नांगरट एक परिपुर्ण माहितीपर लेख

डिजिटल बळीराजा    26-Apr-2018
 
 
 
 
शेतकरी गत हंगामातील पीक घेण्यासाठी याचप्रमाणे जमीन तयार करत असतो. भरपूर व ते पण उत्तम दर्जाचे पीक येण्यासाठी सध्या ज्या प्रकारे नांगरट केली जात आहे ती खरोखरीच हा हेतू साध्य होण्यास पुरेशी आहे का, याबद्दल या लेखात माहिती वाचायला मिळेल.
 
माझी आमच्या गावी शेती आहे. मला शेती करण्यासाठी गावातील होतकरू तरूण मोलाचे साह्य करत आहेत. अगदी सुरवातीस मी गावातील माझे नातेवाइक व इतर शेतकरी बांधव शेती करत असतांना काय काय करत असतात ह्याची माहिती मिळवत होतो. ह्यावेळी मला जाणवणा-या शंकापण त्यांना विचारत असे. समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे मी निरनिराळी मासिके जसे बळीराजा, अ‍ॅग्रोवन सारखी दैनिक, शेतीशास्त्रावरील मुलभूत शास्त्राची माहिती देणारी पुस्तके, मी घेणार असलेल्या पीकासंबंधीत निरनिराळया लेखकांची एकापेक्षा जास्त पुस्तके खरेदी करून वाचन सुरू केले. ह्या वाचनात आलेल्या शंकांचे निरसर करण्यासाठी इन्टरनेटवर उपलब्ध असलेली माहिती गोळा करण्यास सुरूवात केली तेव्हा हे लक्षात आले की आपण शेतकरी कष्टात कमी पडत नसून उत्पादन व पीक दर्जा याच्याशी संबंधीत माहिती/ ज्ञान मिळवण्याचा प्रयत्नच करत नाही आहोत. ह्या सर्वाचा परिणाम वरचेवर कमी उत्पादन शिवाय जमिनीचा दर्जा खालावत जातआहे. शेतकरी बंधूनी शेती विज्ञाना या विषयाची माहिती जाणून घेतल्याशिवाय सध्या त्याला भेडसावत असलेल्या कमी उत्पादन व नुकसान या समस्यातून सुटका होणार नाही. वानगी दाखल मी नांगरट ह्या कृती बद्दल खाली चर्चा करणार आहे. ही माहिती वर दिलेल्या निरनिराळया माध्यमातून एकत्रीत केलेली आहे.
 
शेतीमध्ये नांगरटीचे महत्व शेतक-याला ठाऊक आहे. शेतक-यांना नांगरट करून काय साध्य केले जाते असे विचारले तर सर्व साधारणपणे जी उत्तरे मिळतात ती अशी :
 
1. जमीन भुसभूशीत होते.
2. भुसभूशीतपणामुळे पीकास हवा व पाणी भरपूर मिळते.
3. पीकास खत पुरवठा व्यवस्थित होतो.
4. जमीन ऊन्हात तापल्यामुळे किड व त्यांचे कोष नष्ट होतात.
5. जमीन ऊन्हात तापल्यामुळे तण व त्यांचे बी नष्ट होते.
 
 
शेतक-यांचा नांगरट करतांना वरील उद्देश खरोखरीच पुर्णपणे साध्य होतो का? हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. शेतक-यांना मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन व त्याचा दर्जा कमी कमी होत जात असल्याचा अनुभव येत आहे. शेतक-यांनी आता संख्यात्मक व गुणात्मक दर्जाचे उत्पादन का कमी येतअसेल ह्या बाबींचा विचार करणे जरूरीचे झाले आहे. मी ह्या लेखात नांगरट या कृतीशी संबंधित जास्ती जास्त मुद्यांचा सखोल विचार करणार आहे. शेतकरी गत हंगामातील पीक काढून झाल्यावर, जमीन नवीन पीक घेण्या योग्य करण्यासाठी नांगरट काक-या इत्यादी काम करतो. शेतकरी गत हंगामातील पीक घेण्यासाठी याच प्रमाणे जमीन तयार करत असतो. भरपूर व ते पण उत्तम दर्जाचे पीक येण्यासाठी सध्या ज्या प्रकारे नांगरट केली जात आहे ती खरोखरीच हा हेतू साध्य होण्या सपुरेशी आहे का हीच बाब आपण विचारात घेणार आहोत.
 
 
शेतक-यांनी हा विचार करणे आवश्यक आहे की वर दिलेले उद्देश साध्य करतांना काही अडथळे तर निर्माण झालेले नाहीत. उद्देशपुर्तीत निर्माण होणारे मुद्ये हे ढोबळ मानानी खालील प्रकारे येऊ शकतात. शेतकरी जो पर्यन्त ह्या अडथळ्यांपासून शेत मुक्त करत नाही तो पर्यन्त शेती ऊत्पादन व त्याचा दर्जा चांगला असण्याची शक्यता खुपच कमी असणार आहे. शेतक-यांना ठाऊक असलेले उद्देश आपण चर्चे घेणार आहोत.
 
 
1 जमीन नांगरट केल्यामुळे भुसभूशीत होते.
गत हंगामातील पीक घेतल्यामुळे व ते घेण्यासाठी जी निरनिराळी काम केलीजातात त्या सर्व कामामुळे जमीनीस जो घट्टपणा आलेला असतो तो पुर्णपणे मोडल्याशिवाय आपण जमीन पुर्णपणे भुसभूशीत झाली आहे असे म्हणू शकत नाही. ह्याचे उत्तर शोधण्यासाठी शेतकरी करतअसलेल्या गत हंगामातील कामच तपासून पाहणे जरूरीचे आहे, व त्याच बरोबर या कामामुळे जमीन भुसभूशीत होण्यात काही अडथळे येतात का हे पण पहावे लागणार आहे. शेतकरी गत हंगामातील पीक घेतांना करत असलेल्या कामाचा तपशिल सर्वसाधारणपणे असा असतो.
 
प्रथम नांगरट करणे.
जमीन ऊन्हात तापत ठेवणे.
परत नांगरट,काक-या इत्यादी
त्यानंतर पीक पेरणीसाठी रान तयार करणे.
पीक पेरणी करणे.
पीक वाढीच्या काळात
पाणी देणे व ते देतांना दार धरणे.
पाहणी करणे. तण काढण्यासाठी खुरपणी करणे किंवा औषध मारणे.
पीकारवर आलेल्या रोगावा/ किडींचा बदोबस्तकरणे.
पीक तयार झाल्यावर तोडणी करणे व शेतातच वाळवणे.
वाळलेले पीक पोत्यात किंवा वाहनात भरून साठवण्यासाठी किंवा विक्रिसाठी वाहून नेणे.
 
 
वर दिलेल्या कामांचा भुसभूशीतपणा येण्यात काही अडथळे तयार होतात का हे आपल्याला निश्‍चितच करावयाचे आहे. जमीनीवर ही काम करतांना जे संस्कार होत असतात ते मुख्यत्वे खालील प्रकारचे असतात. शेतातील वरा मातीचा थर हलचालीं मुळे कमी जास्त प्रमाणात दबला जाणे. ह्या हलचाली ट्रक्टर, इतर अवजार, पाणी देतांना/ खुरपणी करतांना/ औषध मारतांना मजुराची ये जा. शेतक-यांची पाहणी करतांना व मजूरांना कामाचे स्वरूप सांगताना व त्या कामाची पाहणी करताना पीकातुन होणारी हलचाल यात मोडते. शेतात होणा-या ह्या हालचाली जमीनीस घट्टपणा कशा प्रकारे आणतात हे आपण पाहणार आहोत. ट्रॅक्टर नांगरट किंवा इतर काम करतांना शेतात एका टोका पासून दुस-या टोका पर्यन्त पुढे मागे फिरत असतो. ट्रॅक्टर वजनदार असतो त्यामुळे तेवढया वजनाचा दाब चाकाखालील जमीनीवर पडत असतो. एकासरीतून ट्रॅक्टर ज्यावेळी जात असतो त्यावेळी चाकाखालची जमीन दाबली जाते व घट्ट होते. 
 
