भात पिकावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण

डिजिटल बळीराजा    21-Sep-2018
 
महाराष्ट्रात भात हे दुसरे प्रमुख पीक असून त्यावर पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, लष्करी अळी, गादमाशी, तपकिरी तुडतुडे आणि निळे भुंगेरे या महत्वाच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याबद्दल अधिक माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.
 
खोडकिडा : ही भात पिकावर पडणारी सर्वात महत्वाची कीड असून ही फक्त भातावरच उपजिवीका करते. ही किड प्रामुख्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील दुबार पिकाखालील क्षेत्रात प्रतिवर्षी नुकसान करताना आढळते.
 
ओळखण्याच्या खुणा : या किडीचा पतंग पिवळसर रंगाचा व मध्यम आकाराचा असुन मादी पतंगाच्या पुढील पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो. 
 
जीवनक्रम : खोडकीडीची एक मादी 150 ते 200 अंडी 3 ते 4 पुंजक्यात घालते. प्रत्येक पुंजक्यामध्ये 50 ते 80 अंडी असतात. अंडीपुंज पानाच्या टोकाजवळ वरच्या पृष्ठभागावर आढळून येतात. मादी आपल्या उदराच्या टोकावर असलेले नारंगी केस अंडी पुंज्यावर झाडून त्यावर एक आच्छादन तयार करते. कालांतराने हे केस तपकिरी होतात. आच्छादनामुळे अंडरांचे वातावरणातील बदलांपासून व नैसर्गिक शत्रुंपासून संरक्षण होते. 5 ते 8 दिवसांनी अंड्या तून अळ्या बाहेर पडतात. 
 
पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा पृष्ठभाग खरवडते आणि साधारणपणे 1 ते 2 तासाने ती आपल्या लाळेपासून एक चिकट धागा बाहेर टाकते आणि त्याला लोंबकळत राहते. व वाऱ्याबरोबर खोडात प्रवेश करते. एका फुटव्यात बहूतांशी एकच अळी दिसून येते. पण कधी-कधी चार अळ्या देखील आढळून येतात. एका आठवड्या नंतर अळी फुटव्याबाहेर येते आणि दुस-रा फुटव्यात प्रवेश करते. परिणामी अनेक फुटवे मरतात. अळीची वाढ पुर्ण होण्यास सुमारे चार ते पाच आठवडे लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी 25 मि.मी. लांब व 3 मि.मी. रूंदीची असते व ती खोडातच कोषावस्थेत जाते. ही अवस्था 7 ते 10 दिवस राहते. काही वेळा प्रतिकूल हवामानात ती एक महिन्यापर्यंत तग धरु शकते. कोष तयार करण्याअगोदर ती खोडावर एक छिद्र तयार करुन ते पातळ पापुद्र्याने बुजवून ठेवते ज्यामधून ती प्रौढावस्थेत पतंग होऊन बाहेर पडते. पतंग कणखर असून ते 12 सेंमी. पाण्याच्या थराखालून देखील बाहेर येऊ शकतात. 
 
पावसाळरात या किडीच्या चार तर उन्हाळयात तीन पिढया पुर्ण होतात मात्र फक्त पावसाळी एकच पिक जेथे असते तेथे या किडीची एकच पिढी पूर्ण होवू शकते. या ठीकाणी या किडीच्या अळ्या कापणीनंतर शेतात राहणा-या चुडात सुप्तावस्थेत राहतात. 
 
नुकसानीचा प्रकार : या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटीकेत तसेच लावणीनंतर पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये आढळुन येतो. अळी सुरूवातीस काही वेळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पिक पोटरीवर येण्यापुर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच “गाभा मर” असे म्हणतात. सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. पोटरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळुन येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढ-या लोंब्रा बाहेर पडतात. यालाच पळींज किंवा पांढरी पीसे असे म्हणतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठया प्रमाणावर घट येते. 
 
किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण : साधारणत: 200 सेल्सिरस ते 300 सेल्सिरस, तापमान आणि भरपूर आर्द्रता (90 ते 100:) या किडीसाठी पोषक आहे. अळीचा प्रसार वाऱ्याबरोबर होतो, तर पंतग कमी पाऊस, जास्त सूर्यप्रकाश कालावधी, रात्रीची जास्त आर्द्रता आणि सरासरी 16 ते 170 सेल्सिरस न्रुनतम व 26 ते 370 सेल्सिरस जास्त तापमान असताना बाहेर पडतात. मादी 300 सेल्सिरस पेक्षा जास्त तापमानात तसेच आर्द्रता 75: पेक्षा कमी असल्यास अंडी घालत नाहीत. तापमान 12.50 सेल्सियसपेक्षा खाली आल्यास मादी अंडी घालत नाही.
 
