कोकणकन्याळ : शेळीपालकांना वरदान

डिजिटल बळीराजा    09-Dec-2017

 

  
पशु-पक्षी हे शेतकर्यांचे खरे मित्र आहेत. आज मानवाच्या आहारात आणि औद्योगिक क्षेत्रात पशुपक्षी उत्पादनाची मागणी वाढत आहे.म्हणूनच पशुपक्षी पालन व्यवसायाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशातील तरुणवर्ग मोठया प्रमाणात शेळीपालन व्यवसायाकडे आकर्षित होताना दिसत आहे. त्याचे कारण देशात शेळीच्या मांसाला वाढत असलेली मागणी आणि त्या मांसाला मिळत असलेला विक्र्री दरआहे. देशातील शेळीच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती मांसाची गरज पूर्ण करण्यासाठी शेळीच्या मांस उत्पादनास फार मोठा वाव आहे. त्या द़ृष्टिने देशातील तरुण या व्यवयासाकडे मोठया संख्येने वळत आहेत. परंतू अति पर्जन्यमान, दमट आणि उण हवामान असलेल्या कोंकणासारख्या प्रदेशात शेतकरी तसेच ग्रामीण तरुणांपूढील ही मोठी समस्या आहे. येथे पावसाळयातील चार ते पाच महिने दमट आणि ओलसर वातावरणामुळे शेळयांच्या रोगराईचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शेळीपालकांचे मोठे नुकसान होते.
 
 
 
कोकणातील अति पर्जन्यमान व उण दमट हवामानाच्या भूप्रदेशासाठी योग्य अशी शेळीची जात स्थानिक शेळयांच्या कळपातून सर्वेक्षण करून निशिचत केलेल्या गुणधर्माच्या आधारे अधिक उत्पादनक्षमतेसाठी निवडलेल्या शेळयांमध्ये सुधारणा करून ‘कोकणकन्याळ’ ही नविन सुधारीत शेळीची जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने 2010 साली प्रसारित केली आहे. या शेळीच्या जातीची नोंद राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्यूरो यांचेकडे इंडीया गोट 1100- कोकण कन्याळ- 06022 अशी बावीसाव्या अनुक्रमाने करण्यात आली आहे. कोंकणकन्याळ शेळी मुख्यत: मांस उत्पादनासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. कोकणासारख्या अति पर्जन्यमान व उषण दमट हवामानाच्या भूप्रदेशासाठी हि जात अतिशय उपयुक्त आहे. म्हणून महाराषट्रतील भूमिहीन, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. या जातीच्या पैदाशीचा स्त्रोत दक्षिण कोकण आहे. या जातीच्या शेळयांची पैदास कोकणामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने सिंधुदूर्ग जिल्हयात पशु संशोधन केंद्र, निळेली, रत्नागिरी जिल्हयात कृषि तंत्र विद्यालय, लांजा, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, दापोली आणि मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली तसेच रायगड जिल्हयामध्ये कृषि विज्ञान केंद्र, रोहा येथे करण्यात येते.
 
 
 
या जातीला कोकण तसेच महाराषट्रातील इतर विभागामध्ये शेळीपालन व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर मागणी आहे. विद्यापीठाकडून आगावू नोंदणी केलेल्या शेतकर्यांना प्राधान्य क्रमाने प्रशिक्षित करून शेळयांचा पुरवठा करण्यात येत आहे.
 
 
शेळीच्या शारिरीक गुणधर्माची वैशिषटये -
 
1. ही जात स्थानिक शेळयांपेक्षा चांगलीच उंच, शरीराने काटक असून आकाराने मोठी आहे. 
2. कान लांब, लोंबकळणारे, चपटे आणि काळया रंगासह पांढरी किनार असणारे असतात. 
3. चेहरा, मान आणि कानावर काळया रंगासह पांढरी किनार असते.
4. डोक्यावर नाकपुडयांपासून कानापर्यंत दोन्ही बाजूंनी काळयारंगासह पांढरी किनार असते.
5. कपाळ पसरट आणि रूंद असते.
6. शिंगे गोल टोकदार मागे वळलेली, मान लांब, तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा व भरदार छाती असलेली अशी आहे.
7. शेपटी वरील बाजूने काळी आणि खालील बाजूने पांढरी असते.
8. मादीचा बांधा मोठा असल्यामुळे एकापेक्षा जास्त करडे (गर्भ) गर्भाशयात जोपासण्याची क्षमता आहे. नर बोकड उंच, छाती भरदार, शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असलेला आहे.
9. पायात अंतर जास्त, पाय मजबूत व खूर उंच असलेला, डोके, मान व खांद्याचा भाग दणकट व पृठ, नर अतिशय चपळ व माजावर असलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असा आहे.
10. या शेळी जातीच्या नराची सरासरी उंची 87.2 सें.मी. आणि मादीची 69.6 सें.मी. असून, छातीचा घेर नरामध्ये 87.8सें.मी. तर मादीमध्ये 73.8सें.मी. आहे. शरीराची लांबी नरामध्ये 83सें.मी. व मादीमध्ये 72.8 सें.मी. आहे. 
11. डोंगर-दर्याच्या प्रदेशात चरावयास चालण्यासाठी आवशयक असे मजबूत व काटक पाय, टणक व उंच खूर असलेली असे विशिष्ठ गुणधर्म असलेली असल्यामुळे कोकणातील डोंगरदर्याच्या प्रदेशास योग्य अशीआहे.
 