 
शेतजमीन जर काळी असेल तर ऊन्हामुळे तापून त्या भागातील पाण्याचे प्रमाण कमी होते व चिकणमातीचे कण जास्त प्रमाणात एकमेकास घट्ट धरून ठेवतात. शेतकरी नवीन पीक घेतांना हा घट्टपणा पुर्णपणे मोडला आहे का याची काळजी घेत नाही.(तज्ञ ह्याच करणा साठी ऊभी आडवी नांगरट करा असे सांगत असतात) ट्रॅक्टरमुळे जमिनीत येणारा घट्टपणा कमी-जास्त प्रमाणात कसा येऊ शकतो हे खाली दिलेल्या तपशीलावरून ध्यानात येईल. अगोदरच सांगितल्याप्रमाणे नांगरट करताना एका सरीत येण्या/जाण्यामुळे एकाच पट्ट्यातील जमीन टक्टरच्या वजनामुळे बर्‍याच प्रमाणात दबली जाते.ओळीच्या शेवटी टक्टर वळत असतो त्यावेळी जमिनीच्या त्या भागावर जास्त प्रमाणात दाब येतो व त्या ठिकाणचीजमीन बर्‍याच जास्त प्रमाणात दबली जाते.
 
 
ऊस तोडणी झाल्यावर जवळ जवळ 12 किंवा जास्त टन वजन घेऊन ट्रक माल भरताना शेतात उभा असतो व नंतर शेतातून बाहेर येतो. असा भरपूर वजन असलेला ट्रक खूपच जास्त प्रमाणात वाहनाचे वजन असल्यामुळे बर्‍याच प्रमाणात जमिनीचा पट्टा दाबत जातो. ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या बाबतीतपण असाच जरी थोडा कमी प्रमाणातील असला तरी जमीन दाबली जाते. इतर पिकांच्या बाबतीतपण असाच अनुभव येतो.
 
अशा शेतातील माती जर चिकण/काळी असेल तर हा घट्टपणा पुढे ढेकळांचे रूप धारण करतो व चिकणमातीच्या काही गुणधर्मांमुळे मातीचे कण विलग न होऊ शकल्यामुळे ती भुसभुशीत होत नाही. अशा प्रकारे घट्टपणा आलेल्या भागातील तणांच्या बिया तसेच किडीची अंडी इत्यादी नष्ट होत नाहीत याचा परिणाम नवीन पीक काळात तणाचा व रोगाचा भरपूर त्रास होण्याची शक्यता वाढत जाते. याची परिणती कमी शेतमाल उत्पादन व ते पण कमी दर्जाचे- या शिवाय ही कामं करण्यास लागणारा वेळ व खर्च यात वाढ होते व शेतकरी नुकसानीच्या दिशेने जाऊ लागतो. 
 
 
ट्रॅक्टरच्या नांगराचा फाळपण काही प्रमाणात जमीन घट्ट करण्यास कारण ठरत असतो. शेतकर्‍यानी नेहमी हे अनुभवले असेल की बर्‍याचवेळा जस जसा नांगराचा फाळ पुढे पुढे जात असतो त्यावेली पलटी मारत जाणारी माती तेलकट दिसते. मातीचा असा तेलकटपणा प्रामुख्याने काळ्या मातीत दिसून येतो. अशी तेलकट माती वाळल्यावर खूपच कडक बनते व हेच कारण जमीन पूर्णपणे भुसभुशीत न होण्याचे असते. नोंद घ्या की नांगराच्या फाळानी जमिनीचा कापला जाणारा भाग जमिनीशी 90 अंशाचा कोन करून पुढे पुढे जात राहणे जरुरीचे असते. ट्रॅक्टरच्या नांगराचा फाळ जर झिजला तर त्याचा जमीन कापणारा भाग 90 अंश राहत नाही व त्याचमुळे माती कणिक मळतात तशा प्रकारे मळली जाऊन तेलकट दिसू लागते. माती मळली गेल्यामुळे तिचे कण खूपच जवळ जवळ येतात व जमिनीत असलेले पाणी त्यांना धरून ठेवण्यास मदत करतात. उन्हामुळे तापल्यावर जमिनीची तेलकट दिसणारी माती खूपच कडक बनते. कडक झालेल्या मातीत पिक कमी येते हे आपण वर पाहिलेच आहे.
 
 
शेतमजूर शेतात जी कामं करतात जसे खुरपणी, औषध मारणे, पाणी देताना दारे धरणे अशी सुरुवातीपासून पीक साठवणीसाठी नेईपर्यंत केलेली सर्व कामं-ह्या काम करण्याच्या काळात मजूर मुख्यत्वे सरीतून ये-जा करत असतात. सततच्या अशा हालचालीमुळे सरीतील जमीन कमी अधिक प्रमाणात दबली जात असल्यामुळे सरीत उंच-सखलपणा येतो. अशाप्रकारे घट्टपणा आलेला भाग सर्व शेतभर अंतरा अंतरावर असतो. घट्टपणामुळे पिकास दिलेले पाणी सर्व शेतात समप्रमाणात पसरू शकत नाही. काही भागांत कमी पाणी म्हणजे कमी खत पुरवठा अर्थात कमी उत्पन्न.
 
 

 
 
 
2) भुसभुशीतपणामुळे पिकास हवा व पाणी भरपूर मिळते.
 भुसभुशीत जमिनीत पिकांना योग्य प्रमाणात हवा व पाणी उपलब्ध असते हे खरे आहे. शेत जमीन वाफसा स्थितीत असेल तर हे आपोआप साध्य होते. आपण वर मुद्दा 1 मध्ये पाहिले आहे, की नांगरट करताना जमिनीस भुसभुशीतपणा आणण्यात जे जे अडथळे आहेत ते दूर झाले नाहीत तर जमीन पूर्णपणे भुसभुशीत झालेली नसते. वेगवेगळ्या कारणांनी दबली गेलेल्या मातीचा घट्टपण / तयार झोली ढेकळं मोडली नाहीत तसेच नांगराच्या फाळामुळे तेलकट होऊन बाहेर आलेली माती पुढे वाळल्यावर खूपच घट्ट बनते. अशा प्रकारे घट्ट झालेल्या मातीत पाणी सर्व बाजूस पसरत नाही म्हणजे काही भागांत पाणी कमी व हवा जास्त अशी स्थिती तयार होते. याचा परिणाम सर्व ठिकाणी उगवलेल्या रोपांना समप्रमाणात हवा व पाणी उपलब्ध होत नाही. पिकास हवा किंवा पाणी यामुळे खत जर आवश्यक प्रमाणात मिळाले नाही तर उत्पादन व दर्जा शेतमालाचा कमी असतो. परिणामी पिकाची चांगली वाढ काही भागांत व त्यामुळे शेतमाल उत्पादन कमी. शेतकर्‍याला तज्ज्ञ वरचेवर वाफसा स्थिती साध्य करा याच कारणांनी बजावत असतात. 
 
 
3) पिकास खतपुरवठा व्यवस्थित होतो.
शेतकर्‍यांना हे ठाऊकच आहे की पिकास जर व्यवस्थित व योग्य प्रमाणात खत मिळण्याची व्यवस्था करावयाची असेल तर संबंधित खाली दिलेल्या घटकांची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
- खताच्या सान्निध्यात योग्य प्रमाणात पाणी व हवा.
- काही खत द्राव्य स्थितीत बदलण्यासाठी सूक्ष्म जिवांची उपस्थिती.
- सेंद्रिय खत ज्यामुळे सूक्ष्म जिवांना अन्नपुरवठा, पाण्याची व सूक्ष्मजीवांनी विरघळवलेल्या खतांचा पुरवठा करणे. पिकाच्या संपूर्ण काळात सूक्ष्म जीव कार्यरत असणे आवश्यक आहे म्हणजे दिलेल्या रासायनिक खताचा पिकास पूर्ण फायदा मिळेल.
- पिकास कर्बवायूचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे भरपूर उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
 
सेन्द्रिय पदार्थ जमिनीत असल्यास दोन कामं होतात.
1) सूक्ष्मजीवांची वाढ व
2) पिकाच्या उत्तम वाढीसाठी कर्बवायू पुरवणे.
  
असे निदर्शनास आले आहे, की शेणखत इत्यादी सेंद्रिय पदार्थ शेतकरी कमी प्रमाणात जमिनीत टाकतात. पीक कमी येण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे हे वेगळे सांगायला नको. पूर्वी चर्चा केलेला मुद्दा नंबर 1 व 2 वरून हे लक्षात येईल की सूक्ष्मजीवांची वाढ मर्यादित स्वरूपाची असणार आहे. परिणामी खत पुरवठा पण मर्यादित म्हणजे पीक उत्पादन मर्यादित.
 
