केळी पिकावरील किडींचे एकात्मिक किड व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    15-Sep-2018
 
किडींपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते, केळी या फळपिकावरील महत्वाचे किडीं आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल या लेखात माहिती पाहू.
 
प्रस्तावना : भारत हा केळी जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतात उत्पादीत होणा-या 73.5 दशलक्ष टन फळांचे उत्पादन होते. त्यात केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरर्वाी 7.48 लाख हेक्टरवर लागवड होते व त्यातून सुमारे 27 दशलक्ष टन उत्पादन मिळते. केळी पिकावर सर्वसाधारणपणे 15 किडींचा प्रादुर्भाव होत असून त्यात किडी, कोळी यांचा समावेा होतो. (तक्ता 1) काही नविन किडींचाही प्रादुर्भाव हा लागवडीपासून ते घड काढणीपर्यंत दिसून येतो. या किडींमध्ये केळीवरील भुंगेरे हया संपूर्ण देठावर यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. बाकी किडीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात व ठरावीक भागात आढळून येतो.
 
किडी :
1 कंद पोखरणारी सोंडेकिड :
प्रसार : कंद पोखरणारी किडीचा प्रादुर्भाव हा केळी उत्पादन घेणा-या सर्व भारतातील राज्यामध्ये आढळून येतो यात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरीसा, पचिम बंगाल, बिहार, गोवा, पॉडेचरी, आसाम व पुर्वोत्तर पहाडी प्रदेश या राज्यामध्ये या किडींचा प्रादुर्भावाची नोंद करण्यात आलेली आहे. मालभोग, कर्पूरावल्ली, रोबुस्टा, नेद्रन, लालकेळी आणि येल्लकी या सारख्या व्यापारीदृष्टया महत्वाचे वाणांवर मोठया प्रमाणावर बळी पडतात.
 
लक्षणे : या किडीचा प्रादुर्भाव सुरूवातीला असेल तर झाडाची वाढ खुंटते झाड निस्तेज दिसते. झाडाची वाढ नसल्यामुळे ते रोगग्रस्त झाडासारखे दिसते. सुरूवातीच्या काळात पानांवर पिवळया लाईन्स दिसतात तर जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर खोडाचा वरचा भाग निमुळता होत जातो. पानांचे आकारमान लहान होते. घडाची प्रत खालावते आणि घड अडकण्यासारखी परिस्थिती तयार होते.
 
जीवनक्रम : या किडीचा प्रौढ जमीनीलगत कंदाजवळ जेथे कंद व खोड यांचा जोडणी झालेली असते त्या ठिकाणी प्रादुर्भाव करतो. प्रौढ कंदाजवळ एक एक अंडी घालते. अंडी उबविण्यासाठी 7-14 दिवस लागतात. अळी अवस्था दोन ते सहा आठवडयांची असते. कोषावस्था एका आठवडयात पुर्ण होते. मादी आपल्या पुर्ण आयुष्यात 36 ते 53 अंडी घालते.
 
एकात्मीक किड नियंत्रण : या किडीचा संपुर्ण जीवनक्रम जमीनीलगत व कंदामध्ये पुर्ण होत असल्यामुळे या किडीचा एकात्मीक पध्दतीनेच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
 
या किडीचा प्रसार रोखण्यासाठी बाग तणविरहीत ठेवणे आवयक आहे.
 
कंद लागवडीच्या वेळी कंद चांगले तासून ट्रायझोफॉसच्या द्रावणात (2.5 मिली/ लिटर)20 मिनीटे बुडवावीत म्हणजे त्यातील अंडी व अळी अवस्थेत असल्यास नष्ट होतील.
 
बिव्हेरीया बॅसीयानाच्या द्रावणात (10 मिली/लिटर) लागवडीपुर्वी बुडवून लागवड करावी.
 
घड कापणीनंतर खोड कापुन त्यावर कार्बारील (1 ग्रॅम मिली/लिटर) किंवा क्लोरोपायरिफॉस (2.5 लिटर पाणी) द्रावणात संस्कार करून त्यात असलेले किडे मरतील.
 
