शेतकर्‍यांच्या खरंच गरजा काय आहेत?

डिजिटल बळीराजा    26-May-2018
 
 
शेतकर्‍यांच्या गरजा शोधण्यापूर्वी
आजकाल शेतकरी दोन कारणांनी चर्चेत आहेत. एक आत्महत्या व दुसरं राजकीय पक्षांच्या निवडणुकींच्या घोषणापत्रात.
 
सार्‍या जगाचे योजनाकार, राज्यकर्ते व बुद्धिजीवी जे शासकीय स्तरावर आहेत. सर्वांना वाटू लागलं आहे की शेतं वाढावी आणि शेतकरी कमी व्हावे. शिवाय शेतकर्‍यांनी शेती सोडून इतर क्षेत्रात रोजगार शोधावे. कारण त्यांच्या मते शेतीमध्ये आता विकास शक्यच नाही.
 
जगभर कार्यरत बहुराष्ट्रीय कंपन्या व बीटी सारखे वाण बनवणारे सांगतात की शेती आता अर्थशास्त्र आधारित उद्योगांच्या ताब्यात आहे.
 
दुर्दैवाने हा विचार प्रखरतेने शासनकर्त्यांच्या मनात आहे आणि तो आम्हाला सशक्त अशा माध्यमात वाचायला, बघायला व ऐकायला मिळतो.
 
समाज सुधारक सतत गरीब आणि श्रीमंत यांच्या वाढत चाललेल्या दरी बाबत बोलत असतात आणि त्यांच्या मते गरीब म्हणजे शेतकरीच.
 
शेतकर्‍यांचे संकट आमची प्राथमिकता असायला हवी आणि आम्ही शेती व शेतकर्‍यांमध्ये सुधारणा कशी होईल याचा सतत विचार करत राहिलं पाहिजे.
 
भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःला शेतकर्‍यांचा हितचिंतक समजतो, पण शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, नापिक शेती आणि मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची शहराकडे धाव वेगळीच कहाणी सांगत आहे आणि हे विदारक सत्य आहे.
 
शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आखलेले शासकीय कार्यक्रम आणि आमच्या कृषि विद्यापीठांमध्ये चाललेले संशोधन काही महत्त्वपूर्ण मुद्दे विसरले आहेत. हे पुस्तक एका इशार्‍यानेच हे सांगत आहे.
 
उत्तरप्रदेशचा बांदा जिल्हा शेतकर्‍यांच्या आजच्या समस्यांचे जिवंत उदाहरण आहे. तिथे कार्य करीत असलेला शेतकरी प्रेमसिंह आणि त्याच्या मदतीला बेल्जियमहून आलेले जोहन डी. हलस्टर बांद्याला ह्युमन एग्रेटियन सेंटर चालवतात, हजारो नागरिकांना महत्त्वपूर्ण असं सांगत आहेत. भारतात शेतीच्या अस्तित्वाला घेवून काही भेदक प्रश्‍न ते आपल्यापुढे मांडतील. या देशात प्रत्येक दुसरा व्यक्ती तुम्हाला सांगेल की तो गावात राहणारा आहे. पण त्याला शेतीचं विचारल्या बरोबर तो पोपटपंची करू लागेल. इतकंच नव्हे गावात राहणार्‍यांनी पण कधीच त्याचा विचार केला नाही.
 
प्रेमसिंह व जोहन तीन मुद्दे तुमच्या समोर मांडत आहेत.
 
1) शेतकर्‍यांच्या परिवाराचं स्वावलंबन
2) आजच्या शेतीचे स्वरूप बदलण्यासाठी हवा असलेला दृढ निश्‍चय व साहस
3) राजकीय, सामाजिक आणि आमच्या समुदायाच्या स्तरावर शेतकर्‍यांची ओळख
 
एके दिवशी मी फोनवर प्रेमभाईला विचारलं काय करतोय? तो म्हणाला स्वप्रेरित शेतकरी नेहमीच धरतीवर स्वर्ग आणण्यात गंतलेला असतो.
 
चला आपण पण त्यांना मदत करू या.
 
आजपर्यंत आमच्या समाजाने कधी ही महिला किंवा पुरूष शेतकर्‍यांची दखल घेतली नाही. इतकंच नव्हे तर आमच्या समाजात शेतकर्‍याचं खरोखरंच स्थान काय आहे यावर गोंधळ जास्त आहे.
 
देशाच्या स्वयंपूर्णतेसाठी शेतकर्‍यांमध्ये स्वाभिमान, आदर आणि आत्मविश्‍वास जागृत व्हायला हवा असं या लेखकांना वाटतं. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा शेतकरी स्वतंत्रपणे मातीची सुपिकता, बी-बियाणं, जल आणि ऊर्जेवर विचार करतील.
निसर्गाशी मधुर संबंध ठेवूनच समाज जिवंत राहू शकतो. शेती हीच खरी तर आपली संस्कृती आहे.
 
आमच्या समाजाची आकृती खरं तर खाली दिलेल्या पिरॅमिडच्या आकाराची आहे.
 
नोकरी (सेवा)
उद्योग
शेती
 
त्याचे 3 मुख्य भाग आहेत. रोजगार, उद्योग आणि शेती. आमच्या भारतीय समाजाची जडण-घडण अशी आहे की शेती आमचा पाया आहे. तो आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा देतो आणि बर्‍याच जीवनावश्यक वस्तू मिळवून देतो.
 