आर्थिक नुकसान पातळी :
1.पुर्नलागवडीनंतर : 5 टक्के मेलेले फुटवे किंवा 1 मादी पतंग/चौ.मी. 
2.फुटवयांची अवस्था : 1 अंडी पुंज/चौ.मी. 
3.पिकाची पोटरी अवस्था : 1 मादी पतंग किंवा 1 अंडी पुंज/चौ.मी. 
नियंत्रणाचे एकात्मिक उपाय : ही किड भात खोडाच्या आत राहत असल्याने केवळ किटकनााकांचा वापर करून तिचे नियंत्रण करण्यापेक्षा विविध पध्दतींचा एकत्रितपणे अवलंब करून एकात्मिक किड नियंत्रण पदधतीचा वापर करणे आवरक आहे.
1. मशागतीर पध्दतींचा अवलंब :
*या किडीची अळी धसकटामध्ये सुप्तावस्थेत जाते आणि पुढील हंगामात उपद्रव करते. म्हणुन पिक कापणी नंतर लगेचच जमीन उभी-आडवी नांगरावी आणि धसकटे गोळा करुन जाळून नष्ट कयावीत.
*उशिरा येणा-या व उंच वाढणा-या स्थानिक जाती उदा. पटनी, कोलम, ईके-70, झिनीरा, भडस इत्रादी जातींची लागवड करू नये. प्रतिकारक्षम जातींची लागवड करावी.
 
2. तांत्रिक पध्दतीचा अवलंब : 
*पिकाची कापणी वैभव विळयाच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. 
*कापणीनंतर वाफसा येताच जमिनीची नांगरट करावी व भाताचे चोथे गोळा करून त्रांचा नारनाट करावा.
*पिकाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे पाऊस सुरु होताच कोषावस्थेतून बाहेर आलेले मादी पतंग प्रकाश सापळयात आकर्षित करुन नष्ट करावेत. 
*किडीचे अंडीपूंज वेळोवेळी गोळा करुन नष्ट करावेत. 
*किडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत.
*या किडीच्या निरंत्रणासाठी गंध सापळरांचा देखील वापर करता येतो. हे सापळे भात शेतामध्ये 20 ते 25 मी अंतरावर हेक्टरी वीस या प्रमाणे लावावेत.
 
3. जैविक नियंत्रण :
*शेतात बेडुका सारख्या नैसर्गिक शत्रुंचे संवर्धन करावे कारण बेडूक हे प्राणी खोडकीडीच्या अळ्या खातात. तसेच चतूर, मुग्धामाशी अशांचे भात खाचयात संवर्धन करावे. 
*खोडकीडीच्या जैविक निरंत्रणासाठी लावणीनंतर 30 दिवसांपासून ट्रारकोग्रामा जापोनिकम ची हेक्टरी 50,000 अंडी 3 ते 4 वेळा 10 दिवसांच्या अंतराने शेतात सोडावी. कीटकनाशकांचा वापर टाळण्यासाठी शेतातील शत्रु व मित्र किडींचे प्रमाण 2:1 ठेवावे.
 
4.रासारनिक कीटकनाशकांचा वापर :
रोपवाटीका :
*पेरणीनंतर रोपवाटीकेमध्ये 15 दिवसांनी एक पतंग किंवा एक अंडीपुंज प्रति चौरस मिटर किंवा 5 टक्के किडग्रस्त रोपे आढळल्यास दाणेदार 10 टक्के फोरेट 10 किलो किंवा 5 टक्के क्विनॉलफॉस 15 किलो किंवा 3 टक्के कार्बोफुरॉन 16.5 किलो प्रतिहेक्टरी टाकावे. दाणेदार किटकनाशकाचा वापर करते वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. पुरेशा ओलाव्या अभावी किंवा उताराच्या जमिनीत दाणेदार किटकनााक वापरणे शक्र नसल्यास प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. त्रासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 1600 मि.लि. किंवा फेनथोएट 50 टक्के प्रवाही 800 मि.ली. किंवा कारटॅप हारड्रोक्लोराईड 50 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 600 ग्रॅम किंवा एसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 675 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. 
 
*भाताची रोपे लागवडीपुर्वी मुळे भिजतील आा प्रकारे क्लोरपाररीफॉस 20 ईसी 1 मि.ली /लिटर याप्रमाणात 12 तास अगोदर लागवडीपुर्वी बुडवुन ठेवावी. 
 
*पुर्नलावणीनंतर प्रकाश सापळयात खोडकिडीच्या पतंगांची संख्या सतत 5 दिवस वाढत असल्याचे किंवा शेतात एक अंडीपुंज प्रति चौरस मिटर किंवा 5 टक्के किडग्रस्त फुटवे आढळल्यास रोपवाटीकेत सुचविलेल्यापैकी कोणतेही एक दाणेदार किंवा प्रवाही कीटकनाशकाची मात्रा द्यावी. निमगरव्या जातीमध्ये दाणेदार किटकनाशकाची एक मात्रा लावणीनंतर 25 दिवसांनी द्यावी, किंवा प्रवाही कीटकनाशकाच्या 7 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. गरव्या जातीमध्ये लावणीनंतर 25 व 50 दिवसांनी दाणेदार कीटकनाशकाचा दोन वेळा वापर करावा किंवा आठवड्या च्या अंतराने चार वेळा प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी, वेळेवर लावणी केलेल्या हळव्या जातीमध्ये कोणत्राही कीटकनाशकाची मात्रा देण्याची गरज नाही. 
 