 4) उगवण व्यवस्थित होते.
जमीन जर सर्व जागी योग्य प्रमाणात भुसभुशीत असेल व योग्य खोलीवर बी पेरले गेले असेल तर बियाणास उगवण क्रिया चांगल्या रीतीने सुरू होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. समप्रमाणात जमिनीत भुसभुशीतपणा नसणे ही बाब या कामासाठी मारक ठरते. अगोदर आपण पाहिलेच आहे की जमिनीत ढेकळे स्वरूपातील माती पाणी सर्व दिशांना पसरण्यास अडथळा करते. त्याच कारणामुळे तुटक प्रकारची उगवण होते शिवाय त्यातील काही रोपे कमकुवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुटाळी व कमकुवत उगवणीमुळे त्याच्या प्रमाणात शेतमाल उत्पादन कमी व दर्जापण कमी येतो.
 
 
5) जमीन उन्हात तापल्यामुळे किड व त्यांचे कोष नष्ट होतात.
उष्णतेमुळे कीड व तण नाश पावते हे खरे आहे. आपला उद्देश कीड व तण यांचा नाश करणे असला तरी जमीन तापवल्यामुळे होणारे पीक उत्पादनाचे नुकसान टाळणे हे पण जरूरीचे आहे. तेव्हा जमीन उन्हात तापत ठेवणे ही क्रियाच विचारात घेणे जरूरीचे आहे. नांगरट जमिनीत काही प्रमाणात पाणी असल्याशिवाय करता येत नाही. अगोदरच्या पिकाच्या दिलेल्या खताचे शिल्लक अवशेष व कार्यरत असलेले सूक्ष्मजीवपण जमिनीत यावेळी असतात. जवळ जवळ एक महिना जमीन उन्हात तापत ठेवली जाते. उन्हाळ्यातच ही क्रिया केली जाते. म्हणजे हवेचे तापमान भरपूर असते. या भरपूर दिर्घकाळच्या उष्णतेमुळे खत अवशेष व सूक्ष्म जिवाणूपण नष्ट होतात. त्याचा परिणाम ही व्यवस्था परत नवीन पिकाच्या वेळी करणे अत्यंत आवश्यक ठरते. या सर्व बाबीमुळे खर्चात मोठी वाढ शिवाय जिवाणू सर्वार्थानी कार्यरत होण्यास लागणारा कालावधी जो कमी पीक उत्पादनास कारण ठरतो. पीक उत्पादन कमी येईलच याशिवाय कमकुवत रोपांमुळे प्रतपण कमी राहील हे ज्यादाचे नुकसान ठरणार आहे.
 
 
पर्यायी पद्धत : वरील अडथळे दूर करण्यासाठी नांगरट करताना सर्वप्रथम सर्व ढेकळे मोडल्याची खात्री करून घेणे, जमीन भुसभुशीत झाल्याची खात्री झाल्यावर सर्व जमीन कमीत कमी बियाणे पेेरलेल्या भागात आच्छादित करण्याचा प्रयत्न करणे. आच्छादनामुळे जमिनीत असलेल्या पाण्याची उन्हामुळे तापून वाफ होते व त्या वाफेत खूपच जास्त उष्णात असल्यामुळे तण व कीड पूर्णपणे नष्ट होते. पाणी व खत अवशेषांचीपण बचत होते. आच्छादनावर होणारा खर्च हा पीक उत्पादनातून भरून निघतो.
जमीन उन्हात तापल्यामुळे तण व त्यांचे बी नष्ट होते. नांगरट जर व्यवस्थित प्रकारे झाली नाही तर जमिनी सर्व ठिकाणी जागोजागी मातीच्या ढेकळांचा पट्टा राहतो हे आपण वर पाहिलेच आहे. या ढेकळात तणाच बी व कीडींची अंडी तग धरून राहू शकतात. ज्यावेळी पेरणी करून पाणी देण्यास सुरुवात होते त्यावेळी तण व कीड रोग पण कार्यरत होतात व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.
 
शेतकर्‍यांनी हे ध्यानात घेणे जरूरीचे आहे, की वर वर्णन केलेले अडथळे जर दूर करण्यात त्याला जेवढे यश येईल त्या प्रमाणात त्यांचे शेतमाल उत्पादन वाढेल व ते पण चांगल्या दर्जाचे असल्यामुळे फायदा होण्याची स्थिती येईल. अयोग्य नांगरटीमुळे भेडसावणार्‍या समस्या व त्यावरील उपाय वरच्या थरातील मातीची उलथापालथी बरोबर जुने पीक अवशेष व खत पण त्या बरोबर येते. यात तण, बिया, पूर्वी पिकावरील रोगाशी संबंधी कोष इत्यादीपण असतात. जे पुढे नियंत्रणात ठेवण्यासाठी खर्च करण्याची वेळ येते. त्याशिवाय उत्पन्न कमी येते.
 
नांगरटीस बरीच शक्ती वापरावी लागते. जमिनीत टाकलेले खत, आंतर मशागतीत केली गेलेली कामं, वेळोवेळी दिले गेलेले पाणी (पुढच्या पाळीच्या काळापर्यंत पाणी कमी झाल्यामुळे आलेला घट्टपणा). परत पाणी पुन्हा घट्टपणा हे पाणी पाळ्या चालू असेपर्यंत होत राहते. या सर्वांचा परिणाम नांगरटीस जास्त वेळ म्हणजे जादा खर्च. यावर उपाय- पुढची पाणी पाळी देण्याअगोदर जमिनीतील ओल तपासणे. जमीन कडक होण्या अगोदर पाणी देणे हा आहे. जुन्या ताणांचे बियाणे पूर्णपणे नष्ट होत नसल्यामुळे नांगरट करताना जुने पीक अवशेष असल्या भागात नांगरटीस जास्त प्रतिकार होतो. या प्रतिकारामुळे मातीची जडणघडण समप्रमाणात होत नाही. तण बियाणे शिल्लक राहत असल्यामुळे त्याची उगवण व वाढ टाळणे खर्चाचे ठरते.
 
जमिनीतून पाण्याचा र्‍हास नांगरटी नंतर ती तापत ठेवल्यामुळे होत असतो. चिकण मातीत मोठमोठी ढेकळे तयार होतात व तीच पुढे पाणी कमी होण्यास कारण ठरतात. र्‍हास कमी होण्यासाठी नांगरटीस जमिनीत ओल असल्याशिवाय होत नाही म्हणजे यावेळी जमिनीत आवश्यक तेवढे पाणी असते. काकर्‍या मारताना व नंतर पाळ्या घालताना पूर्व पिकांचे अवशेष काडी कचरा पूर्णपणे बाहेर आणणे व तो नाहीसा केल्यास तणांचा बराच बंदोबस्त होतो. दाबलेल्या जमिनीत पाणी असतेच ते उन्हामुळे तापते व त्याच्या वाफेमुळे काही प्रमाणात कीडपण मोठ्या प्रमाणावर नष्ट होते. या सर्वांचा परिणाम पुढे पेरलेले पीक चांगले येण्यात होतो. जमीन ओलसर असेल तरच नांगरट शक्य होते. जमीन कोरडी असेल तर जमिनीतून मोठ मोठी ढेकळे वर येतात. जमीन फार मोठ्या प्रमाणावर वातावरणाच्या संपर्कात येते. परिणाम जमिनीतील पाणी वाफ होऊन निघून जाते. पाणी वाफ होऊन सर्व प्रमाणात निघून जात नाही. ढेकळे असलेल्या भागातून ते कमी प्रमाणात जाते. या पाण्याच्या वाफ होण्याच्या प्रमाणात नांगरट केलेल्या खोलीपर्यंत जमीन मोकळी होत असल्यामुळे बरीच वाढ होते.
 
