शेतकर्‍यांनो ! पिकांचे योग्य वाण निवडा

डिजिटल बळीराजा    04-Jun-2018
 
 
यंदा पाऊस भरपूर पडेल परंतु नंतर खंड पडेल, हे भाकीत खरे ठरेल काय याची खात्री वाटेनाशी झाली आहे. मान्सुन अजूनही हुलकावणी देत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांनी लागवडीसाठी पिकांच्या योग्य वाणांची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे.
 
महाराष्ट्रात तृणधान्य, गळीत धान्य, भाजीपाला, फळझाडे मसालावर्गीय पिके, औषधी व सुगंधी वनस्पतींची व इतर अनेक पिके घेतली जातात. या पिकांचे बियाणे, कंद, बेणे, रोप यांची वेळेवर उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची योग्य गुणवत्ता असणे महत्त्वाचे आहे. ऐन पेरणीच्या हंगामाआधी 10-15 दिवस शेतकरी आपल्या शेतात हवे असलेले बियाणे शेजारीपाजारी लावतील ते किंवा कृषी विभाग अथवा कृषी विक्री केंद्राच्या मार्गदर्शनाने विकत घेतो. प्रत्येकाचे ज्ञान व स्वार्थ वेगवेगळा असल्याने व त्याच वेळी खासगी बियाणे कंपन्यांच्या प्रभावी प्रचाराला बळी पडून तो चुकीचे बियाणे निवडतो व शेवटी त्यांचा संपूर्ण हंगाम, वेळ व पैसा वाया जातो.
 
महाराष्ट्रातील सेंद्रियसह सर्वच शेतकर्‍यांनी पिकावरील खते व फवारणीचा खर्च वाचवून समाधानकारक उत्पन्न (उत्पादन नव्हे) मिळविण्यासाठी सर्व पिकांच्या सरळ, सुधारित व संमिश्र वाणांची निवड करावी.
 
पिकांचे सरळ, सुधारित, संमिश्र वाणच का?
नैसर्गिक लहरीपणा (अकाली पाऊस, अवकर्षण, थंडी, गारा, वादळ, धुके), ग्लोबल वॉर्मिंग, जमिनीची घटलेली उत्पादकता इत्यादी कारणांमुळे पेरलेले पीक हाती येईलच याचा भरवसा नाही. खते-औषधांवर केलेला जादा लागवड खर्च परत मिळेलच याची शाश्‍वती नाही. हा विचार करून कृषिक्षेत्रात (खपलेाश ठळीज्ञ चरपरसशाशपीं) पद्धती अवलंबली पाहिजे. त्यासाठी योग्य प्रमाणात लागवड खर्च, मिश्रपीक पद्धती स्वीकारली पाहिजे. झालेले नुकसान पेलवेल ऐवढे तरी पाहिले पाहिजे. त्यासाठी कमी उत्पादनखर्च असलले, पुरेसे उत्पन्न देणारे, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीला तोंड देणारे वाण निवडले पाहिजे. पिकाचे पारंपरिक वाणाचे बियाणे शोधून, गोळा करून वाढवावे लागेल. सरळ, सुधारित व संमिश्र वाण महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठांत उपलब्ध आहे. त्यांची संपूर्ण यादी गुणधर्मांसह मॉफकडे उपलब्ध आहे. एकदाच हे बियाणे विकत घेऊन निवड पद्धतीने शेतकरी पुढील हंगामासाठी वापरू शकतात व बियाण्यावर दरवर्षी होणारा खर्च वाचवू शकतात. 2-3 वषार्ंनंतर या बियाण्याची एकमेकात देवाणघेवाण करून त्याची गुणवत्ता कायम ठेवू शकतात. विदर्भातील ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील बहुसंख्य बी.टी. कापूस लावलेले शेतकरी आहेत. भरपूर लागवड करून नंतर नुकसान झाल्यामुळे कर्ज वाढले व नैराश्याने गळफास घ्यावा लागला, अशी अनेक उदाहरणे आहेत, परंतु एकाही सेंद्रिय शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची पाळी आली नाही, ही उल्लेखनीय बाब आहे.
 