पाने गुंडाळणारी अळी :
ओळखण्याच्या खुणा : या किडीचा पतंग सोनेरी फिकट पिवळसर रंगाचा असुन त्रांच्या पंखांवर काळी नागमोडी नक्षी असते व पंखाच्या कडा काळसर असतात. नर किडीच्या पंखाचा विस्तार 15 ते 16 तर मादी किडीच्या पंखाचा विस्तार 15 ते 17 मि.मी. असतो. अंड्या तून नुकतीच बाहेर पडलेली अळी पांढरट हिरव्या रंगाची असते व पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते. अळीचे डोके काळसर रंगाचे असते. पूर्ण वाढझालेल्या अळीची लांबी 15 ते 16 मि.मी. असते. तर रूंदी 2 मि.मी. असते. अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत राहते. गुंडाळीस स्पर्श केल्यास अळी झटकन त्रातून बाहेर पडते आणि अतिशर जलद गतीने आपल्या शरीराची वेडीवाकडी हालचाल करते.
 
नुकसानीचा प्रकार : या किडीची अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून गुंडाळी करते व त्रात राहुन आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते. त्यामुळे गुंडाळीच्या बाहर पृष्ठभागावर पांढरट चटटा पडतो. नुकसान जास्त असेल तर पिक निस्तेज पडते. पिकाची जोमदार वाढ, भरपूर पाऊस, अधून मधून उघडीप व हवेतील गारवा अशा प्रकारचे हवामान या किडींच्या वाढीस अत्यंत पोषक असते.
 
जीवनक्रम : या किडीची मादी 2 ते 3 दिवसात सुमारे 60 ते 180 अंडी पानाच्या पृठभागावर मुख्य शिरेजवळ ओळीत घालते. अंड्याचा आकार षटकोनी असुन ती पारदर्शक असतात. अंडी 1.5 मि.मी. लांब व 0.3 मि.मी. रूंद असतात. साधारणपणे 3 ते 4 दिवसांनी अंड्या तून अळी बाहेर येते. अळीच्या एकुण पाच अवस्था असतात. अळी अवस्था 15 ते 17 दिवस असते. अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी 12 ते 13 मि.मी. पर्यंत आखूड होते व कोष पानाच्या गुंडाळीत तयार करते. कोष तांबड्या रंगाचा साधारणत: 8 ते 10 मि.मी. लांब व 2 मि.मी. रूंद असतो. कोषातुन 6 ते 7 दिवसांनी पतंग बाहेर पडतो. नर पतंग 3 ते 4 दिवस तर मादी पतंग 4 ते 10 दिवस जिवंत राहतो. किडीची एक पिढी पूर्ण होण्यास नरास 33 ते 48 दिवस तर मादीस 36 ते 52 दिवस लागतात.
 
आर्थिक नुकसानीची पातळी :
पीक वाढीची अवस्था व किडी :
अ) लागवडीपासुन फुटवे येईपर्यंत: 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड
ब) फुटवे येण्याची अवस्था : 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड
क) लोंबी निसवण्यापासुन फुले येण्यापर्यंतची अवस्था : 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड
 
एकात्मिक व्यवस्थापन :
1) बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
2) ट्रारकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रारकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाची 50,000 अंडी प्रति हेक्टरी पिकामध्ये सोडावीत.
3) पीक फुटव्याच्या मध्रावस्थेत किंवा पोटरीत असते त्रावेळी प्रत्येक चुडात 2 नवीन कींडग्रस्त पाने दिसल्यास प्रति हेक्टरी कारटॅप हारड्रोक्लोराईड 50 टक्के 1000 ग्रॅ. किंवा ट्रारझोफॉस 40 टक्के प्रवाही 750 मि.ली. किंवा क्लोरोपाररीफॉस 20 टक्के प्रवाही 2.5 लिटर किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही /500 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
3 सुरळीतील अळी : भात पिकावर पूर्वी ही कीड फारच क्वचित दिसून येत होती आणि तिच्यामुळे होणारे नुकसान देखील फारच नगण्र होते. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून तिचे अस्तित्व खरीप हंगामात निरमितपणे दिसून येऊ लागले आहे. 
 
ओळखण्याच्या खुणा : या किडीचा पतंग लहान, नाजूक व दुधाळ पांढर्‍रा रंगाचा असून त्राच्या पंखाची लांबी 8 -11 मि.मी. एवढी असते. पंखावर फिकट काळया रंगाचे लहान लहान ठिपके असतात. अळी पारर्दाक फिकट हिरवट पांढरट रंगाची असते. पुर्ण वाढलेल्या अळीची लांबी 20 मि.मी. असते.
 
नुकसानीचा प्रकार : या किडीची अळी कोवळे पान कापून त्राचे लहान तुकडे करते व त्राची सुरळी करून त्रात राहते. रात्रीच्या वेळी अळी सुरळीसह भाताच्या आव्यावर चढते व पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. पिक निस्तेज दिसते. वाढ खुंटते. सुरळया पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.
 
जीवनक्रम : एक मादी रोपाच्या पानावर सुमारे 60 ते 150 अंडी घालते व त्रातून 4 ते 5 दिवसांनी छोटयाशा पारदर्शक हिरवट रंगाच्या अळ्या बाहेर येतात. अळी पानाचा छोटासा तुकडा कापून त्राची सुरळी करते आणि त्रात राहते. सुरळी एका बाजूने बंद असते. दिवसा अळी सुरळीमध्ये राहते अशा सुरळया शेतामध्ये पाण्यावर तरंगताना आढळून येतात. अळी अवस्था 14 ते 20 दिवस टिकते. सुरळीतच कोष तयार होतो आणि कोषातून 4 ते 7 दिवसांनी पतंग बाहेर येतो. या कीडीची एक पिढी पूर्ण होण्यास 19 ते 37 दिवस लागतात. 
 
