भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    24-Sep-2018
 
खरिपातील महत्वाचे भात पिकावर येणार्‍या करपा या रोगाची ओळख त्याचे वर्गीकरण त्यामुळे होणाये नुकसान व त्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती घेऊ या.
 
महाराष्ट्रात भातावर प्रामुख्याने तीन प्रकारचे करपा रोग येतात. ते म्हणजे करपा (ब्लास्ट), पर्ण करपा आणि कडा करपा हे होत. यापैकी करपा (ब्लास्ट) आणि पर्ण करपा हे रोग बुरशीजन्र तर कडा करपा हा रोग अणुजीवामुळे होतो. याव्यतिरिक्त तपकिरी ठिपके, पर्णकोष कुजव्या, दाणे रंगहिनता, पर्णकोष करपा, आभासमर काजळी आणि उदबत्ता हे रोग कमी अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे या रोगांची लक्षणे तसेच नियंत्रण, उपाययोजना भिन्न आहेत. कोणत्याही रोगाचे चांगले नियंत्रण करण्यासाठी प्रथमत: तो ओळखता आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या भागात दरवर्षी कोणता रोग हमखास व मोठ्या प्रमाणात येतो याविषरीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार हंगामापूर्वी योग्य ते निरोजन (उदा. योग्य जातीची निवड, बिजप्रक्रिया, इ.) करता येते.
 
करपा :
रोगकारक बुरशी : पाररीकुलारीया ओरारझी
रोगाची लक्षणे : रोगाचा प्रादुर्भाव अगदी रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेच्या काळात कोणत्याही अवस्थेत पान, खोड, पेये व लोंबीच्या मानेवर होतो. पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते होत जाणाये असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्य राखाडी रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आकार आणि रंग यावरून हा रोग ताबडतोब ओळखता येतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने मोठ्या प्रमाणावर करपतात. पानाप्रमाणेच पेये आणि लोंबीच्या दांड्यावर सुद्धा रोग येतो, त्यामुळे रोगट ठिकाणी पेये आणि मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत.
 
नुकसान : या रोगामुळे भात पिकास सर्वात जास्त (50 ते 80 %) नुकसान होते. खोडाचे पेये व लोंबीच्या मानेवर रोग आल्यास मोठया प्रमाणात नुकसान होते.
 
रोगाची लागण व प्रसार :
या रोगाचे प्रमाण पेरभात / घाट माथ्यावरील भातामध्ये म्हणजेच ज्रा ठिकाणी शेतात पाणी साठवून ठेवले जात नाही तेथे जास्त असते. त्याचप्रमाणे खाचयामधील पाणी अतिशर कमी झाल्यास सुद्धा रोगाचे प्रमाण वाढते. सदर रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा रोगट बियाणाद्वाये व शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. रोगाचा प्रादुर्भाव आणि पुढील वाढीसाठी खालील बाबी अनुकूल आहेत.
1)पेरभात / घाटमाथ्यावरील लागवड किंवा भात खाचयात पाणी नसणे किंवा अतिशय कमी असणे.
2)जास्त काळ पानावर साठणाये दव
3)जास्त सापेक्ष आद्रता (90 ते 92 %)
4)अधून मधून हलका पाऊस
5)जास्त प्रमाणात नत्र खतांचा वापर
6)ढगाळ हमामान (कमी सूर्यप्रकाश)
7)दाट लागवड
 
पर्ण करपा किंवा पान टकल्या :
रोगकारक बुरशी : रिंकोस्पोरीरम ओरारझी
रोगाची लक्षणे : लागवड झाल्यानंतर साधारणत: 30 ते 40 दिवसांनी रोगाची लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव जवळ जवळ संपूर्ण याज्रामध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिकट ठिपके येतात. हळूहळू ठिपके रुंद होत जाऊन तपकिरी होतात. पर्णकरपा रोगामुळे मुख्यत: पानाचे शेंडे करपतात. परंतु कधी कधी मधील भाग सुद्धा करपलेला दिसतो. थोड्याच दिवसात करपलेला भात राखाडी रंगाचा दिसतो आणि या भागात सनमारकावरील नक्षीप्रमाणे एकमेकांना समांतर अशी फिकट तपकिरी वलये दिसतात. 
 
