भाजीपाला पिकातील कीड नियंत्रणाचे महत्त्व

डिजिटल बळीराजा    30-Apr-2018

 

  
रोप वाटिकेत तयार होणारी रोपे जर लहानपणापासूनच कीड व रोग विरहित ठेवली तर अशा रोपांपासून मिळणारी झाडे निरोगी राहतातच, शिवाय त्यापासून मिळणार्‍रा उत्पादनात वाढ होते. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्यापारी तत्त्वावर भाजीपाल्याची लागवड केली जाते व त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करताना शेतकरी योग्य ती काळजी घेतातच. चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये व खतांचा वापर इत्यादीचे सांगड घालून रोपे तयार करणे महत्त्वाचे असते.मानवाच्या रोजच्या आहारात भाजीपाल्याचा समावेश असणे गरजेचे मानले जाते. भाजीपाला उत्पादनात भारताचा जगात चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो, तर जागतिक भाजीपाला उत्पादनाच्या 14.4 टक्के इतर उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रात 4.55लाख हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतलेजाते व यातून 6.45 दशलक्ष टन उत्पादन मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने भेंडी, कांदा, मिरची, टोमॅटो, बटाटा वेल वर्गीय तसेच कोबी वर्गीय भाजीपाल्याची लागवड केली जाते.
 
 
भाजीपाला लागवडीत रोपवाटिका व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा तसेच कोबी वर्गीय भाजीपाला मुख्य शेतात लागवडीपूर्वी रोपवाटिकेत पेरून लहान रोपांची योग्य ती काळजी घेतली जाते. रोपवाटिकेत तयार होणारी रोपे जर लहानपणापासूनच कीड व रोग विरहित ठेवली तर अशा रोपांपासून मिळणारी झाडे निरोगी राहतातच, शिवाय यापासून मिळणार्‍रा उत्पादनात वाढ होते. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्यापारी तत्त्वावर भाजीपाल्याची लागवड केली जाते व यासाठी रोप वाटिकेत रोपे तयार करताना शेतकरी योग्य ती काळजी घेतातच. चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे, सूक्ष्म अन्नद्रव्रे व खतांचा वापर इत्यादीची सांगड घालून रोपे तयार करणे महत्त्वाचे असते.
 
 
भाजीपाला रोप वाटिकेतील कीड नियंत्रणाचे महत्त्व :
भाजीपाला रोप वाटिकेत प्रामुख्याने रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. यामुळे रोपांची गुणवत्ता ढासळते व रोपे मुख्य शेतात लागवडीसाठी निरुपयोगी ठरतात. अशी रोपे जर पुनर्लागवडीसाठी वापरली तर रोपांची वाढ चांगली होत नाही व झाडाला फुले व फळे लागण्यास उशीर होतो. पांढरी माशी, फुलकिडे या किडी विषाणुजण्य रोगांचा प्रसार करतात. यामुळे उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट येते. यामुळे रोप वाटिकेत योग्य कीड व्यवस्थापन पद्धती वापरल्यास चांगले उत्पादन होण्यास मदत होईल.
 
 

 
 
रोप वाटिकेतयेणाऱ्या प्रमुख किडी :
प्रामुख्याने रसशोषण करणार्‍रा (पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, मावा, पाने पोखरणारी अळी-नाग अळी लाल कोळी) किडी रोप वाटिकेत आढळतात.
 
पांढरी माशी :
पांढर्‍रा रंगाची रसशोषक वर्गातील ही कीड पानाच्यामागे अंडी घालून पिल्लावस्था आणि प्रौढावस्था पानातील रस शोषण करतात. तसेच जास्त प्रादुर्भाव असल्यास पानावर चिकट पदार्थ सोडते. यावर काळ्या रंगाची बुरशी वाढते. यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो. याशिवाय पांढरी माशी यलोलीफ कर्ल व्हायरस (कुबड्या) या विषाणूचा देखील प्रसार करते. पुनर्लागवड केल्यानंतर शेतात या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे गरजेचे असते.
 
 
फुलकिडे :
पिवळ्या पांढरट रंगाचे फुलकिडे पानातील रस शोषण करत असतात. याच बरोबर पानावर जखमा होऊन पानांचा रंग लाल तपकिरी बनतो.
 