 
कोणते बियाणे टाळावे?
विविध पिकांचे संकरीत व खासगी बियाणे कंपन्यांचे संशोधित वाण  जनुक परावर्तित टाळावे.
 
संकरित बियाणे
कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व खासगी बियाणे कंपन्या संकरित बियाणे वापरण्याची शिफारस करतात. ज्वारी, मूग, भुईमूग, भाजीपाला इत्यादी पिकांच्या संकरित जातीचे बियाणे 200 रुपयांपासून 20,000 रु. किलोप्रमाणे विकले जाते. शेतकरी ते पेरतात. काहींना यशही येते तर काहींना अपयश, परंतु शेतकर्‍यांना मात्र दरवर्षी दुकानात जाऊन नवीन बॅग विकत आणावीच लागते. त्याऐवजी वरील वाण वापरले तर शेतकरी स्वत:चे बियाणे शेतावरच उत्पादन करून दुकानदारांचे खिसे कापण्याचे काम टाळू शकतो. कापसाचे एन.एच. 615, पी.एच. 348 (यमुना), पी.ए. 402 (विनायक), तुराब, रजत ही बियाणे कमी लागवडखर्चात जास्त नक्त उत्पन्न देणारे वाण आहेत. संकरित वा बीटी कापसाच्या मागे लागण्यात अर्थ नाही. प्रत्येक पिकाच्या बाबतीत संकरित नसलेली वाणे उपलब्ध आहेत. भाजीपाल्याचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की संकरित वाण जास्त उत्पन्न देणारे नव्हे तर रासायनिक खतांना जास्त प्रतिसाद देणारे आहेत. 
 
संशोधित वाण
खासगी बियाणे कंपन्या बाजारात विविध वाण विक्रीला आणत आहेत. दरवर्षी नवनवीन बियाणे ते बाजारात आणतात. आकर्षक जाहिराती, प्रचंड उत्पादन असल्याचे खोटे फोटो व शेतकर्‍यांच्या बनवलेल्या यशोगाथा इत्यादी मार्गांनी शेतकर्‍यांना प्रभावित केले जाते व एक-दोन हंगामांत पैसा वसूल होतो. परंतु हे वाण सातत्याने दरवर्षी उत्पादन देत नाही त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होते. बहुतांश खासगी कंपन्या संशोधित वाण आणून अशी फसवणूक करत आहेत. ह्या वाणात सातत्याने दरवर्षी तेवढेच उत्पन्न देणारी आनुविंशकता नसते, म्हणून शेतकर्‍यांनी हे बियाणे घेण्याचा धोका पत्करू नये. हे बियाणे दरवर्षी त्याच कंपनीकडून विकत घ्यावे लागेल. त्यामुळे बियाणे कंपन्याच जगतील व सध्या हेच होत आहे.
 
जनुक परावर्तित पिकांचे वाण
अत्याधुनिक विज्ञानाच्या आधाराने प्रयोगशाळेत एखाद्या पिकाच्या बियाण्यात विशिष्ट गुणधर्म असलेले जनुक घालून तयार केलेल्या पिकाला जनुक परावर्तित पिके म्हणतात. विशिष्ट गुणधर्म म्हणजे कीड / रोगाला (उदा. बोंडअळी, खोड किडा, मर, करपा रोग इ.) प्रतिकारक / प्रतिबंध करणे अथवा तणनाशक सहन करणे (तणनाशक फवारले तरी तण मरतील परंतु पीक ते सहन करते). बी.टी. कापसाचे उदाहरण सर्वांना माहीत आहे. बॅसिलस युरिनर्जेसिस (बी.टी.) हा जमिनीत राहणारा जिवाणू एंडोटॉक्सिन नावाचे प्रथिन तयार करतो, जे अळीसाठी घातक आहे. हा जिवाणू कापसाच्या बियाण्यात टाकला गेला आहे. त्यामुळे या जनुक परावर्तित बी.टी. कापसावर बोंडअळी आली तर तिचा घसा सुजतो व ती मरते. रावुंडअप पेडी कॉटन, रावुंड अप रेडी सोयाबीनसारख्या जनुक परावर्तित पिकावर तणनाशके फवारली तरी अनुक्रमे कापूस व सोयाबीन पिकाला नुकसान न होता तण मात्र मरतात.
 
