भुईमूगावरील प्रमुख किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण

डिजिटल बळीराजा    22-Aug-2018
 
महाराष्ट्रातील तेलबिया वर्गातील भुईमुग हे एक अति महत्वाचे पीक असल्यामुळे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून भुईमुगावरील कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती या लेखात पाहू.
 
तेलबिया वर्गातील भुईमूग हे महाराष्ट्रातील एक अति महत्वाचे नगदी पीक आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले भुईमूगाचे सर्व सुधारित वाण कमी अधिक प्रमाणात अनेक प्रकारच्या किडी व रोगास दरवर्षी हमखास बळी पडतात असे आढळून आले आहे. त्यापैकी मावा, तुडतुडे, फुलकिडी व पाने गुंडाळणाऱ्या आळ्या या महत्वाच्या किडी आहेत. याशिवाय कांही भागात पाने खाणाऱ्या आळ्या व हुमणी या किडींचा उपद्रव होत असल्याचे आढळून येते. तर साठवणीतील भुईमूगाच्या शेंगा पोखरून खाणाऱ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव अलिकडे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
या सर्व किडींच्या उपद्रवाचा काळ हा मुख्यतः 32 ते 39 या हवामान खात्याच्या आठवड्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) दिसून येतो. विशेषतः या काळात भुईमूगाचे पीक फुलोऱ्यात किंवा आऱ्याच्या अवस्थेत असल्याने पिकाचे नुकसान जास्त होते. तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे सलग तीन वर्षे घेतलेल्या प्रयोगाअंती या सर्व किडीमुळे ‘फुले प्रगती’ या भुईमूगाच्या जातीमध्ये सरासरी 14 टक्के उत्पादनात घट आल्याचे दिसून आले आहे. तसेच या संशोधन केंद्रावरती ‘फुले प्रगती’ या भुईमूग जातीचे किडीपासून संरक्षण कुठल्या अवस्थेत करणे हे पहाण्यासाठी सलग तीन वर्षे एक प्रयोग घेण्यात आला होता त्यावरून असे दिूसन आले आहे की भुईमूग उगवणी नंतर 30 ते 60 दिवसाचा काळा हा सर्व किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचा असून यावेळी जर पीक संरक्षणाची उपाय योजना केली नाही तर उत्पादनात घट येऊन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादन होत नाही.
 
महाराष्ट्रात कांही भागात योग्य हवामान मिळाले तर रोप अवस्थेत मर रोग आणि नंतरच्या वाढीच्या अवस्थेत टिक्का व तांबेरा रोग भुईमूग पिकावर आकस्मात आढळून येतात. या रोगामुळे जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रावर सलग तीन वर्षे केलेल्या अभ्यासात भुईमूगाच्या ‘फुले प्रगती’ या जातीमध्ये सरासरी 23 टक्के तर ‘एस.बी.-11’ या जातीमध्ये 28.7 टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. उन्हाळी हंगामात शेंडा कुजव्या रोग जास्त प्रमाणात आढळून येतो पण खरीप हंगामात त्याचे प्रमाण अल्प असते. फुल किडीच्या सहाय्याने या रोगाच्या व्हाईरसचा प्रसार होतो.
 
भुईमूगावरील प्रमुख किडी :
 
1.मावा
2.तुडतुडे
3.फुलकिडे
4.पाने पोखरणारी
5.पाने खाणारी अळी
6.केसाळ अळी 
7.शेंगावरील ढेकूण 
8.हुमणी 
9.साठवणीतील शेंगा खाणारी अळी 
10.मुळावर गाठी करणारी सूत्रकृमी 
 
