शेती विषयक

ट्रॅक्टरची देखभाल वाढवते कार्यक्षमता

ट्रॅक्टर शेतीमध्ये काम करीत असताना त्याच्या विविध भागांची झीज होते. त्यामुळे ट्रॅक्टरची नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमता व आयुष्य वाढते. त्यासाठी निरीक्षण, अ‍ॅडजस्टमेंट व दुरुस्ती ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी...

शिंगाडा लागवड तंत्रज्ञान

शिंगाडा या पिकाची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड कशी करावी तसेच काढणी व साठवणुकीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

सीताफळ लागवड तंत्रज्ञान

सीताफळाचे सुधारित तंत्रज्ञानाने भरपुर उत्पन्न घेण्यासाठी जमीन, सुधारित जाती, लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, बहार छाटणी, आंतरपीक, पीकसंरक्षण, फळांची काढणी व साठवणूक संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहेत. ..

निर्यातक्षम भाजीपाला गुणवत्ता मानांक

भाजीपाला निर्यात करताना त्याचा दर्जा, आधुनिक पकिंग, शीत साखळी, फवारलेल्या औषधाच्या घटक अवशेषांचे प्रमाण, बाजारपेठ आधीचा काटेकोरपणे अभ्यास करून निर्यात वाढविण्यासाठी गुणवत्ता मानांक विषयी माहिती या लेखात दिले आहे...

निर्यातक्षम भेंडी उत्पादन

निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन घेण्यासाठी आधुनिक लागवडीच्या तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक असून या संबंधीच्या माहितीचा समावेश या लेखात केला आहे. ..

झेंडू

झेंडू पिकाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याची सुधारित पद्धतीने लागवड करणेसाठी हवामान जमीन, महत्वाच्या जाती, लागवड पध्दती, खते व पाणी व्यवस्थापन, व महत्वाच्या कीडी व रोगाचे नियंत्रण व काढणी तंत्राविषयी माहिती असणे आवश्यक असून ती ह्या लेखात सखोलपणे सादर केली आहे...

खरीप मका लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रात मका हे नगदी पीक असून लागवडीसाठी जमीन व हवामान , पिकाचे सुधारित वाण, पिकातील अंतर, पूर्वमशागत, बीजप्रक्रिया, आंतरपिके, पाणी व खत व्यवस्थापन, संरक्षण व पिकाची काढणी व मळणी संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे. ..

कागदी लिंबाची व्यापारी लागवड

कागदी लिंबाची तंत्रशुध्द लागवड व व्यावसाईक उत्पादन कसे घ्यावे यासंबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे..

कडधान्य पिकाचे महत्त्व कमी उत्पादनाची कारणे आणि उपाय

कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते. असे प्रयोगांती सिद्ध झालेले असून कडधान्य पिकाचे महत्त्व, कमी उत्पादनाची कारणे आणि त्यावर उपाय संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे...

गाजर गवतापासून कंपोस्ट खतनिर्मिती

महाराष्ट्रात हे गवत फक्त शेतकर्‍यांसाठीच नाहीतर मनुष्यप्राणी , पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोकाच बनत चाला आहे. यासाठी गाजर गवतापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे त्याचे फायदे व पर्यावरणाची सुरक्षा कशी राखावू या संबंधीची माहिती सदरच्या लेखात दिली आहे...

द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

सध्याच्या वातावणात मिलीबर्ग तसेच खोड किडीचा प्रौढ भुंग्यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे ह्यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

टोमॅटोवरील किडींची ओळख व नियंत्रण

किडींचे निदान केल्याशिवाय त्यावर कोणतेही उपाय करू नयेत. टोमॅटो पिकावर पडणार्‍या किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यावरील किडींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. टोमॅटोवर पडणार्‍या किडींचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार, जैविक नियंत्रणाचे उपाय याबद्दल थोडक्यात माहिती या लेखात करून घेऊ...