भारतात एकूण 12 शासकीय व खासगी संशोधन केंद्रामध्ये एकूण 23 पिकांना (उदा. कापूस, मिरची, वांगे, सोयाबीन, भेंडी, भुईमूग इ.) जनुक परावर्तित करणे चालू आहे. शासकीय संशोधन केंद्र तसेच अंकुर, सिर्जेटा, महिको, नाथ, तुलसी, गंगा, रूलिज, प्रोअ‍ॅग्रोसारख्या खासगी कंपन्या असे जी.एम.सी. उत्पादन करण्यात आघाडीवर आहेत. ही पिके विशिष्ट कीड अथवा रोगास प्रतिबंध करणारी असली तरी या पिकांच्या सेवनाने (सरळ अथवा प्रक्रियायुक्त) अथवा लागवडीमुळे कृषी, मानव व पशुधनाच्या आरेाग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी हे सुरक्षित आहेत हे जगात कुठेही अधिकृतरीत्या सिद्ध झाले नाही. उलट, त्याचे नेमके कोणते दुष्परिणाम होतात याची (पुराव्यासह) अनंत उदाहरणे / प्रयोग उपलब्ध आहेत. जी.एम.सी. सुरक्षित असल्याचा दावा फक्त उत्पादक बियाणे कंपन्याच करीत आहेत, अन्य कुणीही नाही, हे या ठिकाणी गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे.
 
जी.एम.सी. हा स्वतंत्र, मोठा तपशील असणारा विषय आहे. त्यासाठी वेगळा मोठा लेख लिहिता येईल. जैव तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामाची एकूण 35 कारणे तपशिलासह उपलब्ध आहेत. या प्रसंगी एवढेच नमूद करावेसे वाटते, की केवळ बलाढ्य आर्थिक ताकद असणार्‍या आंतरराष्ट्रीय बियाणे उत्पादक कंपन्यांचा राज्यकर्त्यांच्या संगनमताने शेतकर्‍यांना परावलंबनाकडे नेण्याचा हा कट आहे. त्यात कंपन्या व धोरणकर्त्यांचा लाभ आहे व इतर सर्वांचे (शेती, शेतकरी व ग्राहक) नुकसान आहे. खरीपच्या हंगामात शेतकर्‍यांनी पिकांच्या सरळ, सुधारित व संमिश्र वाणास प्रथम प्राधान्य द्यावे. संकरित वाणांना दुय्यम प्राधान्य, तर जी.एम. (बी.टी.) वाण अजिबात नकोत. महाराष्ट्रातीलचा कृशी विद्यापीठांना शिफारस केलेल्या तृणधान्य, कडधान्य,तेलबिया, फळझाडे, भाजीपाला व चारापिकांचे खालील वाण निवडावेत -
 
पिकांचे योग्य वाण 
 
1 ज्वारी
हलक्या जमिनीसाठी - फुले अनुराधा, सिलेक्शन - 3
मध्यम जमिनीसाठी - फुले चित्रा, फुले माउली
भारी जमिनीसाठी - फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही. -22
बागायती जमिनीसाठी - फुले रेवती, सी.एस.व्ही. 1818, पी.के.व्ही. 801, पी.के.व्ही 809, एस.पी.व्ही. 1616 रब्बी ज्वारी - मालदांडी 3551, फुले अनुराधा, फुले वसुधा, फुले रेवती, फुले यशोदा, फुले माउली, फुले चित्रा, परभणी मोती
लाह्यासाठी ज्वारी - फुले पंचमी
 