भुईमूगावरील प्रमुख रोग :
1.पानावरील ठिपके (टिक्का) 
2.तांबेरा 
3.अल्फा बुरशी (मूळावरील) 
4.करपा 
5.कॉलर रॉट
6.मूळ कुजण्या रोग 
7.टोबॅको स्ट्रीक व्हाररस 
8.देठ व शेंगा मर 
1. मावा : भुईमूगाचे पिकावरील मावा ही अत्यंत महत्वाची किड आहे. तिचा उपद्रव मुख्यत्वे करून खरीप हंगामात जास्त आढळून येतो. विशेषतः पाऊसमान योग्य असेल तेंव्हा भुईमूग फुलोऱ्यात तसेच आऱ्याच्या अवस्थेत असताना जुलै व ऑगस्ट महिन्रात मावा दिसून येतो. या किडीची लहान पिल्ले सुरवातीला फिकट हिरवी असतात. वाढ होईल तशी ती गर्द होतात. पूर्ण वाढलेला मावा पंखी किंवा बिगर पंखी असतो. पंखी माव्याचा रंग गर्द मोरपंखी, तपकिरी किंवा काळा असतो. पंखी तसेच बिगरपंखी मादी नराशी संयोग न होता पिल्ले देतात. विन पंखी प्रकारामध्ये पिल्ले 8 दिवसात 4 वेळा कात टाकून पूर्ण वाढतात आणि 8 ते 17 दिवसांचे जीवनात सुमारे 54 पिलाना जन्म देतात. पंखी प्रकारात पिल्ले 14 दिवसात 4 वेळा कात टाकून पूर्ण वाढतात आणि 8 दिवसात 47 पिलाना जन्म देतात.
 
मावा व त्यांची पिल्ले पिकाच्या वाढणाऱ्या कोवळ्या शेंड्यावर आणि फुलोऱ्यानंतर आल्यावर कोवळ्या पानाचे मागील बाजूस एका ठिकाणी स्थिर राहून आतील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. याशिवाय हे कीटक अंगातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी तयार होते. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. या किडीमुळे ‘रोझेट’ नावाच्या घातुक लसीचा (व्हायरस) प्रसार होतो. माव्याच्या या जातीचा इतर बऱ्याच पिकाना उपद्रव होतो. 
 
2. तुडतडे : हे खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्रात जास्त प्रमाणात दिसून रेतात. कमी पाऊसमान आणि उष्ण हवामानात तुडतुड्यांचा उपद्रव जास्त हानीकारक असतो. पूर्ण वाढलेले तुडतुडे पाचरीच्या आकाराचे असून रंगाने फिकट हिरवट असतात. त्याच्या डोक्याकडील भाग रूंद असून डोक्यावर व पंखावर दोन काळे ठिपके असतात. त्यांची तिरकस चालण्याची रित ही वेगळीच असते. तुडतुड्याची पिल्ले पिवळसर हिरव्या रंगाची व पंख विरहित असतात. एक मादी 8 ते 9 दिवसात सुमारे 25 अंडी पानाच्या शिरेमध्ये घालते. अशी अंडी हवामानानुसार 5 ते 12 दिवसात उबतात व त्यातून लहान पिल्ले बाहेर पडतात. साधारणपणे एक आठवड्यात त्यांना पंख फुटून मोठे होतात. पूर्ण अवस्थेतील तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातील रस शोषतात त्यांमुळे पाने मुरडतात व पिवळसर होऊन वाळतात. बऱ्याच वेळा पानांच्या कडा करपल्या सारख्या दिसतात. परिणामतः झाडाची वाढ खुंटते.
 
3. फुल किडे : महाराष्ट्रात फुल किडीच्या तीन प्रकारच्या उपजाती असून पाऊसमान व जास्त तापमान असेल त्यावेळी काळसर रंगाचे फुलकिडे भुईमूगाच्या नवीन फुटणाऱ्या पालवीवर याहून रस शोषतात. त्यामुळे भुईमूगाच्या खालील पानावर पांढरे चट्टे दिसून रेतात. तर इतर दोन प्रकारच्या फुल किडीमुळे भुईमूगाच्या वरील व मधल्या पानावर पिवळसर चट्टे दिसतात आणि त्यामुळे पाने अत्यंत छोटी राहून ‘शेंडामर’ हा विषाणूयुक्त रोग पडतो. विशेषतः ऑगस्ट व सप्टेंबर तसेच जानेवारी व फेबु्रवारी या महिन्रात या किडीमुळे जास्त नुकसान होते. फुलकिडे मुख्यत्वे पानावरील पापुद्रा खरडून काढतात व त्यातून बाहेर येणाऱ्या रस शोषून घेतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रौढ फुलकिडे आकाराने 10 मि.मि. लांब असतात त्यांच्या पंखाच्या कडेला बारीक केस असतात. पिल्ले पिवळसर हिरवट रंगाची असतात व त्यांना एक दात नसतो. त्यामुळे ती पानावरील भाग खरवडतात त्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसतात. फुलकिडीची मादी पानाच्या खालच्या बाजूतील शिरामध्ये 30 ते 50 अंडी घालते. 2 ते 3 दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर रेतात व तीन वेळा कात टाकून पूर्ण वाढतात. पूर्णावस्था 10 ते 15 दिवस टिकते. अशा रितीने 3 ते 5 आठवड्यात एक पिढी पूर्ण होते व वर्षभरात अनेक पिढ्या पूर्ण होतात.
 