नुकसान : या रोगामुळे करपा (ब्लास्ट) या रोगाप्रमाणे नुकसान होत नसले तरी त्याचे प्रमाण अलीकडे जास्त वाढत चाललेले आहे आणि रोगाच्या तीव्यतेनुसार 10 ते 70 टक्क्रांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे भविष्या तील हानी टाळण्यासाठी त्याचे वेळीच नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे. 
 
रोगाची लागण व प्रसार : रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे तसेच शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. रोग वाढण्याची कारणे करपा रोगाप्रमाणेच आहेत.
 
कडा करपा :
रोगकारक जिवाणु : झान्थोमोनस ओरारझी पी.व्ही. ओरारझी
रोगाची लक्षणे : प्रादुर्भाव साधारणत: फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो. जास्त पावसाच्या प्रदेशात, उदा. कोकणामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. या रोगामुळे भात पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. करपलेल्या भागाचा रंग फिकट तपकिरी असतो आणि हिरवट भागाला लागून असलेल्या कडा सरळ नसून वेड्यावाकड्या असतात. रोगग्रस्त पान दोन बोटात धरुन ओढले असता त्याचा स्पर्श खडबडीत लागतो. वरील दोन्ही बुरशीजन्र रोगांचा स्पर्श असा खडबडीत लागत नाही. 
 
नुकसान : भात पिकविनारा विभाग, रोगास बळी पडनारी जात व पीक वाढीची अवस्था, अनुकुल हवामान आणि रोगाच्या तीव्यतेनुसार साधारणत: जास्तीत जास्त 70 टक्क्रांपर्यंत नुकसान होऊ शकते. 
 
रोगाची लागण व प्रसार : या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे व शेतामधील प्रसार पाणी आणि पावसाच्या थेंबामार्फत होतो. रोगाच्या वाढीसाठी साधारणत: मध्यम उष्ण हवामान (25 ते 340सें तापमान) आणि जास्त आर्द्रतेची (70 % पेक्षा जास्त) आवश्यकता असते.
 
पर्णकोष कुजव्या : 
रोगकारक बुरशी : सॅरोक्लॅडिरन ओरारझी
रोगाची लक्षणे : हा रोग लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना पानाच्या पोंग्या च्या वरील भागावर दिसून येतो. रोगट भाग तपकिरी रंगाचा होऊन कुजल्या सारखा दिसतो. तपकिरी रंगाच्या मधील भाग राखाडी रंगाचा असतो. या रोगामुळे लोंब्या पूर्ण बाहेर न पडता पोंग्या मध्ये अडकतात. रोगट लोंबीच्या दाण्यांचा रंग फिकट ते गर्द तपकिरी होतो. लोंबीमध्ये दाणे भरत नाहीत व रोगट लोंब्या कुजतात.
 
नुकसान : पीक वाढीची अवस्था व रोगाच्या तीव्यतेनुसार साधारणत: 20 ते 40 टक्क्रांपर्यंत नुकसान होऊ शकते. 
रोगाची लागण व प्रसार : रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे तसेच शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. साधारणत: मध्यम उष्ण हवामान (25 ते 300सें तापमान) आणि जास्त आर्द्रता असल्यास हा रोग बळावतो. परंतु कमी आर्द्रतेमध्ये सुध्दा हा रोग वाढू शकता़े.
 
तपकिरी ठिपके :
रोगकारक बुरशी : बारपोलॅरिस ओरारझी
रोगाची लक्षणे : रोगामुळे पानावर अंडाकृती तपकिरी रंगाचे ठिपके येतात. हळूहळू ठिपक्राचा मध्य फिकट पांढरट रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाच्या होऊन त्याभोवती फिकट पिवळसर रंगाचे वलर दिसून येते. दाण्याच्या टरफलावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि ते पूर्ण गडद तपकिरी रंगाचे होतात.
 
नुकसान : तपकिरी ठिपके रोगामुळे साधारणत: 10 ते 40 टक्क्रांपर्यंत नुकसान होऊ शकते. 
रोगाची लागण व प्रसार : हलक्रा जमिनीत तसेच जास्त आर्द्रता असल्यास हा रोग बळावतो. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे तसेच शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो.
 