2 बाजरी
पी.सी. - सबुरी (परभणी संपदा), बाजरी 2240 (गोसावी प्रतिबंधक)
 
3 नागली हळवी
- दापोली नं.1, निमगरवी - शारदा, ई.31, गरवी - हंसा, आ युटी - 2, कोकण सफेद
 
4 भात
सुगंधा, अविष्कार, पराग, फुले, समृद्धी, अांबेमोहर, इंद्रायणी, कोळंब, कृष्णा, वैभव, नारा, नीला, सुरक्षा
 
5 मका
प्रभात, शक्ती, मांजरी, किरण, पंचगंगा, नवज्योत, आफ्रिकन टॉल
 
6 कापूस
एन एच 615, एन.एच. 630, पी.एच 348, फुले जे. एल.ए. 794, फुले 688, फुले धन्वंतरी, फुले अनमोल (देशी 2011)
 
7 गहू
जिराईत पेरणीसाठी : पंचवटी,  शरद (2197-16)
जिराईत व मर्यादीत सिंचन : नेत्रावती ( - 1415) 108 दिवस व
बागायती वेळेवर पेरणीसाठी : तपोवन ( - 917)
गोदावरी (- 295), त्र्यंबक (-301)
बागायत उशिरा पेरणीसाठी (-34 )
कुदरत -9, कुदरत  16
 
8 मूग
बी.पी.एम. आर - 145, वैभव बी -4, टी -44, जनकल्याणी (रघुवंशी)
 
9 उडीद
बी.डी.यू.-1, टी. ए.यू -1
 
10 नाचणी
फुले नाचणी
 
11 करडई
एस.एस.एफ - 658, जे.एस.आत. - 7, 73, जे. एस.एफ. 97, पी.बी.एन.एम - 40, को. -1 (बिनकाटेरी)
संकरित - डी.सी.एच 129, एम.के.एच. - 11, एन.आर. एस.ए. 521, पी.एच-6
 
12 हरभरा
पी.के.व्ही. -2, विजय, विशाल, बी.डी.एन 979, जे.एल. -11
 
13 तूर
बी.एस.एम.आर - 736 (लाल), बी.एस.एम. आर 853, (पांढरी), विपुला, आय.सी.पी.एल. -87, कुदरत - 3, बी.डी.एन. - 711, (नवीन - 150 दिवसांची)
 
14 भुईमूग
टी.ए.जी.24, टी.जी 26, टी.जी. 526, टी.एल. जी. 45, टी.पी.जी. -41, फुले उनप जे एल 501, स्पॅनिश, फुले न्यास, टी.जी. - 19, कराड, फुले आर.एच.आर.जी - 6021 (उन्हाळी)
 
15 सूर्यफूल
एस.एल. - 11, एस एस 56, पी के व्ही एस एफ -1, फुले रविराज, भानू
 
16 सोयाबीन
एस एल -11, एम ए यु एस - 71, एम ए यु एस - 81, एम ए सी एस 450, एम ए सी एस 124, पी के 1029, एम ए सी एस - 1188 (100 दिवस -24 क्विंटल / हे.)
 
17 करडी
पी बी एन एस -12, पी बी एन एस - 40, ए के एस 217, ए के एस - 31, जे एल एस एफ - 414, एस एस एफ - 658
 
18 एरंडी
गिरिजा, डी सी एस -1
 
19 मोहरी
पुसा बोल्ड, ए सी एस - 1, वरुण, सौरभ
 
20 वाटाणा
बोनोव्हिला , सिलेक्शन - 93, रचना, आर्केल
 
21 कांदा
पी के व्ही सिलेक्शन, फुले समर्थ, पूना फुरसुंगी, अ‍ॅग्रो फाऊंड लाईट रेड, एन - 2-4-1, भीमा सुपर, भीमा राजा, भीमा रेड (राजगुरुनगर) रब्बी हंगाम - भीमा किरण, भीमा शक्ती, भीमा श्‍वेता, पंजाब सिलेक्शन, पुसा रतानार, पुसा माधवी, पुसा रेड, अर्क निकेतन
 