सिताफळ पीक संरक्षण

सिताफळ हे कोरडवाहू शेतातील किंवा बांधावरील, हलक्या ते मुरमाड जमिनीपासून सर्वच जमिनीत येणारे महत्त्वाचे फळपीक असून अत्यंत कमी पाणी, कमी खर्चात आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे महत्त्वाचे फळपिक आहे. ..

सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवणूक

सोयाबीन पिकाची कापणी, मळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची योग्य प्रकारे साठवणूक करणे ह्या गोष्टी बियाण्याची गुणवत्ता व उगवण शक्ती टिकवून ठेवण्यात आणि योग्य बाजारभाव मिळवून देण्यात महत्वपूर्ण ठरतात. म्हणून उत्तम दर्जाचे बियाणे उत्पादित करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सोयाबीनची कापणी, मळणी व साठवणूक करणे आवश्यक आहे. ..

भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

खरिपातील महत्वाचे भात पिकावर येणार्‍या करपा या रोगाची ओळख त्याचे वर्गीकरण त्यामुळे होणाये नुकसान व त्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती घेऊ या...

पीक संरक्षण आणि संजीवन शेती विचार

संजीवन शेती ही प्रचलित शेतीपद्धतीपेक्षा वेगळा विचार करत आली आहे, नेहमी सकारात्मक विचार करत आली आहे. ही आगळीवेगळी विचारपद्धती काय आहे हे समजून घेतल्यास शेतकर्‍यांचा नक्की फायदा आहे हे लक्षात येईल...

नाचणीवरील रोगांचे व्यवस्थापन

नाचणी (इल्युसाइन कोरॅकोना) हे पीक धान्य व सात्त्विक पेय बनविण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. नाचणीवर करपा, पर्णकोष करपा, पानावरील ठिपके, खोडकूज किंवा मर, रोपे कोलमडणे, काणी, बुरशीजन्य केवडा, विषाणुजन्य केवडा, विषाणुजन्य मोटल स्ट्रीक, जिवाणुजन्य पर्ण करपा, इ. रोगांची माहिती या लेखात वाचायला मिळेल. ..

भात पिकावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण

महाराष्ट्रात भात हे दुसरे प्रमुख पीक असून त्यावर पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, लष्करी अळी, गादमाशी, तपकिरी तुडतुडे आणि निळे भुंगेरे या महत्वाच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याबद्दल अधिक माहिती या लेखात देण्यात आलेली आहे...

मधमाश्या पालनाची मूलभूत गरज, उपयुक्त वनस्पती संवर्धन

मोहोळातील मधमाश्यांच्या, राणी, नर व कामकरी माशांच्या संगोपनासाठी या दोन्ही अन्नघटकांची गरज खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांना उपयोगी पडणार्‍या वनस्पतींची लागवड व संवर्धन अत्यावश्यक आहे. वनस्पतींचे नाव, फुलण्याचा काळ, पुष्परस व परागकणांसाठीची उपयुक्तता, वृक्ष लागवडीचा हंगाम, उपलब्धतेचे भौगोलिक क्षेत्र, अशी सर्वांगीण माहिती या लेखात वाचायला मिळेल...

कीडनाशकांचे अवशेष व त्यांचे व्यवस्थापन

आपल्या देशात कीडनाशकांचा वापर इतर विकसित देशांच्या तुलनेत अगदीच कमी असला तरी त्यांच्या अवेळी व अवाजवी वापराने कीडनाशकांचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. भारतातील नागरिकही आता अन्नातील रासायनिक कीडनाशकांच्या अवशेषांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत,तेव्हा शेतकर्‍यांनी या गोष्टींचा विचार करून आपल्या शेतीपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे...