उद्योग त्या नंतर येतात. त्यांना लागणारे साधन निसर्ग देतो. उद्योग समाजाला जीवनावश्यक व चैनीच्या वस्तू तयार करून देतो.
 
जगभर, विशेषकरून विकसित देशात शेतीच्या मानाने उद्योग आणि नोकरी हे क्षेत्र जास्त महत्त्वाचे व आदराचे मानले जातात.
 
बोलकं उदाहरण द्यायचं म्हणजे 2008 डिसेंबर मध्ये गुलबर्गा (कर्नाटक) मध्ये जे घडलं. त्या वेळचे आमचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची एक सार्वजनिक सभा होती. ते तरूणांसाठी नक्कीच एक स्फूर्तीदायक वक्ते होते. त्या दिवशी सभेला 25,000 लोक जमले होतो. आपल्या 45 मिनिटांच्या भाषणानंतर राष्ट्रपतिंनी 5 विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारायची परवानगी दिली. 3 विद्यार्थ्यांनी क्षुल्लक प्रश्‍न विचारले, त्या नंतर 15 वर्षाच्या एका मुलीनी आपल्या लक्षणीय टीकेने राष्ट्रपतींना अचंबित केले. “महाराज तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, वैज्ञानिक व शिक्षक किंवा राजकीय नेता व्हायचा सल्ला देता पण तुम्ही एकाही विद्यार्थ्याला शेतकरी बनायला नाही सांगितले, मग या देशात शेतीचं भविष्य काय राहील?’’
 
राष्ट्रपती अवाक् झाले पण चातुर्याने त्यांनी विज्ञान व तंत्राानाने आपलं शेतीचं उत्पन्न कसं वाढेल हे सांगून वेळ मारून नेली.
पहा! काय स्थिती आहे आमच्या शेतीची आमच्या देशात! तेच आता आम्ही उघडपणे तुम्हाला सांगणार आहोत.
 
स्त्री व पुरूष शेतकरी
आम्ही जेव्हा शेतकरी असं म्हणतो तेव्हां त्यात स्त्री व पुरूष दोन्ही प्रकारचे शेतकरी मोडतात. पण इथे सुद्धा खरं सांगायचे झाल्यास शेतीचा चुकीचा अर्थ लावला जातो. खरं तर पुरूषापेक्षा महिला शेतकरी जास्त काबाडकष्ट करताना दिसतात.
 
नेदरलँड (हॉलंड) चा हरमन वरबीक, जो युरोपियन पार्लमेंटचा माजी सदस्य होता. त्याला मत्स्य आणि शेती यात प्रविण्य स्थान मिळाले होते. तो नेहमी शेतकर्‍यांच्या सभे मध्ये युरोपच्या शेती बद्दल बोलायचा. आपल्या हातात धरलेल्या कॉफीच्या कपामध्ये असलेल्या साखर, दूध व कॉफी पावडरचे उदाहरण देताना सांगायचा की जगभर शेतीची किती दुर्दशा झाली आहे. शेतकरी महिला व पुरूषांची होतअसलेल्या गळचेपीबद्दल बोलताना तो सांगायचा की उत्तर आणि दक्षिण मध्ये उद्योग आणि शेती मध्ये किती विषमता आहे. तो सांगायचा की शेतीमध्ये स्त्रियांचे महत्त्व 60 टक्के आहे. एक शेतकरी ताडकन उठून म्हणाला “तुम्ही चुकत आहात, 60 नव्हे 70 टक्के स्त्रियांचा शेतीमध्ये सहभाग असतो.
 
तुम्ही पुढे पहाल शेतीची काळजी घेणारी व्यक्ती शेतीमध्ये हवी. मग ते पीक असो, माती असो की गुरं ठोरं असोत आणि हे काम स्त्री शिवाय कोण चांगल करू शकेल?
 
शेती हेच आमचं प्राथमिक क्षेत्र आहे
 
अन्न आमची मुख्य गरज आहे. पण शेती तर त्याहून जास्त देते. शेती निसर्गाच्या सान्निध्यात असते आणि आमच्या सर्व गरजा पुरवते. आमच्या दैनंदिन गरजा आहे वन यांचा संबंध जोडत शेती पिकं, माती व पशु यांचा ताळमेळ हाताळते. हे सर्व करत असताना शेती हे पण बघते की शेतीच्या सामर्थ्यासाठी निसर्गाने भरभरून दिलेलं परत कसं करायचे! निसर्गाची ही किमयाच म्हणा की ते देतं जास्त परत घेतं कमी.
 
बघा नं एका ‘बी’ मधून उभा राहिलेला वृक्ष. तो निसर्गाकडून काय घेतो? पोषक तत्त्व आणि तो आम्हाला देतो काय? प्राणवायू, लाकूड, इंधन, सावली, पशु-पक्ष्यांची घरटी, फुलं, कधी-कधी औषधे सुद्धा. या शिवाय जमिनीतून उत्तमोत्तम खनिज वर आणून देतो. पानगळ मार्फत आणि तेच जमिनीचे खाद्य तयार करतात.
 
प्रेमसिंह व जोहन डी. हलसर
(इंग्रजीतून अनुवाद - अरूण डिके)