4. पाने पोखरणारी/गुंडाळणारी अळी : भुईमूग व सोयाबीन पिकावर ही किड अति महत्वाची व नुकसानकारक अशी आढळून आली आहे. विशेषतः उन्हाळी हंगामात जिथे भूईमूग घेतला जातो त्या ठिकाणी या किडीमुळे खूप नुकसान होते. अळी आकाराने लहान म्हणजे 5 मि.मि. लांबीची असून पाठीमागचे बाजूस निमुळती होत जाते व रंगाने तपकिरी किंवा फिकट हिरवी असते. डोके व छातीचा भाग गर्द असतो. प्रथम ही अळी पानाच्या वरील पातळ आवरण छेदून आत शिरते आणि पानातील भाग पोखरत जाते त्यामुळे या अवस्थेत तिला पाने पोखरणारी अळी असे म्हणतात. अळीने पानातील हिरवा हरित भाग खाल्ल्रामुळे पानावर पारदर्शक आवरण फक्त दिसते. परंतु अळी जसजशी मोठी होते तसतशी ती पोखरलेल्या भागातून बाहेर येते व शेजारील पाने एकत्र करून तोंडातील लाळेच्या सहायाने चिटकवते व अशा गुंडाळलेल्या पानामध्ये राहून पानांचा हिरवा भाग खाते म्हणून या अवस्थेत तिला पाने गुंडाळणारी अळी असे संबोधतात. अशी गुंडाळलेली पाने वाळून जमिनीवर खाली पडतात व पिकाचे अतोनात नुकसान होते. किडीचे कोष तांबूस करड्या रंगाचे असून 4 ते 5 मि.मि. लांब व 1 ते 1.5 मि.मि. रूंद असतात. पतंग अकाराने लहान असून त्यांच्या पंखाचा रंग राखी असतो व पुढील पंखावर प्रत्येकी एक फिकट पांढरा ठिपका असतो. मादी पतंग मिलनानंतर 1 ते 3 दिवसानी पानावर पांढरी चमकदार एक एक सुटी सरासरी 1869 अंडी घालते. ही अंडी 4 दिवसात उबून अळ्या बाहेर येतात. त्या 9 ते 17 दिवसात पूर्ण वाढतात व पानाच्या गुंडाळ्यात कोषावस्थेत जातात. कोषावस्था 3 ते 7 दिवसाची असते. सुमारे 15 ते 18 दिवसात एक पिढी पूर्ण होते व एका हंगामात बऱ्याच पिढ्या होतात. भुईमूग व्यतिरिक्त या किडीची वाढ चवळी व सोयाबीन पिकावर तसेच बावची सारख्या ताणावर सुध्दा होते. या किडीच्या प्रार्दुभावाने 20 ते 25 टक्के शेंगाच्या संख्येत तर 18 ते 20 टक्के उत्पन्नात घट येते. खरीप हंगामातचांगल्या पाऊसमानानंतर बराच काळ उघडीप पडून तपमान वाढत जाऊन पाण्याचा ताण पिकावर पढतो अशा वेळी किडीची वाढ अमार्याद होते व भुईमूगाचे संपूर्ण नुकसान होते. 
 