केळी पिकावरील किडींचे एकात्मिक किड व्यवस्थापन

किडींपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते, केळी या फळपिकावरील महत्वाचे किडीं आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल या लेखात माहिती पाहू. प्रस्तावना : भारत हा केळी जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतात उत्पादीत होणा-या 73.5 दशलक्ष टन फळांचे उत्पादन होते. त्यात केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरर्वाी 7.48 लाख हेक्टरवर लागवड होते व त्यातून सुमारे 27 दशलक्ष टन उत्पादन मिळते. केळी पिकावर सर्वसाधारणपणे 15 किडींचा प्रादुर्भाव होत असून त्यात ..

काकडीवर्गीय पिकांचे कीड व्यवस्थापन

काकडीवर्गीय पिकांवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडी, तसेच फळमाशी, पान खाणारे लाल भुंगेरे, ठिपक्यांचे भुंगेरे, ब्रिस्टल बीटल आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो व त्यामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून काकडी पिकाचे उत्पादन घेताना शेतकर्‍यांनी आपल्या शेतीचे सर्वेक्षण करूनच व्यवस्थापन करावे...

पिवळ्या डेझीवरील तांबेर्‍या रोगाचे नियंत्रण

पिकावर तांबेरा या रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर, अयोग्य निचरा त्यामुळे होणारी बुरशीची वाढ व रोगास अनुकूल वातावरण, प्रामुख्याने सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येतो. डेझीवरील तांबेरा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोगव्यवस्थापन म्हणजे भौतिक तसेच रासायनिक पद्धतीचा एकात्मिक वापर करून रोगाचे योग्य रीतीने व्यवस्थापन करावे, याबद्दल या लेखात माहिती बघू...

गुलाब पिकाचे रोग व्यवस्थापन

गुलाब पिकावर शेंडे मर, पानांवरील ठिपके, भुरी व पानावरील काळे ठिपके हे प्रमुख रोग असून गुलाब पिकाचे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे अतोनात नुकसान होते. रोगांचे नियंत्रण करून नुकसानी टाळण्यासाठी रोगाच्या लागणीचा काळ, हवामानातील घटकांची अनुकूलता, रोगांची लक्षणे आणि रोगनियंत्रणासाठीचे उपाय या गोष्टींची माहिती या लेखात वाचायला मिळेल...

दुधी भोपळा लागवड

भोपळा तिखट व उष्ण असून संधिवात, दाताचे रोग, दातखिळी, धनुवार्यो यांचा नाश करतो. भोपळ्याचा वेळ मधुर, शीतल, तर्पणकारक, गुरु, रुचीकर, पौष्टिक, धातुवर्धक, बलप्रद, पित्तनाशक, गर्भपोषक आहे...

डाळिंब कीड व्यवस्थापन

डाळिंब या व्यावसारिकदृष्टया महत्वाच्या फळ पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी, त्यांचा नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी उपलब्ध व्यवस्थापन पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखाद्वारे याविषयी सखोल माहिती घेऊया...

अंजीर- किड व रोग व्यवस्थापन

अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. या फळपिकावर येणार्‍या प्रमुख किडी आणि रोग आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर उहापोह केला आहे. ..

माळावरील हुमणीचा बंदोबस्त

महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या २५ विविध किडींपैकी हुमणी या किडीचा प्रादुर्भाव काही भागात अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणून हुमणीच्या नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय या हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य नाही...

शाश्‍वत शेती, शेतकर्‍यांची प्रगती

कांदा हे पीक खरीप, रब्बी व लेट रब्बी अशा तीनही हंगामांत घेतले जाते. माझी जमीन काळी, भारीची असल्यामुळे खरीप कांदा यशस्वी होत नाही, हे ध्यानात आल्याने मी रब्बी उन्हाळी कांद्यावर लक्ष केंद्रित केले. पहिली काही वर्षे पारंपरिक पद्धतीने रोपवाटिका करून, रोपांची लागवड पारंपरिक पद्धतीने वाफ्यात भुईदंडाने पाणी देऊन करत होतो. बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करत होतो. या सर्व बाबींवर खर्च जादा होत होता, उत्पादन मात्र कमी येत होते...

