच्या खोडांवर जमिनीलगत त्याला प्रादुर्भाव छोटेसे छिद्र पाडन उपजीविका करून त्यातून भुसा बाहेर आल्याचे डोळ्याने स्पष्ट दिसते. 
 
जीवनक्रम : खोडकीडीचा भुंगेरा मादी सुमारे 20-40 अंडी झाडाच्या सालीच्या आत बेचक्यात घालते. अंडी उबवल्यानंतर अळी खोडाच्या सालीच्या पेशीवर उपजीविका करून खोडालगत मुळं व खोडास छिद्र पाडून आत शिरकाव करून 9-10 महिने खोडामध्ये उपजीविका करते. अळी खोडामध्ये 16-18 दिवस कोषावस्थेत राहून पूर्ण वाढ झालेला भुंगेरा 45-60 दिवस जिवंत राहतो. या कीडीचा जीवनक्रम कालावधीत एक वर्षात पूर्ण होतो. 
 
नुकसान प्रकार : भुंगेराची अळी खोडाच्या आतील भाग पोखरून खाऊन त्यातून भुसा बाहेर टाकते. परिणामी झाड पिवळे पडून वाळते.
 
3)खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेर :
ओळख : या किडीचे भुंगेरे तांबूस काळपट रंगाचे असून आकाराने अत्यंत लहान म्हणजे 2 ते 3 मि. मि. लांबीचे असतात. अळीचा रंग भुरकट पांढरा असतो. प्रादुर्भाव झालेल्या जागी टाचणी, सुई आत जाईल एवढे छिद्र दिसते, त्यातून भुसा बाहेर आलेला दिसतो.
 
जीवनक्रम : किडीच्या अंडी, अळी, कोष व भुंगेरा या अवस्था खोडातच आढळून येतात. भुंगेरासाठी मादी खोडाजवळ बेचक्यात अंडी घालते. 8-10 दिवसांत अळ्या बाहेर पडून मॅक्रोस्पोरियम अ‍ॅम्ब्रोसीयम बुरशी गोळा करून त्यावर उपजीविका करते. अळी अवस्था 21-26 व कोषावस्था 10-12 दिवसांत व प्रौढावस्था एक पिढी पर्ण होण्यास 48 दिवस लागतात. 
 
नुकसान प्रकार : भुंगेर्‍याची अळी खोडाला सूक्ष्म छिद्रे पाडून आतील भाग पोखरतात. पोखरलेले झाड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर वरील लहान फांद्यांवरसुद्धा दिसून येतो. प्रादुर्भाव झालेल्या जागी लहान छिद्रामधून भुस्सा बाहेर आलेला असतो. ही किड जमिनीलगतच्या मुळांवर, खोडांव तसेच फांद्यांवर दिसून येते. परिणामी झाड पिवळसर पडून वाळते.
 
इ.मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी :
ओळख : सूत्रकृमी अतिसूक्ष्म असून पूर्ण वाढ झालेली मादी चंबूच्या आकाराची असते. नर आकाराने दोर्‍यासारखे लांबट असून ते 1.10 ते 1. 95 मि.मी. इतका लांब असतो. नराचे प्रमाण माद्यापेक्षा फारच कमी असते व पिकांना उपद्रव करत नाही.
 
जीवनक्रम : मादी मुळाबाहेर चिकट वेष्टनात पुंजक्याने साधारणपणे 250 अंडी घालते. सूत्रकृमीची लांबी 0.52 ते 0.72 मी. मी. इतकी असते. अंडी घातल्यापासन 2-3 दिवसात उबवन 22 ते 25 दिवसात चार वेळा कात टाकून मुळावर उपजीविका करून सुमारे 30 दिवसात जीवनक्रम पूर्ण करते.
 
नुकसान प्रकार : ती डाळिंबाच्या लहान मुळांच्या अंतरभागात राहून मुळांतील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे गाठी निर्माण होतात. शिवाय सूत्रकृमीने इजा केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होतेच. परिणामी झाडे वाळतात.
 
पोषक स्थिती : सूत्रकृमींची वाढ जमिनीतील सततच्या ओलवल्याबरोबर नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत जमिनीचे व वातावरणातील कमी तापमान सूत्रकृमींच्या वाढीस पोषक ठरते.
 
डाळिंब बहार धरणेपूर्वी घ्यावयाची काळजी
1)बागेत स्वच्छता ठेवणे. तणांचा बंदोबस्त करावा.
2)झाडांच्या छाटणीचे नियोजन अशा पद्धतीने करावे की जेणेकरून झाडांवर फांद्यांची गर्दी होणार नाही. तसेच फवारणी करतेवेळी किटकनाशक किंवा बुरशीनाशकांचे द्रावण झाडाच्या संपूर्ण भागात पोहोचण्यास मदत होईल.
3)किटकांचा प्रादुर्भाव अगदीच नगण्य असेल तर लगेच किटकनाशक फवारणीचा अवलंब न करता कीडग्रस्त भाग काढून टाकून जाळून नाश करावा. 
4)परोपजीवी किटक बागेत सोडले तर किटकनाशकांची फवारणी करू नये.
5)किटकनाशकाची फवारणी शक्यतो किडीच्या सर्वेक्षणानुसार गरजेनुसार आवश्यकता असेल तेव्हाच करावा. 
डाळिंब किड व्यवस्थापन संभाव्य आराखडा
डाळिंब बहार धरण्यापूर्वी व बहार नंतरची उपाययोजना
 
कालावधी : 
1)विश्रांती कालावधी ते छाटणी 
2)नवीन शेंडे / पालवी फुले-15 ते 30 दिवस फुले येण्याची अवस्था 20-45 फुले-फळे तयार अवस्था 45-60
3)60 ते 90 दिवस
4)फुले-फळे तयार अवस्था 100 ते 140
5)150 ते 280
6)फळे तयार होण्याची 150-180 अवस्था
संभाव्य कीडी : 
1). खोड / साल पो. कीड, खोड भुंगा सूत्रकृमी(मुळावर गाठी करणार्‍या मावा) 
2).रस शोषणार्‍या किडी किडी/मावा/फुलकिडे, पांढरी माशी/पिठ्या ढेकूण फुलकीडे 
3) फुलकीडे/ फळे पोखरणारी अळी
4) पांढर्‍या माशा 
5) फुलकीडे/ फळे पोखरणारी अळी/ सूत्रकृमी
6) फळे पोखरणारी अळी 
7) फळे पोखरणारी अळी, साल पोखरणारी अळी, खोड भुंगा, वाळवी
8) रस शोषणार्‍या किडी
9) पांढरी माशी
10) फळातील रस शोषणारे पतंग, पिढ्या ढेकूण
 
प्रतिबंधक उपाययोजना : 
1) डाळींबाची छाटणी केलेल्या संपूर्ण झाडावर स्पर्शजन्य किडनाशकाची फवारणी करावी. क्लोरोपायरीफॉस ग्रॅम 20 मिली 10 लिटर पाण्यात खोडावर फवारणी करावी. 
झाडाच्या खोडांना मुलामा (4 कि. गेरू+50 ग्रॅम सी. ओ. सी.+क्लोरोपायरीफॉस 50 मिल+ स्टीकर 5 मिली/ 10 लि. पाण्यात द्यावा. 
छाटणीपूर्वी किंवा नंतर शेणखताबरोबर 20 ग्रॅम ट्रायकोडर्माप्लस +3 किलो चांगल्या प्रतीची निंबोळी पेंड/ झाडाभोवती दोन रिंगमध्ये मातीत मिसळून द्यावी.
झेंडूची लागवड दोन झाडांमध्ये/ बागेच्या बाजूने करावी.
दाणेदार फोरेट 10 जी 25 ग्रॅम/ झाडांस किंवा फ्युराडान 60 ग्रॅम ड्रीपरच्या दोन्ही ठिकाणी रिंग पद्धतीने देणे.
2) मेटॉरायझीयम अ‍ॅनोस्पेपॉली 60 ग्रॅम दूध/10 पाण्यात फवारणी करावी.
किंवा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमेथोएट 15 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड17.8-मिली/10ली पाण्यात फवारावे. रिपनोसॅड 45 टक्के एस. सी. 2.5 ग्रॅम / 10 ली प्रादुर्भाव दिसल्यास पाण्यात फवारावे.
3)प्रादुर्भाव दिसल्यास आठवड्यानंतर 5% निंबोळी अर्क किंवा अ‍ॅझडिराक्टीन 20 मिली किंवा निमतेल व करंजतेल 30 मिली. 10 ली. पाण्यास फवारावे. 
4)सायट्रानीपायरोल- 10 ओडी 3 मिली. 10 लिटर पाण्यात फुलावर फळांवर अंडी किंवा लहान फळांना छिद्रे दिसल्यास फवारणी करावी.
5)अ‍ॅझाहिरक्टीन 20 मिली. 10 लिटर पाण्यात फुलावर फळांवर अंडी किंवा लहान फळांना छिद्रे दिसल्यास फवारणी करावी. किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
6)मुलामा दिलेल्या झाडावर लहान छिद्रे वा भुसा पडत असल्यास निरीक्षणांती तारेने काढून त्यात इंजेक्शनच्या सहाय्याने 5 मिली सायपरमॅथ्रीन किंवा 10 मि.ली. छिद्रात सोडून मेणाने छिद्र बंद करावे.
7)पांढर्‍या माशीच्या नियंत्रणाकरीता बिव्हेरीया/ व्हर्टिसिलीयझम 20 मिली 10 लि. पाण्यात फवारावे
8) 
1) शेतीच्या बांधावरील गुळवेल वनस्पती नष्ट करावेत.
2)बागेत ठिकठिकाणी लाईट/प्लॅश ट्यूब लावावेत. 
3) झाडाच्या खोडास दुसर्‍यांदा (गेरू+4 किलो सीओसी 50 ग्रॅम+लॅम्बडायसायहेलोथ्रीन) चा मुलामा द्यावा.
9) व्हर्टीसिलीएम लॅकेनी-60 ग्रॅम+50 मिली दूध/10 लि. पाण्यात फवारणी करावी व आठवड्यानंतर अझाडिरॅक्टीन 20 मि.ली. 10 पाण्यात या प्रमाणात फवारणी करावी. 
फवारणी करताना घ्यावयाची काळजी :
1)प्रत्येक बुरशीनाशकाची तसेच किटकनाशकाची शिफारशीत मात्रेतच फवारणी करावी. कमी किंवा जास्त तीव्रतेच्या फवारण्यामुळे रोग व किडींचा नाश न होता त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता वाढून त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
2)सर्व फवारण्या गरजेनुसार योग्य मात्रेत कराव्यात. अवाजवी फवारण्या रोग वाढीस सहाय्यक ठरतात. 
3)फवारणी करण्याआधी फवारणीस वापरण्यात येणार्‍या पाण्याचा सामु 6.5 ते 7.0 मध्ये आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सिट्रिक अ‍ॅसिडचा वापर करावा.
4)फवारण्याची संख्या व तीव्रता मर्यादित असावी, अन्यथा झाडांमध्ये अंतर्गत विकृती निर्माण होतात.
5)बोर्डो मिश्रण गरजेइतके द्रावणाचा सामू अचूक बनवून ताबडतोब फवारावे.
6)किडीमध्ये विषप्रतिकारक क्षमता निर्माण न होण्याकरिता विविध किडनाशकांचा आलटून पालटून वापर करावा. 
7)फळामधील किडनाशकांचे अंश निर्धारीत प्रमाणापेक्षा कमी राखण्यासाठी फळ तोडणीपूर्वीचा कालावधी लक्षात ठेवावा व रासायनिक कीड नाशकाचा वापर एक महिन्यापूर्व बंद करावा.
 
