ऊसपाचटापासून गांडूळखतनिर्मिती व फायदे

डिजिटल बळीराजा    17-May-2018
 
 
जमिनीची सुपीकता टिकवून अधिक ऊस व साखर उत्पादन मिळविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये रासायनिक खताबरोबर जैविक व सेंद्रिय खत दरवर्षी जमिनीमध्ये देणे आवश्यक असते. शेतकरी बंधूंना सेंद्रिय खते दरवर्षी उपलब्ध होत नाहीत. जनावरांच्या कमतरतेमुळे शेणखतांचा दरवर्षी तुटवडा भासत आहे. शिवाय उत्तम दर्जाचे भरपूर शेणखत मिळणे दिवसेंदिवस अशक्य झालेले आहे. त्यामुळे शेणखताला पर्याय म्हणून आपल्या शेतातील दरवर्षी उपलब्ध होणारे उसाचे पाचट या नैसिर्गक साधनाचे आधुनिक तंत्रज्ञानाने एका उत्तम सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करता येते. गांडूळखत हे उत्तम सेंद्रिय खत आहे. गांडूळखतनिर्मितीसाठी गांडुळाला अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे खाद्य द्यावे लागते. त्यासाठी उसाच्या पाचटाचे अर्धवट कुजविलेले सेंद्रिय पदार्थ हे खाद्य म्हणून वापरल्यास त्यापासून उत्तम प्रकारचे गांडूळखत निर्माण करता येऊ शकते. याबाबतचे संशोधन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे झाले असून, उसाच्या पाचटापासून गांडूळखत कसे तयार करावे, याबाबतीत सविस्तर माहिती प्रस्तुत लेखात दिली आहे. 
 
शाश्‍वत शेतीची उद्दिष्ट गाठण्यासाठी गांडूळ मोठ्या प्रमाणात उत्पादन व वापर हे मोठे वरदान आहे. गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता पातळी चांगल्या प्रमाणात वाढते. पिकास समतोल व चौरस आहार मिळतो, तसेच रासायनिक खतांवर पूर्ण अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने गांडूळखत फायदेशीर आहे. गांडूळाला मराठीत दानवे, वाळे, केचवे, शिदोड, कडू अथवा भूदान इ. नावाने संबोधतात. या प्राण्याला इंग्रजीत अर्थवर्म असे नाव आहे. जगामध्ये गांडूळाच्या 3000 जाती आहेत, तर भारतामध्ये 300 जातींची गांडळे आढळून येतात. गांडळाच्या जातींच्या अभ्यासावरून इसिनिरा फेटीडा, रुड्रालीस युजिनी या गांडळाच्या जाती वापरल्यास उत्तम दर्जाचे भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेले गांडूळखत तयार होते. अतिशय नाजूक, मऊ, गुळगुळीत शरीराचा, जंतासारखा आकार असणारा गांडूळ हा प्राणी 6 सें.मी. पासून ते 60 सें.मी.पर्यंत लांब असतो, हा रंगाने तांबूस तपकिरी, लालसर किंवा पांढरट असतो. 
 
गांडळाचा जीवनक्रम :
गांडळाच्या जीवनामध्ये अंडी, अपूर्ण अवस्था आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात, या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडळांमध्ये नर आणि मादी असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यांमध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाच्या अनुकूलतेनुसार अपूर्णावस्था दोन ते तीन महिन्यांची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. ते वयात आलेल्या गांडळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षांचे असते. इसिनिरा फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडळाची लांबी 12 ते 15 सें.मी. असते. एका किलोग्रॅममध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडळे असतात. अशी एक हजार गांडळे घेऊन त्यांची अनुकूल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष होते आणि पिले व प्रौढ गांडळे एका किलोग्रॅममध्ये दोन हजार बसतात. शंभर किलोग्रॅम गांडळे महिन्राला एक किलोग्रॅम गांडूळखत तयार करतात. 
 
गांडूळखत/व्हर्मीकपोस्ट :
गांडळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृदगंधयुक्त काळसर रंगाच्या विष्ठेस व्हर्मीकास्ट किंवा गांडुळ विष्ठा असे म्हणतात असे व्हर्मीकास्ट किंवा गांडुळविष्ठा आणि गांडळाची थोडीफार अंडी, अर्धवट कुजलेले कंपोस्ट आणि माती या मिश्रणास व्हर्मीकपोस्ट किंवा गांडुळखत असे म्हणतात. 
 