डाळींब पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व टिकाऊ किंवा शाश्‍वत बाजारपेठ निर्माण करावयाची असल्यास आपणास डाळिंब उत्पादनात अनेक गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल. या लेखामध्ये अशोक वाळूंज यांनी डाळिंबावरील प्रमुख नुकसानकारक किडींच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत अतिशय योग्यरीत्या मांडणी केली आहे...

कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन विशेषत: शेंदरी बोंडअळीचे

सन 2014 मध्ये ऑक्टोंबरच्या अखेरीस बी टी कपाशीमध्ये शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव गुजरात राज्याबरोबरच आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खानदेश या भागात मोठया प्रमाणावर आढळून आला...

एकात्मिक कीडनियंत्रणाचे घटक

गांडूळ, सापाला जसे शेतकर्‍यांचे मित्र म्हणतात त्याप्रमाणे कामगंध सापळा, चिकट सापळा, प्रकाश सापळा आणि तसेच ट्रायकोडर्मा, व्हर्टिरायझीयम आणि अ‍ॅसिटोफॅगस हे परोपजीवी कीटक शेतकर्‍यांना किडींचा बंदोबस्त करण्यासाठी मदत करतात, याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचायला मिळेल...

तूर पीकावरील कीड व रोग व्यवस्थापन

तूर पीकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण, फुलकिडी, खोडमाशी, पट्टेरी भुंगेरे अशा विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कधी कधी साथीच्या स्वरूपात कीड आढळून आल्यास ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते, म्हणून या किडींची ओळख करून त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ..

भुईमूगावरील प्रमुख किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण

महाराष्ट्रातील तेलबिया वर्गातील भुईमुग हे एक अति महत्वाचे पीक असल्यामुळे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून भुईमुगावरील कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती या लेखात पाहू...

भाजीपाला पीकातील एकात्मिक सुत्रकृमी नियंत्रण

आपल्या देशातील काही भागात भाजीपाला रोपे नानाविध प्रकारच्या परोपजीवी सुत्रकृमींनी ग्रासलेली असतात. या सुत्रकृमींचा प्रादुर्भाव रोपावस्थेत मुळांवर आढळतो. मुळांवरील गाठी आणि मुळांची तसेच रोपांची खुंटलेली वाढ ही रोपांना सुत्रकृमी लागणीची प्रमुख लक्षणे आहेत...

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा : एक प्रभावी साधन

पीकनिहाय क्षेत्रामध्ये कीडनियंत्रणाची कोणती कार्यवाही कधी सुरू करावी हे कळण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. कामगंध सापळ्यांचा वापर कीड सर्वेक्षणासाठी आणि पीक संरक्षणासाठी केला जातो. सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्राकरिता फक्त पाच सापळे लागतात...

शेवग्याने दिली समृद्धी

एक सुशिक्षित बेरोजगार तरुण यशस्वी शेवगा उत्पादक, संशोधक कसा झाला याची ही सफल कहाणी. शेवगा पिकाचे अर्थशास्त्र काय, एकरी उत्पन्न किती मिळते, पाणी किती द्यावे लागते याविषयी मी आडतदारांकडून माहिती मिळवू लागलो. मग केरळ, कर्नाटक, तामिळनाडूतील अनेक शेवगा उत्पादक, कृषी विद्यापीठांना भेटलो. चेन्नई परिसरातील एका शेतकर्‍याकडे 1998 मध्ये चाळीस एकर शेवगा शेती पाहिली...

शेततळ्यात आधुनिक तंत्राव्दारे मत्स्यसंवर्धन

आपल्याला मत्स्यशेती मध्ये भारतीय प्रमुख कार्प माशासोबतच गवत्या, चंदेऱ्या व परदेशी सायप्रिनस माशाबाबत माहिती आहे. आजपर्यंत व्यावसायिकदृष्टया या माशांची शेती आपण केली व करीत आहोत...

सोयाबीन पि‍कातील तण नियंत्रण

सोयाबीन पिकामध्ये येणार्‍या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते...

मूलस्थानी मृदा व जलसंधारण पध्दती : शेतकऱ्यांसाठी वरदान

जमिनीच्या पूर्व मशागत आणि पीक पेरणी पद्धतीत करावराची आवश्यक तांत्रीक कामे कशी करावीत. यासाठी हे मार्गदर्शन पावसामुळे मातीची होणारी धूप कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे पावसाचे पडणारे पाणी वाहून ते वारा जाऊ न देता जागच्या जागी जमिनीतच जिरवल्यामुळे पाण्याच्या जमिनी अंतर्गत असणारे प्रवाहमार्ग आणखी वाढतील. पृष्ठभागावरील वाहून जाणारी माती थोपवली जाईल, मुख्य जलप्रवाह गाळ विरहित राहतील...

हवामान व शेती, कृषी तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील बव्हुंशी शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक पाणी पुरवण्याची साधने अपुरी आहेत. यासाठी शेतकर्‍यांना पाऊस व हवामान याची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीत ही गरज आणखी वाढली आहे. डॉ. साबळे जेष्ठ हवामान तज्ञ यांचा हा लेख वाचा...

हवामान बदलानुसार पीक पध्दतीतही बदल हवा

हवामान बदल हे एक मोठे संकट शेतकर्‍रांपुढे उभे राहिले आहे. तापमान वाढीमुळे हवामानात सतत मोठे बदल होताना आपल्याला दिसत आहेत, जागतिक तापमानातील होणार बदल थांबविणे हे शेतकर्‍राच्या हातात नाही. परंतु त्यापासून होणारे नुकसान आपल्याला काही प्रमाणात कमी करता येऊ शकते...

गांडूळ शेती समृद्धीची एक वाट

गांडूळ खत आणि त्याची जमिनीमधील उपस्थितीची उपयुक्तता हे निर्वावादपणे सर्वसामान्य गोष्ट आहे. गांडूळ खत तरार करणेसाठी फार कमी खर्च रेतो. पण त्यापासून मिळणारे खताचे मूल्य - अमूल्य असते...

डाळिंबाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

डाळिंबापासून रस, कार्बोनेटेड शितपेये, अनारदाणा, जेली, सिरप, दंतमंजन, अनारगोळी ते अनेक पदार्थ तयार करता येतात. ह्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरात चांगली मागणी असते. म्हणून उत्पादकांनी डाळिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावे. ..

आडसाली ऊसाची लागवड

साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्‍रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली तर ऊसपिक हे एक शाश्‍वत उत्त्पन्न देणारे, बाजारात सहजतेने विक्री होणारे आणि विक्रीमूल्याची हमी असणारे असे आहे...

ठिबक सिंचनाने वाढवा कापूस उत्पादकता

महाराष्ट्रातील कमी उत्पादकतेच्या कारणांचा अभ्यास केला असता अयोग्य जमिनी लागवड, असंतुलित खतव्यवस्थापन, रस शोषणार्‍या किडींचे अयोग्य व्यवस्थापन आणि सिंचनाचा अभवा या कारणांचा समावेश होतो...

पत्ताकोबीची यशस्वी लागवड

सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास पानकोबीच्या हळक्या जातींचे सरासरी हेक्टर 30 ते 40 टन आणि गरव्या जातींचे सरासरी हेक्टरी 40 ते 50 टन उत्पादन मिळते. ..

पालक उत्पादन तंत्रज्ञान

पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच ह्या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे...

मिरची लागवड सुधारीत तंत्रज्ञान

मिरचीमध्ये नवनवीन वाण आणि लागवडीचे तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे. मिरचीचा तिखटपणा, आकार आणि उपयोग यावरून मिरचीच्या जातीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. ..

मेथी उत्पादन तंत्रज्ञान

त मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. ..