आर्थिक नुकसानीची पातळी :
पीक वाढीची अवस्था व किडी :
अ) लागवडीपासुन फुटवे येईपर्यंत : 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड
ब ) फुटवे येण्याची अवस्था : 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड
क) लोंबी निसवण्यापासुन फुले येण्यापर्यंतची अवस्था : 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड
 
एकात्मिक व्यवस्थापन :
1) शेतात पाणी बांधून ठेवावे व नंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्रावा, त्यामुळे सुरळया पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढावे म्हणजे पाण्याबरोबर खाली पडलेल्या सुरळया वाहून जातात त्या गोळा करून नट कराव्यात.
2) गरज भासल्यास पाने गुंडाळणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी सुचविलेल्या जैविक व रासारनिक उपारांची अंमलबजावणी करावी.
3)शेतातील पाणी शक्र असल्यास काढून टाकावे व नंतर एसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 675 ग्रॅम किंवा कारटॅप हारड्रोक्लोराईड 50 टक्के 1000 ग्रॅ. किंवा ट्रारझोफॉस 40 टक्के प्रवाही 750 मि.ली. किंवा 50 टक्के फेंन्थोऐट 500 मि.ली. प्रति 500 लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात फवारावे. फवारणी शक्रतो तिन्हीसांजेच्या वेळी करावी.
4.लष्करी अळी : ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या कीडीच्या वाढीस अनुकूल असते. 
 
ओळखण्याच्या खुणा : या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व मजबूत बांध्राचा असतो. अळी सुरूवातीला हिरवट रंगाची असते व तिच्या दोन्ही बाजूस पांढरट पिवळसर पट्टा असतो नंतर ती किंचीत करड्या रंगाची असतेे. पूर्ण वाढलेली अळी 30 ते 37 मि.मी. असते. तर पतंगाच्या विस्तार 35 ते 40 मि.मी. ऐवढा असतो.
 
नुकसानीचा प्रकार : या किडीचा उपद्रव हंगामाच्या सुरूवातीस बांधावरील गवतावर आढळुन येतो. बांधावरील गवत फस्त केल्यानंतर अळ्या मुख्य पिकाकडे वळतात. दिवसा त्रा जमिनीत किंवा चुडामध्ये लपुन राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर येवुन पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात. अशा प्रकारच्या नुकसानीवरून किडीचे शेतातील अस्तित्व चटकन ओळखता येते. या किडीचा रोपवाटीकेत प्रादुर्भाव झाल्यास जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात आणि एकही रोप शिल्लक राहत नाही. रोपवाटीकेत सर्वत्र अळरांच्या विष्ठेच्या पांढरट- हिरवट साबुदाण्यासारख्या गोळरांचा सडा पडल्याचे दिसून येते. तसेच चुडामध्ये देखील विष्ठेच्या गोळया आढळुन रेतात यावरून सुध्दा किडीचे शेतातील अस्तित्व ओळखता येते. लोंबीत दाणे भरल्यानंतरही या किडीचा उपद्रव होतो. रात्रीच्या वेळी अळ्या लोंब्रांवर चढतात आणि लोंब्रा कुरतडून खातात. अळ्या अतिशर खादाड असल्यामुळे लोंब्रांवर अधारासारख्या तुटून पडतात. दाणे खाण्यापेक्षा लोंब्रा कुरतडून टाकून त्या अतोनात नुकसान करतात. एका शेतातील अन्नसाठा संपल्यानंतर अळ्या हजारोंच्या संख्येने शेजारच्या शेतात जातात. या किडीच्या अळी एखादया लष्करासारखा पिकावर सामुहित हल्ला करतात व पिक फस्त करतात म्हणून या कीडीस लष्करी अळी असे म्हटले जाते.
 
जीवनक्रम : या किडीची मादी 1500 ते 2000 अंडी सहा पुंजक्यात गवताच्या किंवा भात रोपाच्या पानावर घालते. एका पुंजक्यात 150 ते 200 अंडी असतात. अंड्या तून 5 ते 9 दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. अळीची वाढ 18 ते 22 दिवसात पूर्ण होते व ती जमिनीत जाऊन कोष करते. कोषातून 10 ते 14 दिवसांनी पतंग बाहेर रेतो आणि 20 ते 30 दिवसांत एक पिढी पूर्ण होते. 
 