तुडतुडे :
पाचरीच्या आकाराचे हिरवे प्रौढ व बाल्यावस्थेतील तुडतुडे पानाच्या मागे राहून रस शोषण करत असतात व पाने पिवळी पडतात. वांग्यामध्ये पर्ण गुच्छरोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होत असतो.
 
 
मावा :
काळ्या, पिवळ्या व हिरव्या रंगाचे प्रौढ व बाल्यावस्थेतील कीटक रोपांच्या कोवळ्या शेंड्यातून रस शोषण करतात. यामुळे रोपांची वाढ खुंटते.
 
 
लाल कोळी :
वांग्यासारख्या भाजीपाला पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या वातावरणात अधिक असतो. पानावर जाळे करून ही कीड पानातील रस शोषण करते. यामुळे पानांवर चट्टे पडून पानांचा रंग पांढरा-पिवळा होऊन पाने गळून पडतात.
 
 

 
 
 
नाग अळी:
टोमॅटो, मिरची, वांगी या रोपांमध्ये ही कीड मोठ्या प्रमाणात आढळते. अगदी रोपांची उगवण झाल्यापासून या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. पाने पोखरल्यानंतर पानावर नागमोडी आकाराच्या पांढर्‍रा रेषा तयार होतात. पानांवरील जखमांमुळे जिवाणुजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रसार होतो.
 
 
रोप वाटिकेतील एकात्मिक व्यवस्थापन :
रोप वाटिकेचे व्यवस्थापन करताना कोकोपिट, शेणखत, माती, गांडूळ खत याच बरोबर 2 किलो निंबोळी पेंड अधिक --- ग्रॅम ट्राय कोडर्मा अधिक ---- ग्रॅम पॅसिलोमायसीस प्रति चौकट मीटर टाकून घ्यावे. यामुळे सूत्रकृमी प्रसाराबरोबर तसेच रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होईल. इमिडाक्लोप्रीड किंवा थारमिथोमक्झाम या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून घ्यावी. यामुळे रोपे उगवल्यानंतर 20-25 दिवसांपर्यंत रस शोषक किडीपासून संरक्षण मिळेल. रोपे उगवल्यानंतर इमिडाक्लोप्रीड किंवा थामिथोक्झाम या एका कीटक नाशकाची ड्रेचिंग रोप वाटिकेत करून घ्यावी. रोपे पुनर्लागवडीपूर्वी 10-15 दिवस अगोदर पुन्हा ड्रेचिंग करावी. दर 10 ते 15 दिवसांनी 15 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. यामुळे सर्वच किडींना प्रतिबंध करता येतो. द्रावणात स्टिकरचा वापर करावा. शक्यतो रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा.
 
 
खालील पैकी कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करता येतो.
 
अ. क्र.                   कीटकनाशकाचे नाव                         प्रमाण प्रति 10 लि. पाणी
1.                          प्रोफेनोफॉस                                        50 इ. सी 10 मिली
2.                          इमिडाक्लोप्रीड                                   16.8 एस.एल. 4.5 मिली
3.                         डेलटामेथ्रिन                                        2.8 इ.सी 4 मिली
4.                         डारमेथोएट                                         30 इ. सी. 10 मिली
5.                         अ‍ॅसिफेट                                             65 एस. पी. 25 ग्रॅम
6.                         थारमिथोक्झाम                                    20 डब्ल्रू. जी. 2.5 ग्रॅम
7.                        लॅम्डा सारहालोथ्रीन                              5 ई. सी. 5 मिली
8.                       अ‍ॅसिटामिप्रीड                                      20 ए. पी. 40 ग्रॅम
9.                       मॅलॅथिऑन                                           20 मिली
 
 
अशा प्रकारे भाजीपाला रोप वाटिकेत जर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास नक्कीच शेतकर्‍राला फायदा होऊन व रोपांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होऊन शेतकर्‍राला चांगले अर्थार्जन होईल.
 
 
कु. स्वाती गुरवे, अतुल गोंडे व डॉ. संतोष कुलकर्णी
कृषी कीटकशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी