पीक संरक्षण आणि संजीवन शेती विचार

डिजिटल बळीराजा    22-Sep-2018
 
संजीवन शेती ही प्रचलित शेतीपद्धतीपेक्षा वेगळा विचार करत आली आहे, नेहमी सकारात्मक विचार करत आली आहे. ही आगळीवेगळी विचारपद्धती काय आहे हे समजून घेतल्यास शेतकर्‍यांचा नक्की फायदा आहे हे लक्षात येईल.
 
आपण आपले डोळे उघडे ठेवून निसर्गाकडे बघायला शिकलो तर अगदी साध्या, सोप्या गोष्टींमधून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. अगदी साधे उदाहरण घेऊ. पूर्वी डी.डी.टी.ने मुंग्या मरत, पण नंतरच्या काळात त्या मरेनाशा झाल्या. मग डी.डी.टी.ला पुरून उरणारी प्रजाती कशी निर्माण झाली? हा बदल कोणी घडवून आणला? कारण निसर्गाने प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार दिला आहे. वनस्पतींमध्येही ही स्वसंरक्षणाची प्रक्रिया निसर्गाने दिली आहे. मग या झाडातील नैसर्गिक स्वसंरक्षणाची प्रक्रिया वापरून का घ्यायची नाही, असा विचार आमच्या मनात आला आणि त्या दृष्टीने पीक संरक्षणाचे उपाय शोधण्यास सुरुवात झाली. 
 
झाडातली स्वसंरक्षणाची प्रक्रिया सशक्त केली तर काय फायदे होणार, तर किडी, रोग, जंतू मारण्यात जे पैसे खर्च होतात त्याचे प्रमाण कमी होईल. त्यातले विषारी अंश कमी होतील. जमीन, पाणी, हवा यांचे प्रदूषण कमी होईल. झाडांचे पोषण चांगले झाल्यामुळे उत्पादनात वाढ होईल. विषमुक्त अन्न तयार होईल ते खाल्ल्यामुळे सर्वांचेच आरोग्य सुधारायला मदत होईल.
 
पिकाच्या संरक्षणाचा विचार करण्याआधी पिकावर रोग, कीड का येते याचा शोध घेणे सुरू झाले तेव्हा असे लक्षात आले, की निसर्ग सगळ्यांना समान वागणूक देत असतो. किड्यांना, जंतूंना त्यांचे अन्न शोधण्यासाठी विशेष ज्ञानेंद्रिये दिलेली असतात. डास जसे उच्छ्वासातल्या कार्बन-डाय-ऑक्साइडमुळे माणसांकडे आकर्षित होतात, तसेच झाडावर वाढणार्‍या किडींना त्यांच्या सेन्सर्समुळे कोणत्या झाडावर आपल्याला अन्न मिळेल, आपली वाढ कोणत्या झाडावर चांगली होईल याचे ज्ञानही होत असते. आपण बॅक्टेरियासारखे परोपजीवी जंतू प्रयोगशाळेत इनक्युबेटरमध्ये वाढवतो. त्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करतो. थोडक्यात, कीड जेव्हा झाडावर येते तेव्हा झाडावर त्यांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. झाड इनक्युबेटरचे काम करते. अशक्त असलेले झाड किडीला निमंत्रण देते. कीड त्या झाडाकडे आकर्षित होते आणि आपल्याला झाडावर कीड आलेली दिसते. तुमच्या शेतातली काही झाडे निरोगी असतात तर काही किडीने ग्रस्त असतात. मग हे असे का होते याचा शोध घेणे सुरू झाले.
 
हवामानात सतत होणारे बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे असे लक्षात आले. बाहेरच्या हवामानातल्या बदलाप्रमाणे झाड आपल्या आतल्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणत असते. या बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत झाडाची बरीच ऊर्जा वापरली जाते. ही ऊर्जा वापरली गेल्यामुळे झाडातल्या ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो आणि झाड किडीला निमंत्रण देते.
झाडातल्या ऊर्जेचा असमतोल होण्याची कारणे पाहिली, समजली की त्यावर उपाय करणेही सोपे होईल व त्यातून कीडरोग नियंत्रण करणे सोपे होईल असे लक्षात आले.
 