 
शेळीच्या शारिरीक वाढीची वैशिष्ठे :
 
1. जन्मत: करडाचे वजन2 ते 2.50 किलो आणि जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. 
2. एक वर्षामध्ये बोकडाचे वजन सुमारे 25.26 किलो भरते, करडाचे 3 महिने वयापर्यंतचे वजन 9.12 किलो, 6 महिने वयाचे वजन 15.14 किलो तर 9 महिने वयाचे वजन 19.20 किलो आहे.
3. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी वजन 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोपर्यंत मिळते.
शेळयांचे प्रजनन वैशिष्ठय
1. ही शेळी 11व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. 
2. मादिचे वयात येण्याचे वय 329.25 दिवस आहे.
3. पहिल्या वेताचे वय 507.67 दिवस असते.
4. पहिल्या वेताच्या वेळचे वजन24.50 कि.ग्रॅ. आहे.
5. गाभण काळ 147.52 दिवस असतो.
6. दोनवेतातीलअंतर7.5 महिनेअसून2वर्षाततीनवेतदेतेआणि मरतुकीचेप्रमाण फक्त 3.6 टक्के पर्यंतआहे.
 
 
शेळयांचे दुग्धोत्पादन वैशिष्ठये :
 
1. वेतातील दुग्धोत्पादन 59.02 लिटर आहे.
2. दूधदेण्याचाकाळसरासरी101 दिवसअसून, भाकडकाळहा84 दिवसांचाअसतो. 
3. शेळीचे दुधाचे प्रमाणही चांगले असून प्रत्येक दिवशी सरासरी 0.7 लिटर दूध मिळते. 
4. दुधातील स्निग्धांश 3.01 टक्के आहे.
5. दुधातील स्निग्धोत्तर पदार्थ 9.21 टक्के आहे.
6. दुधाचे गुरूत्व 1.03 टक्के आहे.
 
 
शेळयांचे मांसाचे वैशिष्ठे :
 
1. ही जात मांस उत्पादनासाठी असून मांस उत्तम, स्वादिष्ट आणि रूचकर आहे.
2. मांसामध्ये प्रथिने 17.24 ते 20.39 टक्के, स्निग्ध पदार्थ 1.77 ते 2.58 टक्के आणि खनिजे 0.85 ते 1.34 टक्के असतील.
3. 6,9 आणि 12 महिने वयाचे बोकडाचे वजन 11.68, 16.20 आणि 19.30 किलो असून त्यांचे पासून अनुक्रमे 5.74, 8.22 आणि 9.89 किलो मांस मिळते. मांसाचा उतारा अनुक्रम 6,9 आणि 12 महिने बोकडाचे वयात 49.10,51.11 आणि 51.25 टक्के असतो.
4. 1.5 ते 2वर्षे वयाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के एवढा आहे.
 
 
शेळयांचे व्यवस्थापन : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामध्ये कोकणकन्याळ शेळयांच्या व्यवस्थापन पध्दतीचा अभ्यास केला असता अभ्यासाअंती असे निर्दानास आले कि, कोकणकन्याळ जातीच्या शेळयांचे संगोपन मोकाट, बंदिस्त आणि अांत: मोकाट आणि अांत: बंदिस्त पध्दतीने केल्यास या तिनही पध्दतीमध्ये अनुक्रमे शेळयांच्या वजनात प्रतिदिन सरासरी 20 ग्रॅम, 70 ग्रॅम आणि 80 ग्रॅम वजनवाढ दिसून आली. मोकाट पध्दतीत 11 महिने वयाच्या नराचे सरासरी वजन 25 किलोतर बंदिस्त आणि अर्ध बंदिस्त पध्दतीत 40 किलो आणि 38 किलोपर्यंत मिळते. यामध्ये कोकणकन्याळ जातीच्या शेळयांमध्ये सर्वात जास्त वजनवाढ बंदिस्त पध्दतीत दिसून आली आहे. शेतकर्यांनी आपली आर्थिक परिस्थिती आणि उपलब्ध जागेचा आणि साधनांचा विचार करून शेळीपालन पध्दतीची निवड करावी.
 
 
शेळयांचे आरोग्य : कोकणकन्याळ जातीच्या शेळयांमध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यल्प आहे. कोकण कृषि विद्यापीठाने घेतलेल्या अभ्यासावरून या शेळयांमध्ये मरतुकीचे प्रमाण फक्त 3.6 टक्के इतके आढळले आहे. कोकण हा अति पावसाचा भूप्रदेश आहे. पावसाळयात येथील हवामान अति दमट आणि उषण असते. अति पावसामुळे शेळयांना सहसा निमोनिया हा आजार होतो. परंतू असे असूनही कोकणकन्याळ जातीच्या शेळयांमध्ये एकही निमोनियाची केस आढळली नाही. यावरून अति पर्जन्यमान आणि उषण, दमट हवामानातील भूप्रदेशात तग धरणारी अशी ही शेळीची जात एक वरदान आहे.
 
 
डॉ. डी. जे. भगत,
प्राध्यापक (कॅस),
पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग,
कृषी महाविद्यालय, दापोली