5. पाने खाणारी अळी : स्पोडोप्टेरा लिटूरा ही पाने खाणारी अळी अतिशय खादाड व अनेक पिकांवर आढळून येते. विशेषतः खरीप हंगामात या किडीचा प्रादुर्भाव पाऊस सुरू असताना ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे नियंत्रणाचे उपाय करणे कठीण जाते. मादी पतंग कोवळ्या पानाखाली अंडी पुंजक्यात घालते. एका पुंजक्यामध्ये 100 ते 200 अंडी घातली जातात. अळी अवस्था 2 ते 3 आठवडे असते. अळीचा रंग फिकट तांबूस असून डोक्याच्या मागे काळा ठिपका असतो. अळीवर उभ्या रेषा असतात व त्यांची लांबी 3 ते 4 सें.मी. असते. कोषावस्था 9 ते 14 दिवस जमिनीमध्ये असते. प्रौढ पतंगाचे पंख राखाडी तपकिरी असून त्यावर तिरप्या रेषा व पांढरट कडा असतात. मागील पंखाची जोडी पांढरट असते. अळ्या भुईमूगाची पाने मोठ्या प्रमाणावर कुरतडून खातात त्यामुळे पानावर मोठी भोके दिसतात. कांही अळ्या पानावर फक्त शिराच शिल्लक ठेवतात. त्यामुळे पिकाला लागणारे पुरेसे अन्नद्रव्ये तयार होत नाहीत व उत्पादनात कमालीची घट येते.
 
6. केसाळ अळी : या किडीच्या प्रादुर्भावास साधारणपणे ऑगस्ट महिन्रात सुरूवात होते व पीक काढणीपर्यंत ती शेतात टिकून रहाते. किडीच्या लहान अवस्था सुरवातीस 5 ते 6 दिवस एकत्रित राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात त्यामुळे पानावर फक्त शिरांचे जाळेच शिल्लक रहाते. नंतर त्या सर्व झाडावरती पसरून पाने खातात अशा पानावर मोठी भोके आढळून रेतात. या किडीचे पतंग पिवळसर राखी रंगाचे असतात. मादी पतंगाच्या पंखावर काळे ठिपके असतात. असे पतंग निशाचर असल्याने दिवसा आढळून रेत नाहीत. अळ्या सुरवातीस फिकट पिवळसर रंगाच्या असून त्यांचे अंगावर काळे ठिपके असतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या काळपट तांबूस रंगाच्या दिसतात व त्रांच्या अंगावर राखी रंगाचे पुष्कळ केस असतात.
 
मादी पतंग 400 ते 1000 अंडी पुंजक्यामध्ये पानाच्या पाठीमागील बाजूस घालतात. 5 ते 6 दिवसात अंड्यातून अळ्या बाहेर रेतात आणि पानावर उपजिविका करतात. सहा वेळा कात टाकून अळीची 14 ते 20 दिवसात पूर्ण वाढ होते व नंतर जमिनीत मातीत कोष करते. एका पिढीस पूर्ण होण्यास 5 ते 10 आठवडे लागतात व एका वर्षात 7 ते 8 पिढ्या पूर्ण होतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्रापर्यंत अळी सुप्तावस्थेत रहाते. अनुकूल हवामानात किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
 
7. शेंगावारील ढेकूण : पूर्ण वाढलेले ढेकूण तपकिरी गर्द करड्या रंगाचे असून 8 ते 10 सें.मी. लांबीचे असतात. हे ढेकूण शेंगातील रस शोषून घेतात. त्यामुळे शेंगदाणे भरण्याचे प्रमाण घटते शेंगा काढणीनंतर गोदामात ही किड आढळून येते. मादी पांढरी अंडी जमिनीत घालते. अंड्यातून 9 दिवसात फिकट पांढऱ्या रंगाचे ढेकूण बाहेर रेतात. नंतर 3 ते 4 आठवड्यात ते प्रौढावस्थेत जातात. अशा तर्‍हेने 7 आठवड्यात या किडीची एक पिढी तयार होते. अशा साधारण 6 ते 7 पिढ्या एका वर्षात तयार होतात.
 