दाणे रंगहिनता :
रोगकारक बुरशी : बारपोलॅरिस ओरारझी, सॅरोक्लॅडिरन ओरारझी, पाररीकुलारीरा ओरारझी, इ.
 
रोगाची लक्षणे : लोंब्या बाहेर पडल्यानंतर दाण्याच्या टरफलावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगट लोंबीच्या दाण्यांचा रंग फिकट ते गर्द तपकिरी होतो. दाणे भरत नाहीत व रोगट लोंब्या पोचट राहून कुजतात आणि राखाडी किं वा पूर्ण गडद तपकिरी रंगाच्या होतात. 
नुकसान : दाणे रंगहिनतारा रोगामुळे साधारणत: 10 ते 30 टक्क्रांपर्यंत नुकसान होऊ शकते. 
रोगाची लागण व प्रसार : समशितोष्ण हवामान आणि जास्त आर्द्रता असल्यास हा रोग बळावतो. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे तसेच शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो.
 
पर्णकोष करपा :
रोगकारक बुरशी : रारझोक्टोनिरा सोलॅनी
रोगाची लक्षणे : रोगाचा प्रादुर्भाव लागवड झाल्यानंतर साधारणत: 25 ते 30 दिवसांपासून पान, खोड व पानाच्या पोंग्या वर दिसून येतो. पानावर तसेच पोंग्या वर लंबगोलाकार ते आकारहिन, मध्यभाग राखाडी रंगाचा व कडा तपकिरी रंगाच्या असणाये ठिपके / चटटे पडतात. ठिपक्यांचा आकार आणि रंग यावरून हा रोग ओळखता येतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अनेक चटटे एकत्र मिसळून पाने व पोंगे मोठ्या प्रमाणावर करपतात. 
 
नुकसान : पीक वाढीची अवस्था व रोगाच्या तीव्यतेनुसार साधारणत: 10 ते 15 टक्क्रांपर्यंत नुकसान होऊ शकते. 
रोगाची लागण व प्रसार : रोगाचा प्रथम प्रादुर्भाव तसेच दुय्यम प्रसार शेतातील रोगकारक बुरशीमुळे होतो. साधारणत: उष्ण हवामान (28 ते 320सें तापमान) आणि जास्त आर्द्रता असल्यास हा रोग बळावतो. कोकणामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात येतो.
 
आभासमय काजळी किंवाकाणी :
रोगकारक बुरशी : रुस्टिलॅजिनॉरडी व्हियेन्स 
रोगाची लक्षणे : सदर रोगामुळे लोंबीत दाणे भरण्याऐवजी पिवळ्या किंवा शेंदरी रंगाच्या गाठी तयार होतात आणि नंतर गाठींचा रंग शेवाळी ते काळपट होतो. गाठींचा स्पर्श मऊ मखमली सारखा जाणवतो. या गाठीमधून काळसर रंगाची भुकटी बाहेर येते. 
 
रोगाची लागण व प्रसार : भात वाढीसाठी जे पोषक वातावरण लागते त्याच वातावरणामध्ये हा रोग बळावतो. शेतातील किंवा बांधावरील सहजीवी वनस्पती वरील रोगकारक बीजांणूमळे रोगाचा प्रथम प्रादुर्भाव होतो. 
 
उदबत्ता :
रोगकारक बुरशी : इफिलीस ओरारझी
रोगाची लक्षणे : नेहमीसारखी लोंबी बाहेर न पडता राखाडी पांढरट रंगाची सुरसुरी सारखी दाणे विरहित लोंबी बाहेर पडते. थोड्याच दिवसात रोगट लोंब्या काळ्या पडतात आणि उदबत्ती सारख्या दिसतात. 
 
रोगाची लागण व प्रसार : पावसाळी थंड हवामान रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढीस कारणीभूत असून त्याची प्रथम लागण बियाण्यामार्फत होते.
 