22 लसूण
जी -41, सिलेक्शन -1, जी-50, जी-223- जी-313, फुले बसवंत,श्‍वेता, गोदावरी, यमुना, सफेद, अ‍ॅग्रीफाऊंड व्हाईट
 
23 मिरची
लाल मिरची - सी.ए.960, पंत सी-1, जी - 3, एक्स 235, जयंती, अग्निरेखा, फुले सूर्यमुखी, फु. ज्योती
 
24 भेंडी
फुले उत्कर्षा, फुले किती, ए.के.ओ.व्ही. - 97-16, पी.बी.एन.ओके-1 (परभणी)
 
हिरवी मिरची  - ज्वाला एन.पी. 46, ए उन्हाळी - ज्वाला एन.पी. 46-ए
 
25 वांगे
पुसा हरीता, कृष्णा, परभणी, यशश्री, अरूणा, पुसा क्रांती, मांजरी गोटा, रूचिरा, पुसा पर्पल रावूंड,पु.प. लाँग, पु.प. क्लस्टर, फुले अर्जुना (आर.बी.एस-9), - संकरीत, वैशाली, प्रगती
 
26 चवळी फुले पांढरी, फुले दोफसली, कोकण सदाबहार, अजित -22, जे.सी. -3, व्ही.एस.एम. -8
 
27 राजमा सुयश, वरूण
 
28 दुधी भोपळा सम्र्राट
 
29 काकडी हिमांगी, फुले शुभांगी, फुले प्राची, पूना खिरा, शीतल, पुसा संयोग
 
30 घेवडा फुले सुयश, वरूण, एच पी. आर - 35
 
31 मुळा पुसा केतकी, पु.देशी, पु.रेशमी, पु. हिमानी, जपानीज व्हाईट, पंजाब सफेद, कल्याणपूर नं.1, जोनपुरी, अर्का निशांत, चायनीज रोग, आय.एच.आर.आय - 1, रॅपीड (लाल) इ.
 
32 फुलकोबी लवकर येणार्‍या - पुसा कातकी, पु. दीपाली, अर्ली कुंवारी, अर्ली पाटना मध्यम मुदतीच्या ड्ढ सुधारित जपानी, आघानी, पुसा सिंथटेक, पुसा गुभा उशिरा येणार्‍या, स्नो बॉल - 16, स्नो बॉल -1, इसीं 12013
 
33 टोमॅटो पुसा रूबी, रोमा, पंजाब, छुआरा, पुसा गौरव, अरका सौरभ, वसुंधरा, राजश्री, फुले राजा (संकरित)
 
34 पानकोबी गोलगड्डे - गोल्डर एकर, प्राईड ऑफ इंडिया सपाटे गड्डे - पुसा ड्रमेहड, अर्ली ट्रम हेड
 
35 तीळ खरीप - ए के टी - 64, अर्धरब्बी -एन - 8, उन्हाळी - एके टी 101, पी के व्ही एन टी - 11-91
 
36. कारळ फुले काराळा, आय जी पी एन, सह्याद्री
 
37 बटाटे कुफरी चंद्रमुखी, कु. ज्योती, कु. जवाहर, कु. लवकर, कु.चिपसोना-1,2 कुफरी पुखराज
 
38 कोथिबीर सी एस - 2,4,6, व्ही - 1, व्ही-2, युडी - 41, सी.ओ -1,2, जळगाव धने, वाई धने
  
39 वाल कोकण भूषण, जी के - 1,3 (फुले सुरुची)
 