8.हुमणी : हंगामातील पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे कोषावस्थेतून सारंकाळी बाहेर येतात. बाभूळ, कडूनिंब इत्यादि झाडावर बसून पाला खातात. झाडावरच 5 ते 10 मिनिटे नर मादीचे मिलन होते. सूर्योदयापूर्वी भुंगेरे परत जमिनीत जाऊन लपतात. 2 ते 3 दिवसात मादी भुंगेरा जमिनीत अंडी घालण्यास सुरवात करते. एक मादी 50 ते 60 एक एक सुटी पांढरट व लांबट गोल अंडी जमिनीत 12 ते 15 सें.मी. खोलीवर घालतात. अंडी 9 ते 12 दिवसात उबून त्यातून हुमणीच्या अळ्या बाहेर रेतात. सुरवातीस अळी कांही दिवस सेंद्रिय पदार्थावर जगते व नंतर पिकाच्या मुळावर हल्ला करते. अळी रंगाने पिवळसर असते. ही अळी 6 ते 8 महिन्रात 3 ते 5 सें.मी. लांबीची होते व तीन वेळा कात टाकून पूर्ण वाढते. पूर्ण वाढलेली अळी पांढऱ्या रंगाचा अर्धचंद्र आकाराची असते. तोंडाचा जबडा दणकट व गडद तांबूस रंगाचा असतो. अळी जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था 20 ते 25 दिवस असते. भुंगेरे 80 ते 90 दिवस जगतात. अळीने नुकसान केलेली भुईमूगाची झाडे पिवळी पडून वाळतात व उत्पादनात घट येते.
 
9. साठवणीतील भुईमूग शेंगा पोखरणारा भुंगेरा : शेतातून काढणी केल्यानंतर भुईमूग बाजारात विकण्याच्या वेळेस शेतकर्‍रांना पाहिजे तसा भाव मालास मिळत नाही. अशा वेळेस भुईमूग साठवून ठेवणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरते. साठवणीतील भुईमूग शेंगावर जवळ जवळ 100 किडींची नोंद झालेली आहे. परंतु अलिकडील काळात भुईमूगाच्या शेंगा पोखरणारा भुंगेरा ज्याला इंग्रजीत कॅरिओडॉन सिरॅटस असे कीटकशास्त्रीय नाव असून साठवणीतील भुईमूगावर एक नवीनच समस्या शेतकर्‍रांपुढे उभी राहिली आहे. या भुंगेऱ्यामुळे जवळजवळ 100 टक्केपर्यंत नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
 
हा भुंगेरा प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील आशिया आणि आफ्रिका उपखंडात आढळून रेत असून याचे प्रजनन व अमर्याद वाढ ही चिंचेच्या झाडावरील चिंचोक्रांवर जास्त प्रमाणात तसेच काढणी केलेल्या भुईमूगाच्या शेंगावर अथवा शेंगदाण्यावर होते. महत्वाचे म्हणजे हा भुंगेरा ही एकमेव अशी कीड आहे की जी शेंगा पोखरून आतील शेंगदाणा खाते. या किडीचा पूर्ण वाढलेला भुंगेरा 4 ते 7 मिली मिटर लांबर असून रंगाने विटकरी तपकिरी असतो. या भुंगेऱ्याच्या दोन्ही पंखावर गर्द पण अनिरमित अशा खुणा असतात. या भुंगेर्‍रांना मोठे व स्पष्ट डोळे असून साठवणीतील इतर किडीपेक्षा वेगळे ओळखण्यासाठी पाराची मागील बाजू जाडसर असून पार काटेरी कंगव्यासारखे दिसतात.
 