मका लागवड तंत्रज्ञान

जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहु व भात या पिकानंतर मक्याचा क्रमांक लागतो. उपलब्ध तृणधान्यपिकांच्या तुलनेत विक्रमी उत्पादन देण्याची क्षमता मका ह्या पिकात आहे म्हणूनच मका या पिकास तृणधान्य पिकांची राणी असे म्हणतात...

कोथिंबिरीची यशस्वी लागवड

कोथिंबरीचे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. विविध प्रकारच्या जमिनींत हे पीक घेता येते, परंतु मध्यम वाळूमिश्रित पोयट्याची सुपीक जमीन या पिकास मानवते. ..

खरीप भुईमूग लागवड तंत्रज्ञान

भुईमुगावरील टिक्का व तांबेरा रोगाच्या किफायतशीर व्यवस्थापनासाठी ट्युबॅकोनॅझोल 25.9 ई.सी. (फॉलिक्युअर) या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया 1.5 मिली / किलो बियाणास करावी व याच बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या (1 मिली / लि. पाणी) कराव्यात. पहिली फवारणी रोगाची लक्षणे आढळून आल्यास घ्यावी व दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने घ्यावी. ..

कांदा लागवडीची सुधारित पद्धत : जैन इरिगेशन

कांदा हे जगात सर्वत्र महत्त्वाचे कंदवर्गीय भाजीपाला पीक आहे. पावसाळी कांद्याला जरी कमी सिंचन लागत असले, तरी हिवाळी, उन्हाळी, अर्धखरीप या हंगामांसाठी हमीचे सिंचन साधन हवे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये जैन ठिबक, जैन मायक्रोस्प्रिंकलर यांचा उपयोग केल्यास दर्जेदार उत्पादन हे दीडपट ते सरासरीच्या दुपटीने वाढते...

द्राक्षवेलींची पावसाळ्यातील काळजी

एप्रिल छाटणीनंतर 7 जूनपासून पावसाळ्याला प्रारंभ होत असतो. या कालावधीत द्राक्षवेलींची पाने वयात येऊन अन्न बनवितात आणि त्यांचा साठा द्राक्षवेलीत करीत असतात. जून ते सप्टेंबर या महिन्यांतील पावसाळ्यात द्राक्षवेलींची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी...

ढोबळी मिरची लागवड

ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से. पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो...

भाजीपाला काढणीदरम्यान व काढणीपश्‍चात व्यवस्थापन

भाजीपाल्याच्या काढणीनंतर वाहतूक मात्र विनाविलंब झाली पाहिजे. विक्रीव्यवस्थेदरम्यान भाज्यांची प्रत आणि आयुष्य उत्तम टिकविण्यासाठी कमीत कमी नुकसान होणारी, जलद आणि स्वस्त वाहतूक असावी...

अळू लागवड तंत्रज्ञान

अळूला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कडाक्याच्या थंडीत अळूच्या पानांची वाढ खुंटते. अळूच्या लागवडीसाठी सरासरी 21 अंश-22 अंश सेल्सियस तापमान असावे. रेताड आणि भुसभुशीत जमिनीत अळू चांगला फोफावतो. अळू हे पीक चोपण, खारपड जमिनीत तसेच सांडपाण्याच्या जागेतसुद्धा पानांसाठी घेता येते...

आले : अधिक उत्पादन आणि प्रत मिळण्यासाठी हरितगृहातील लागवड तंत्रज्ञान

योग्य मशागत व व्यवस्थापन असल्यास ओल्या आल्याच्या गड्ड्यांचे उत्पादन प्रति एकरी 12 ते 15 मे. टन बाहेरील क्षेत्याच्या लागवडीपासून मिळते. हरितगृहामध्ये आल्याची लागवड केल्यास प्रति झाड 50 ते 60 टक्के गड्ड्यांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त मिळून उत्पादन मिळण्याची खात्री असते...