एकात्मिक रोग व्यवस्थापन :
भात पिकाचे शेतात रोगांपासून होणाये नुकसान टाळण्यासाठी खालील उपाररोजना कराव्यात.
1.शेत व शेताचे बांध स्वच्छ व तण विरहीत ठेवावेत.
2.रोग प्रतिकारक जातींचा वापर करावा
 
करपा या रोगांस प्रतिकारक जाती : फुले समृद्धी, इंद्रारणी, भोगावती, फुले मावळ, बासमती 370, फुले राधा, कर्जत संकरित भात -1, सह्याद्री 2, सह्याद्री 3, सह्याद्री 4, इ.
3.निरोगी शेतातील रोगमुक्त किंवा प्रमाणित बियाणांचा वापर करावा.
4.बीजप्रक्रिया : बियाणास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. द्रावणावर तरंगणाये हलके आणि रोगट बी काढून टाकावे आणि तळात बसलेले बी काढून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची खालीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
अ) करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके आणि उदबत्ता या रोगांच्या निरंत्रणासाठी कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणास 3 ग्रॅम या प्रमाणे चोळावे. त्यानंतर सुडोमोनस फ्ल्रुरोसन्स या जैव रोगनाशकाची प्रति किलो बियाणास 5 ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
ब) कडा करपा या रोगाच्या निरंत्रणासाठी अ‍ॅग्रीमारसीन 2.5 ग्रॅम किंवा स्ट्रिप्टोसारक्लिन 3.0 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या द्रावणात बी आठ तास भिजवावे.
5.भात पिकाची दाट लाट लागवड करू नये.
6.रासायनिक खतांचा वापर शिफारसीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. तसे केल्यास रोगांचे तसेच किडींचे प्रमाण खूपच वाढते.
7.खाच्यात पाणी साचू न देता ते वहाते ठेवावे.
8.काणी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून त्रांचा नाश करावा.
9.चार सुत्री भात लावणी या एकात्मिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा.
भात पिकाच्या अवशेषांचा वापर : भात तुस अगर पळींजाच्या राखेचा वापर
गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा मर्रादीत वापर 
सुधारीत किंवा संकरित भाताच्या रोपांची निरंत्रित लावणी 
युरिया ब्रिकेटचा कार्यक्षम वापर 
 
10.फवारणी :
अ)करपा, पर्णकोष कुजव्या, तपकिरी ठिपके, पर्णकरपा, दाणे रंगहिनता, आभासमय काजळी आणि पर्णकोष करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 50 डब्लु.पी किंवा प्रोपीकोनाझोल 25 ई.सी. 10 ग्रॅम/मि.ली किंवा हेक्झाकोनाझोल 5 ई.सी. 20 मि.ली. किंवा मॅन्कोझेब 75 डब्लु.पी. 25 ग्रॅम+ स्टिकर (चिकट द्राव) 10 मि.ली. प्रति 10 लि. पाणी या प्रमाणात फवारावे. रोग दिसताच पहिली फवारणी आणि आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या दर 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 
ब) या व्यतिरिक्त करपा (ब्लास्ट) रोगाच्या उत्कृष्ट निरंत्रणासाठी ट्रारसारक्लोझोल 75 डब्लु.पी 10 मि.ली किंवा कासुगामारसीन 3% एस. एल. 15 मि.ली. किंवा एडिफेनफॉस 50 ई.सी. 6 मि.ली. किंवा आयसोप्रोथिओलेन 40 ई.सी. 7.5 मि.ली. प्रति 10 लि. पाणी यांची फवारणी करावी.
क) कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड 50 डब्लु.पी 25 ग्रॅम + स्ट्रिप्टोसारक्लीन 1.5 ग्रॅम + स्टिकर 10 मि.ली. प्रति 10 लि. पाणी या प्रमाणात रोग दिसताच फवारावे. आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या 10 ते 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
11.भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून धसकटे गोळा करुन त्रांचा नाश करावा, यामुळे सुप्तावस्थेतील रोगांच्या अवशेषांचा नाश होईल.
12.भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्थी करावी व जमीन समपातळीत आणावी. 
13.परिसरातील सर्व शेतकर्‍रांनी रोग नियंत्रक योजनांचा एकत्रितरीत्या अवलंब करावा.
 
डॉ. अनिल प. गायकवाड आणि डॉ. युवराज सो. बालगुडे
कृषि संशोधन केंद्र, लोणावळा