काढणी केलेले भुईमूग जेंव्हा शेतात किंवा जवळील जागेत उन्हात वाळत घालतात अशा ठिकाणी भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो. या भुंगेऱ्याची मादी ही शेंगाच्या टरफल्याच्या आवरणावर तसेच शेंगदाण्याच्या बाहेरील बाजूस चिटकून अतिसुक्ष्म अशी पांढरी अंडी घालते. अंड्यातून जेंव्हा अळी बाहेर पडते तेंव्हा लगेचच अळी टरफले अथवा शेंगदाण्यास पोखरून उपजीवीकेस सुरूवात करते. प्रत्रेक अळी वैयक्तिकरित्या सर्वसाधारणपणे कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 3 ते 5 शेंगदाणे खाते. जेंव्हा अळीची वाढ पूर्ण होते तेंव्हा अळी किंचीत किंवा पूर्णपणे शेंगदाण्यातून बाहेर पडते व बाहेर पडतांना मात्र सहज लक्षात रेण्यासारखे जवळ जवळ 3 मिली मिटर व्यासाचे छिद्र टरफलास करते. अळी ही साठवणीतील ढिगाऱ्याच्या तळाला सरकत जावून पांढऱ्या पारदर्शक गोल व लांबट अशा कोषावस्थेत जाते. या किडीच्या नवीन रेणाऱ्या पिढीपासून होणारे नुकसान हे साठवणीत खूपच मोठ्या प्रमाणावर होते. सर्व साधारणपणे या किडीच्या उपजिवीकेकरीता 25 ते 35 डिग्री सेल्सीअस एवढे तापमान व 70 टक्के हवेतील आर्द्रता योग्य असते. परंतु वातावरणातील तापमान 15 डिग्री सेल्सीअसच्या खाली अथवा 40 डिग्री सेल्सीअसच्या वर गेले तर या भुंगेऱ्याचा साठवणीतच नैसर्गिकरित्रा नाश झाल्याचे आढळून आले आहे.
 
या भुंगेर्‍रांची साधारणपणे महिन्रातून 1 पिढी पूर्ण होते. प्रत्रेक मादी भुंगेरा 5 ते 12 अंडी शेंगदाण्यावर किंवा टरफल्यावर अधांतरीत घालते. ही अंडी 4 ते 6 दिवसात उबल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते. अळी अवस्था 12 ते 16 दिवस राहते व नंतर शेंगदाण्यावर किंवा टरफल्याच्यावरील बाजूस कोषावस्थेत जाते. कोषावस्था साधारणतः 4 ते 7 दिवस टिकते व पूर्ण वाढ झालेला भुंगेरा सर्वसाधारणपणे 15 ते 25 दिवस जगतो. या भुंगेऱ्याच्या निरंत्रणासाठी खालील उपाययोजना केल्यास भुंगेऱ्यास आळा बसतो.
 
1)शेंगा साठविण्यापूर्वी त्रा कडक उन्हात वाळवाव्यात.
2)जुनाट व नवीन शेंगा एकत्र साठवू नरेत.
3)भुंगेरेग्रस्त शेंगा किंवा शेंगदाणे, तसेच भुंगेऱ्याच्या प्रौढावस्था आणि कोषावस्था गोळा करून नाश करावा.
4)शेंगा साठविण्याच्या ठिकाणी भिंतीवर, जमिनीवर तसेच साठविण्याच्या पोत्रावर 0.5 टक्के प्रवाही मेलॅथिऑनची फवारणी करावी. 
5)भुंगेऱ्याचा उपद्रव झालेला दिसल्यास तात्काळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅल्रुमिनिअम फॉस्फाईड (सेल्फॉस) च्या 3 ग्रॅमच्या 2 ते 3 गोळ्रांची प्रती टनास या प्रमाणात धुरी द्यावी.
 
 
भुईमूगावरील रोग : आद्रतारुक्त हवामान, वारा, रोपांची जास्त संख्या यामुळे पिकात हवा खेळण्याचे कमी झालेले प्रमाण या बाबी रोगास आमंत्रित करतात. भुईमूगावर बुरशीमुळे होणारे पानावरील ठिपके (टिक्का) व तांबेरा हे दोन प्रमुख रोग आढळून रेतात. ह्या रोगाशिवाय जमिनीतील व बियावरील रोग कारकामुळे बी कुजणे, भुईमूगाची रोपे वाळून अथवा कुजून जाणे इत्यादी रोगाचे प्रकार ही आढळून येतात पण त्यांचे प्रमाण कमी असते.
 