गांडूळखत पैदास करण्याचे तंत्र :
गांडूळ पैदास करणार्‍रा खड्ड्यावर सावली पूर्ण दिवसभर राहील याप्रमाणे छप्पर करावे. सदरहू जमीन पाण्याचा निचरा होईल अशी असावी. सर्वसाधारणपणे 2000 गांडळे खड्ड्यामध्ये सोडून त्रांच्यापासून प्रजनन, तसेच गांडुळखत व्हर्मीकपोस्ट मिळविण्यासाठी खाली नमूद केलेली कृती करावी. 
 
जमिनीमध्ये 20 सें.मी. खोलीचा तसे 1 मीटर लांब आणि 60 सें.मी. रुदीचा खड्डा खोदावा. या खड्ड्यामध्ये निम्मे कंपोस्टखत, तसेच निम्मे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा. म्हणजे हा गादीवाफा तयार होईल. हे खाद्य अंदाजे 200 किलोग्रॅम होते आणि या गादीवाफ्यामध्ये 2000 गांडळे चांगल्या प्रकारे या सेंद्रिय पदार्थांवर उपजिविका करू शकतात. या गादीवाफ्यामध्ये गोणपाटाचे आच्छादन करून त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये 60 ते 70 टक्के ओलावा राहील या बेताने दिवसातून 3 वेळा गादीवाफ्यांवर पाणी शिंपडावे. म्हणजे गादीवाफ्यामध्ये ओलसरपणाही टिकून राहील. संशोधनामध्ये असे दिसून आले आहे, की या पद्धतीमध्ये 10 दिवसांमध्ये गांडूळखत तयार होते. हे खत तयार झाल्यानंतर अगोदर दोन दिवस पाणी शिंपडण्याचे बंद करावे. त्यामुळे वरच्या बाजूचे गांडूळ खाली जातील व नंतर हाताने गांडूळखत बाजूला करावे. शक्रतो खत वेगळे करताना अवजाराचा टिकाव, खोरे, खुरपे इ. वस्तूंचा वापर करू नरे. त्यामुळे गांडळांना इजा पोचते. पूर्णवाढ झालेली गांडूळ वर नमूद केल्याप्रमाणे परत गादीवाफ्यात सोडावित. तयार झालेली गांडूळखतामध्ये 95 टक्के गांडूळ विष्ठा खत 5 टक्के न कुजलेले पदार्थ प्रतिकिलो गांडूळखतामध्ये सरासरी 3 ते 4 अंडीपुंजी जिवाणूंची संख्या मेलेले गांडूळही काही थोड्याप्रमाणात असतात. या सर्वांचे मिश्रण म्हणजेच गांडूळखत होर. गांडूळखत गोळा केल्यानंतरपूर्ण वाढलेले जिवंत गांडूळ परत नवीन खड्ड्यात सोडावेत तेथे परत गांडळांची पैदास होते, परंतु हा खड्डा नेहमी ओलसर ठेवावा.
 
गांडूळखताचे फायदे :
1.गांडूळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये पिकास भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
2.गांडूळखतामध्ये साधारणपणे 1 ते 2.0 टक्के नत्र, 0.05 ते 0.82 स्फुरद व 0.65 ते 1.25 टक्के पालाश असल्याने पिकास ते फारदेशीर ठरते. 
3.गांडूळखत वापरामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
4.जमिनीचा सामू (पीएच) योग्य प्रमाणात राखला जातो. 
5.मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. 
6.मुळ्या अथवा झाडांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते, त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. 
7.पाण्याचे बाष्पिभवन फारच कमी होते. 
8.जमिनीची धूप कमी होते. 
9.गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 
10.जमिनीतील उपरुक्त जीवाणूंच्या संख्येत भरमसाट वाढ होऊन वर खते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते. 
11.पिकास समतोल, सकस व संतुलित आहार मिळतो. त्यामुळे पिकाची कीड व रोग प्रतिकारक शक्ती वाढते. 
12.गांडळाच्या विष्ठेद्वारे संप्रेरक बाहेर पडून ती पिकांना उपयुक्त ठरतात. 
  
 
 
उसाच्या पाचटापासून गांडूळखतनिर्मिती :
ऊस उत्पादक शेतकर्‍रांकडे उसाचे पाचट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. एक हेक्टर क्षेत्रामधून 8 ते 10 टन उसाचे पाचट मिळते. पाचटामध्ये 0.35 ते 0.50 टक्के नत्र, 0.14 ते 0.20 टक्के स्फुरद 0.75 ते 1.0 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असतो. पाचटाचा उपरोग करून शेतकरी बांधव ऊसखोडवा पिकांमध्ये, तसेच लागणीमध्ये सरीत आच्छादन म्हणून पाचटाचा वापर, तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ करू शकतो. पाचट गोळा करून त्यापासूनकंपोस्ट, फॉस्फोकंपोस्ट आणि गांडूळखतही तयार करू शकतात. गांडूळखताचा शेतात वापर करून शेतीची भौतिक, रासायनिक, तसेच जैविक सुपीकता वाढविता येईल. या सुपीकतेवर पिकांची अन्नद्रव्ये घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. अशी अन्नद्रव्ये पिकांना सहजासहजी उपलब्ध होऊन ऊस उत्पादनात वाढ होते. म्हणून पाचटापासून गांडूळखत निर्माण केल्यास नक्कीच फारदेशीर ठरेल. 
 
पाचटापासून गांडूळखत निर्माण करण्याची पद्धत : 
 
1. जागेची निवड व शेड उभारणी :
गांडूळ पैदास करण्यासाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जवळपास मोठी झाडे असू नयेत. कारण या झाडांची मूळे गांडूळखतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखतनिर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता शेतीवर उपलब्ध असणार्‍रा वस्तू बांबू, लाकूड, उसाचे पाचट यांचा वापर करावा. छपरामधील उंची 1.95 मी. (6.5 फूट) बाजूची उंची 1.50 मी. व रुंदी 3 मी असावी, परंतु छपराचे वरील आवरण दोन्ही बाजूंस 33 सें. मी. बाहेर असावे. म्हणजे छपराची बाहेरील रुंदी 3.60 मी. असावी. छपराची लांबी आपल्याकडे उपलब्ध असणार्‍रा उसाच्या पाचटानुसार कमी जास्त होईल अशा छपरांमध्ये मध्यापासून 30 ते 30 सें. मी दोन्ही बाजूंस जागा सोडून 1.05 मी रुंदीचे व 30 सें.मी. उंचीचे दोन समान वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूने प्लास्टर करावे, तसेच खालील बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी तळाशी पाइप टाकावा. वाफे करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी 20 ते 25 सें. मी. खोलीचे दोन समांतर चर काढावेत. खड्ड्यातील माती चांगली चोपून चोपून टणक करावी. 
 
2. पाचट कुजविणे :
छपयामध्ये खोदलेल्या चयामध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे व त्याची उंची जमिनीपासून किंवा नीट बांधकामापासून 20-30 सें.मी. ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरिया 8 कि. ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 10 कि. गॅ्र., 1 कि. गॅ्र. पाचट कुजविणारे जिवाणू व ताजे शेणखत 10 कि. ग्रॅम वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाचा 5 ते 10 सें. मी. थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया, फॉस्फेट इ. द्रावणाचा पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजल्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धन या प्रमाणात प्रत्येक थरावर थोडे थोडे वापरावे. अशा पद्धतीने खडावाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे व पाण्यात भिजवून घेतलेल्या पोत्याने झाकावे. दररोज त्यावर पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल. शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. अशा अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी 20,000 इसिनिरा फेटीडा जातीची गांडळे सोडावित. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांची उसाच्या पाचटापासून उत्तम दर्जाचे गांडूळखत तयार झालेले दिसते. 
 
गांडूळखत तयार झाल्याची चाचणी :
1.सर्व पाचटापासून अंडाकृती लहान विष्ठेच्या गोळ्या झाल्याचे दिसून रेते.
2.गांडूळखताचा सामू पीएच 7 च्या दरम्यान असतो. 
3.गांडूळखताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो. 
4.खताचा रंग गर्द काळा असतो.
5.कार्बन नायट्रोजन गुणोत्तर 15:20:1 असे असते. खतामध्ये खालीलप्रमाणे अन्नद्रव्यांचे प्रमाण हे खाद्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थानुसार बदलते. गांडूळखतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या अन्नघटकांचे प्रमाण हे शेणखतामधील अन्नद्रव्यांपेक्षा जवळपास दुप्पट असते. सर्वसाधारणपणे पाचटापासून तयार केलेल्या गांडूळखतामध्ये नत्र 1.85 टक्के, स्फुरद 0.65 टक्के, पालाश 1.30 टक्के, सेंद्रिय कर्ब 0.35 ते 0.42 असते, तसेच यामध्ये सूक्ष्म-अन्नघटकांचे प्रमाणदेखील अधिक असते. शिवाय नत्र स्थिर करणारे जीवाणू, अ‍ॅक्टीनोमायसेटीस, बुरशी इ. जीवाणूंची संख्यादेखील भरपूर असते. 
 
श्री. नितीन सुरेश ढोबे
कृषी कीटकशास्त्र विभाग,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली : 415712
जि. रत्नागिरी 
मो. 919175980062