कडधान्याचे बीजोत्पादन

आपल्या आहारामध्ये प्रथिनांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील बहुसंख्य लोक शाकाहारी असल्यामुळे प्रथिनांचा पुरवठा त्यांना कडधान्यांमधून किंवा डाळींतून होतो. आपल्या देशातील कडधान्यांचे उत्पादन प्रजेची गरज भागविण्यासाठी पुरेसे नसल्यामुळे कडधान्यांची आयात दरवर्षी परदेशांतून करावी लागते. ..

नैसर्गिक गांडूळखत

रासायनिक खतांच्या दिवसेंदिवस वाढणार्‍या अवाजवी किमती व खतांची न होणारी उपलब्धता, जमिनीचे प्रदूषण या समस्या कमी करावयाच्या असतील तर आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे सेंद्रिय नैसर्गिक खतांचा वापर. ..

कापूस उत्पादन वाढीचे तंत्र

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कापूस हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापसाच्या खरीप 2013 हंगामासाठी 95 लाख एकर क्षेत्रामध्ये लागवड झाली आहे, परंतु प्रति एकरी सरासरी उत्पादन केवळ 5.5 क्विंटल आहे, जे आपल्या शेजारील गुजरात राज्यामध्ये 11 क्लिटंल आहे. याचाच अर्थ आपणास कोरडवाहूमध्ये दुप्पट उत्पादनवाढ करण्याची संधी आहे. ..

सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान

भुईमूग पिकानंतर सूर्यफूल पीक महत्त्वाचे आहे. सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण साधारणतः 35 ते 45 टक्के असून, तेलकाढणी झाल्यानंतर शिल्लक असणारी पेंड जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते. सूर्यफुलाच्या काडापासून हिरवळीचे खत, जळण, मुरखास तसेच भरखतसुद्धा व्यवस्थित मिळते...

सोयाबीन लागवड तंत्र

मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी, गाळाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते. हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते. ज्या जमिनीत पाणी साठून राहते त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही...

आले अधिक आर्थिक फायद्याचे पीक

आले पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचर्‍याची सेंद्रिययुक्त तांबडी जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीतसुद्धा आले पीक येऊ शकते. परंतु अशा प्रकारच्या जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी व जमिनीची प्रत सुधारण्यासाठी.....

देशी गाईचे महत्त्व

पंचगव्याचा शेतीसाठी खूप उपयोग आहे. वृक्ष आयुर्वेद भागात याचे वर्णन आहे. आधुनिक कृषितज्ज्ञांनीही यावर खूप प्रयोग केले आहेत. गोमूत्र व कडुलिंबाच्या पानांपासून बनविलेले औषध कीटकनाशक व मच्छर प्रतिबंधक आहे...

रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवड

खरीप हंगाम (जून महिना) सुरू झाल्यावर नैर्ऋत्य मान्सून वार्‍यांपासून पावसाला चांगली सुरुवात होते व साधारणत: 100 ते 150 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाल्यावर या पिकाची पेरणी केली जाते. ..

आडसाली उसाची लागवड

ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. या पिकाखालील क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत आहे; परंतु अजूनही उसाची शेती प्रगत तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने केली जाते. कारण संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, विस्तारकेंद्र यांच्याकडील आधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जलदरीत्या सामान्य शेतकर्‍यापर्यंत म्हणावे तसेच पोहोचत नाही. म्हणून ऊस लागवडीमध्ये प्रगत तंज्ञानाचा वापर करून उसाचे प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळविणे अनिवार्य झाले आहे...

खरीप पिकांसाठी जैविक खतांची बीज प्रक्रिया महत्त्वाची

बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर केले जात असल्यामुळे जमिनीला दिल्या जाणार्‍या रासायनिक खतांची मात्रा कमी द्यावी लागते...

खरीप ज्वारी पिकांचे लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पूर्व खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांत हे पीक सर्वसाधारणपणे घेण्यात येते. ज्वारीचे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत घेतले जाते. ज्वारीची उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्राची माहिती येथे दिली आहे...