झाडावर येणारे ताण :
1)पाण्याचा अभाव किंवा अति पाणी, दुष्काळ किंवा ओला दुष्काळ.
2)त्या त्या ऋतूंमध्ये आवश्यक असणारे हवामान नसणे, म्हणजेच उन्हाळ्यात पावसाळी हवा, पावसाळ्यात ऊन, थंडीत उन्हाळा, याप्रमाणे विपरीत हवामान. अति ऊन, अति पाऊस, अति थंडी.
3)खतांचा ताण : खताचा अतिरेक किंवा अभाव. चुकीच्या वेळी चुकीचे खत. नत्रयुक्त खतांचाच वापर- यामुळे लुसलुशीत कोवळी पाने किडीला निमंत्रण देताना दिसतात.
4)रासायनिक घटक-कीटकनाशके-बुरशीनाशकांचा अतिवापर अशा अनेकविध ताणांचा परिणाम झाड सहन करत करत तुम्हाला उत्पादन देत असते. मग अशा ताणातून जर झाड मुक्त झाले तर ते उत्पादनात किती वाढ करून देईल याचा विचार करा.
 
झाडाचे ताण कसे कमी करता येतील याचा विचार सुरू झाला. तहान लागल्यावर विहीर खणण्यात उपयोग नाही. सुरुवातीपासून झाडाचे, पिकाचे पोषण चांगल्या, सोप्या पद्धतीने करता आले तर झाड कोणतेही ताण सहन करण्यास सक्षम होईल. झाडातली ऊर्जा संतुलित झाली की झाड रोग, कीडींना निमंत्रण देणार नाही आणि पीक किडींपासून सुरक्षित राहील अशी ‘वसुमित्र’ची मूलभूत संकल्पना आहे.
 
पिकाचे पोषण पहिल्यापासून उत्तम झाले की दुहेरी फायदा होतो. तो म्हणजे किडीवर लवकर नियंत्रण येते आणि उत्पादनातही वाढ होते. झाडाच्या पोषणप्रक्रियेत एन, पिके आणि सूक्ष्म अन्नघटक यांचा जेवढा सहभाग आहे तितकाच सहभाग सिलिका व कार्बन यांचा आहे हे आमच्या लक्षात आले. पीक संरक्षणाच्या कार्यक्रमात तर त्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होत आहे हेही लक्षात आले. 
 
‘वसुमित्र’ने सिलिकासंबंधात सखोल संशोधन केले. त्यातून कार्बन व सिलिकाची वापरायला सहज सोपी व परिणामकारक औषधे निर्माण केली. 
 
पीक संरक्षणात सिलिकाचा सहभाग :
1)ताण : मागे आपण पाहिलेले ताणांचे जे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारच्या ताणांमध्ये सिलिकाकडून झाडाचे संरक्षण केले जाते. मातीत सिलिका असतेच, झाडाने ते उचलून घेणे गरजेचे असते. प्रत्येक पिकाची सिलिकाची गरज वेगळी असते. योग्य प्रमाणात झाडाने सिलिका उचलून घेतले असेल तर झाड कोणत्याही ताणाला योग्य प्रकारे तोंड देण्यास समर्थ होते, बाहेरच्या वातावरणातले चढ-उतार सहन करण्याची क्षमता झाडात येते.
 
2)गवतवर्गीय पिके : या वर्गातल्या वनस्पतींची खोडे कमकुवत असतात. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. उसासारख्या पिकात लोकरी मावासारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सिलिका योग्य प्रमाणात या पिकांमध्ये असेल तर खोडकिडा किंवा लोकरी मावासारखा आजार होणे टळते.
 
3)वेलवर्गीय पिके : भोपळा, कलिंगडासारख्या वेलवर्गीय पिकांची खोडे ही नाजूक असतात. रसशोषक किडींपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या पानावर व खोडावर लव असते. ही झाडाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही लव सिलिकामुळे कडक होते. ती कडक झाल्यामुळे रसशोषक कीड पानांपर्यंत वा खोडापर्यंत पोहोचू शकत नाही आणि झाडाचे संरक्षण होते. 
 
4)सिलिका आणि पाने : कोणत्याही पिकाच्या पानात सिलिका योग्य प्रमाणात साठली असेल तर कोणत्याही प्रकारची बुरशी पानावर आपला जम बसवू शकत नाही. त्यामुळे बुरशीजन्य आजारात सिलिका ढालीप्रमाणे काम करते.
 