1. टिक्का रोग : हा रोग बुरशीपासून होतो. ह्या रोगामुळे पानावर ठिपके पडतात. म्हणून यास टिक्का रोग असे म्हणतात. सुरवातीला या रोगाची लक्षणे फक्त पानावरच आढळून येतात. पानावर दोन जातींच्या बुरशीमुळे वेगवेगळ्या आकाराचे ठिपके दिसून रेतात. भुईमूगाची वाढ झाल्यानंतर पानावर गोलाकार किंवा वेळेवाकडे, तांबूस करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात व अशा ठिपक्यांची वाढ होऊन ते एकमेकात मिसळून जातात. या ठिपक्याभोवती सुरवातीस पिवळे वलय दिसून येते. अनुकूल हवामानात झाडाच्या जमिनीवरील सर्व मुळे पाने कमजोर होतात व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाने गळून पडतात. याचा फलधारणेवर व शेंगाच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. 
 
या रोगकारक बुरशीची बीजे जमिनीवर गळून पडलेल्या रोगट पानावर, फांद्यावर बरेच दिवस राहू शकतात. म्हणून पीक काढल्यानंतर शेतातील रोगट पालापाचोळा जाळून नष्ट करावा.
 
टिक्का रोगाचा प्रादुर्भाव दिसून लागताच कीटकनाशकाचे फवारणीच्या वेळेस पाण्यात मिसळणारे 80 टक्के गंधक 2 किलो किंवा डारथेन एम 45-1 किलो बुरशीनाशक औषध 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. जरूर वाटल्यास दोन आठवड्यांनी वरीलप्रमाणे बुरशी नाशकाची दुसरी फवारणी द्यावी. 
 
2. तांबेरा : अलिकडे हा रोग भुईमूगावर पडत असल्याचे आढळून आले आहे. सुरवातीला जमिनी लगतच्या पानावर नारिंगी रंगाचे लहान, गोलाकार आकाराचे ठिपके आढळून रेतात. अनुकूल हवामानात ठिपक्रांची वाढ होऊन त्रात असंख्य बुरशींची बीजे तयार होतात व ही बीजे वाऱ्याच्या सहाय्याने सर्वत्र फैलावतात. रोगाची तीव्रता जास्त झाल्यास व त्राच वेळेस पानावर टिक्का रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास मोठ्या प्रमाणावर पानांची गळ होते. याचा अनिष्ट परिणाम फलधारणा व शेंगाचे आकायावर होतो.
 
या रोगाने शेंगा पिवळसर तपकिरी पडतात. बऱ्याचवेळा अकाली पानगळ होते. दाण्रांच्या वजनात लक्षणीर घट होते व हेक्टरी उत्पादन घटते. तांबेरा प्रभावित भागात (सांगली, सातारा व कोल्हापूर) पेरणी शक्यतो 15 ते 25 जूनच्या दरम्यान करावी. फुले अग्रणी सारखा रोगास बळी न पडणारा वाण वापरावा. प्रोपीकानॅझॉल किंवा हेक्झा कोनॉझॉल यापैकी एखादे बुरशीनाशकाची फवारणी 1 लिटरला 1 मिली या प्रमाणात करावी. पिकाच्या अवस्थेनुसार 1 ते 2 फवारण्या 15 दिवसाचे अंतराने गरजेनुसार घ्याव्यात. टिक्का व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास 25 ग्रॅम मॅन्कोझेब (डारथेन एम-45) + 25 ग्रॅम बाविस्टीन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 
नियंत्रणाचे उपाय : 
1)रसशोषण करणाऱ्या किडी (मावा फुलकिडे तुडतुडे ) : 5 ते 10 मावा प्रति शेंड्यावर, 15 ते 20 तुडतुडे प्रति झाड, 5 फुलकिडे प्रति शेंड्यावर. डारमेथोएट 30% ई.सी.10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. बीजप्रक्रिया केली गेली नसेल अथवा उपद्रव पेरणीनंतर 30 दिवसापासून पुढे आढळल्यास ट्रारझोफॉस 40% प्रवाही 12.5 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.पावसाने पेरणीनंतर दिर्घकाळ उघडीचे दिली अथवा पीकास पाण्याचा ताण पडल्यास उपद्रव अधिक वाढतो. नत्ररुक्त खतांची मात्रा शिफारशीहून अधिक देऊ नका. 
 