लष्करी अळीचा जीवनक्रम :
आर्थिक नुकसानीची पातळी :
फुलो-याच्या अवस्थेत आणि तद्नंतर : 4 ते 5 अळ्या प्रती चुड
 
एकात्मिक व्यवस्थापन :
1) भाताची कापणी केल्यानंतर ताबडतोब शेताची नांगरट करावी. नांगरटीमुळे किडीचे जमिनीतील सुप्तावस्थेतील कोष उघड्या वर रेतात आणि प्रखर सूर्य प्रकाशामुळे त्रापैकी काही मरतात तर काही पक्ष्रांच्या भक्षस्थानी पडतात. 
2) अळीचे स्थलांतर रोखण्यासाठी रोपवाटीकेभोवती किंवा शेताभोवती दोन फुट खोल चर काढून ते पाण्याने भरून ठेवावीत. 
3) हंगामाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
4) किडीचे अंडीपुंज गोळा करून त्यांचा नायनाट करावा.
5) भाताची लागण केलेल्या शेतात पाणी बांधून ठेवावे, त्यामुळे अळरांना लपारला जागा राहत नाही आणि अळ्या रोपावरती चढतात व पुढे त्रा पक्ष्रांच्या भक्ष्रस्थानी पडतात. 
6) बेडकांचे शेतात संवर्धन व संरक्षण करावे कारण बेडूक या किडीच्या अळ्या खातो.
7) पिक फुलो-यावर आल्यानंतर 4 ते 5 अळ्या प्रति चौ.मी. आढळल्यास सारंकाळच्या सुमारास वारा शांत असताना डारक्लोरोव्हॅस 76 टक्के प्रवाही 650 मिली किंवा क्लोरोपाररीफॉस 20 टक्के प्रवाही 2.5 लिटर, 500 लिटर पाण्यात मिसळून त्राची एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी किंवा मिथील पॅरॉथिऑन 2 टक्के भुकटी 25 किलो प्रति हेक्टरी धुरळावी.
8) पीक तयार झाल्यावर कापणी ताबडतोब करावी अन्रथा ते किडीच्या हल्ल्रास बळी पडते.
5.तपकिरी तुडतुडे : तुडतुडे तपकिरी रंगाचे, त्रिकोणी, पाचराच्या आकाराचे, लहान असतात. तुडतुडे व त्रांची पिल्ले नेहमी तिरकस व भरभर चालतात. खोडावर ते मोठया संख्येने दिसून रेतात.
नुकसानीचा प्रकार : तुडतुडे व पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठया प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात. शेतात ठिकठिकाणी तुडतुडरांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते यालाच हॉपर बर्न असे म्हणतात. या रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात. 
 
आर्थिक नुकसानीची पातळी :
लागवडीपासून फुटवे येईपर्यंत 5 ते 10 तुडतुडे प्रती चूड
फुटवे रेण्याची अवस्था10 तुडतुडे प्रती चूड
लोंबी निसवण्यापासून फुले रेईपर्यंतची अवस्था 15 ते 20 तुडतुडे/चूड
फुलोर्‍राच्या अवस्थेत आणि तदनंतर25 ते 30 तुडतुडे प्रति चूड
एकात्मिक व्यवस्थापन :
1) तपकिरी तुडतुडरांना कमी बळी पडणा-या जातींची लागवड करावी. 
2) लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर 20 सें.मी. आणि दोन चुडातील अंतर 15 सें.मी. ठेंवावे तसेच रोपांची पट्टा पध्दतीने लागण करावी. 
3) नेहमी प्रादुर्भाव होणा-या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. 
4)शेतातील पाण्याचा निचरा करावा.
5) प्रत्येक चुडात 5 ते 10 तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे किटकनााकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी 500 लिटर पाण्यात इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 125 मि.ली. किंवा थायामेथॉक्झाम 25 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार किटकनााक 100 ग्रॅम किंवा क्लोथिरानिडीन 50 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार किटकनााक 25 ग्रॅम किंवा फेनिट्रोथिऑन 50 टक्के प्रवाही 500 मि.ली. किंवा मॅलेथिऑन 50 टक्के प्रवाही 1000 मि.ली. किंवा फेंथोएट 50 टक्के प्रवाही 500 मि.ली. मिसळून फवारावे. फवारणी करताना कीटकनााक फुटव्याच्या बुंध्रावर पडेल याची दक्षता घ्रावी.
6. गादमी : महाराष्ट्रामध्ये गादमाशीचा उपद्रव प्रामुख्याने भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्हरांतील काही भागात आढळून रेतो. 
 
ओळखण्याच्या खुणा : गादमाशाीला लांब पार असून तीचा आकार डासासारखा असतो. या किडीची मादी तांबूस रंगाची असते, तर नर पिवळट करड्या रंगाचा असतो. किडीची अळी पार विरहित व गडद तांबूस रंगाची असते. 
नुकसानीचा प्रकार : अंड्या तून बाहेर पडलेली अळी रोपाच्या खोडात िारून त्रामध्ये असलेले कोवळे अंकुर कुरतडून खाते. अंकुर कुरतडताना तिच्या तोंडातून लाळ बाहेर पडते.त्या लाळेत सिसिडोजन नावाचे द्रव्य असते. सिसिडोजनची कुरतडलेल्या अंकुरावरती प्रक्रिया होते व त्यामुळे अळीच्या भोवतालचा अंकुराचा भाग फुगतो व त्राची कांद्याच्या पातीसारखी नळी तयार होते. ही नळी पिवळसर पांढरट किंवा चंदेरी रंगाची असते. त्यालाच नळ किंवा गाद किंवा पोंगा असे म्हटले जाते. आा अंकुराला ओंब्या येत नाहीत. पीक फुटव्याच्या अवस्थेत असताना गादमाशीचा उपद्रव जास्तीत जास्त असतो. कीडग्रस्त रोपाला अनेक फुटवे येतात परंतु ते खुरटे राहतात.
 