कापणी केलेल्या केळीचा खांब उभा कापुन (1.5 ते 2 फुट) तुकडे करून एकरी 10-15/एकर बागेत ठेवून या किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे ओळखता येतो.जर या सापळयामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षिात झालेले आढळून आल्यास आा प्रकारचे सापळयांना बिव्हेरिया बॅसीयाना 20 ग्रॅम भाताच्या तु-यावर तयार केलेले किंवा 10 मिली द्रवरूप द्रावण (बाजारात उपलब्ध द्रावण 10 मिली/लिटर पाणी)
किंवा
किडींना प्रादुर्भाव करणा-या सुत्रकृमी हेट्रो-हेॅव्डीटीस इंडिका 20 मिली द्रावण लावून 100 / हे बागेत संस्कार केलेला भाग जमीनीकडे राहील आा पध्दतीने ठेवावेत. (चित्र क्र. 11 क आणि ड) कामगंध सापळे हेक्टरी 5 या प्रमाणात ठेवून आर्किात झालेले प्रौढ गोळा करून नष्ट करावीत. या सापळयांची जागा महिन्यातून एकदा बदलावी.
 
2. खोड पोखरणारी किड : ओडेाईपोरस लॉगीकोलीस
प्रसार : खोड पोखरणा-या किडीचा प्रादुर्भाव केळी उत्पादन करणा-या सर्व राज्यामध्ये आढळून येतो. यात तामीळनाडू, केरळा, आंध्रप्रदेश, महाराट्र, कर्नाटक, ओरीसा, वेस्ट बंगाल, बिहार, गोवा, पॉडेचरी, आसाम आणि उत्तरपुर्व डोंगराळ प्रदेा यांचा समावेा होतो. नेंद्रन, मानन, रोबुस्टा, कमी उंचीची कॅव्हेडिा, थेलाचक्रकेली, मार्टमन यासारख्या व्यापारी दृटया महत्वाचे वाण या किडीस जास्त बळी पडतात.
 
लक्षणे : या किडीची अळी व प्रौढ हे खोडास छिद्र पाडून आत पोखरत जातात. त्या छिद्रातून डिंकासारखा चिकट द्रव पदार्थ स्त्रवतो. हे सुरूवातीचे प्रादुर्भाव असल्याचे लक्षण असते. ब-याचवेळा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल तर झाडाचा वरचा भाग किडीने पोखरून निकामा केल्याने मोडून पडतो. परंतु या लक्षणांची वाट न पहाता हमखास प्रादुर्भाव होणा-या प्रदेशात बागेत घड कापणी झालेल्या खोडाचे 1.5 ते 2 फुटलांबीचे तुकडे करून ते मध्यभाग उभे कापुन बागेत ठेवावेत त्यात प्रौढ आकर्षीत झाल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत. 
 
जीवनक्रम : या किडी मादी पाच महिने झालेल्या केळी झाडाचे खोड निवडत आणि पान कापलेल्या देठालगत अंडी घालते. ही अंडी उबविण्यासाठी साधारण 5-8 दिवस लागतात. अळीचा कार्यकाळ हा 26 दिवसांचा असतो. ही किडकोषावस्थेत 20-24 राहून प्रौढ बाहेर पडतो. अळीचे खावून झालेवर व पुर्ण वाढ झाल्यावर कोषावस्थेत जाण्याअगोदर अळी सर्वात शेवटच्या पानाच्या देठ व त्याला लागून असलेल्या देठाजवळ चौकोनी छिद्र करून त्या ठिकाणी कोष बनविण्यासाठी जागा तयार करते. प्रौढ, अळीने तयार केलेल्या छिद्रातून बाहेर पडते. पानाच्या देठावरील गोल छिद्र अळीचा प्रादुर्भाव झाल्याने दर्शावितात.
 
एकात्मिक किड नियंत्रण : हया किडीच्या सर्व अवस्था केळीच्या खोडामध्येच पुर्ण होत असल्याने हया किडीचे एकात्मीक पध्दतीने नियंत्रण केलेले फायदेशाीर ठरते. जुनी व कोरडी झालेली पाने कापुन नष्ट करावीत.
 
पान कापलेल्या ठिकाणी देठाला क्लोरोपायरीफॉस (2.5 मिली/लिटर)+1 मिली स्टिकर किंवा बिव्हेरीया बॅिसयाना (3 मिली/लिटर) हे द्रावण लावावे.
 
घडाची कापणी झालेले झाड जमीनीलगत कापुन घ्यावे व कापलेल्या भागावर कार्बारील (2.5 मिली/लिटर) द्रावण 100 मिली किंवा बिव्हेरीया बॅसीयाना (3 मिली/लिटर) द्रावण 100 मिली लावावे.
 