नांगराचा फाळ हा पण नुकसान करण्यास कारण ठरतो. फाळ जरा धारदार नसेल तर पुढच्या भागातील माती प्रथम दाबली जाते मग घर्षणाने व पाण्यामुळे बाजूस सरणारा मातीचा भाग तेलकट स्वरूपात येतो. या तेलकट स्वरुपातील माती गोळ्यांना पुढे वाळल्यावर जास्त घट्टपणो येतो. या गोळ्यातील माती बरीच बारीक असल्यामुळे तिचे कण एकमेकांना घट्ट पकडतात. याचा परिणाम नंतर पाणी दिल्यावर ते काही काही ठिकाणी समप्रमाणात तर काही ठिकाणी विषम प्रमाणात मुरते. याच कारणामुळे सर्व ठिकाणी उगवणे एकसारखी येत नाही. याचं प्रत्यंतर पीक वर आल्यावर दिसतो. कमी-जास्त वाढ झालेली रोपे दिसतात.
 
 
 
चांगली नांगरट म्हणजे काय :
1) जमीन पूर्णपणे भुसभुशीत होणे
2) जमिनीतील हवा योग्य प्रमाणात खेळती होणे
3) हवा अति प्रमाणात खेळती होऊ न देणे म्हणजे वरच्या थरात ढेकळे असू देऊ नयेत.
4) हवा योग्य प्रमाणात जमिनीत असल्या कारणाने, कार्बवायू वनस्पतीस आवश्यकते प्रमाणे मिळतो, गांडूळ व इतर सूक्ष्मजीव व्यवस्थित काम करतात, पीक क्षेत्रात समप्रमाणात पाणी पसरते, हे फायदे उठवण्यासाठी नांगरटी नंतर लगेच काकर्‍या पाळ्या घालणे व नंतर वरचा थर दाबून ठेवणे होय. 
 
नांगरटी नंतर जमिनीचा वरचा भाग मोठ्या प्रमाणावर उघडा पडतो. जमिनीत खेळत्या हवेचे प्रमाण वाढल्यामुळे सूक्ष्म जिवाणू कार्यरत होतात. त्यामुळे रासायनिक किंवा जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर परिणाम होऊन कार्ब वायू तयार होतो व बाहेर जातो. परिणामी जमिनीतील वातावरणात बदल होतो. सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व वरून पीक घेताना न टाकला गेल्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया कमी होते. परिणामी उत्पन्न कमी मिळते.
 
पीक पेरणी करताना सर्‍या पाडल्या जातात. ह्याच सर्‍यात पीक कालावधीत अनेक कामं केली जात असतात. परिणामी सर्‍यांचा संपूर्ण भाग बराच दाबला जातो. पीक गेल्यावर नवीन पिकासाठी नांगरट करताना हा भाग पूर्णपणे मोडणे जरूरीचे आहे. तसे केले नाही तर या पूर्वीच्या सर्‍यांमुळे तिथे उंच सखलपणा तयार होतो. खोलगट भागात जास्त पाणी पाणी तर उंच भागात कमी पाणी अशी स्थिती तयार होते. पेरलेल्या पीकास सम प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळे उत्पन्नावर विपरित परिणाम होतो. उपाय-पहिले पीक गेल्यावर नवीन पीक घेताना अगोदरच्या पिकासाठी तयार केलेल्या सर्‍या मोडून जमीन समपातळी करणे आवश्यक माना.
 
जमिनीत नांगरटीच्या वेळी असलेल्या पाण्याच्या प्रमाणाप्रमाणे जमिनीवर परिणाम होतो. पाणी कमी असेल तर मोठी ढेकळ तयार होतात. पाणी जास्त असेल तर चिखलणी होते. मोठी ढेकळे वरच्या थरात येतात व पुढे पिकास दिलेले पाणी समप्रमाणात जिरू देत नाही. चिखलणीमुळे मळलेला (कणिक मळतात तसा) गोळा तयार होतो. हा गोळा नंतर वरच्या थरात असल्यामुळे केलेल्या गेलेल्या काकर्‍या व पाळ्या मारताना जमीन भुसभुशीत होत नाही. चिखलणीमुळे मातीचे बारीक कण तयार होतात व हे काम करणार्‍या ट्रॅक्टरच्या टायरच्या दाबामुळे त्या खालच्या मातीस घट्टपणा येतो जो नंतर जात नाही. चिखलणीमुळे वर वर्णन केलेला घट्टपणा पुढच्या वेळी नांगरट करताना ती समप्रमाणात होऊ देत नाही. या सर्वांचा परिणाम उत्पन्न कमी येण्यात होतो. उपाय निचरा स्थितीत नांगरट केल्यास कमी नुकसान होते.
 
वर वर्णन केल्याप्रमाणे ट्रॅक्टर जमीन दाबण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत असतो. ट्रॅक्टर नांगरट, काकर्‍या पाळ्या घालताना अनेक वेळा मागे-पुढे होत असतो. उलट्या दिशेनी जाण्यापूर्वी तो वळत असतो तिथे जास्त प्रमाणात दाबल जातो, आपल्या शेतात स्वत:चा बाजूच्या शेतकर्‍याचा ऊस कारखान्यास जात असेल तर ट्रक व उसानी भरलेल्या जवळजवळ 10 टन वजनामुळे फारच मोठ्या प्रमाणावर जमीन दाबली जाते. परिणाम रोपांना वाढीच्या काळात खोल व बाजूस पसरण्यास मज्जाव होतो. मुळांची वाढ नाही म्हणजे उत्पन्न कमी. आपण नेहमीच अनुभवतो की बांधा जवळील भागात पीक वाढ कमी प्रमाणात असते. उपाय उभी व आडवी नांगरट करून हा घट्ट थर फोडून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करणे.
 
अगोदर वर्णन केल्याप्रमाणे जमिनीत ढेकळे, उंच सखलपणा इत्यादी राहिल्यास जमिनीत मुरलेले पाणी सर्व बाजूस पसरण्यात अडथळे तयार होतात. परिणामी जमिनी खालील मुुळ्यांना अन्नद्रव्य व पाणी यांचा पुरवठा धड होत नाही म्हणजे कमी उत्पन्न.
 