अ) किडनाशकांचे कमाल अवशेषमर्यादा (एमआरएल) व काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी
अ. क्र. किटक एमआरएल प्रतिक्षा कालावधी दिवस (पीएच1)
1 क्लोरोपायरीफॉस 0.02 40
2 फॉरेट 10 जी 0.05 -
3 कार्बापयुरॉन इजी 0.02 -
4 डायमेथोएट 0.02 100
5 इमिडाक्लोप्रीड 2.00 90
6 स्पिनोसॅड 45 एस.सी 0.02 28
7 सायट्रीनीलप्रोल 10.2 0.02 90
8 अ‍ॅझाडिराक्टीन 0.02 3
9 अ‍ॅसीटयमिप्रीड 0.01 90
10 थायक्लोप्रीड 0.02 90
11 पल्यबेड्यामाईड 0.01 -
12 प्रॉपरगाईड 0.01 15
13 थायमेयॉक्झम 0.05 40
14 लम्ब्डासायहॅलोथ्रीन 0.02 80
15 सायपरमेथ्रीन 0.05 40
 
बुरशीनाशके कमाल अवशेषमर्यादा (एमआरएल) व काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी
अक्र. एमआरएल मि.ग्रॅ/ किलो प्रतिक्षा कालावधी 
1 कॅप्टन 0.02 35
2 कॅप्टॉफॉल 0.02 -
3 क्लोरोयॅलॉनील 0.01 90
4 कार्बनडेन्झीम 0.10 100
5 प्रोपीनेब 2.05 90
6 मॅक्रोझेब 0.05 -
7 मेटीराम 0.05 -
8 थायफेनोएट मेथील 0.01 50
9 प्रोपीकोनाझॉल 0.05 20
10 कॉपरऑक्सीक्लोराईड 2.0 60
11 हायड्रोकसाईड 2.0 -
12 ट्रायडेमार्फ 0.02 40
13 बोर्डोमिश्रण 20.0 60
 
क. युरोपीय युनियनने निर्यातीसाठी बंदी घातलेली कीटकनाशके
हेक्झीकनिझेल डायक्लोरोव्हॉस फ्युझॉलोन
कार्बोरील मॅलाथिऑन कारटापहयड्रोक्लोराईड
इन्डोसल्फान डायकोफॉल डायफुनथ्थूरॉन
 
टीप : डाळिंबावरील कीडनाशकाचे उर्वरित अंश काढणीपूर्व कमाल मर्यादा कालावधी हे प्रायोगिक चाचण्यावर उपलब्ध असल्याने इतर फळपिकावर उपबल्ध असलेल्या कीडनाशकाचा कमाल प्रतिक्षा कालावधी हा डाळिंबावर वापरण्यात येणार्‍या कीडनाशकाचा विचार करून व युरोपीय युनियन यांनी निर्धारीत केलेल्या कमाल मर्यादा ग्राह्य धरून या एका तात्पुरत्या स्वरूपात दिशादर्शक म्हणून सोबत दिलेल्या आहेत. शिफारशीत केलेले कीडनाशके हे कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंदान संस्था यांच्या प्रायोगिक शिफारशीवर आधारीत असल्याने न्यायप्रविष्य बाबीस अनुकूल नाही. 
 
 
डॉ. अशोक वाळुंज, डॉ. विनायक जोशी व डॉ. मोहन शेटे
अ.भा. स. कोरडवाडू फळे संशोधन प्रकल्प, म. फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.