केळी खोडापासून तयार केलेल्या सापळयांच्या व्दारे या किडीचा प्रादुर्भावाचे निरिक्षण करावे.
 
केळी खोड हे एक ते दीड फुट उभे काप कापावे किंवा 4 ते 5 इंच गोल चकत्या कापून घ्याव्यात. हेक्टरी 100 सापळे ठेवून त्याकडे आकर्षिले गेलेले प्रौढ गोळा करून नष्ट करावेत.
 
लागवडीनंतर पाच महिन्यांनी केळी खोड, कोरापायरीफॉस (2.5 मिली/लिटर +1 मिली स्टिकर) किंवा 1 टक्का अ‍ॅझॅडिरॅक्टीन द्रावणाने (2.5 मिली/लिटर) लिंपावे.
 
काप केलेल्या केळी खोडाला 20 ग्रॅम (भाताचा भरडा यावर वाढवलेली किड मारणारी बुरशी)किंवा बाजारात उपलब्ध द्रावण बिव्हेरीया बॅसीयाना 20 मिली (1 मिली/100 मिली ) यांचे मिश्रण किंवा हेटरोव्ॅडीटीस इंडिका चे मिश्रण 20 मिली लावून कापलेला भाग जमीनीकडे राहिल आा पध्दतीने बागेत ठेवावेत त्यात प्रौढआकर्षिात होवून मरतात.
 
केळीच्या खोडाला खोड पोखरणा-या किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्यावर खोडास इंजेकशन देवूनच त्या किडीचे नियंत्रण करता येते. ट्रायझोपास (150 मिली/लिटर +300 मिली पाणी ) या द्रावणाचे इंजेकशन च्या सहायाने जमीनीपासून 2 आणि 4 फुटावर 30 अशाच्या कोनात 2 ते 4 मिली द्रावण सोडावे. इंजेकशन 2 ते 3 खोलीवर दयावे.
 
प्रादुर्भावग्रस्त भागात केळी खोड कापणीनंतर लगेच कापुन घ्यावे अन्नद्रव्यांच्या पुर्नवापरासाठी ठेवू नये.
 
घड कापणीनंतर केळी खोड 30 सेमीचे तुकडे करून त्यांना उभे कापुन सापळे म्हणून वापरावेत.
 
3.केळी फळांवर चट्टे करणारा भुंगा : केळी फळावर चट्टे करणारी ही किड आसाम, बिहार, प.बंगाल आणि भारताचा पुर्वोत्तर भागात या किडीचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. हया किडी पानांवर उपजिवीका करतात आणि पानांवर गोलाकार छिद्रे करतात अपरिपक्व फळाची साल खरवडल्यामुळे त्या ठिकाणी काळसर चट्टे तयार होतात. या किडीने फळांची साल खाल्ल्यामुळे फळे निस्तेज वाळल्यासारखी व चट्टे दिसतात. चट्टे पडलेली चट्टे केळी फळाची गुणवत्ता खालावून अशा फळांना बाजारात फार कमी दर मिळतो. फळांवर प्रादुर्भाव झाल्यामुळे अशा फळांची वाढीवर परिणाम होतो.
 
नियंत्रण : प्रवाही बिव्हेरीया बॅसीयाना (10 मिली/लिटर) द्रावणाच्या सहाय्याने दोन झाडामधील माती सिंचीत करावी त्यामुळे जमीनीत कोषावस्थेत जाणा-या अळयाचना प्रभावीपणे नाा करता येतो. 
किंवा
प्रवाही बिव्हेरीया बॅसीयाना (10 मिली/लिटर पाणी) या द्रावणाची पानांवर व घडांवर मे, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात हया किडींचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
किंवा
केळ फुल बाहेर पडल्यावर लागलीच त्यावर 6 टक्के छिद्रे असलेली प्लास्टीक पिशवी चढवावी. सर्व फण्या निसवल्यावर केळीफुल तोडून घ्यावे.
किंवा
पोंग्यात व पानाच्या बेचक्यात अ‍ॅसीफेट 0.1 टक्का द्रावण ओतावे. 
 