 
लक्षात ठेवावयाचे मुद्दे :
1) पुढच्या व मागच्या चाकातील अंतर समान असले पाहिजे.
2) वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी 90 अंशात काम करत असली पाहिजे. 
3) साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवरच मातीत चालला पाहिजे. 
4) पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालला पाहिजे. 
5) नांगरटीची खोली ही दोन सर्‍यातील अंतराच्या 2/3 इतकी असल्यास नांगरटी पासूनचे फायदे जास्त मिळतात. 
6) सर्व जागी असलेले नट व बोल्ट हे घट्ट असणे आवश्यक आहे. 
7) वर वर्णन केलेले काम ट्रॅक्टर हळू चालवूनच शक्य आहे. काम संपवण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये.
8) नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरूरीचे आहे. हे अवशेष 4 इंचापर्यंत जास्त खोल दाबले जाणे जरुरीचे आहे. असे केल्याने तण परत उगवणार नाही. 
9) दोन सर्‍यात जास्त अंतर ठेवल्यास मधल्या सर्व जमिनीतील मातीची उलथापालथ होत नाही व हेच कारण त्या भागात असलेल्या तण परत वाढण्याचे. याच कारणासाठी नांगरट करताना जवळ जवळ करावी. नांगरट जवळजवळ केल्याने जमिनीतील सर्व भागातील मातीची उलथापालथ होते, खालच्या थरात असलेले पूर्वीच्या पिकांचे अवशेष व तण बियाणे वर येते. पुढे ते नाहीसे करता येते.
10) नांगरटीच्या वेळी जमिनीत जर कमी प्रमाणात ओल असेल तर मातीचे कण एकमेकांना जास्त शक्तींनी धरून ठेवतात. याचा परिणाम नांगरटी नंतर मोठमोठी ढेकळे तयार होतात. या ऐवजी मातीत जास्त पाणी असेल तर चिखलणी होते व फाळाबरोबर वर येणारी माती तेलकट दिसू लागते. या स्थितीत पुढे पाणी प्रमाण कमी झाल्यावर जास्त घट्टपणा येतो. मुळांना वाढीच्या काळात खोल जाण्यास अडथळा येतो. 
11) सतत एकाच खोलीवर नांगरट केल्यास जमिनीखाली एक पडदा तयार होतो. जो पाण्याला खालच्या थरात जाऊ देत नाही. याच कारणासाठी अधूनमधून जास्त खोल नांगरट करणे जरुरीचे आहे. बर्‍याचवेळा हा पडदा 15 ते 18 इंचावर खाली असतो. त्यामुळे 2 फूट खोलीवर हा पडदा तोडण्यासाठी नांगरट करणे जरूरीचे आहे. काही जमिनीत हा थर 3-4 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोलीवरपण मिळतो. 
12) वनस्पतींच्या मुळांची खोली प्रत्येक पिकासाठी वेगळी असते. सर्वसाधारणपणे जमिनीपासून एकूण मुळाच्या खोलीच्या 70 ते 75 टक्के भागात अन्नद्रव्य व पाणी शोषण करणार्‍या मुळ्या असतात. (मुळे 12 इंच खोली जात असतील तर 8 ते 9 इंच थरात ही मुळे असतात.) याच थरातील माती भुसभुशीत असल्यास मुळांना हवा व पाणी भरपूर मिळते. शिवाय पाण्याचे वहन मातीत सर्व बाजूस व्यवस्थित होत असल्यामुळे या शोषणास जास्त फायदा होतो. ओल असल्यामुळे सूक्ष्मजीवांचे कार्य, सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन पानांना भरपूर कर्बवायू उपलब्ध होतो. या सर्वांचा परिणाम उत्तम पीक येते. हे सर्व साध्य करण्यासाठी नांगरट ते सपाटीकरण या क्रिया उत्तमच होणे आवश्यक आहे.
13) ट्रॅक्टर जेव्हा शेतात चालत असतो त्यावेळी चाकाच्या खालची माती त्याच्या वजनाने दबली जाते. 
14) हा परिणाम शेतात जास्त पाणी असेल तर प्रकर्षाने होतो. चिकणमातीत भविष्यात याचा परिणाम थोड्या प्रमाणात कमी होतो. कारण चिकणमाती पाणी धरून ठेवल्यामुळे फुगते पण पाण्याची वाफ झाल्यावर तेथे पोकळी तयार करते. ज्यामुळे हवा व पाणी त्या पोकळीत जमा होऊ शकते, अर्थात हे प्रमाण कमी जास्त होते.
14) जमिनीची पीक भरपूर देण्याची समर्थता त्यात असलेल्या कर्बयुक्त प्रमाणाशी निगडित असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थच कर्ब वायू पुरवू शकतात. सेंद्रिय पदार्थ जमिनीत वाढवण्याचे दोन मार्ग आहेत. एक- वरून गाडण्यासाठी पीक लावायचे व मग ते गाडायचे. दुसरा मार्ग जमिनीत असलेले सेंद्रिय घटक कमी होऊ न देणे-हेच आपल्याला नांगरट करताना साध्य करता येते. सेंद्रिय पदार्थ विघटन होऊनच नाश पावत असतात. या क्रियेसाठी ओल व प्राणवायू आवश्यक असतो. नांगरटी नंतर मोठमोठी ढेकळे असलेली जमीन बराच काळ उघडी ठेवल्यास सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. परिणामी उत्पन्न कमी येतेे. नांगरटी नंतर लगेच काकर्‍याच व पाळ्या घालून जर जमीन दाबून घेतली तर प्राणवायूचा पुरवठा अल्प प्रमाणातच होतो व सेंद्रिय घटकांचे विघटन थांबते म्हणजे जमिनीची प्रत फारशी खालावत नाही. 
15) दोन सर्‍यांतील अंतर एवढे असावे ज्यामुळे माती पूर्णपणे उलटली जाईल. ज्यावेळी माती पूर्णपणे उलटली जाते त्यावेळी तण खूपच कमी प्रमाणात उगवते.
16) पाळ्या घालताना ट्रॅक्टरची गती एवढी असणे जरूरी आहे, की वर असलेले पूर्व पिकांचे अवशेष पूर्णपणे जमिनीखाली 7 सेमी किंवा जास्त खोलवर गाडले जावेत. पाळ्यासाठी वापरलेल्या लोखंडी पट्टीचा कोन व खोली त्याप्रमाणे ठेवणे जरुरीचे आहे. 
17) ट्रॅक्टरची गती जास्त असेल तर माती फाळावरून पुढच्या बाजूस फेकली जाते. अशावेळी गती कमी करून माती दाबली जाईल हे पाहणे जरुरीचे आहे.
18) जमिनीत जर पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ट्रॅक्टर ठरवलेल्या खोलीवर जमीन कडक असल्यामुळे नांगरट होत नाही. अशावेळी जमिनीखाली 12 ते 18 इंचावर एक पडदा तयार होतो. जमीन कडक असल्यामुळे फाळच्या कडेवर घासल्या जाणार्‍या मातीची बारीक पूड तयार होते व पाणी दिल्यावर हळूहळू खालच्या थरात जाते व एक पडदा तयार करते. हाच पडदा निचरा स्थिती मिळवण्यात मोठा अडथळा ठरतो.
19) मातीची घनता वरच्या 5 ते 7 इंचाच्या थरात नांगरटीमुळे बदलत असते. या खोलीपेक्षा जास्त खोलीवर नांगरटीमुळे घनतेवर खूपच कमी परिणाम होतो. जितकी जास्त घनता तितक्या प्रमाणात मुळांना खोल जाण्यास अडथळा होतो. याच कारणामुळे नांगरट वरच्या थरात केल्यामुळे रोपं चांगली वाढतात. 
20) जमिनीतील पाण्याच्या प्रमाणावर मुळे जमिनीत शिरण्याचे प्रमाण ठरते. कमी पाणी असेल तर जमीन कडक असल्यामुळे मुळे खोल शिरण्यास अडथळा येतो. यावरून हे लक्षात घेणे जरूरीचे आहे की मुळांच्या खोलीपर्यंत पाणी पोचणे आवश्यक आहे. 
21) माती जर फाळाला चिकटलेली मिळाली तर त्याचा अर्थ जमिनीतील मातीची उलथापालथ धड झालेली नाही. पीक या उलथापालथी पासून मिळणारे फायदे मिळणार नाहीत.
22) फाळाचा शेवटाचा भाग थोडासा वाकडा असावा ज्यामुळे कडेची माती आतल्या बाजूस पडेल-फाळ रुंद सरीच्या रुंदीपेक्षा थोडी कमी असावी, रुंदी समान किंवा जास्त असेल तर माती बाजूस ढकलली जाईल.
नांगरट म्हणजे नुसती मातीची उलटापालट, भुसभुशीत इत्यादी कारणे नसून वर दिलेल्या माहितीवरून हे ध्यानात येईल, की नांगरट करताना किती तरी बाबींचा विचार करणे जरुरीचे आहे. शेतकर्‍यांना शेती करताना कमी उत्पादनाचा जो सामना करावा लागत आहे त्यातील काही कारणे वर दिलेल्या विवेचनात मिळण्याची शक्यता आहे. अर्थात यासाठी शेतकरी सध्या करत असलेल्या नांगरटीत काही उणिवा राहिल्या आहेत का, हे त्यांनी स्वत: तपासणे अत्यंत जरुरीचे आहे. 
 
 
नांगरटीचा उत्तम दर्जाचे भरपूर पीक येण्यासाठी उपाय :
 
1) चाकातील अंतर  :
नांगरटीसाठी वापरलेल्या ट्रॅक्टरच्या पुढच्या व मागच्या चाकातील अंतर समान असले पाहिजे. 
 
2) नांगराचा फाळ :
वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी 90 अंशात काम करत असला पाहिजे.
ट्रॅक्टरची गती जास्त असेल तर माती फाळावरून पुढच्या बाजूस फेकली जाते. अशा वेळी गती कमी करून माती दाबली जाईल हे पाहणे जरुरीचे आहे.
माती जर फाळाला चिकटलेली मिळाली तर त्याचा अर्थ जमिनीतील मातीची उलथापालथ धड झालेली नाही. पीकास या उलथापालथीपासून मिळणारे फायदे मिळणार नाहीत.
फाळाचा शेवटचा भाग थोडासा वाकडा असावा, ज्यामुळे कडेची माती आतल्या बाजूस पडेल. फाळ रुंद सरीच्या रुंदीपेक्षा तोडी कमी असावी, रुंदी समान किंवा जास्त असेल तर माती बाजूस ढकलली जाईल.
नांगरताना दोन प्रकारे ढेकळ तयार होतात. 
जमिनीत कमी प्रमाणात पाणी असेल तर, व दोन -तेलकटपणामुळे दोन्ही बाबतींत पुढे मातीचे बारीक कण वेगळे होऊ लागतात. मातीचे बारीक कण पाणी दिल्यावर हळूहळू खालच्या थरात जातात. पुढे या कणांमुळे जमिनीखाली पडदा तयार होतो जो निचरा होण्यात अडथळे तयार करतो.
 