जीवनक्रम : मादी जवळपास 100 अंडी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर घालते. अंडी 0.55 मि.मि. लांबीची लांबट आकाराची, पांढरी अथवा तांबूस रंगाची असतात. अंड्यातून 3 ते 4 दिवसांनी अळी बाहेर येते. ती खोडात वाढणा-या अंकुराजवळ जावुन तो कुरतडून खाते. हा अंकुर अळीभोवती नळीसारखा वाढतो आणि नळीतच अळीची पुर्ण वाढ 15 ते 20 दिवसात होते. पूर्ण वाढलेली अळी नळीच्या वरच्या टोकाजवळ रेऊन टोकाच्या थोड्या शा खालील भागात एक लहान छिद्र पाडते व नळीतच ती कोष करते. कोषातून 5 ते 8 दिवसांनी माशी बाहेर येते व ती अळीने पाडलेल्या छिद्रातून नळीच्या बाहेर पडते. माशी 1 ते 3 दिवस जगते. या किडीची एक पिढी तयार होण्यास साधारणत: 19 ते 21 दिवसांचा कालावधी लागतो. 
 
किडीच्या वाढीस पोाक वातावरण : हवेतील 80 टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणार्‍रा पावसाच्या सरी, घट्ट लागवड, 280से. ते 330से. तापमान या किडीच्या वाढीस पोषक असते.
आर्थिक नुकसानीची पातळी :
पुर्नलागवड झाल्यानंतर 1पोंगा प्रती चौ.मी. नेहमी प्रार्दुभाव होणार्‍रा क्षेत्राकरिता
5टक्के प्रार्दुभाव झालेले फुटवे 
फुटव्रांच्या मध्रावस्थेत 5टक्के प्रार्दुभाव झालेले फुटवे
एकात्मिक व्यवस्थापन :
1.भात पिकाची लागवड शक्यतो एकाच वेळी करावी.
2.खतांचा संतुलित वापर करावा.
3.बिगर हंगामात शेतात वाढणा-या देवधानाचा व इतर तणंचा जाळून नाश करावा कारण या गवतावर ही किड वाढते. 
4.लागवडीनंतर 20 दिवसांनी किंवा एक चंदेरी पोंगा प्रति चौ.मी. आढळल्यास दाणेदार 3 टक्के कार्बोफ्रुरॉन 16.5 किलो किंवा 4 टक्के कारटॅप हारड्रोक्लराईड 25 किलो किंवा 0.3 टक्के फिप्रोनील 25 किलो प्रति हेक्टरी जमिनीत टाकावे.
5.किडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळुन टाकावित.
6.गादमाशी प्रतिकारक जातींची लागवड करावी. विदर्भ विभागासाठी वैभव, निला व तारा या जातींची व कोकण विभागाकरीता फाल्गुना व विक्रम या जातींची शिफारस करण्यात आली आहे.शिफारीत जातींची पेरणी केल्यास गादमाशीच्या व्यवस्थापनासाठी कोणतेही कीटकनाशक वापरण्याची गरज नाही.
7.लागवडीपुर्वी रोपाची मुळे क्लोरपाररीफॉस 20 टक्के प्रवाही प्रति लिटर 1 मि.ली. च्या द्रावणात 12 तास बुडवावीत किंवा वरील द्रावणात 1 टक्का रुरिया मिसळल्यास रोपांची मुळे 3 तास बुडवुन ठेवावीत.
 
7. निळे भुंगेरे :
ओळखण्याच्या खुणा : निळे भुंगेरे या किडीचे शास्त्रीर नांव लेपटिस्पा पिग्मीया असे आहे. ही भुंगेरेवर्गात मोडणारी कीड असुन प्रौढ भुंगेरा लांबट, गोलाकार, गर्द निळया रंगाचा असतो. त्राची लांबी 5 मि.मी. व रूंदी 1.5 मि.मी. आहे. पुर्ण वाढलेली अळी पांढरट रंगाची व 5 मि.मी. लांब असते. या किडीचा कोष 4.5 मि.मी. आकाराचा असतो.
जीवनक्रम : मादी साधारणत: 38 ते 66 अंडी पानांच्या आतील आणि पाठच्या बाजुला घालते. अंडी 4-5 दिवसांत उबतात. व त्यातुन अळ्या बाहेर पडतात. साधारणपणे या किडीची अळी अवस्था 12 ते 14 दिवसांची असते. तर कोषवस्था 5 ते 6 दिवसांची असते. पानांच्या वरच्या पृष्ठभागावर गुंडाळलेल्या पानांत अळी कोषावस्थेत जाते. प्रौढ भुंगेरा 18 ते 35 दिवस जगतो. आणि गवतावरच सुप्तावस्थेत जातो.
 