4) मावा : मावा या किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून तामीळनाडू, कर्नाटका, केरला, आंध्रप्रदेश, गुजराथ, महाराट्र आणि प. बंगाल या राज्यामध्ये आढळून येतो. व्यापारीदृटया महत्व असलेले नेंद्रन पुवन आणि विरूपक्षी हे वाण या किडीस जास्त बळी पडतात. मावा या किडीचा बाल्यावस्था व प्रौढे केळी खोडाच्या बाहेरच्या आवरणाखाली एकत्रित दिसतात. (चित्र क्र. 5 ) मावा किडीचा प्रसार करणा-या मुंग्या नेहमी मावा किडीसोबत आढळतात. मावा किडीची बाल्यावस्था व प्रौढ झाडातील रस घेतात. त्यामुळे झाडाची वाढ मंदावते. मावा ही किड पर्णगुच्छ या विषाणूचा प्रसार करण्यास मदत करतात.
 
नियंत्रण :
किडमुक्त बागेतून बेणे निवड करावी.
विणूयुक्त / पर्णगुच्छ ग्रस्त झाडे नट करावीत.
मावा किडीच्या नियंत्रणाकरीता निमॅझाल (2.5 मिली/लिटर पाणी) किंवा डायमेाोएट 0.05 टक्के (2.5 मिली/लिटर पाणी) किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी (2 मिली/लिटर पाणी) पानांच्या देठामध्ये फवारावे. 
बेनेप्रक्रिया केल्यावरच लागवड करावी. 
खोडवा व आंतरपिके घेण्याचे टाळावे.
 
5. केळी फळावरील फुलेकिडे : प्रौढ व बाल्यावस्था फळे अपरिपक्व असतांना साल खरवडून त्यातील अन्नरस करतात व फळांवर अंडी घालतात. त्यामुळे फळांवर परिपक्व होतात तेव्हा लाल तांबे-यासारखे चट्टे पडतात. तांबे-यासारखे चट्टे हाताला खरबडीत लागतात. आणि नंतर त्याठिकाणी बारीक बारीक तडे पडतात. तापमान जास्त असणा-या दिवसामध्ये प्रादुर्भाव जास्त असतो. फळे पुर्ण परिपक्व झाल्यावर त्यांच्यावर हे लाल तांबे-यासारखे चट्टे दिसतात. पूवन, मॉन्थन, साबा, नेपुवन आणि रस्थाळी यासारखी व्यापारी दृटया महत्वाची वाण या किडीस जास्त बळी पडतात. लाल तांबे-या सारख्या चट्टयामुळे फळांची गुणवत्ता खालावते व अशा फळांना बाजारात भाव फारच कमी मिळतो. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येते या किडीच्या नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडतेवेळी फवारणी घेणे अत्यंत आवयक आहे. जून-जुलै महिन्यात निसवणा-या पूवन, मॉथन आणि चट्टा या वाणांच्या घडावर या किडीचा प्रादुर्भाव फार मोठया प्रमाणावर दिसून येतो.
 
नियंत्रण : फुलकिडींचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून केळफुल बाहेर पडल्याबरोबर त्यास 100 गेज जाडी असलेल्या प्लॅस्टीक पिशवी चढवावी.
किंवा
क्लोरपायरीफॉस 0.05 टक्के (2.5 मिली/लिटर पाणी) केळफुल बाहेर पडते केळी व संपूर्ण फण्या निघाल्यावर आा दोन फवारण्या कराव्यात.
किंवा
इमिडॅक्लोप्रीड 17.8 एस एल (1 मिली/लिटर पाणी) याचं केळफुल सरळ उभे असतांनाच त्यात 2 मिलीचे इंजेकशन द्यावे.
फुलकिडीची कोाावस्था जमीनीत राहात असल्यामुळे जमीनीवर द्रवरूप् बिव्हेरीया बॅसियाना ची (10 मिली/लिटर पाणी) फवारणी करावी.
 
6.फुलांवरील फुलकिडे : केळफुल बाहेर पडून ते उतलेपर्यंत फुलकिडीच्या बाल्यावस्था व प्रौढ अपरिपक्व फळातील व फुलातील अन्नरस शोषून घेत त्यावर उपजिवीका करतात. अन्नरस शोषून केल्यामुळे त्याठिकाणी काळे ठिपके पडतात. त्या किडीची मादी अपरिपक्व केळी फळाच्या सालीत अंडी घालतात. अंडयातून बाल्यावस्था बाहेर पडते तेव्हा त्याठिकाणी अन्नरस व कोरडा झाल्यावर फळांवर हया ठिकाणी उंचवटे तयार होतात. फळे पिकल्यानंतर आा ठिकाणी दुय्यम बुराीची वाढ होवून काळे डाग पडतात. पूवन, नेंद्रन आणि कर्पुरावल्ली हे वाण या किडीस जास्त बळी पडतात.
 