3) पाळ्या :
पाळ्या घालताना वापरात असलेलेी पट्टी समान खोलीवरील मातीत चालला पाहिजे. 
पाळ्या घालताना ट्रॅक्टरची गती एवढी असणे जरुरीचे आहे, की वर असलेलं पूर्व पिकांचे अवशेष पूर्णपणे जमिनी खाली 7 सेंमी किंवा जास्त खोलवर गाडले जावेत. पाळ्यासाठी वापरलेल्या लोखंडी पट्टीचा कोन व खोली त्याप्रमाणे ठेवणे जरुरीचे आहे. 
 
4) नांगरटीची खोली :
साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवरच मातीत चालला पाहिजे.
नांगरटीची खोली ही दोन सर्‍यांती अंतराच्या 2/3 इतकी असल्यास नांगरटीपासूनचे फायदे जास्त मिळतात. सतत एकाच खोलीवर नांगरट केल्यास जमिनीखाली एक पडदा तयार होतो. जो पाण्याला खालच्या थरात जाऊ देत नाही. याच कारणासाठी अधूनमधून जास्त खोल नांगरट करणे जरुरीचे आहे. बर्‍याचवेळा हा पडदा 15 ते 18 इंचावर खाली असतो. त्यामुळे 2 फूट खोलीवर हा पडदा तोडण्यासाठी नांगरट करणे जरुरीचे आहे.
 
वनस्पतीच्या मुळांची खोली प्रत्येक पिकासाठी वेगळी असते. सर्वसाधारणपणे जमिनीपासून एकूण मुळांच्या खोलीच्या 70 ते 75 टक्के भागात अन्नद्रव्य व पाणी शोषण करणार्‍या मुळ्या असतात. (मुळे 12 इंच खोल जात असतील तर 8 ते 9 इंच थरात ही मुळे असतात.) याच थरातील माती भुसभुशीत असल्यास मुळांना हवा व पाणी भरपूर मिळते, शिवाय पाण्याचे वहन मातीत सर्व बाजूस व्यवस्थित होत असल्यामुळे या शोषणास जास्त फायदा होतो. ओल असल्यामुळे सूक्ष्मजीवांचे कार्य, सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन पानांना भरपूर कर्बवायू उपलब्ध होतो. या सर्वांचा परिणाम उत्तम पिक येते. हे सर्व साध्य करण्यासाठी नांगरट ते सपाटीकरण या क्रिया उत्तमच होणे आवश्यक आहे. 
 
मातीची घनता वरच्या 5 ते 7 इंचाच्या घरात नांगरटीमुळे बदलत असते. या खोलीपेक्षा जास्त खोलीवर नांगरटीमुळे घनतेवर खूपच कमी परिणाम होतो. जितकी जास्त घनता तितक्या प्रमाणात मुळांना खोल जाण्यास अडथळा होतो. याच कारणामुळे नांगरट वरच्या थरात केल्यामुळे रोपं चांगली वाढतात. जमिनीतील पाण्याच्या प्रमाणावर मुळे जमिनीत शिरण्याचे प्रमाण ठरते. कमी पाणी असेल तर जमीन कडक असल्यामुळे मुळं खोल शिरण्यात अडथळा येतो. यावरून हे लक्षात घेणे जरूरीचे आहे, की मुळांच्या खोलीपर्यंत पाणी पोचणे आवश्यक आहे. 
 
5) ट्रॅक्टरची काळजी :
सर्व जागी असलेले नट व बोल्ट हे घट्ट असणे आवश्यक आहे. वर वर्णन केलेले काम ट्रॅक्टर हळूहळू चालवूनच शक्य आहे. काम संपवण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये. ट्रॅक्टरची गती जास्त असेल तर माती फाळावरून पुढच्या बाजूस फेकली जाते. अशावेळी गती कमी करून माती दाबली जाईल हे पाहणे जरुरीचे आहे.
 
6) 1. शेतातील पूर्व पिकाचे अवशेष :
नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे. हे अवशेष 4 इंचापेक्षा जास्त खोल दाबले जाणे जरुरीचे आहे. असे केल्यानी तण परत उगवणार नाही.
 
7) दोन सर्‍यातील अंतर :
दोन सर्‍यात जास्त अंतर ठेवल्यास मधल्या सर्व जमिनीतील मातीची उलथा पालथ होत नाही व हेच कारण त्या भागात असलेल्या तण परत वाढण्याचे आहे. याच कारणासाठी नांगरट करताना जवळ जवळ करावी. नांगरट जवळ जवळ केल्याने जमिनीतील सर्व भागांतील मातीची उलथा पालथ होते. ‘खालच्या थरात असलेले पूर्वीच्या पिकांचे अवशेष व तण बियाणे वर येते. पुढे ते नाहीसे करता येते. दोन सर्‍यांतील अंतर एवढे असावे ज्यामुळे माती पूर्णपणे उलटली जाईल. ज्यावेळी माती पूर्णपणे उलटली जाते त्यावेळी तण खूपच कमी प्रमाणात उगवते. 
 
8) जमिनीतील पाणी प्रमाण :
नांगरटीच्या वेळी जमिनीत जर कमी प्रमाणात ओल असेल तर मातीचे कण एकमेकांना जास्त शक्तींनी धरून ठेवतात. याचा परिणाम नांगरटीनंतर मोठमोठी ढेकळे तयार होता. या ऐवजी मातीत जास्त पाणी असेल तर चिखलणी होते व फाळाबरोबर वर येणारी माती तेलकट दिसू लागते. या स्थितीत पुढे पाणी प्रमाण कमी झाल्यावर जास्त घट्टपणा येतो. मुळांना वाढीच्या काळात खोल जाण्यास अडथळा येतो. 
 
उन्हात नांगरलेली जमीन उघडी ठेवल्याने जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास होतो. अशा प्रकारे काही काळ नांगरट झाल्यावर जमीन उघडी ठेवल्यामुळे पाण्याचा र्‍हास उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे पाण्याचा झालेला र्‍हास पुढे पेरलेल्या पिकास कमी प्रमाणात मिळणार्‍या पाण्यामुळे फार कमी उत्पादन मिळते किंवा पीकच धोक्यात येते.
ढेकळ तयार झाल्यामुळे जेव्हा पाणी दिले जाते तेव्हा जमिनीत सर्वत्र सारख्या प्रमाणात पाणी शोषले जात नाही. त्याचा परिणाम काही भागांतील जमीन लवकर कोरडी होते. कोरडी जमीन खत कमी प्रमाणात पिकांना उपलब्ध करून देते. या शिवाय जमिनीवर उंच व खोलगट असे लक्षात येतील असे भाग तयार होतात. ज्यामुळे पाणी समप्रमाणात दिले जात नाही. याचे पर्यवसान पीक नगण्य येण्यात होते.
 
9) ट्रॅक्टरच्या चाकांचा जमिनीवरील दाब :
ट्रॅक्टर जेव्हा शेतात चालत असतो त्यावेळी चाकाच्या खालची माती त्याच्या वजनानी दबली जाते. हा परिणात शेतात जास्त पाणी असेल तर प्रकर्षानी होतो. चिकणमातीत भविष्यात याचा परिणाम थोड्या प्रमाणात कमी होतो. कारण चिकणमाती पाणी धरून ठेवल्यामुळे फुगते पण पाण्याची वाफ झाल्यावर तेथे पोकळी तयार करते ज्यामुळे हवा व पाणी त्या पोकळीत जमा होऊ शकते, अर्थात हे प्रमाण कमी जास्त होते.
 