नुकसान : निळे भुंगेर्‍राचा प्रौढ व अळी या दोन्ही अवस्था हानीकारक आहेत. प्रौढ व अळ्या पानाचा हिरवा भाग/हरित द्रव्य खातात व पापुद्रा तसाच ठेवतात. त्यामुळे पानांवर समांतर पांढर्‍रा रेषा उमटतात. अशा अनेक रेषा एकमेकांत मिसळतात व त्याठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. असे चटटे तपकिरी होतात व कालांतराने पाने करपल्यासारखी दिसतात. ही किड पानाच्या गुंडाळीत आढळुन येते. एका भाताच्या पातीवर बर्‍राच अळ्या खाताना आढळुन येतात. प्रादुर्भाव खुप मोठया प्रमाणावर असल्यास रोपे सुकतात व त्रातुन लोंब्रा बाहेर पडत नाहीत.
 
एकात्मिक व्यवस्थापन : ही किड भात पिकानंतर बांधावरील गवतावर तसेच भाताच्या फुटव्रांवर आपली उपजिविका करते आणि पुढच्या हंगामात भात पिकाला उपद्रव करते म्हणुन बांधावर गवत किंवा तण मोठया प्रमाणावर असतील तर या किडीचा प्रादुर्भाव त्रा शेतात दिसुन रेतो. तसेच पाणथळ किंवा पाण्याचा निचरा न होणार्‍रा शेतात या किडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळुन रेतो. ज्या शेतात नत्र खताची मात्रा जास्त प्रमाणात दिली असेल व लागवड दाट असेल अशा ठिकाणी सुध्दा हया किडीचा प्रादुर्भाव आढळुन रेतो. या किडीचा प्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसरवण्यापुर्वी दिसुन येतो.
 
या किडीचा प्रादुर्भाव उदभवू नये त्यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे.
1.भात पिकाची दाट लागवड करू नये. दोन ओळीतील अंतर 20 सें. मी. व दोन रोपातील अंतर 15 सें. मी. असावे
2.नत्र खतांची मात्रा शिफारशी प्रमाणे द्यावी. अतिरिक्त मात्रा देऊ नये.
3.शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कारण पाणथळ जागेत या किडीचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण जास्त असते.
4.बांधावरील गवत काढुन बांध स्वच्छ ठेवावेत. कारण जेव्हा शेतात भात पिक नसते. त्रावेळी बांधावरील गवतावर ही किड उपजिविका करते. व तेथेच सुप्तावस्थेत जाते आणि शेतात भाताची लागवड झाल्यावर पुन्हा सक्रिय होते.
5.ही किड छोटा चिमणचारा, हरकी, गजराज, पॅरागवत, हिरवा चारा, मारवेल या गवतांवर आढळुन येते. म्हणुन बांधावरील गवत काढुन नष्ट करणे गरजेचे आहे.
6.या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास (पुर्नलागवडीच्या वेळेस 1 भुंगेरा किंवा 1 प्रादुर्भित पान प्रति चुड व फुटव्यांच्या अवस्थेत 1 भुंगेरा किंवा 1 ते 2 प्रादुर्भित पाने प्रति चुड)
या किडीच्या निरंत्रणासाठी भात पिकावरील खोड किड व पाने गुंडाळणारी अळी या किडीसाठी प्रमाणित केलेली (लेबल क्लेम) किटकनाशके खालीलप्रमाणे वापरावीत.
एसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 675 ग्रॅम किंवा कारटॅप हारड्रोक्लोराईड 50 टक्के 1000 ग्रॅ. किंवा ट्रारझोफॉस 40 टक्के प्रवाही 750 मि.ली. प्रति 500 लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
 
आथिर्र्क नुकसान पातळी :
पुर्नलागवर्डीच्या वेळेस : 1 भुंगेरा किंवा 1 प्रार्दुभित पान प्रति चूड
फुटवाच्या अवस्थेत : 1 भुंगेरा किंवा 1 ते 2 प्रार्दुभित पाने प्रति चूड
8. खेकडे : भात खाचरात विशेषात: खरीप हंगामात खेकडा हा प्राणी भात पिकाचे अतोनात नुकसान करतो. खेकडा हा संदीपाद प्राण्यांच्या जातीमध्ये मोडतो, खेकडरांचे शरीर दोन भागांमध्ये विभागलेले असते. यातील पहिला भाग म्हणजे - डोके आणि धडाच्या संरोगामुळे झालेला असतो आणि दुसरा भाग म्हणजे - पोट. खेकडरांना पायाच्या पाच जोड्या असतात. याखेरीज त्यांना र्स्पोद्रिंयाच्या दोन जोड्या असून दोन डोळे असतात.
 
कोकणात प्रामुख्याने तीन वेगवेगळया प्रकारचे खेकडे आढळून रेतात. त्रांचा रंग व आकारमानानुसार तीन प्रकार पडतात ते म्हणजे खेकडा, चिंबोरी आणि मुठया.
 
खेकडे : ते पांढरे अगर गडद तपकिरी रंगाचे असतात. पाठीच्या कडा पिवळसर असतात. पांढर्‍रा रंगाचे खेकडे सर्वसाधारणपणे नर असतात. तर गडद तपकिरी-खेकडे बहुत वेळा मादया असतात. लांबी 4 से.मी तर जाडी 5 से.मी. एवढी असते.
 