व्यवस्थापन : केळफुल बाहेर पडल्यावर त्याला 100 गेज पॉलीथीनची पिशवी घालावी. त्यामुळे फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. 
संपूर्ण फण्या निसवल्यावर केळफुल तोडून नष्ट करावे.
 
7. पाने खाणा-या अळया : पुंजक्यांनी या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस अंडी घालते. अंडयातून अळी बाहेर पडल्यावर नवीन निघालेली पाने, पोगा किंवा जुने पानांच्या वरचा भाग खरवडून खाते. अळी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी पाने खातांना दिसते. अळी दिवसा पोग्यामध्ये लपून बसते. पोगा मोकळा झाल्यावर खाल्लेला भाग दिसतो. व पान खाल्लेला भाग खरबरीत होतो व लालसर काळया रंगाचे दिसते या पानांचे प्रकाश संलेाण क्रियेवर परिणाम होवून ती खालावते.
 
नियंत्रण : ही किड पुंजक्यांनी अंडी घालत असल्यामुळे ठरावीक झाडावरचा त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो अशी झाडे शोधून काढावीत. 
अंडी पुंजके पानाच्या खालच्या भागावर घालतात. ती शोधून किंवा अळया बाहेर निघालेल्या असल्यास अळयांसह पान कापून नट करावेत.
फेरोमेन सापळे 12 हेक्टरी लावावीत व त्यात आर्किात होणारे नर पतंग गोळा करून नष्ट करावीत. बिव्हेरीया बॅसीयाना पानांवर व पोग्यात फवारावे.
 
नियंत्रण : हाताने गोळा करून अळी व प्रौढ मादींचा नाश करावा. क्लोरोपायरीफॉस (2.5 मिली/लिटर) यांचे द्रावण पानांच्या खालच्या बाजूने फवारावे.
 
11. केळीवरील लेस विंग बग / टिजीड बग : या किडीच्या बाल्यावस्था व प्रौढ पानांच्या खालच्या बाजूस समुहाने राहून अन्नरस शोाण करतात. पानातील अन्नरस शोाण करतात. पानांतील अन्नरस शोाण केल्यामुळे पानाच्या वरच्या भागावर पिवळसर ठिपके पडलेले दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव खालच्या पानांवर सुरूवात होते नंतर वरच्या पानांवर पसरत जातो. सर्व व्यापारीदृटया महत्वाच्या वाणांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
 
नियंत्रण : थायोडॉन 35 इसी (1.5 मिली/लिटर पाणी) पानांच्या खालच्या बाजूवर फवारणी करावी.
 
12. मोसंबी वर्गीय पिठया ढेकूण : ही किड अपरिपक्व फळांवर प्रादुर्भाव करतात. त्यामुळे घडांच्या वाढीवर चांगलाच परिणाम होवून घड चांगले पोसले जात नाहीत. केळीवरील स्टभीक व्हायरस हा विााणूजन्य रोगाचा प्रसार हा कंद किंवा रोपांमार्फत होतो. परंतु त्याचा प्रसार हा या किडीमुळे थोडया फार प्रमाणात होत असतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे व विााणूजन्य रोगाचा प्रसारामुळे केळी बागांचे फार मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. पिठया ढेकणाचा प्रादुर्भाव फरोमेन सापळयाव्दारे निरिक्षण करता येतो. (पिवळे भुंगेरे) कापसावरील पिठया ढेकणाचा प्रादुर्भाव केळी बांगावर दिसून आला आहे. 
 
नियंत्रण : आस्टेलियन लेडी बर्ड बीटल ;बीपसवबवतने दपहीजनेद्ध किडभक्षक व स्मचसवउेंपजग कवबजलसवचप ही परोपजीवी किडी यांचा उपयोग करून या जैविक पध्दतीने नियंत्रणासाठी शिफारस करण्यात आली आहे.
किंवा
बिव्हेरीया बॅसीयाना द्रवरूप (10 मिली/लिटर पाणी) यांचे द्रावण प्रादुर्भावग्रस्त भागांवर फवारणी करावी. तसेच जमीन क्लोरोपायरीफॉस (2.5 मिली/लिटर पाणी) द्रावणाने मुंगळयाच्या नियंत्रणासाठी सिंचीत करावी.
 