10) जमिनीतील सेंद्रिय पदार्थ :
जमिनीची पीक भरपूर देण्याची समर्थता त्यात असलेल्या कर्बवायू प्रमाणाशी निगडित असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थच कर्बवायू पुरवू शकतात. सेंद्रिय पदार्थ जमिनीत वाढवण्याचे दोन मार्ग आहेत. एक वरून गाडण्यासाठी पीक लावायचे व मग ते गाडायचे. दुसरा मार्ग जमिनीत असलेले सेंद्रिय घटक कमी होऊ न देणे. हेच आपल्याला नांगरट करताना साध्य करता येते. सेंद्रिय पदार्थ विघटन होऊनच नाश पावत असतात. या क्रियेसाठी ओल व प्राणवायू आवश्यक असतो. नांगरटी नंतर मोठमोठी ढेकळे असलेली जमीन बराच काळ उघडी ठेवल्यास सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. परिणामी उत्पन्न कमी येते. नांगरटी नंतर लगेच काकर्‍या व पाळ्या घालून जर जमीन दाबून घेतली तर प्राणवायूचा पुरवठा अल्प प्रमाणातच होतो व सेंद्रिय घटकांचे विघटन थांबते. म्हणजे जमिनीची प्रत फारशी खालावत नाही. 
 
2) शेतात नांगर व कामगारांच्या हालचालीमुळे आलेला घट्टपणा.
शेतात ज्या ज्या कामासाठी ट्रॅक्टर वापरला जातो तसेच कामगार निरनिराळी कामे करताना ज्या हालचाली करत असतात त्याचा परिणाम त्या भागातील जमिनीचा पट्टा घट्ट बनतो.
 
11) जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यातील अडचणी :
जमिनीत जर पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ट्रॅक्टर ठरवलेल्या खोलीवर जमीन कडक असल्यामुळे नांगरट होत नाही. अशावेळी जमिनीखाली 12 ते 18 इंचावर एक पडदा तयार होतो. जमीन कडक असल्यामुळे फाळाच्या कडेवर घासल्या जाणार्‍या मातीची बारीक पूड तयार होते व पाणी दिल्यावर हळूहळू खालच्या थरात जाते व एक पडदा तयार करते. हाच पडदा निचरा स्थिती मिळवण्यात मोठा अडथळा ठरतो.
 
12) सूक्ष्म जीव :
जमिनीत निरनिराळ्या कारणांनी जी ढेकळं तयार होतता व ती जेव्हा हळूहळू फुटून लहान लहान होतात त्या काळात व त्यानंतरच्या काही काळासाठी गांडूळ व इतर सूक्ष्मजीवांच्या हालचाली एकदम बंद तरी होतात किंवा मोठ्या प्रमाणावर कमी होतात. सूक्ष्म जीवांचे कार्य कमी किंवा बंद होणे याचा अर्थ पीक उत्पादनात त्या प्रमाणात घट होय.
 
 
नांगरट करताना पीक संवर्धनासंबंधीत मुद्दे :
 
नांगरट करताना खाली दिलेल्या मुद्दयांचा विचार शेतकर्‍यांनी केल्यास व त्याप्रमाणे काम केल्यास उत्तम व भरपूर शेतमाल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
 
नांगराचा फाळ
वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी 90 अंशात काम करत असला पाहिजे.
ट्रॅक्टरची गती जास्त असेल तर माती फाळावरून पुढच्या बाजूस फेकली जाते. अशा वेळी गती कमी करून माती दाबली जाईल हे पाहणे जरुरीचे आहे.
 
माती जर फाळाला चिकटलेली मिळाली तर त्याचा अर्थ जमिनीतील मातीची उलथापालथ धड झालेली नाही. पीकास या उलथापालथी पासून मिळणारे फायदे मिळणार नाहीत.
 
फाळाचा शेवटचा भाग थोडासा वाकडा असावा, ज्यामुळे कडेची माती आतल्या बाजूस पडेल. 
 
फाळ रुंद सरीच्या रुंदीपेक्षा तोडी कमी असावी, रुंदी समान किंवा जास्त असेल तर माती बाजूस ढकलली जाईल.
 
जमिनीतील पाणी प्रमाण नांगरटीच्या वेळी जमिनीत जर कमी प्रमाणात ओल असेल तर मातीचे कण एकमेकांना जास्त शक्तींनी धरून ठेवतात. याचा परिणाम नांगरटीनंतर मोठमोठी ढेकळे तयार होता. या ऐवजी मातीत जास्त पाणी असेल तर चिखलणी होते व फाळाबरोबर वर येणारी माती तेलकट दिसू लागते. या स्थितीत पुढे पाणी प्रमाण कमी झाल्यावर जास्त घट्टपणा येतो. मुळांना वाढीच्या काळात खोल जाण्यास अडथळा येतो. 
 
जमिनीवर ढेकळ बनण्यामुळे किंवा तेलकट प्रकारची माती वर आल्यामुळे होणारा परिणाम दीर्घ काळ टिकणारा असतो. परिणामी जमीन सुधारल्याशिवाय पीक उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूपच कमी येत राहते.
 
ट्रॅक्टरच्या चाकांचा जमिनीवरील दाब :
ट्रॅक्टर जेव्हा शेतात चालत असतो त्यावेळी चाकाच्या खालची माती त्याच्या वजनानी दबली जाते. हा परिणात शेतात जास्त पाणी असेल तर प्रकर्षानी होतो. चिकणमातीत भविष्यात याचा परिणाम थोड्या प्रमाणात कमी होतो. कारण चिकणमाती पाणी धरून ठेवल्यामुळे फुगते पण पाण्याची वाफ झाल्यावर तेथे पोकळी तयार करते ज्यामुळे हवा व पाणी त्या पोकळीत जमा होऊ शकते, अर्थात हे प्रमाण कमी जास्त होते.
 
जमिनीतील सेंद्रिय पदार्थ उपलब्धतेवर होणारा परिणाम :
जमिनीची पीक भरपूर देण्याची समर्थता त्यात असलेल्या कर्बवायू प्रमाणाशी निगडित असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थच कर्बवायू पुरवू शकतात. सेंद्रिय पदार्थ जमिनीत वाढवण्याचे दोन मार्ग आहेत. एक वरून गाडण्यासाठी पीक लावायचे व मग ते गाडायचे. दुसरा मार्ग जमिनीत असलेले सेंद्रिय घटक कमी होऊ न देणे. हेच आपल्याला नांगरट कारताना साध्य करता येते. सेंद्रिय पदार्थ विघटन होऊनच नाश पावत असतात. या क्रियेसाठी ओल व प्राणवायू आवश्यक असतो. नांगरटीनंतर मोठमोठी ढेकळे असलेली जमीन बराच काळ उघडी ठेवल्यास सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. परिणामी उत्पन्न कमी येते. नांगरटीनंतर लगेच काकर्‍या व पाळ्या घालून जर जमीन दाबून घेतली तर प्राणवायूचा पुरवठा अल्प प्रमाणातच होतो व सेंद्रिय घटकांचे विघटन थांबते. म्हणजे जमिनीची प्रत फारशी खालावत नाही. 
  
नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे. हे अवशेष 4 इंचापेक्षा जास्त खोल दाबले जाणे जरुरीचे आहे. असे केल्यानी तण परत उगवणार नाही.
पीक घेण्यासाठी रान तयार करणे.
नांगरटीची खोली.
साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवरच मातीत फाळ चालला पाहिजे.
नांगरटीची खोली ही दोन सर्‍यांतील अंतराच्या 2/3 इतकी असल्यास नांगरटी पासूनच फायदे जास्त मिळतात. 
 
सतत एकाच खोलीवर नांगरट केल्यास जमिनीखाली एक पडदा तयार होतो जो पाण्याला खालच्या थरात जाऊ देत नाही. त्याच कारणासाठी अधून मधून जास्त खोल नांगरट करणे जरुरीचे आहे. बर्‍याच वेळा हा पडदा 15 ते 18 इंचावर खाली असतो. त्यामुळे 2 फूट खोलीवर हा पडदा तोडण्यासाठी नांगरट करणे जरुरीचे आहे.
 
वनस्पतीच्या मुळांची खोली प्रत्येक पिकासाठी वेगळी असते. सर्वसाधारणपणे जमिनीपासून एकूण मुळांच्या खोलीच्या 70 ते 75 टक्के भागात अन्नद्रव्य व पाणी शोषण करणार्‍या मुळ्या असतात. (मुळे 12 इंच खोल जात असतील तर 8 ते 9 इंच थरात ही मुळे असतात.) याच थरातील माती भुसभुशीत असल्यास मुळांना हवा व पाणी भरपूर मिळते, शिवाय पाण्याचे वहन मातीत सर्व बाजूस व्यवस्थित होत असल्यामुळे या शोषणास जास्त फायदा होतो. ओल असल्यामुळे सूक्ष्मजीवांचे कार्य, सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन पानांना भरपूर कर्बवायू उपलब्ध होतो. या सर्वांचा परिणाम उत्तम पिक येते. हे सर्व साध्य करण्यासाठी नांगरट ते सपाटीकरण या क्रिया उत्तमच होणे आवश्यक आहे. 
 