चिंबोरी : या जातीच्या खेकडरांची पाठ पसरट असून रंग गडद तपकिरी किंवा काळा असतो. शरीराचा खालचा भाग पिवळसर असतो. लांबी 7.5 से.मी तर जाडी 10 से.मी असते. ही जात इतर दोन जातीपेक्षा आकाराने मोठी असते.
 
मुठया : तिचा आकार हाताच्या मुठीसारखा असल्यामुळे तीला “मुठया” असे संबोधले जाते. रंगाने ही जात गडद तपकिरी किंवा फिक्कट तपकिरी अशी आहे. लांबी 3 से.मी तर रूंदी सुमारे 5 से.मी असते.
 
नुकसानीचे स्वरूप : तिन्ही प्रजाती भात पिकाचे नुकसान करतात. चिंबोरी या जातीचा उपद्रव भात खाचरामध्ये अतिशय कमी प्रमाणात होतो. ही जात प्रामुख्याने ओढा, नदी, तलाव रांच्या जवळपास असलेल्या भात खाचयामध्ये आढळून येते. कोकणात चिंबोरी जातीचे शेकडा प्रमाण फारच कमी म्हणजे 1 टक्का एवढेच आहे. मुठया जातीचे शेकडा सरासरी प्रमाण 12 टक्के तर खेकडा या प्रजातीच शेकडा सरासरी प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 87 टक्के आढळते. हीच जात भात पिकाला जास्त हानिकारक आहे.
खेकडे भात पिकाचे दोन प्रकारे नुकसान करतात. पहिल्या प्रकारामध्ये खेकडे रोपवाटीकेतील तसेच पुर्नलागण केलेल्या भात पिकातील रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. खेकडे आवश्रकतेपेक्षा जास्त रोपे कापून टाकतात. अशी कापलेली रोपे जमिनीवर पडलेली आढळतात. खेकडे दिवसा बिलांमध्ये राहतात आणि रात्री भात रोपांचे नुकसान करतात. परिणामी भात रोपांची प्रतिहेक्टरी संख्या कमी होते आणि भाताचे उत्पन्नही कमी होते.
 
दुसर्‍रा प्रकारामध्ये खेकडे भात खाचरांमध्ये असंख्य छिद्रे पाडतात. अशा छिद्रांमध्ये /बिळांमध्ये खेकडे वास्तव्य करतात. अशी छिद्रे जमिनीवर तसेच बांधावर पाडलेली आढळतात. अशा बिळातून शेतातील पाणी वाहून जाते. पिकाचे वाढीस आवश्रक असणारे पाणी शेतात साचून राहत नाही. त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. शिवार वरचेवर बांधावरील बिळे बुजविण्याचे काम करणे भाग पडते. त्यामुळे बांध-बंदिस्तीचे खर्चात वाढ होते. एक हेक्टर भात खाचरातील बांधावर सुमारे 2000 बिळे आढळून रेतात. बिलांचा व्यास 4-5 से.मी आणि खोली सुमारे 28 से.मी असते. बिळांची जास्तीत जास्त खोली 185 से.मी असल्याचे आढळून आले आहे खेकडे जून पासून सप्टेबंर पर्यंत भात पिकाचे नुकसान करतात.
 
खेकडरांचा जीवनक्रम : खेकडरांचे पुनरूत्पादन वर्षातून एकदाच होते. खेकड्या ची मादी गडद पिवळया रंगाची सुमारे 100 ते 500 अंडी “मे” महिन्रापर्यंत घालते. ही अंडी पोटाचे खालचे बाजूस असलेल्या पिशवीत शरीराला चिकटलेली असतात. ही अंडी जूनच्या पहिल्या पंधरवड्या त उबवतात. त्रातून निघालेली खेकड्या ची पिल्ले मादी भात खाचरात सोडून देते. त्यानंतर हि पिल्ले स्वतंत्रपणे बिळे करून राहतात. खेकडे 3 ते 5 वर्ष जगतात.
 
एकात्मिक व्यवस्थापन :
1) पावसाळा सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस रोज रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या किंवा पलित्याच्या किंवा काकड्याच्या प्रकाशात पकडून त्रांचा नायनाट करावा.
2) बेडूक हा खेकडरांचा शत्रु आहे. खेकडरांना खातो, म्हणून भात खाच्यात त्याचे संवर्धन करावे.
3)विषारी अमिषाचा वापर करून खेकडरांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी 1 किलो शिजविलेल्या भातामध्ये 75 टक्के पाण्यात मिसळणारी अ‍ॅसिफेटची भुकटी 75 ग्रॅम 
किंवा 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारील भुकटी 100 ग्रॅम + 20 ग्रॅम गुळ या प्रमाणात मिसळून विषारी अमिष तयार करावे. या मिश्रणाच्या सुपारी एवढया 100 गोळया तयार करून प्रत्येक बिळात एक गोळी टाकावी व ते बिळ चिखलाने लिपावे. दुस-या दिवशी जी बिळे उकरली जातील त्या बिळात परत विषारी अमिष वरीलप्रमाणे टाकावे.
 
प्रां. व्हि. एन. जालगांवकर, किटकशास्त्रज्ञ,
डॉ. एल. एस. चव्हाण,
सहगी साोंधन संचालक,
डॉ. ए.एल. नरंगळकर, प्रमुख, किटकशाास्त्र विभाग,
प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत. जि. रायगड.