5)रासायनिक खते : यांचाही पिकावर बर्‍याचदा ताण येतो. हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने सिलिकाचा उपयोग होतो.
थोडक्यात, कोणत्याही प्रकारचा ताण झाडावर आला की त्याने झाडातल्या ऊर्जेचा र्‍हास होतो. ऊर्जेच्या र्‍हासामुळे झाड क्षीण होते, त्याची प्रतिकारशक्ती कमी होते व शेवटी झाड कीडरोगाला निमंत्रण देते. हे निमंत्रण टाळायचे असेल तर सिलिका खताचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.
 
हे खत जमिनीत सिलिकॉन डाय ऑक्साइडच्या स्वरूपात असते. या स्वरूपात येते तेव्हाच ते झाडाला उचलून घेता येते. बाजारात उपलब्ध असणारी खते ही कॅल्शियम सिलिकेट या स्वरूपात असतात. ती या स्वरूपात नसल्याने ते झाडाला उपलब्ध होत नाही आणि वाया जाते.
 
या सगळ्याचा विचार करून ‘वसुमित्र’ने सिलिका सॉलिड खताच्या स्वरूपात व संवेद सिलिका हे लिक्विड स्वरूपात आणले आहे. ही खते झाडाला सहज उपलब्ध होतील अशा स्वरूपात आणली आहेत.
 
6)सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि पीक संरक्षण : पिकाने सुरुवातीपासून सूक्ष्म अन्नद्रव्ये उचलून घेतली असल्यास झाडाची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राहते. सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाला सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होतील अशा स्वरूपात ‘वसुमित्र’ने आणली आहेत. यात एकूण दहा सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य मिश्रण आयनिक स्वरूपात-सूक्ष्म स्वरूपात केले असल्याने झाडाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज त्वरित भरून निघते. त्यामुळे झाडाच्या रोगप्रतिकारकशक्तीत त्वरेने सुधारणा होते आणि प्रादुर्भाव नियंत्रणात येतो. कोणत्याही कीडरोगनाशक औषधाबरोबर हे फवारल्यास फवारण्यांची संख्या कमी होते असा अनुभव आहे.
 
‘वसुमित्र’ कीडनियंत्रक बुरशीनियंत्रक, बॅक्टेरिया, व्हायरस नियंत्रक औषधांबरोबर दिल्यास त्याचा त्वरित सकारात्मक परिणाम दिसून येतो.
 
7)कार्बनचा पीक संरक्षणातला सहभाग : पिकाच्या पोषणाच्या, वाढीच्या आणि उत्पादनाच्या संदर्भात कार्बनचा सहभाग महत्त्वाचा आहे. तो फुकट उपलब्ध असल्याने त्याचे महत्त्व समजत नाही. फोटोसिंथेसिस आणि कार्बन यांचा घनिष्ठ संबंध आहे हे लक्षात घेऊन वसुमित्रने झाडाची कर्बग्रहणाची म्हणजेच फोटो सिंथेसिसची क्रिया अतिउच्च क्षमतेने कशी चालेल याचा विचार करून संशोधन केले. त्यातून संवेद उे2 हे औषध तयार झाले. या औषधाने कर्बग्रहण उत्तम प्रकारे होते. ज्या काळात कर्बग्रहण नीट होत नाही अशा ढगाळ हवेत, थंडीमध्येही कर्बग्रहणाच्या क्रियेवर परिणाम होतो. तिथे या औषधाचा उत्तम उपयोग होतो.
 
पीक संरक्षणात झाडाचा उ/छ रेशा म्हणजेच कर्ब/नत्र गुणोत्तर योग्य असेल तर कीड येत नाही. नत्राचे झाडातले प्रमाण वाढले की पाने लुसलुशीत होतात आणि अशी लुसलुशीत पाने किडींना खाण्यास सोपी जातात. तेव्हा पीक संरक्षणात झाडाचा कर्ब/नत्र गुणोत्तर प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. कार्बन योग्य प्रमाणात असल्यास काड्या-खोडे मजबूत होतात. झाडाचे संरक्षण उत्तम प्रकारे होते. कार्बनशी निगडित अजून काही औषधे ‘वसुमित्र’ने बनवले आहेत.
 
फुगॉल : कर्बग्रहण उत्तम होते व त्याचा परिणाम फळाचा रंग, गोडी व मुख्यत: वजन वाढवण्यात होतो.
फायटोचेक : कर्ब/नत्र गुणोत्तर सुधारते व त्यामुळे शाखीय वाढ थांबते. नत्राचा जोर कमी होतो व परिणामी झाडाची ऊर्जा फुलावर येण्याकडे वळते.
 