2)पाने पोखरणारी अळी : 10% प्रादुर्भाव ग्रस्त पाने पतंगाना आकर्षिक करून मारण्यासाठी शेतात रात्रीचेवेळी प्रकाश कंदीलचा वापर करावा. डेकोमेथ्रिन 2.8% प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. उन्हाळी भुईमूगानंतर सोयाबीन करणे टाळावे तसेच सोयाबीन नंतर भुईमूग करणे टाळा. 
 
3)केसाळ अळी : 10 अळ्या प्रतिमिटर ओळीत पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी. अंडीपूंज व समुहाने आढळणाऱ्या आळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून अथवा चुरडून नष्ट करा. एस.ओ.एन.पी.व्ही.हा विषाणू तयार करून तो पुढील हंगामात वापरता येतो यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन फवारणीवरील खर्च कमी करता येतो प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे पेरणीनंतर 30-70 दिवसापर्यंत विशेष जाणवतो. ग्रासित झाडाची पाने पांढरी पडलेली आढळतात.
 
4)पाने खाणारी अळी (स्पोडोपटेया) : 10 अळ्या प्रतिमिटर ओळीत पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी. पीकामध्ये हेक्टरी 5 याप्रमाणे स्पोडोप्लरचा वापर करून फिरोमोन सापळे लावा, पीकाच्या कडेने एरंडीची एक ओळ घ्या, व त्यावर लक्ष ठेवून गरजेप्रमाणे किटकनाशक फवारा प्रकाश सापळ्रांची ही शक्य झाल्यास वापर करा. 
 
प्रकाश सापले रात्री 11 वाजता बंद करावेत कारण मित्र किटकांची कार्यक्षमता सुरू होते. 
 
एस.एल.एन.पी. व्ही. 500 एलई अथवा डारक्लोरोव्हास 76% ई.सी. अथवा एन्डोेक्झार्काब 15.8% ईसी 6.6 मिली 10 लिटरपाण्यातून फवारा. नोमूरिआ रिलेई बुरशीच्या वापराने ही अळ्या रोगग्रस्त होऊन मरतात. बदामी रंगाचे किडीचे अंडीपूंज पानावर असतात अळ्या सुरवातीचे 4-5 दिवस समुहाने उपजिवीका करतात. दोन महिन्रापेक्षा अधिक वराचे पीक अळ्रांना विशेष आवडते. पावसाची उघडीप आणि अमावस्रेनंतर दहा-बारा दिवसानी दोन महिन्रापेक्षा अधिक वराच्या पीकात उपाय रोजने अभावी अतोनात नुकसान होते. अळ्या दिवसा लपून रात्री हल्ला करतात. 
 
5)हुमणी : एक अळी प्रति 10 स्क्वेअर मिटर भुईमूग लागवडीपूर्वी खोल नांगरट करावी तसेच पिकाची फेरफालट करावी. 
 
1) कडूनिंब व बाभळीच्या झाडावर जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. 
2) शेणखत व कंपोष्ट खतामध्ये क्लोथनिडीन 50 थऊॠ 250 ग्रॅम प्रति हेक्टरी मिसळावे. किंवा मेटारिझीरम अनीसोपली भुकटीचा वापर करावा. 
3) कार्बोफ्रूरान 3 टक्के दाणेदार 33 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे.
4) खुरपणी करताना अळ्या नष्ट कराव्यात. हुमणीच्या जिवनात भुंगेरे हीच अवस्था जमिनी बाहेर काही काळाकरिता बाहेर असते त्यामुळे या अवस्थेवर बंदोबस्तासाठी लक्ष केंद्रित करावे.
प्रा.डॉ. शहाजीराव घोरपडे
माजी कीटकशास्त्रज्ञ (तेलबिया)