13. किडीव्यतिरीक्त नुकसान पोहोचविणारे किड
केळीवरील कोळी ;ज्मजतंदलबीने पदकपबनेद्ध
कोळी पानांच्या खालच्या बाजूस समुहाने राहतात. व त्याठिकाणी पानांमधून रस करून नुकसान पोहोचवतात. सुरूवातीला लालसर तांबडया रंगाचे चट्टे दिसतात. नंतर हे चट्टे पानांत एकत्र होवून नंतर पाने पुर्णपणे वाळतात. 
नियंत्रण :
उन्हाळयात बागांना नियमीत पाणी पुरवठा करून प्रादुर्भाव कमी करावा.
प्रादुर्भावग्र्रस्त पाने कापुन नट करावीत.
कॅलथेन किंवा डायमेाोएट (1.5 मिली/लीटर) द्रावणाची पानांच्या खालच्या बाजुस फवारणी करावी.
 
14. इतर कमी महत्वाच्या किडी :
केळी फळ खरवडून चट्टे करणारे पतंग : हा पतंग टार्टीसीडी या कुटूंबातील असून घंटाकृती पतंग म्हणून ओळखला जातो. अळी रेामी पोकळयांमध्ये राहून फळांची साल खरवडून खाते त्या ठिकाणी लाल काळसर रंगाचे चट्टे तयार होतात. त्यामुळे फळांची गुणवत्ता खालावते आणि त्यामुळे आा फळांना बाजारभाव न मिळाल्याने ोतक-यांचे मोठे नुकसान होते. अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांची लांबी व आकार यांचेवर सुध्दा परिणाम ऐकून उत्पादनात सुध्दा घट येते. मोठया प्रमाणावर लागवड केल्या जाणारे वाण जसे विरूपक्ष कर्पुरावल्ली आणि पूवन या किडीच्या प्रादुर्भावास बळी पडतात. दिंडीगली, नमकुल, तिरूचरापल्ली, तंजावर आणि पुडूकुट्टी हे तामीळनाडू राज्यातील जिल्हयामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. 
 
मोठया आफ्रिकन गोगलगाय : केळी पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव तामिळनाडू राज्यातील विल्युपुरम या जिल्हयात आढळून आला गोगलगायी नवीन आलेला केळीचा पोगाच खाउन टाकतात. अर्धवट पोगा मोकळा झाल्यावर पानांवर खाल्लेल्याच्या खुणा दिसतात.
केळी बागेत छोटे खड्डे खोदून त्यात ओले गोणपाट ठेवावे जेणेकरून सुर्य उगवल्यावर हया गोगलगायी थंडाव्याकडे आर्किात होतात नंतर त्यावर खाण्याचे मीठ टाकावे त्यामुळे त्याच्या शरीरात पाणी कमी होवून त्या मरतात.
 
15. केळी वरील किडीच्या नियंत्रणासाठी खास तयार केलेले तंत्रज्ञान :
केळी फळांवरील फुलकिडे व व्रण करणारे भुंगेरे : या किडीच्या नियंत्रणासाठी सर्व फण्या उमलल्यावर केळफुल तोडून त्या घडावर पॉलीथीनची पीावी किंवा पॉलीप्रोपीलीनची पिावी घातल्यास या किंडीचा प्रादुर्भाव होत कमी होतो.
 
किडीच्या नियंत्रणासाठी केळफुलास इंजेकन : इमीडॅक्लोप्रीक 17.8 इंडोकच्या सहाय्याने द्रावण तयार करून चांगले मिसळायचे आणि यातीन दोन मीली द्रावण इंजेकन व्दारा केळफुल उभट अवस्थेत असतांनाच 30 कोनामध्ये खालील एक तृतीयाां भागात द्यावे इजेकन देतांना 2 मीली द्रावण पुर्णपणे केळफुल मध्ये जाईल याची काळजी घ्यावी केळफुलास दुस-या सुईच्या व्दारे छिद्रे करून त्यामध्ये इंजेकन दिल्यास द्रावण देण्यात किंवा इंजेकनची सुई कचरा अडकून बंद पडणार नाही. 
 