पोटॅशचा पीक संरक्षणातला सहभाग : लाल कोबी, भुरी यांसारख्या रोगांना पीक जेव्हा बळी पडते तेव्हा पिकात पोटॅशची कमतरता आहे हे निश्‍चित समजावे. पिकाची पोटॅशची गरज सहज-सोप्या पद्धतीने कशी पूर्ण होईल यावर संशोधन करून संवेद झ3 हे औषध बनवले. याच्या वापराने कमीत कमी वेळात पोटॅशची कमतरता भरून निघते आणि रोगाचा जोर कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोणताही ताण सहन करण्यासाठी पोटॅश सिलिकाबरोबर महत्त्वाचे काम करत असते. 
 
फॉस्फेटचा पीक संरक्षणातला सहभाग : निमॅटोड, मूळ कूज, करपा, केवडा हे रोग झाडातल्या फॉस्फेटच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. पिकाची फॉस्फेटची गरज सहज सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी झ3 हे औषध ‘वसुमित्र’ने संशोधित केले. याने पिकाची फॉस्फेटची गरज कमी वेळात भागवली जाते आणि वरील रोगांचा जोर कमी होण्यास मदत होते.
 
‘वसुमित्र’ पोषणाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढवते व त्यायोगे रोगाचे येण्याआधी नियंत्रण करते. रोग आल्यावरही ते नियंत्रणात आणण्यासाठी याच औषधांची विविध मिश्रणे करून रोगनिवारणाचेही काम करते. मुख्य म्हणजे यात कीड, रोग मारण्यासाठी विषारी घटक नाहीत तरीही रोगनियंत्रणाचे काम ही औषधे करतात. हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे.
 
पिकावर कोणत्या पोषक घटकांची कमतरता निर्माण झाली की कोणता रंग येतो हे लक्षात घेऊन पीक संरक्षणासाठी सुरक्षित, परिणामकारक औषधे बनवण्यात आली.
1) डिस्चेक- बुरशीजन्य विकारात
2) सेफचेक- रसशोषक कीडनियंत्रणासाठी
3) अल्ट्रागार्ड- अळीवर्गावर नियंत्रणासाठी
4) बॅक्टागार्ड- बॅक्टेरियाच्या नियंत्रणासाठी
5) व्हायरोचेक- व्हायरस नियंत्रणासाठी
6) नेमॅनिल- निमॅटोड नियंत्रणासाठी
भारतीय शेती बर्‍याच प्रमाणात पावसावर अवलंबून असणारी आहे. त्यामुळे दोन पावसांत अंतर वाढले की पिकावर ताण येतो. त्यावर उपाय म्हणून ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे बाहेरून नियोजन केले जाते. ‘वसुमित्र’ने पाण्याचे झाडातले नियोजन कसे करता येईल हे औषध झाडातल्या पाण्याचे नियोजन सुधारते. कर्बग्रहणाच्या कामातून मोठ्या प्रमाणावर पाणी पानातून बाहेर टाकले जात असते. त्यावर नियंत्रण आल्यामुळे 50 टक्के पाण्याचे नियंत्रण करता येते. दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या अभावामुळे काही शेतकरी डाळिंब बागा तोडायला निघाले होते. त्यांना हे औषध वापरण्यास दिले. हे औषध फवारल्यावर 50% पाण्याची बचत झाल्याचे लक्षात आले. अशा पद्धतीने दुष्काळापासून त्यांचे पीक वाचले, मोठे नुकसान टळले, पिकाचे संरक्षण झाले. से. ुर म्हणजे ीर्रींश ुरींशी. वॉटर असे त्याचे नाव असले तरी जास्त पाऊस, जास्त थंडी किंवा इतर ताणांत झाडातले पाण्याचे नियोजन सुधारण्याचे हे काम करते असे दिसून आले आहे.
 
असंख्य शेतकरी बांधव या औषधांचा वापर रोगनियंत्रणासाठी करून विषमुक्त अन्न बनवण्याच्या ‘वसुमित्र’च्या संकल्पात सहभागी झाले आहेत. आपणही विचार करा आणि भारतीयांच्या आरोग्य रक्षणात सहभागी व्हा.
 
यशोधन परांजपे