40 आले (आद्रक) महिमा, रिओडी जानेरिओ, कालिकत, स्थानिक
 
41 हळद सेलम, टेकुरपेटा, कृष्णा, फुले स्वरूप
 
42 कुळीथ सीना, मर्ची
 
43 मटकी एम बी एास - 27
 
44 शेवगा कोईमतूर - 1,2, पी के एम 1,2 कोकण रूचिरा, ओडीसी (फुल, फळ, शेंगा एकाच वेळी)
 
45 रताळी कोकण अश्‍विनी, वर्षा, श्रीवर्धिनी
 
46 साबुकंद एन-22, एन 165, श्रीप्रकाश, एस - 1310, पेट्टी पुरम, श्री विजय, टी.सी-5, सी.आय. 649
 
47 जवस एन.एल. 117, 97, 142, 165, 260 पी के एन एल - 260
 
48 ऊस फुले 265, सी ओ 94012, सी ओ 86032, सी ओ 8094, सी ओ एम 88121, सी ओ सी 671, सी ओ 7527
 
49 चारापिके मराठवाडा - सी ओ 86032, सी ओ 94012, सी ओ सी 671, सी ओ व्ही एस आय 6805, सी ओ एम 265
- तांबेरा भागात सी ओ 671, 7527 लावू नयेत.
- पाणी कमी असेल तर फुले 265 किंवा सी ओ 86032 लावावे.
- उसाच्या रस धंद्यासाठी देशी वाण वाळा व जवारी ( 6 गुंठ्यात 6 टन)
बेणे संपर्क - जगन्नाथ रावळ रा बुगरे आलूर, ता चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक)
लुसर्न - आर.एल. 88, सिरसा - 9, आनंद -2 आणि 3
ज्वारी - रूचिरा, फुले अमृता, मालदांडी 35-1, एसएसजी 59-3, पुसाचारी, एम.पी.चारी. निळवा
बाजरी - जायंट बाजरा, राजको बाजरा
मका - आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, विजय, गंगा सफेद - 2
ओट - फुले हरिता, केंट, जे.एच.ओ - 882
बरसीम - वरदान, मेस्कवी, जेबी-1, जे एच.बी. -146
चवळी - श्‍वेता, ई.सी 4216, बुंदेल लोबिया, यू .पी.सी.5286
संकरीत नेपियर गवत, यशवंत, फुले जयवंत स्टायलो, फुले क्रांती मारवेल, गजराज, दशरथ
 
50 चिक्कू काली पत्ती, क्रिकेट बॉल
 
51 अंजीर पूना अंजीर, दिनकर
 
52 द्राक्ष माणिक चमन, थॉमसन सीडलेस, बेंगलोर पर्पल, शरद, सोनाका, नाम गणेश
 
53 मोसंबी फुले मोसंबी (सिलेक्शन -4)
 
54 लिंबू फुले सरबती, कागदी लिंबू, विक्रम, प्रणालिनी
 
55 काजू वेंगुर्ला -1, वेंगुर्ला - 4,5,6,7,8
 
56 नारळ बाणावली, टी×डी, डी×टी, लक्षदीप, प्रताप
 
57 पेरू लखनौ -49 (सरदार), अलाहाबाद सफेद, अर्का मृदुला
 
58 आवळा कृष्णा, कांचन, चकय्या, नीलम
 
59 करवंद कोकण बोल्ड
 
60 केळी श्रीमती ग्रॅड नैन (टिश्यू), अर्धापूरी, हरसाल, सफेद वेलची, महालक्ष्मी
 
61 अननस क्यू, क्वीन, मॉरिशियस जॉइंट क्यू
 
62 डाळिंब आरक्ता, मृदुला, गणेश, भगवा
 
63 सीताफळ बालानगर, एन एम के -1 (श्री. कसपटे - मो.9822669727)
 
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा -
 
* महाराष्ट्र ऑरगॅनिक फार्मिंग फेडरेशन, पुणे (मॉफ), 
1038/11, बालाजी निवास, फ्लॅट नं. 5,
कॉसमॉस बँक लेन,
दीप बंगला चौक,
मॉडेल कॉलनी, पुणे-411 016.