मातीची घनता वरच्या 5 ते 7 इंचाच्या घरात नांगरटीमुळे बदलत असते. या खोलीपेक्षा जास्त खोलीवर नांगरटीमुळे घनतेवर खूपच कमी परिणाम होतो. जितकी जास्त घनता तितक्या प्रमाणात मुळांना खोल जाण्यास अडथळा होतो. याच कारणामुळे नांगरट वरच्या थरात केल्यामुळे रोपं चांगली वाढतात. 
 
जमिनीतील पाण्याच्या प्रमाणावर मुळे जमिनीत शिरण्याचे प्रमाण ठरते. कमी पाणी असेल तर जमीन कडक असल्यामुळे मुळं खोल शिरण्यात अडथळा येतो. यावरून हे लक्षात घेणे जरूरीचे आहे, की मुळांच्या खोलीपर्यंत पाणी पोचणे आवश्यक आहे.
 
अगोदरचे पीक घेताना सर्वसाधारणपणे सरी वरंबा पद्धत अवलंबली जाते. पिकाच्या काळात निरनिराळ्या हालचाली तसे दिवस व रात्र यातील हवामानाचा फरक परिणाम करत राहतो. अशाप्रकारे जमिनीवर झालेला परिणाम पुढील पिकाच्या वाढीत व पोषणात अडथळे निर्माण करतो. शेतकर्‍याला हे सर्व जर टाळावयाचे असेल तर सरिवरंबा भागात आलेला घट्टपणा पूर्णपणे मोडल्याशिवाय नवीन पीक चांगले येणार नाही. 
 
शेतकरी बर्‍याच वेळा फाळवर घेऊन ट्रॅक्टर मागे पुढे करत असतात. त्यामुळे खुद्द नांगरटीपेक्षा नांगरट चालू नसल्याच्या परिस्थितीत जमीन दाबली जात असते.
 
नांगरटीची खोली :
शेतकर्‍यांना बर्‍याच वेळा हे अनुभवास येत असते की एकाच खोलीवर जमीन नांगरली जात नाही. सर्वसाधारणपणे फाळ हे कारण मानून नांगरट योग्य खोलीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो.
 
फाळ हे जरी एक कारण असले तरी जमिनीशी संबंधित जी कारणं आहेत ती विचारात घेतली जात नाहीत. नांगरट करत असलेली जमीन जर एकाच घनतेची किंवा समप्रमाणात भुसभुशीत झालेली नसेल तर ठीक ठिकाणी घट्टपणा वाटेत येतो. त्या जागेवर फाळ पुढे जाताना जास्त शक्ती वापरावी लागते. अशावेळी जर ट्रॅक्टरची गती जास्त असेल तर मातीचा घट्टपणा पूर्णपणे न मोडता फाळ जरा वर उचलला जातो व पुढे जातो. परिणामी सरी कमी जास्त खोलीची तयार होते व सरीत पाणी पसरण्यास अडथळा करणारा घट्टपणा पण तसाच राहतो. पेरणी करताना बियाणे कमी-जास्त खोलीवर जाते. उगवणीस आवश्यक असलेली खोली व पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे उगवण सर्व ठिकाणी न होता तुटाळी येते. याचा परिणाम उत्पन्नावर होतो. शिवाय नांगरटीचा खर्चपण वाढतो म्हणजे नुकसानच होते.
 
दोन सर्‍यांतील अंतर :
नवीन पिकासाठी पूर्वमशागत करताना दोन सर्‍यांत जास्त अंतर ठेवल्यास मधल्या सर्व जमिनीतील मातीची उलथापालथ होत नाही व हेच कारण त्या भागात असलेल्या तण परत वाढण्याचे आहे. याच कारणासाठी नांगरट करताना जवळ जवळ करावी. नांगरट जवळ जवळ केल्याने जमिनीतील सर्व भागांतील मातीची उलथापालथ होते, खालच्या थरात असलेले पूर्वीच्या पिकांचे अवशेष व तण बियाणे वर येते. पुढे ते नाहीसे करता येते. 
 
निचरा :
जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यातील अडचणी
जमिनीत जर पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ट्रॅक्टर ठरवलेल्या खोलीवर व जमीन कडक असल्यामुळे नांगरट होत नाही. अशावेळी जमिनीत जर पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ट्रॅक्टर ठरवलेल्या खोलीवर जमीन कडक असल्यामुळे नांगरट होत नाही. अशावेळी जमिनीखाली 12 ते 18 इंचावर एक पडदा तयार होतो. जमीन कडक असल्यामुळे फाळाच्या कडेवर घासल्या जाणार्‍या मातीची बारीक पूड तयार होते व पाणी दिल्यावर हळूहळू खालच्या थरात जाते व एक पडदा तयार करते. हाच पडदा निचरा स्थिती मिळवण्यात मोठा अडथळा ठरतो.
 
जागोजागी जमिनीवर पाणी जमा होणे :
सरीत पीक काळात जे कामगार काम करत असतात व इतर कारणांनी उंच-सखलपणा येतो. पाणी दिल्यावर खोलगट भागात बरेच पाणी जमा होते. असे जमा झालेले पाणी निचरा होईपर्यंत कामगारांना काम करण्यात अडथळे करत राहते. या पाणी जमा झालेल्या भागांत जर काही कारणांनी कामे चालू ठेवली तर त्या भागातील मातीची चिखलणी होते. चिखलणी झालेल्या भागात पुढे ढेकळ तयार होतात व नंतर दिलेल्या पाण्यास समप्रमाणात पसरण्यास विरोध करतात. घट्टपणा मोडणे अत्यंत आवश्यक आहे.
 
शेतकर्‍यांनी नांगरट करताना पूर्व पिकाच्या पूर्वमशागतीत तयार झालेला सरी वरंब्यामुळे व निरनिराळ्या कारणांनी शेतात आलेला घट्टपणा तसेच जमिनीखाली तयार झालेला माती कणांचा पडदा पूर्णपणे मोडला नाही तर नवीन पीक उत्पादन हमखास कामी येणार. 
 
पाळ्या :
पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालली पाहिजे.
पाळ्या घालताना ट्रॅक्टरची गती एवढी असणे जरुरीचे आहे, की वर असलेले पूर्व पिकांचे अवशेष पूर्णपणे जमिनीखाली 7 सेंमी किंवा जास्त खोलवर गाडले जावेत. पाळ्यासाठी वापरलेला लोखंडी पट्टीचा कोन व खोली त्याप्रमाणे ठेवणे जरुरीचे आहे. 
 
नांगरट म्हणजे नुसती मातीची उलटापालट इत्यादी कारणे नसून वर दिलेल्या माहितीवरून हे ध्यानात येईल की नांगरट करताना किती तरी बाबींचा विचार करणे जरूरीचे आहे. शेतकर्‍यांना शेती करताना कमी उत्पादनाचा जो सामना करावा लागत आहे त्यातील काही कारणे वर दिलेल्या विवेचनात मिळण्याची शक्यता आहे. 
 
शेतकरी बांधवांना आवाहन :
वाचक शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या या लेखात आपणास वाटलेली कमतरता पत्र रूपाने बळीराजा मासिकास जरूर कळवावी. या शिवाय अनवधानाने राहून गेलेले मुद्दे पण कळवावे. 
अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण केल्यामुळे शेतकर्‍यांच्या ज्ञानात भरच पडणार आहे. परिपूर्ण माहिती व त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी काम केले तर कमी उत्पादन व उत्पन्न ही समस्याच राहणार नाही. 
 
 
 
अरविंद बाळकृष्ण कुलकर्णी
भांबोरा, तालुका-कर्जत, जिल्हा- अहमदनगर
अंबरीश,प्लॅट नं 8.अपरानंद सोसायटी, आनंदगर,
सिंहगडरस्ता, पूणे 411 051.
मोबाइल नं- 9890627045