केळी खोडाचे सापळे तयार करणे : घड कापलेल्या झाडाच्या गोलाकार खोडाचे 30 सेमी चे आडवे तुकडे करून नंतर ते मधोमध उभे काप घेवून दोन सारखे भाग करावेत आपल्याला सापळे म्हणून उपयोग होतो.
मजुरांचा खर्च कमी करण्यासाठी केळी खोडाचे सापळे जैविक पध्दतीचा उपयोग करणे. 
 
केळी खोडाचे सापळे तयार करून त्याकडे आर्किात झालेले प्रौढ गोळा करणे त्यांचा नाा करणे यावर होणारा मजुरांचा खर्च वाचविण्यासाठी खोडाचा काप घेतलेल्या भागावर जैविक क्रियााील सुक्ष्म घटकांचा लेप द्यावा जेणेकरून आर्किात झालेले प्रौढ रोगग्रस्त होवून त्यांचा आपोआप नाा होईल. केळी खोडाच्या सापळयांमध्ये खोडाच्या कापलेल्या भागावर बिव्हेरीया बॅसीयाना ही बुराी किंवा किडींना रोगग्रस्त करणारे हेटरोहॅब्टीडीस इंडिका यांच्या द्रावणाचा लेप दिल्यास त्याकडे बागेतील खोड किंवा कंद पोखरणा-या किडींचे प्रौढ आर्किात होवून क्षतीग्रस्त होवून मरतील. त्यामुळे त्यांना गोळा करणे व नट करणे यावरील खर्च कमी होईल. 
 
केळी खोड पोखरणा-या किडीच्या नियंत्रणासाठी इंजेकनचा वापर : या केळी खोड पोखरणा-या किडीच्या नियंत्रणासाठी इंजेकनचा वापर करून किडनाक खोडात सोडून या किडीचे नियंत्रण करता येते. खोडातून डिंकासारखा चिकट पदार्थ स्त्रवतो त्याठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे. यासाठी केळी लागवडीपासून 5 व्या महिन्यापर्यंत याचा उपयोग होतो व एकात्मिक किड नियंत्रणामध्ये ही पध्दत वापरता येते. घड निघाल्यावर या पध्दतीचा वापर तसेच इंजेकनची खोली या गोटी बारकाईने ही पध्दत वापरतांना लक्षात घ्याव्यात. घड निघाल्यावर या पध्दतीचा वापर करू नये. कारण किडनाकाचा फळांमध्ये राहू शकतो.
 
किडींना रोगग्रस्त करणा-या बुराीचे मोठया प्रमाणावर उत्पादन : किडींना रोगग्रस्त करून त्यांचा नाा करणा-या बुरशींचा किडींच्या नियंत्रणासाठी आवयक आहेत. या बुरशीचे मोठया प्रमाणावर उत्पादन ोतावरील घरांमध्ये साध्या सुविधांचा उपयोगात आणून करणे सहज ाक्य आहे. या बुरशीची वाढ भाताचा भुसा किंवा केळीच्या साली, टाकावू पदार्थ किंवा इतर टाकावू पदार्थ स्वच्छ करून घ्यावेत व 4 तास पाण्यात भीजू घालावेत आणि नंतर प्रालीप्रॉपीलीनच्या पिावीत ठेवून 30 मिनीटे शिजवावेत. दुस-या दिवाी पॉलीपॉपीलीन पिावीत सुक्ष्मजंतु नााक स्टेप्टोमायसीन 5 मी.ग्रॅ/500 ग्रॅम किंवा प्रति पिावी आधि 5 मीली बिव्हेरीया बॅसीयाना बुरशी इंजेकशनच्या सहायाने लसीकरण करून मिसळावे. असे लसीकरण केलेली पिावी थंड व कोरडया जागी ठेवावे. हया पिाव्या दर तिस-या दिवाी हलवाव्यात जेणेकरून बुरशीचे बिजाणू सर्व भागांवर त्यांची उगवण होवून बुराीची वाढ होईल. अशाप्रकारे जवळपास 15 दिवस पिशवीत सर्व वापरलेल्या पदार्थावर पांढ-या बुरशीचे वाढ होईल व गरजेनुसार हे मटेरीयल आपल्याला वापरता येईल.